जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19

Primary tabs

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
16 May 2020 - 12:56 am

फारच निराशा वाटतेय आज
आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले
आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे
सामान संपत चालले आहे
सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही
अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय
सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत
काय होणार कळत नाही

******************************

प्राजक्ता २१ यांचा हा प्रतिसाद वाचून बरेच दिवस टंकाळा करत असलेला अनुभव शब्दबद्ध करूयाच असा विचार केला.

लॉकडाऊनच्या दुसर्‍याच आठवड्यात आमच्या सोसायटीमध्ये एक पेशंट सापडला. मी जिथे राहत आहे तेथील अनेक रहिवासी "अत्यावश्यक सेवा" गटातील असल्याने सोसायटीमध्ये लवकरच करोना पेशंट सापडेल याची शक्यता वाटत होतीच. त्याप्रमाणे एक दिवस संध्याकाळी बातमी आली की अमुक अमुक फ्लॅटमधील तमुक तमुक सरांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.

नंतर एकच धांदल उडाली आणि सोसायटीचे सर्वच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप खर्‍याखोट्या माहितीने भरून वाहू लागले.

"नक्की काय झाले आहे" ही माहिती खूप कमी लोकांना होती आणि बहुदा त्यांना या कठीण परिस्थितीत "सबसे तेज" वगैरे व्हायचे असावे.. करोना पॉझिटिव्ह असलेल्या सरांचा मेडिकल रिपोर्टच कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मात्र या मेसेजकडे लोकांनी दुर्लक्ष केले असावे कारण थोड्यावेळाने चर्चा सुरू झाली, की ज्या सरांना करोना झाला आहे त्यांचे नांव गुप्त ठेवायला हवे वगैरे वगैरे..

मी या सगळ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ऑफिसचे काम करण्यात गुंतवून घेतले.

यथावकाश कॉर्पोरेशनचे लोक गेटवर पहार्‍यासाठी येऊन बसले आणि सोसायटीच्या सगळ्या वाटा रोखल्या गेल्या. एक फ्लेक्सही आणून लावला. त्यावर "या परिसरातील एक रहिवासी करोनाबाधीत आढळल्याने या भागातील प्रवेशावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले आहेत" अशी सूचना आणि "उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल" असा लाल रंगात आदेशही रंगवला होता. सोबत आपत्कालीन विभाग, तक्रार निवारण अधिकारी यांचे फोन नंबर आणि एक ट्विटर हँडल अशी सर्व माहिती होती.

सोसायटीमधील कांही लोकांनी पुढाकार घेऊन एक टास्क फोर्स स्थापन केला आणि पुढील पद्धतीने क्वारंटाईन / आयसोलेशनची काळजी घेतली.

१) प्रत्येक बिल्डिंगचे लिडर ठरवले. सोसायटीत १५ बिल्डिंग आहेत. त्या १५ लिडर्सनी मिळून आपआपल्या बिल्डींगमध्ये फ्लोअर लिडर ठरवले. सोसायटीच्या ग्रुपवर सूचना देऊन सामुदायिक गोंधळ व प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देण्याऐवजी; सर्व महत्वाच्या सूचना त्या त्या लिडर्सना दिल्या गेल्या आणि बिल्डिंगनुसार त्या पुढे सरकवल्या गेल्या.

२) भाजी, दूध यांची सोय सोसायटी / कॉर्पोरेशनने मिळून केली आणि शक्य आहे त्या सर्व प्रकारच्या भाज्या, रोजचे दूध, दही, ताक वगैरे सोसायटीच्या गेटवर मिळेल याची व्यवस्था केली. अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट आणि सुपर डेली वगैरे सर्व डिलिव्हरी एजंट्सना गेटपाशीच थांबवले गेले. याची सुरूवात खरेतर लॉकडाऊन नंतर लगेच झाली होती, त्यावेळी मेन गेट उघडे असायचे. पॉझिटिव्ह पेशंट सापडल्यानंतर गेट बंद झाले व वस्तूंची डिलिव्हरी गेटवरून होऊ लागली.

३) सोसायटीमध्ये राहणार्‍या वय वर्षे ६० च्या वरच्या सर्व ज्येष्ठ लोकांची एक यादी करण्यात आली आणि त्यांना असलेले आजार विस्तृतपणे नोंदवून त्याचा एक डेटाबेस तयार केला.

यानंतरच्या आठवड्यात आंम्ही राहतो त्या बिल्डिंगमध्येच आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली.

मग आमच्यासाठी नियम आणखी कडक झाले. पूर्वी बिल्डिंग ते मेन गेट असे जाऊ शकत होतो; ते ही बंद झाले. लोकांना घरातून बाहेर पडायचे नाही याच्या सक्त सूचना दिल्या गेल्या. लिफ्ट बंद करण्यात आली आणि जिन्याच्या प्रवेशद्वाजवळ बॅरीकेट रचून जिना बंद करण्यात आला.

यानंतर जे सामान आंम्हाला गेटपर्यंत जाऊन घ्यावे लागत असे ते सामान घरात कसे मिळेल याची आखणी करण्यात आली आणि बिल्डिंग लिडर्सनी सिक्युरीटी गार्डच्या मदतीने रोज आमच्या बिल्डिंगचे सामान गेटपासून तळमजल्यापर्यंत आणले जाईल याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने फ्लोअर लिडर तळमजल्यावर येत आणि आपल्या मजल्यावरचे सामान घेऊन जात.

साधारणपणे अशी व्यवस्था होती..
१) संपूर्ण सोसायटीसाठी, भल्यापहाटे दुधाच्या पिशव्या तर दुपारी कधीतरी भाजीच्या पिशव्या सोसायटी गेटवर पोहोचत असत. (भाजी व फळांची लिस्ट एक दिवस आधी गोळा केली जाई)
२) त्यातल्या आमच्या व पहिला पेशंट सापडलेल्या बिल्डिंगच्या पिशव्या वेगळ्या करून सिक्युरिटी गार्ड त्या त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पोहोचवत असत.
३) सिक्युरिटी गार्ड कडून हिरवा झेंडा मिळाला की बिल्डिंग लिडर पहिल्या मजल्यावरच्या फ्लोअर लिडरला सूचना देई की तळमजल्यावरून सामान घेऊन जाणे. पहिल्या मजल्याचा लिडर सामान घेऊन घरात पोहोचला की मग दुसर्‍या मजल्यावरचा लिडर बाहेर पडून तळमजल्यावरून सामान घेऊन जाई.. अशा प्रकारे एका मजल्यावरच्या लोकांचा दुसर्‍या मजल्यावरील लोकांशी १००% संपर्क टाळला गेला.

हे सर्व कम्युनिकेशन वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवून केले गेले. (सोसायटी लिडर्स, बिल्डिंग लिडर्स आणि फ्लोअर लिडर्स)

यथावकाश सोसायटीवर आलेले निर्बंध आणखी कोणत्याही पॉझिटिव्ह केस शिवाय हटवले गेले.

नंतरची चांगली बातमी म्हणजे आमच्या सोसायटीमधील दोन्ही पॉझिटिव्ह पेशंट बरे होऊन घरी परतले. त्यावेळी त्यांचे स्वागत घंटा / थाळ्या वाजवून आणि रोषणाई करून करण्यात आले.

***********************************************************

आता हे झाले सोसायटीच्या पातळीवर.. आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला आणि पुढील गोष्टी ठरवल्या. तुम्हाला त्या उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे.

घरी महत्वाच्या वस्तूंची साठवणूक, घरकामाची विभागणी वगैरे मुद्दे सोडून देऊ.. आत्तापर्यंत सर्वांना याचा अंदाज आला असेलच.

१) सोसायटीमध्ये जे लोकं पुढाकार घेऊन सर्व गोष्टी मॅनेज करत आहेत त्यांना सहकार्य करा. त्यांना सर्व गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या.

२) जगभरात कशी वाईट परिस्थिती आहे आणि भारतात / महाराष्ट्रात / पुण्यात / गल्लीत किती रूग्ण सापडले वगैरे अनावश्यक ब्रेकिंग न्युजचा ताण येत असेल तर सरळ टीव्ही बंद करा आणि दुसरे एखादे हलके फुलके चॅनेल किंवा पुस्तकं यांच्याकडे मोर्चा वळवा.

३) सतत टीका करणारे, फेसबुकवर वचावचा भांडणारे आणि नेहमी निगेटिव्ह राहणार्‍या लोकांना फाट्यावर मारा. आपली मनस्थिती उत्तम ठेवा.

४) होम वर्कआऊट सारखे एखादे अ‍ॅप मिळवा आणि शक्य तितका व्यायाम करा. मला या अ‍ॅपबद्दल सायकल सायकल ग्रुप / निनाद आचार्य कडून कळाले.

५) आपल्या आजुबाजूच्या मेडिकल / किराणा दुकानदारांचे नंबर हाताशी ठेवा. क्वारंटाईन असताना ते आपल्याला आवश्यक त्या वस्तू सोसायटी गेटवर पोहोचवू शकतात.

६) हात धुवत राहणे आणि बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे / आंघोळ व सर्व कपडे धुणे यांत कोणताही आळस करू नका.

७) क्वारंटाईन दरम्यान झोपेचे शेड्युल सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. मी सुरूवातीला पहाटे ४ पर्यंत जागे राहून वेब सिरीज बघणे, पुस्तके वाचणे वगैरे उद्योग केले पण आता ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे.

******************************************************

एकूण काय.. थोडे दिवस क्वारंटाईन मध्ये काय होणार हा प्रश्न पडला, पण सोसायटीमधील दक्ष नागरिकांच्या मदतीने कोणाचीही कोणतीही गैरसोय झाली नाही. सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले.

हा झाला माझा अनुभव.. तुमचेही अनुभव लिहा आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी कांही सूचना असतील तर नक्की सांगा.

******************************************************

जीवनमानप्रकटनप्रतिसादअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

16 May 2020 - 1:42 am | कानडाऊ योगेशु

सर्वांनी स्वयंप्रेरित होऊन कामे केली हे पाहुन चांगले वाटले. आपत्ती निमित्त असा एक चांगला बदल लोकांच्या मानसिकतेत घडतो आहे.

सतीश विष्णू जाधव's picture

16 May 2020 - 1:48 am | सतीश विष्णू जाधव

मोदक,

छान व्यक्त झालास...

आता करोनाचा विचार बंद.

करोना सोबतच आता जगायचे आहे याची खुणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे.

माझ्या सर्व गृपवर करोना बाबत सर्व गोष्टी जसेकी; चर्चा , पोष्ट, मेसेज, ब्रेकिंग न्यूज सर्व बंद केले आहेत.

मानसिक ताण तणावातून बाहेर पडण्यासाठी सध्या प्रत्येक जण आपले छंद सांगतोय.

सॉलिड धम्माल येतेय. बालपणात केलेल्या गमतीजमती वाचल्यावर खूप हलके वाटते.

काहीजण वाचत असलेल्या पुस्तका वर चर्चा करीत आहेत

नातू आणि नातीबरोबर केलेल्या गमती जमती मी शेअर करतोय.

आताचा प्रत्येक क्षण उस्फुर्तपणे कसा जगता येईल हेच महत्वाचे आहे.

मन स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा सुद्धा फार उपयुक्त आहे.

सतीश जाधव

परिस्थिती छान आणि विचारपूर्वक हाताळली.
ब्राव्हो !!

सस्नेह's picture

16 May 2020 - 7:15 am | सस्नेह

मला अत्यावश्यक सेवा असल्याने रोज कामावर जावे लागते.
मास्क आणि सॅनिटायझर तर आहेच.त्याखेरीज इतर दक्षता काय घेता येईल समजत नाही. शारीरिक अंतर कामाच्या स्वरुपामुळे जमतेच असे नाही. कागद हाताळणे टाळता येत नाही.
कोरोनासोबत कसे जगायचे याचाही धागा काढा बॉ.

नेत्रेश's picture

16 May 2020 - 7:43 am | नेत्रेश

डॉक्टर वापरतात तसले लेटेक्स ग्लोव्हज वापरु शकता.

अथवा कागदाला हात लावण्यापुर्वी कागस निर्जंतुक करण्यासाठी अल्टाव्हायलेट (UVC) चा वापर करा. अल्टाव्हायलेट कीरणाची वेव्हलेंग्थ २५० ते २८० नॅनोमीटर हवी.

हा Disinfection Lamp फोनला लागतो, जमले तर ऑर्डर करा:

https://www.banggood.com/5V-Type-C-Port-Ultraviolet-Disinfection-Lamp-Bo...

व्हायरस बद्द्ल ची सर्व आवशक्या बातमी मिळाली आहे.

न्यूज बघणे पूर्ण पने सोडले आहे न्यूज वाले उगाचच भयंकर शब्द वापरून सत्य परिस्थिती चा विपर्यास करतात.
न्यूज बघणे सोडले की मानसिक स्वस्थ उत्तम राहते.
निगेटिव्ह पोस्ट n bachne, negetive बोलणाऱ्या लोकांना फाट्यावर मारणे हे मन स्वस्थ चांगले राहण्यासाठी गरजेचे आहे.
रोज नियमित व्यायाम तुम्हाला फीट ठेवतो .
नियमित व्यायाम केल्यामुळे,.
झोपेची समस्या येत नाही योग्य वेळी योग्य वेळ झोप लागते.
पचन संस्था ठीक राहणे आणि अस्वस्थ वाटणाऱ्या तक्रारी येत नाहीत.
आणि गरजा कमी करा जे उपलब्ध आहे तेच वापर करा.
हे सर्व मी पाळतो.
अजून तीन चार महिने लॉक डाऊन राहिले तरी मी ते एन्जॉय करू शकतो.
असा विश्वास आहे.

शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी एकत्रितपणे हाताळलेली परिस्थिती . सुंदर उदाहरण .

तुमच्या सोसायटीतील उदाहरण चांगले आहे.

त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या.

ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही.
अशावेळी आपण वैयक्तिक स्वतःच्या पातळीवर किमान खालील गोष्टी करू शकतो.
१. स्वतःची जमेल तितकी काळजी घेणं.
२. उगाच, टाईमपास, पाय मोकळे करायला, मला काय होत नाही, मला अमुक खाऊशी वाटतंय म्हणून तमुक आणायला, घराबाहेर पडणं टाळणं.
३. खरे खोटे कसलेच मेसेज न पसरवणे.
४. जमल्यास, येताजाता घरात अथवा फोनवर, समाज माध्यमांवर फालतू चर्चा (ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही) न करणं
५. जर कुणी मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक निष्काळजी पणा करत नसेल तर निगेटिव्ह टिपण्णी अथवा टीका टाळून आपलं मत (लई आग्रह न करता ) मांडणं.
६. जग खूप सुंदर आहे, फक्त भांडण अन् मतभेद सोडून देता आले पाहिजेत.

सुबोध खरे's picture

16 May 2020 - 7:39 pm | सुबोध खरे

ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही.
अतिशय योग्य लिहिलंय

जो ऊठतो तो श्री मोदी, श्री केजरीवाल किंवा श्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर मध्येच लॉक डाऊन करायला पाहिजे होता, पासून लॉक डाऊन मुळे गरीब लोक कसे उपाशी मरत आहेत याना अक्कल नव्हती का लॉक डाऊनची गरजच काय? सारखे तारे तोंडत आहेत.

(अशा अनेक दीड शहाण्याआणि हलकट लोकांना समजवायचे प्रयत्न मी कधीच सोडून दिले आहेत).

पक्ष कोणताही असो, राज्यकर्त्यांनी निर्णय घेतले ते चूकही असतील परंतु त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत.

हा विचार न करता आपल्या विरोधी पक्षाच्या राजकारण्यांवर गरळ ओकायची एकही संधी असले नतद्रष्ट लोक सोडत नाहीत.

तुम्ही काय करताय? या प्रश्नाला यांच्याकडे उत्तरच नाहीये

चौकस२१२'s picture

17 May 2020 - 5:46 am | चौकस२१२

झकास उत्तर
पण दुरदैवाने लोकांना फालतू चर्चा हव्यात
- हे सगळं थोतांड आहे
- हजारो मेले ते कोविद मुले नाही
- सरकार बसल्या खटल्यावर वाढून का देत नाही ..
त्या पेक्षा ट्रम्प तात्यांनी तोडलेले तारे परवडले असे म्हणण्याची वेळ आली
असो
जमावबंदी आणि घरबंदी येथे दक्षिण गोलार्धात आत टप्य्या टप्प्याने कमी होत आहे .. त्यात येडपटासारखे वागणारे इथेही आहात तेव्हा आता पुढे काय होतंय ते बघुयात
त्यात आता थंडीला सुरवात झाली त्यामुळे त्याचाही काय परिणाम होतोय
या आठदवद्यपासून रेस्टारंट चालू ( १० लोक जास्तीत जास्त)
- समुद्र किनारे आणि सरकारी उद्याने उघडली
- १ अथडवड्याने शाल पूर्ण सुरु
- समूह जास्ती जास्त १० जन
- घरी पाहुणे जास्तीत जास्त ५ जण
- प्रवास जास्तीत जास्त १५० किम पर्यंत आणि दुर्गम प्रदेशात ५००न किमी पर्यंत
२.७ कोटी लोकसंख्येत
७००० रुग्ण, त्यातील ६३०० बरे झाले , ९८ मृत्यू
४६ हॉस्पिटल मध्ये, १७ अतिदक्षता विभागात
१० लाख चाचण्या

उपेक्षित's picture

21 May 2020 - 1:30 pm | उपेक्षित

पैलवान आणि डॉक १००% सहमत,
२ महिन्यांनी काही महाभाग लॉकडाऊन कशाला केले म्हणून किनार्यावर बसून दगड मारीत आहेत पण हे खरोखरच आवश्यक होते.
आता प्रशासन, मोडी, उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चुका निश्चित झाल्या असतील नाही असे नाही पण त्यांचा उद्देश नक्कीच चांगला होता (वयक्तिक मी मोदींचा टीकाकार आहे पण सध्याची वेळ ती नाहीये)

मुळात कोरोनाचे संकटाच असे होते कि जगात कुणाकडेच याची उपाययोजना नव्हती सगळे ट्रायल आणि एरर बेसिस वर काम करत आहेत.

जाता जाता मोदक भाऊ उत्तम प्रकारे शब्दांकन केले आहेस रे याबद्दल तुला माझ्याकडून {लॉकडाऊन उठल्यावर :P } खिला-रे एग्स मध्ये पार्टी. ;)

गणेशा's picture

29 May 2020 - 7:43 am | गणेशा

@ सुबोध खरे..

आज वाचायला घेतला हा धागा.. ह्या असल्या चर्चेत भाग घेतलेला नाहीच..

पहिल्यादा आपले विचार एक वाटले यावेळेस..
माझे पण सेम म्हणणं आहे..

राजकारण नंतर बघू.. कोण उगाचच मुद्दाम कशाला काय करेल..

Copy करतोय मेसेज ची.. अनेक group वर हमरी तुमरीत काय बोलत नाही आता असे msg होते.. तेथे टाकतो हा msg

चांगली चर्चा

सर्वांचे मार्गदर्शनबद्दल आभार आणि शुभेच्छा
आमच्या इथे औषध फवारणी झालीये काल
@मोदक सर -आपल्या इथली परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे आपल्याला शुभेच्छा
@सुबोध खरे सर-आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

वामन देशमुख's picture

18 May 2020 - 9:39 am | वामन देशमुख

अनुभवकथन आवडले, मोदक.

मला माझ्या सोसाइटीत आणि परिसरात (सुदैवाने!) अजूनतरी कोरोना रुग्ण सापडण्याचा अनुभव नाही. तुम्ही दिलेल्या सूचना आणि केलेले घटनांचे वर्णन यातून अनेक बाबी समजल्या आणि इतर अनेक बाबींची स्पष्ट जाणीव झाली.

>>> सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले.

हा कळीचा मुद्दा आहे.

आम्हीही आमच्या सोसाइटीत अनेक कडक निर्बंध घातले आहेत आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल करत आहोत. ९८% (हा आकडा precise आहे!) रहिवासी सहकार्य करतात आणि उरलेले काही-ना-काही खुसपट काढत राहतात. अर्थात सोसाइटी सांभाळणं हा thankless job (मराठी?) आहे आणि त्याउलट अनेकांचे शिव्याशाप ऐकावे लागतात ते वेगळेच.

सोसाइटीच्या कायप्पा समूहात पोस्ट केलेले काही संदेश -

२५ मार्च २०२०

Important Update

Dear Residents,

Considering alarming news-reports about multiple COVID-19 infections in areas in Hyderabad, the regulatory directions include but not limited to, the following -

1. Let's ALWAYS wear masks to step out of our home
2. Let's maintain social distance (no groups roaming around)
3. Let's rub sanitizer on hands when necessary
4. Let's avoid using lifts whenever possible (to avoid touches)
5. Let's NOT step out of our premises unless very urgent and important
6. Let's NOT invite outsiders into our premises
7. Let's not allow outsiders into our premises except -
a. Cooking gas cylinder delivery persons
b. Plumber
c. Electrician
(These persons are allowed only with mask, gloves and are sanitized)
8. Let's collect outside delivery from security gate
9. Let's dump garbage ONLY in the bins, no door-to-door collections
10. Lets follow regulatory guidelines very strictly

All the common amenities, including clubhouse, library, gym, yoga-room, kids' play area, sports courts, swimming pool will be closed till further notice. Any delivery from outside, milk, newspapers, flowers etc will be done only till security gate. Residents are to collect the stuffs from there.

Our society is infection-free, at least till now. Let's be extra cautious for the safety of ourselves, our family members and our neighbours. Thank you for abiding by the regulatory directions that we recieved from Police and other regulatory bodies.

Stay home, stay safe. Thank you.

-Team EC

२७ मार्च २०२०

IMPORTANT AND URGENT:

Vegetables in Our Premices

Dear Residents,

We have spoken to municipal commissioner and CI, *** PS for the arrangement of vegetables sale in our premises.

The authority will visit our premises and make necessary arrangements for the sale of vegetables with all the regulatory precautions.

*. Proper space will be allocated for the seller.
*. Lime / muggu markings with one meter distance will be put for the buyers.
*. The seller will have masks and gloves.
*. Sanitization and hygiene will be maintained.
*. The sale timings will be as per regulatory norms.
*. Residents my avail this hygienic arrangement as per their requirement.

Let's buy vegetables / groceries only from the authorised sources. Let's prevent COVID-19 virus enter our premises.

Thank you.

-Team EC

तुषार काळभोर's picture

18 May 2020 - 5:47 pm | तुषार काळभोर

Let's हा शब्द वापरल्याने वेगळे (आणि चांगले) वाटले.

वामन देशमुख's picture

20 May 2020 - 6:16 pm | वामन देशमुख

शब्द जरी करूया (Let's) असे आवाहनात्मक असले तरी अंमलबजावणी अगदी कडक सुरू आहे!

उद्यापासून थोड्या प्रमाणात सूट द्यायचा खल सुरु आहे.

सूट देताना लोकांच्या काय काय मागण्या येऊ शकतात हे थोडेसे विचार करून त्या मान्य करायच्या की नाही हे आधीच ठरवा आणि त्यानुसार सोसायटीच्या कमिटीच्या निर्णयात एकवाक्यता असूद्या.

उदा. लोकांना सोसायटीच्या आवारात फेर्‍या मारायची विनंती येईल - याला होकार द्यायचा की नकार.. आणि का..?

योग्य सूचना दिल्या आहेत.

या लॉकडाऊन आणि एकंदर संकटामुळे लोकांना अनेक गोष्टींची नव्याने जाणीव झाली आहे हा त्यातल्या त्यात चांगला भाग..

मराठी कथालेखक's picture

19 May 2020 - 11:52 pm | मराठी कथालेखक

आपली इमारत किती मजली आहे ?
लिफ्ट बंद ठेवली असताना सामान घेवून आपापल्या मजल्यावर जाणे सदर फ्लोर लीडर्स साठी त्रासदायक ठरले का (खासकरुन जास्त वरच्या मजल्यांकरिता). हे क्वारंटाईन किती दिवस चालू होते ?

सात मजली बिल्डिंग आहे. सामान जिन्याने नेणे सर्वांना सोयीचे आणि सुरक्षित वाटले.

हे क्वारंटाईन साधारणपणे २१-२२ दिवस चालले.

मराठी कथालेखक's picture

20 May 2020 - 2:06 pm | मराठी कथालेखक

तुमच्या बिल्डिंग वा सोसायटीतील ज्यांना अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर जायचे असेल त्यांना या काळात बाहेर जाता आले का ?
तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ? सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ?
तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ?

मोदक's picture

20 May 2020 - 8:34 pm | मोदक

>>>तुमच्या बिल्डिंग वा सोसायटीतील ज्यांना अत्यावश्यक सेवेकरिता बाहेर जायचे असेल त्यांना या काळात बाहेर जाता आले का ?
नाही.

>>>तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ?
फक्त आमची सोसायटी सील केली होती. सोसायटी जवळची म्हणजे साधारण ५०० / ७०० मीटरपेक्षा लांब असलेली दुकाने सुरूच होती. त्या भागातील दुकानदारांचे मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर केले गेले. किराणा मालाची व्यवस्था त्या त्या दुकानदारांनी केली. भाजी आणि दुधाच्या पिशव्या अशाच पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. हे सर्व सामान गेटमधून आत दिले जात होते. सोसायटीच्या आतून कोणालाही बाहेर जाण्याची आणि कोणालाही बाहेरून आत येण्याची परवानगी नव्हती.

>>>सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ?
फळभाजी विक्रेता आणि किराणा दुकानदारांचे नंबर वगैरे व्यवस्था प्रशासनाने केली. पालिकेचे अधिकारी सोसायटीला नियमीतपणे भेट देत होते.. पोलिस पाहिले नाहीत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येऊन सॅनिटायझेशन, धूर मारणारी यंत्रे आणून फ्युमिगेशन असे बरेच कांही सतत सुरू होते. वयस्कर लोकांच्या तब्बेतीचे अपडेट घेतले जात असावेत. आमच्या तब्बेतीचे अपडेट्स कुणीही विचारले नाहीत.

>>>तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ?
सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश लोक अत्यावश्यक सेवेत असल्याने आजिबात नकारात्मक सूर उमटला नाही. "त्यांच्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे" असा विचार मुळीच केला गेला नाही. उलट एकदा एका पेशंटच्याच घरी कोणत्यातरी वस्तूची आवश्यकता असताना तातडीने त्या त्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोचवल्या गेल्या.
सिक्युरिटी गार्डच्या जेवणाची काळजी सोसायटीमधील सर्वांनी उत्साहाने पार पाडली आणि जनरल औषधे किंवा कांहीही गोष्टींची आवश्यकता लागल्यास सर्वांनी बिन्धास्त सोसायटी गृपवर मेसेज पाठवून सोसायटीमध्येच सगळ्या गोष्टींची सोय शोधली.

मराठी कथालेखक's picture

20 May 2020 - 11:31 pm | मराठी कथालेखक

सिक्युरिटी गार्ड्सना घरी जाण्याची परवानगी होती का ? नसल्यास ते कुठे झोपायचे ?
तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ?
एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ?

>>>सिक्युरिटी गार्ड्सना घरी जाण्याची परवानगी होती का ? नसल्यास ते कुठे झोपायचे ?
सिक्युरिटी गार्ड्सनी घरी जाण्याचे प्रमाण कमी केले होते. क्लब हाऊसमध्ये त्यांच्या विश्रांतीची सोय केली होती.

>>>तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ?
सर्वसाधारणपणे स्त्रिया वैयक्तिक आरोग्याशी संबंधित गोष्टींची इतकी हातातोंडाची लढाई करत नाहीत. पण जर कांही अडचणी आल्या असतील तर ते प्रश्न त्यांच्या त्यांच्या ग्रुपद्वारे सोडवले गेले असतील. कारण मेन ग्रुपवर असा कांहीच विषय निघाला नाही.

>>>एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ?
आता असे आहे.. ही अभूतपूर्व परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा बघत आहोत आणि प्रार्थना करूया की हे सगळे लवकर संपेल.
आपण / सरपंच / नगराध्यक्ष / महापौर / आमदार / मुख्यमंत्री / पंतप्रधान / राष्ट्रपती हे सर्वजण ही परिस्थिती पहिल्यांदाच बघत आहेत. लॉकडाऊन होईल आणि महिनोन्महिने रेल्वे / विमान सेवा बंद राहतील असे आपल्याला कधीतरी वाटले होते का..? ९/११ ला अमेरिकेने सर्व विमाने विमानतळावर उतरवली हे बहुतेक अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आज भारतात तसेच घडते आहे. "लॉकडाऊन होऊन सोसायटी सील कसे करणार..?" हे जसे जानेवारी २०२० मध्ये कुणालाच माहिती नव्हते त्याच प्रमाणे "लोकं कामाला जाऊ लागले आणि रूग्ण सापडला की सोसायट्या कसे सील करणार..?" हे त्या त्या वेळी बघू आणि उत्तरे शोधू.

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 3:57 pm | मराठी कथालेखक

सील करण्याचा प्रकार , त्यातील अडचणी , त्यावर काढलेले मार्ग याबद्दल तुम्ही लिहिले आणि तेच अधिक विस्ताराने समजून घेण्याकरिता मी काही प्रश्न विचारलेत. कारण उद्या अशी परिस्थिती माझ्याही सोसायटीत उद्भवू शकते. त्यातून आता अनेकांचे कार्यालय/ कंपनीमध्ये जाणे चालू झाले असल्याने कुणी कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता वाढणारच आहे. म्हणून मी अधिक खोलात जावून समजून घेण्याकरिता प्रश्न विचारलेत. आणि तुम्ही त्यांची विस्ताराने उत्तरं दिलीत.
पण त्यामुळे माझा "लॉकडाऊनला असलेला विरोध" आणि इथे मी विचारलेले प्रश्न यांची सांगड घालत माझ्या प्रश्नांत नसलेली नकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न एका प्रतिसादात (तुमच्या नव्हे) दिसून आला.

तुम्हाला आणखीही प्रश्न असतील तर बिन्धास्त विचारा..

कसे आहे, आमच्याकडून एखादा विचार करायचा राहून गेला असेल तर इथे तसा नोंदवला जाईल आणि समजा आंम्ही अंमलबजावणी केली नाही तर निदान मार्ग तरी कळेल, कुणालातरी त्याचा उपयोग नक्कीच होईल. त्यामुळे कांहीही संकोच न करता प्रश्न विचारा.

"मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्न आपण आज जिथेतिथे विचारायचा आहे, की "आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 6:49 pm | मराठी कथालेखक

"मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्न

नाही हो.. आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :)

"आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.

हो.. तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..

आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :)

बरोबर.. आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो. त्यामुळे किमान आपल्यासारख्या लोकांनी कुणाकडूनच काहीच अपेक्षा करू नये.

तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..
तुमचा हा निष्कर्ष म्हणजे सिलेक्टिव रिडींगचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात माझा देश उद्योग आणि उत्पादनात आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मला आजिबात वाईट वाटणार नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मानभावीपणा करत कुणाला अशा एखाद्या गोष्टीची टवाळी करावी असे वाटत असेल तर त्याने स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे - हे माझे वैयक्तिक मत.

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 11:29 pm | मराठी कथालेखक

स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे

कुणाच्याच नाही. ना मोदी ना अन्य कुणी. ना भाजप ना काँग्रेस.
एक गोष्ट आहे साधीशी - भिकारी आणि चोर सोडले तर स्वतः कष्ट करुन खाणारा प्रत्येक जण आत्मनिर्भरच. लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे.
बाकी तुमच्या धाग्यावर विषयांतर नको असे तुम्हीच सुचवले होते म्हणून मला वाटते ही चर्चा इथे थांबवावी (मोदींचा विषयही मी काढला नव्हताच, असो).

मोदक's picture

21 May 2020 - 11:39 pm | मोदक

धन्यवाद.

लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे.

श्री मोदी काय म्हणाले हे आपण नीट समजूनच घेतलेले नाही असे दिसते.

याचे कारण आपला पूवग्रह असू शकतो.

भारताला अणूशक्ती, अणुपाणबुडी, क्षेपणास्त्रे, उपग्रह यांचे तंत्रज्ञान कुणी दिले? कुणीही नाही.

हे सर्व आपणच विकसित केलेले आहे.
मग जर भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ इतके उच्च तंत्रज्ञान विकसित करू शकतात तर इतर तंत्रज्ञान का नाही. आज आपण अनेक गोष्टींमध्ये चीन वर अवलंबून आहोत. ते अवलंबित्व सोडून या गोष्टी स्वतः बनवू लागा हा खरा संदेश आहे.
आणि हा संदेश केवळ इसरो किंवा डी आर डी ओ च्या शास्त्रज्ञांना नाही ( ते अगोदरच आत्मनिर्भर आहेत) तर लहान माध्यम आणि मोठ्या उद्योगातील लोकांसाठी आहे.
आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत.
पण कोव्हीड मुळे आपले मातीचे पाय उघडे पडले आहेत.

उद्या तुम्ही त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू लागलात तर चीनमधील वस्तू महाग झाल्या तरी झक मारत त्या तुम्हाला विकतच घ्याव्या लागतील.
https://www.cnbc.com/2017/02/27/chinese-wages-rise-made-in-china-isnt-so...

असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे.

परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाही.

बेरोजगार मजुराला आत्मनिर्भर हो याचा अर्थ ( आमचे १५ लाख रुपये कुठे आहेत म्हणणार्यांप्रमाणे) आपल्याला सोयीस्कर पणे लावून केअवलं टीका करण्यात काय हशील आहे?

अजूनही आपल्याला हे समजूनच घ्यायचे नसेल तर मी येथेच थांबतो.

मराठी कथालेखक's picture

22 May 2020 - 3:23 pm | मराठी कथालेखक

असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे.

बरोबर आहे. पण "मेक इन इंडिया" अभियान आधीच होतं ना. आता या परिस्थितीत "आत्मनिर्भर व्हा" अशा आवाहनाचा काय अर्थ घ्यायचा ? जर्मनी, अमेरिका ई देशांत उद्योगांना अर्थिक मदतही मिळाली आहे (व्हॉटस अ‍ॅप व येथील पोस्ट वाचून समजले त्याप्रमाणे)
बाकी एरवी सरकारने (फक्त केंद्र असे नाही तर राज्य, स्थानिक) उद्योगांकरिता फार असं वेगळं काही केलं नाही तरी चालेल पण फक्त कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम असावी, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, भ्रष्टाचार यांना पुर्णतः मोडीत काढायला हवे, औगद्योगिक तंटे (जसे पेमेंट बुडविणे, कराराच्या अटी न पाळणे ई) त्वरेने निकालात निघून न्याय मिळेल याची व्यवस्था करावी. मग प्रगती करण्यास उद्दोजक सक्षम आहेतच. या मातीत टाटा , किर्लोस्कर , जगदाळे असे अनेक उद्योजक स्वतःच्या हिमतीवर पुढे आले आहेत. पण त्याचवेळी अनेक जण व्यवसायात पडायला घाबरतात कारण भ्रष्टाचार, गुंडगिरी याची भिती.

आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत.

ही खूप नॉर्मल आहे. जेव्हा जे स्वस्त आणि सहज मिळतं ते माणूस तिथूनच घेतो स्वतः विकसित करण्याच्या भानगडीत पडत नाही. गरज ही शोधाची जननी आहे. मी स्वतः काही रेसिपीज इतक्याकरिता शिकलो की ते पदार्थ सहसा कोणत्या हॉटेलमध्ये मिळत नाहीत आणि जिथे ते मिळतात तिथेही खूप महाग होते.
जो हाडाचा उद्योजक आहे त्याला माहिती आहे की किंमत कशी नियंत्रणात ठेवायची. पण रक्तात उद्योजकता नसलेला व्यक्ती नोकरीच करेल. आणि आता त्याची नोकरी गेली असेल तर त्याला सरकारी सहाय्य गरजेचे आहे. तो लगेच आत्मनिर्भर बनू शकत नाही.

परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाही

हा तुमचा गैरसमज. मी मोदी विरोधक नाही. २०१४ साली मोदी सत्तेवर आलेत तेव्हा मलाही खूप आनंद झाला. त्यांच्या गुजरातच्या विकासबद्दल खूप ऐकले होते आणि आता देशाचाही विकास वेगाने होईल असे स्वप्न होते. पण नंतर पदरी निराशाच आली. पण ते असो. मात्र मोदींवर केलेली टीका तुम्ही व्यक्तिशः खूपच मनाला लावून घेता असं दिसतंय.

सुबोध खरे's picture

22 May 2020 - 6:47 pm | सुबोध खरे

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आणि आमचं सेम नसतं

चौकस२१२'s picture

29 May 2020 - 9:38 am | चौकस२१२

"..लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे"
मुळात (जमेल तसे) आत्मनिर्भय व्हा" हे सुचवणे फारसे चुकीचे वाटत नाही आणि ते काही फक्त टाटा बिर्लांना नाही किंवा ज्याच्याकडे अगदीच काही नाही त्याला सांगितले असे नाही , ज्यांना शक्य आहे त्यांना सांगितलेले दिसते मग एवढे चुकीचे आणि टीका करण्यासारखे काय?
तर "या वेळेस " हे सांगणे जरुरीचे होते काय? असा आपलं प्रश्न दिसतोय..
भारत काय सर्वांनाच या परिस्थिती आपण चीन वर किती अवलंबून आहोत याची कोविद च्या धक्य्यने प्रचिती आलेली दिसतेय ..आणि म्हणून या परिस्थिती हे जर देशाच्या पंतप्रधानांच्या सुचवले तर काय गैर आहे हो?
हे मी दिवसेंदिवस आत्मनिर्भर कमी होत चाल्लेलाय देशातून बोलतोय .. त्यामुळे कदाचित भारत पेक्षा जास्त अवघड आम्हला जातंय .. तुम्ही त्यामामाने खूप आत्मनिर्भय आहात .. आज भारतात, घड्याळ फ्रिज , मोबाइलला फोन , गाड्या आणि अशा कितीतरी वस्तू देशात बनतात म्हणजे हे सगळे तंत्रण्याना देशाच्या मालकीचे आहे ( याचे श्रेय नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्वांना ) मग त्या बद्दल अभिमान बाळगायचा आणि या परिस्थिती दुहेरी संधीचा फायदा घायचा ( चीन आयातिला पर्याय स्वतःसाठी आणि इतर देशांसाठी) कि "मोदी म्हणले म्हणून हाणून पाड " असे धोरण अंगिकार्याचे ते आपणच ठरवा!
मी तरी मी भारताकडे हेव्याने बघतोय आणि विचार करतोय मी ज्या सुजलाम सुफलाम देशात राहतोय त्या देशाने नुसते खनिज निर्यात ना करता त्या खनिजा पासून पुढे एअर कंडिशनर किंवा गाडी बनवला तर ...

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 11:36 pm | मराठी कथालेखक

आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो.

फार काही वेगळी अशी देशसेवा नसेन करत पण वर्षाला सहा आकडी टॅक्स भरतो. वाहतुकीपासून सगळे नियम पाळतो. लॉकडाऊनलाही तात्विक विरोध असला तरी ते पाळतो आहेच.
तसेच आणखी काही वैयक्तिक गोष्टी/निर्णय आहेत जे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फक्त देशाकरिताच नाही तर पुर्ण जगाकरिता, निसर्गाकरिता , पर्यावरणाकरिता लाभकारकच आहेत. असो. तो पुर्णतः वेगळा विषय होईल.

सुबोध खरे's picture

22 May 2020 - 6:48 pm | सुबोध खरे

वर्षाला सहा आकडी टॅक्स भरतो.

हि बाब अनाठायी आणि अनावश्यक आहे.

मराठी कथालेखक's picture

22 May 2020 - 7:11 pm | मराठी कथालेखक

हि बाब अनाठायी आणि अनावश्यक आहे.

टॅक्स भरणं अनाठायी आणि अनावश्यक आहे ?

सुबोध खरे's picture

22 May 2020 - 7:14 pm | सुबोध खरे

आपण किती कर भरतो याची सार्वजनिक न्यासावर टिमकी वाजवणे अनावश्यक आणि अनाठायी आहे.

मराठी कथालेखक's picture

22 May 2020 - 7:28 pm | मराठी कथालेखक

तो प्रतिसाद एकतर तुम्हाला नव्हता. आणि आपण स्वतः किती धाग्यांवर किती टिमकी वाजवत फिरता याचेही आत्मपरीक्षण करावे.
तुमच्या ज्ञानाचा, वयाचा , आणि एकंदरीत अनुभवाचा मला आदर आहे. पण दुसर्‍याला विनाकारण अपमानास्पद बोलण्याची तुमची प्रवृत्ती अलीकडे जास्तच दिसून येत आहे . विचार पटत नसेल तर तुम्ही वैयक्तिक पातळीवर येवून प्रतिसाद देता. स्वतःचा अहंकार जपण्याकरिता शेवटचा प्रतिसाद हा तुमचाच असेल याकरिता रेटून प्रतिसाद देता. इतरांना बिनधास्त मुर्ख वगैरे म्हणता.

मी गेले सहा-सात वर्षे जालावर. मी कोणत्याही कंपूत नाही. मला इथे कुणाशीही मैत्रीही करायचा उद्देश नाही (झाल्यास हरकत नाही, पण मुद्दाम तसे प्रयत्न नाहीत) आणि कुणाशी वैरही करायची इच्छा नाही. थोडेफार लेखन, थोडे वाचन, काही चर्चांत जमल्यास भाग घेणे , कधी काही सल्ला हवा असल्यास तो मिळवण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा माफक उद्देश आहे. मी स्वतःहून कधीच कुणावर (म्हणजे मिपा सदस्यावर) वैयक्तिक टिपण्णी करत नाही की कुणाची खोडी करत नाही. असतात प्रत्येकाचे विचर वेगळे. आणि राजकीय विचारप्रणाली तर कमालीची भिन्न असू शकते. त्यामुळे कुणा मिपाकरावर वैयक्तिक विखारी टीका कराविशी मला वाटत नाही. पण माझा अपमान करण्याचा कुणी प्रयत्न केला , विनाकारण माझ्याशी खोडसाळपणा केला तर मी जशास तसे उत्तर देवू शकतो.
वर म्हंटल्याप्रमाणे तुमच्या ज्ञान व अनुभवाचा मला आदर आहेच , तरी त्या आदराची किंमत ठेवून तुम्ही यापुढे मला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नम्रपणे व्यक्त करतो.
धन्यवाद.

मराठी कथालेखक's picture

22 May 2020 - 7:29 pm | मराठी कथालेखक

मी गेले सहा-सात वर्षे जालावर

मी गेले सहा-सात वर्षे मिपावर आहे

सुबोध खरे's picture

22 May 2020 - 7:46 pm | सुबोध खरे

मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती?

एखादा नवीन नोकरीला लागला असेल त्याचा पगारच सहा आकड्यात नसेल पण तो जरी सर्व कायदे पळत असेल तर त्याला मत नाही?

किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?

मराठी कथालेखक's picture

22 May 2020 - 7:55 pm | मराठी कथालेखक

किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?

असेलही..पाच आकडी भरणाराही माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल. मुळात मी माझ्या हुशारी बद्दल बोललोच नव्हतो.
प्रश्न होता समाजाला काही देण्याचा तेव्हा मी उत्तर दिले होते. इतरही काही उल्लेख होते त्या उत्तरात पण तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग केले असावे, तसेच प्रश्नही वाचला नसावा.
असो.

मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती?

बाकी माझा प्रत्येक प्रतिसाद पोस्ट करण्यापुर्वी तुमच्याकडे परीक्षणाला द्यावा काय ? कशाची गरज आहे आणि कशाची नाही हे तुम्ही ठरवावे काय ?
तुमच्या धाग्यांत , अनेक प्रतिसादातील तपशीलाचीही अशा प्रकारे कुणी विनाकारण चिकित्सा केली तरी तुम्हाला चालेल का ?
असो. आता या विषयावर अधिक वाद होवू नये अशी माझी इच्छा आहे.

चौथा कोनाडा's picture

23 May 2020 - 5:17 pm | चौथा कोनाडा

"मी कष्ट करून / माझी बुद्धिमत्ता वापरून मी जास्त पैसे कमावतो व जास्त कर भरतो" ही बाब अभिमानास्पद वाटते.
हे विधान इतरांनी सकारात्मक दृष्ट्या घेतल्यास काही अडचण येऊ नये.
जास्त कर भरणार्‍याचे वृत्तपत्रे देखील कौतुक करतातच की !

गामा पैलवान's picture

20 May 2020 - 6:52 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत.

लोकांना त्रास द्यायचं उद्दिष्ट नाही पण लोकांना त्रास तर होतो आहेच ना? निरर्थक बंधनं म्हणजे नागरी स्वातंत्र्याचा संकोच नव्हे काय?

करोना हां सर्दी किंवा फ्लू पेक्षा घातक रोग नसतांना धडधाकट लोकांवर टाळेबंदी का लादली जातेय?

आ.न.,
-गा.पै.

सगळेच बऱ्यापैकी सुशिक्षित, सुखवस्तुकर सोसायट्यात राहतात व ताकही फुंकून प्यायचा गुण करोना काळात सर्वात उपयोगी पडत असल्याने तिथे विशेष चिंता नाहीच पण जर कोणी चाळीत राहात आहे जिथे 200 लोकात 1 संडास वापरला जातो अथवा दाटीवाटीच्या वस्तीत जिथे एकाच खोलीत 4 अथवा जास्त लोक राहतात तिथं जीवनमान खडतर आहे व ते लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल

सहमत. असे कुणाचे अनुभव असतील तर खरंच वाचायला आवडेल.

थोडेसे अवांतर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते पुण्यात शासनाच्या मदतीला जात आहेत आणि त्यांचे सकारात्मक अनुभव वाचायला मिळत आहेत. विटेकरकाकांच्या मुलाचा खरडफळ्यावरचा अनुभव मुद्दाम इथे पेस्टवत आहे.

******************

विटेकर — 14 May 2020 - 08:49

माझा मुलगा अथर्व याचे अनुभव कथन
========================

माझा खारीचा वाटा

माझ्या घरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण आहे. वडील, काका, मावश्यांचे यजमान, असं संपूर्ण कुटुंब संघाच्या संपर्कात आहे. त्यामुळे जेव्हा निरोप मिळाला, की संघाचे स्वयंसेवक सेवा वस्त्यांमध्ये 'Mass Screening' चा उपक्रम राबवत आहेत, घरच्यांची समजूत घालून, त्यांची परवानगी घेऊन या, तेव्हा मला वडिलांकडून आज्ञा मिळाली- ' तू जा'. मी आईला विचारलं, तिचे दोन प्रश्न होते- "केव्हा परत येणार?", आणि "तू गेल्यावर अर्णवचा(माझा धाकटा भाऊ) अभ्यास कोण घेईल?". "अर्णवनं आता स्वतः अभ्यास करायला शिकलं पाहिजे" असं सांगून मी फॉर्म भरला.

मी बॅग भरली. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून त्याच दिवशी नवीन साबण, पेस्ट वगैरे घेऊन ठेवलं होतं. सकाळी फोन आला, तुला आज नाही, उद्या जायचंय. माझा दृढनिश्चय अजून पक्का झाला. अर्णवला मात्र एक दिवस जास्त अभ्यास करावा लागला!

घरून निघालो. मनात भीती अजिबात न्हवती. माहीत होतं, सत्कर्म करायला निघालोय, त्यामुळे मार्ग खडतर असला तरी वाट निघेल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आहेत.

मी आबासाहेब गरवारे कॉलेजला पोहोचलो, तेव्हा जेवण करून या असं सांगितलं. जेवणानंतर PPE kit घातलं, आणि शिवाजीनगर स्टेशनजवळील ताडीवला रोडला ऍम्ब्युलन्स मधून रवाना झालो.

तिथे एका बौद्ध विहारात काही डॉक्टर असेच PPE kits घालून लोकांच्या तपासण्या करत होते. मला सांगितलं गेलं होतं त्यांना मदत करायची.

पहिल्या दिवशी फार काम न्हवतं. डॉक्टरांनी आधीच सर्व काम केलं होतं. एक माफक संख्या सोडली, तर निवडलेल्या भागामधील सर्वांचं स्क्रिनिंग झालं होतं. तेव्हा मग कार्यपद्धती समजून घेतली.

दुसऱ्या दिवशी मात्र बौद्ध विहारात न जाता, घरोघरी फिरलो. घराच्या दारातूनच सर्वांच्या तपासण्या केल्या. त्यांना औषधं व मास्क दिले. डॉक्टरांनी काही सूचना दिल्या. आम्ही सर्वांची नावं नोंदवून घेत होतो. संभाव्य रूग्णांच्या नावापुढे खुणा करत होतो.
आमच्या सर्वांमध्ये, खेळीमेळीतच आपोआप एक शर्यत लागली- कोणती टीम जास्त घर करत आहेत...50 घरं करायला सांगितली होती, आम्ही 90 केली.

तिसऱ्या दिवशी देखील 70 घरं केली, त्यात एक पूर्ण चाळ आम्ही कव्हर केली.
तिथल्या युवा वर्गाने देखील आम्हाला भरपूर मदत केली. एकही घर सुटत नाही ना, याची खात्री केली. कुठे कुणाला त्रास होतो आहे का, हे देखील सांगितलं. वस्तीत राहणाऱ्या लोकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी टाळ्या वाजवून कौतुक केलं, आभार व्यक्त केले. काहींनी चहा-सरबत देखील विचारलं! PPE kit घातल्यामुळे काही घेता आले नाही. नाहीतर तहान खूप लागली होती

कष्ट करून घाम गळणं म्हणजे काय असतं, हे तेव्हा मला कळलं!

ह्या सगळ्या अनुभवावरून, एक गोष्ट मात्र मला कळली- PPE kit बघून काही जण घाबरून जात, काही जणांना असं वाटत होतं की आपल्यात काही लक्षणं दिसली तर आपल्याला क्वारन्टाईन च्या नावाखाली डांबून ठेवतील.
लक्षणं दिसली म्हणजे माणूस गेलाच म्हणून समजा, म्हणून मग तपासणी होण्यापूर्वी गार पाण्याने अंघोळ करायची, दीड- दोन वर्षांचं बाळ मांडीवर असताना, त्याची आई पुन्हा गरोदर होती, आणखीन एक वर्षभराचं बाळ होतं, त्यांचं घर शौचालयाजवळ होतं, व त्या बाळामध्ये लक्षणं दिसत होती. 10x10 च्या खोलीत 10 जणांचा संसार कसा चालतो, हे माझ्यासू अजूनही एक कोडंच आहे. एक मोठा 2bhk फ्लॅट होता. पण त्यात 40 जणं रहात होती! 'सोशल डिस्टन्स ठेवा' असं म्हणता येतंच न्हवतं.

ह्या सगळ्यावरून मी असा बोध घेतला की समाजात शिक्षण आणि जागरूकता, या दोनही गोष्टींची आवश्यकता आहे.
सुदैवाने लोकांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत आहे. कोणीही कुठल्याही संभाव्य घराला वाळीत टाकलं नाही. एक-दोन अंघोळ करणारे अपवाद सोडले, तर चाचण्या करून घ्यायला कोणी नाही म्हणत न्हवते. मुलं आणि वयस्कर ह्यांची विशेष काळजी घेतली जात होती.

नॅशनल ट्रेझर या इंग्रजी चित्रपटातील एक वाक्याची आठवण झाली. त्याचं सार होतं, जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा ज्यांच्याकडे कार्य करण्याची क्षमता असेल कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

ज्यांच्याकडे अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद असते, त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवतात.

जेव्हा श्रीराम सेतू बांधत होते, तेव्हा खारीने देखील उचलेल्या दगडाचा उपयोग होत होता. तो दगड भले छोटा असेल, पण रामकार्यात सहभागी होणाऱ्या त्या खारीसाठी मात्र तो दगड मोठा होता.

माझी अजूनही काम करायची तयारी आहे. मी जे काम केलं, ते इतर अनेक लोकांच्या मानाने कमी आहे. पण तो देशकार्याचा सेतू बांधायला मी मदत करू शकलो, ह्यात मी धन्यता मानतो. ह्यासाठी, मी माझ्या पालकांचा व शाखेतील सर्व शिक्षकांचा ऋणी आहे.

अथर्व स्वाती सुहास क्षीरसागर

पुणे
98502 89730

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 7:57 pm | आयर्नमॅन

विविध लोकांचे हेच अनुभव माझ्यासारख्या सामन्याला समृध्द बनवतात.

अनुभव शेअर केल्या अतिशय धन्यवाद सर.

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 7:54 pm | आयर्नमॅन

जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19

टायटल वाचून सामान्यजन जे गोंधळलेले नसतील ते गोंधळात पडून जातील

पावसाळ्यातील एक दिवस,
मी पाहिलेला हिटलर,
रेड लाईट मधील एक संध्याकाळ
इसिस प्रमुखासोबत केलेला नाश्ता

अथवा आशा शब्द योजनेतून सुरू होणारे बरेच एस्से हे यु नो अशी थिंग स्पष्ट करत असतात जी इतरेजनांच्या नजरेतून सुटलेली तरी आहे अथवा नजरेच्या टप्यात कधी येऊच शकलेली नाही अथवा ती आशा वेळी घडली जेंव्हा वाचक पृथ्वीवरच न्हवता पण सदरील लेख वाचल्यावर तर असे काहीच नसल्याने मोठ्या अपेकसेने काय नक्की घडले तरी काय असावे असा विचार करत धागा वाचल्यावर भयंकर हिरमोड झाला...

खोदा पहाड निकला चुहा अशी काहीशी भावना झाली

अभिप्रायाचे स्वागत आहे. मुळात जगावेगळी अशी कोणतीही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाच नाहिये. फक्त एका सदस्याला आलेली निराशेची भावना वाचल्यानंतर प्रत्यक्षात क्वारंटाईनचा घेतलेला अनुभव इथे मांडला आहे इतकेच. तुम्हाला या लेखातून जगावेगळ्या अचाट अपेक्षा असल्याच तर लेख पुन्हा वाचा (शीर्षकासह) ही नम्र विनंती.

बाकी, आयडी तयार झाल्यापासून एकाच दिवसात अपेक्षा तयार झाल्या, वाढल्या आणि हिरमोड झाला; असे बरेच कांही घडले आहे म्हणजे नक्कीच पुनर्जन्म असण्याची दाट शक्यता वाटत आहे.. ;)

फक्त सामान्य मतिचा व्यक्ती टायटलमुळे कन्फ्युस होतो हे विषद करावेसे वाटले

बाकी काय बोलणार उत्पत्ती स्थिती व लय हे चक्र चालूच राहते त्यामुळे तुम्हाला तुमचा सध्याचा जन्म जरी पुनर्जन्म वाटत नसला तर तो तुमचे अज्ञान आहे असे तत्वज्ञान म्हणते आणी फक्त कोणी एकच पुनर्जन्म घेत असेल असे वाटत असेल तर ते महाज्ञान ठरावे

लोकहो,

आंतरराज्य प्रवासास आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार : https://twitter.com/navimumpolice/status/1256640942494240769

भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही. तर मग अशा प्रवासपत्राची सक्ती करणे हे घटना धाब्यावर बसवणे नाही का?

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 4:05 pm | मराठी कथालेखक

भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही

संचारस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे हे खरं पण आणीबाणी जाहीर झाली तर इंटरनेट व फोनवरही बंधने येवू शकतील... बाकी या लॉकडाऊनविषयी काही याचिका दाखल झाल्या आहेत किंवा कसे ?

मोदक's picture

21 May 2020 - 4:32 pm | मोदक

विषयांतर होत आहे.

गापै जी धूळ उडवत आहेत ते सगळे या धाग्याचा विषय नक्कीच नाहीये.

गामा पैलवान's picture

21 May 2020 - 6:48 pm | गामा पैलवान

मोदक,

विषयांतराबद्दल क्षमा असावी.

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 6:53 pm | मराठी कथालेखक

विषयांतर होत आहे.

खरंय.. पण गापैंचा एक धागा उखडला गेला आणि आता तो साईड इफेक्टवाला धागाही वाचनमात्र केला आहे.
मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं.
असो..

मोदक's picture

21 May 2020 - 10:25 pm | मोदक

मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं.

एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.

तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला.. तुम्ही ते सदस्य आणि अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी त्यावर काहीही उपाय केला नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.

बघा विचार करा. इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:29 pm | आयर्नमॅन

एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.

बरोबर आहे उगा धोरणे निष्पक्ष की लवचिक याचा ऊहापोह आजिबात करू नये

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 11:42 pm | मराठी कथालेखक

खाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.

ते माझं मी बघेन. तुमचा धागा आहे , मी तुमच्याशी चांगल्याप्रकारे चर्चा करत होतो. पण तुम्हाला वाकड्यात घुसायची हौस आहे का ?
मी आणि मालक काय ते बघून घेईन. तुमच्या मालकीची नाही ना वेबसाईट ?

थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.

उगाच वाईट भाषा वापरुन तुम्ही स्वतःची पातळी दाखवत आहात. अपमान मलाही करता येतो.

इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?

तुमचा धागा आहे आणि मी तुमची खोडी काढली नव्हती. फालतूत वाद करु नका.

चौकस२१२,

- हजारो मेले ते कोविद मुले नाही

अमेरिकेत दोन महिन्यांत जर खरोखंच ८८०००+ मेले असते तर काय हाहाकार उडाला असता!

विदर्भात मोवाड नावाचं एक गाव वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. तिथे जुलै १९९१ मध्ये भयानक महापूर आला होता व आख्खं गाव पाण्याखाली गाडलं गेलं होतं. परिस्थिती इतकी वाईट होती की प्रेतांची मोजदाद करणंही अशक्यं बनलं होतं. मृतांचा अधिकृत आकडा ५०० होता तर अनधिकृत आकडा २०००+. लक्षांत घ्या, २४ तासांत फक्त २००० लोकं मेल्याने भीषण रोगराई माजली होती. तर चिमुकल्या UK मध्ये ६० दिवसांत ३५०००+ लोकं मेल्याने काय हाहाकार माजायला हवा होता बरं?

संदर्भ : २० मार्च ते २० मे या कालांतराचा तक्ता - https://www.worldometers.info/coronavirus/country/uk/

करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड.

आ.न.,
-गा.पै.

चौकस२१२'s picture

21 May 2020 - 6:29 am | चौकस२१२

हि कसली विचित्र तुलना !
भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ?
आणि पुरातून होणारी रोगराई आणि आशय फुफुसाच्या आजारातून प्रसार होणारी रोगराई यात काही फारकत नाही?
पूर इंडोनेशियात पण येतो आणि हजारो मरतात आणि पूर ऑस्ट्रेलियात पण येतो आणि काही थोडे मरतात .. दोन्ही ची तुलना कशी होईल
भूकंप इंडोनेशियात पण होतो आणि नू झीलंड मध्ये पण दोन्ही ची तुलना कशी होईल
तुम्हाला पण आपलेच घोडे पुढे दामटवायचे असेल आणि हे थोतांड म्हणून चालू ठेवायचे असेल तर बसा उगाळत ( जरा नो १० ला जाऊन बोरिस काकांना पण सांगा कि ते आजारी पडलेच नवहते )

करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड.

ओके गापै.

आंम्ही वेगळ्या जगात रहात आहोत आणि तुम्ही वेगळ्या. तुमच्या जगात प्रॉब्लेम नसल्याने तुम्ही सुखी आणि निवांत आहात. मग आमच्या जगात प्रॉब्लेम आहेत तर आंम्हाला आमचे प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवूद्या.

तुमच्या जगात प्रश्न नाहीत हा तुमचा मुद्दा कळाला आहे - आता त्या मुद्दयाचा जप प्रत्येक धाग्यावर करून नक्की काय साध्य करीत आहात..?

तुषार काळभोर's picture

21 May 2020 - 12:45 pm | तुषार काळभोर

अजून काही लोकांचं जग वेगळं आहे, जे तुमच्या सोसायटीत असलेले नसलेले प्रॉब्लेम शोधून तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करताहेत.

तुषार काळभोर's picture

21 May 2020 - 6:44 am | तुषार काळभोर

इथे एकजण स्वतःचा अनुभव सांगतोय की लॉक डाऊन मध्ये कशी व्यवस्था केली गेली, अडचणी कशा हाताळल्या गेल्या, त्रास कमीत कामी कसा करता येईल त्याचे काय प्रयत्न केले गेले, दुसरा त्याला पटवून देतोय की काहीतरी त्रास झालाच असेल. तुला नाहीतर दुसऱ्याला झाला असेल. कुणालाच नाही तर सिक्युरिटी गार्ड ला तरी झालाच असेल. जर गार्ड ला सुद्धा झाला नसेल तर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जो झालाय तो त्रासच आहे, पण ते तुम्हाला समजत नाहीये. म्हणजे तुमच्यातच प्रॉब्लेम आहे!

दुसरीकडे जगातील आर्थिक ताकद म्हणून ओळखले जाणारे देश गुडघ्यावर येऊन काही ना काही प्रयत्न करताहेत. युरोप पासून चीन पर्यंत अन् अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळे देश, तिथली सरकारे, प्रशासन, वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर, उद्योगधंदे, उद्योगपती, सगळे एकतर मूर्ख आहेत किंवा सगळे जण एकत्र येऊन इतरांना मूर्ख बनवताहेत कारण जे चाललंय ते थोतांड आहे. फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!

गामा पैलवान's picture

21 May 2020 - 2:29 pm | गामा पैलवान

चौकस२१२,

भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ?

इंग्लंडचं जाऊ द्या. तो भारतापेक्षा बराच प्रगत आहे असं गृहीत धरूया.

इटलीतला लोम्बार्डी तर भारतासारखाच आहे ना? गर्दी, धूर, धूळ, प्रदूषण, इत्यादि भारतीय महानगराइतकं नसलं तरी बाकीच्या युरोपपेक्षा जास्त आहे. तिथे म्हणे प्रेतं पुरायला जागा अपुरी पडू लागली. मग उघड्यावर सडलेल्या किंवा नुसतं पडलेल्या प्रेताचा एखादा फोटो कुठेतरी मिळेल काय? नुसते मोठमोठे आकडे टाकल्याने ती विश्वासार्ह बातमी होत नसते.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

21 May 2020 - 6:57 pm | गामा पैलवान

पैलवान,

फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!

थोतांड उकलणं हे सत्य शोधण्यापेक्षा फारंच सोपं असतं. मी संपूर्ण सत्य माहीत असल्याचा दावा केला कुठेही नाहीये. माझ्या कथनात त्रुटी आहेत हे मान्य.

पण आपण सगळ्यांचे अनुभव जर एकत्र मांडले तर त्यातून सत्याच्या अधिक जवळ जाता येईल. जनज्ञान किंवा Crowdsourcing the Truth असंही म्हणता येईल.

आ.न.,
-गा.पै.

म्हणजे तुम्ही खरे बोलताय त्याची शहाणीशा होऊन जाईल

सकृत दर्शनी आपण चीनची व त्याचा पोपट WHO यांची वकिली करत आहात असा भास होतोय. शत्रू देशाची री ओढल्याबद्दल आपण समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे

असं सगळे म्हणत होते. आमच्या गणपती मंडळाच्या अध्यक्षा पासून ते चौकातल्या दुकानदाराला पर्यंत सगळे जण म्हणत होते पूर्ण आभाळ काळवंडल आहे.
मी म्हणत होतो, छे. तो अध्यक्ष अन् दुकानदार तुम्हाला मूर्ख बनवून खोटं सांगताहेत की ढगाळ वातावरण आहे. आणि तुम्ही मूर्ख बनत आहात. डोळे उघडे ठेऊन बघा, स्वच्छ उन पडलय.

मग पाऊस पडू लागला, मी सांगत होतो सगळ्यांना. हा पाऊस पडत नाहीये, कडक ऊन पडले आहे. पाऊस वगैरे थोतांड आहे. हवामान विभागाची वेबसाईट दाखवत होती पुणे शहराच्या पूर्व भागात पावसाची सुरुवात झालीय आणि पूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे. पूर्ण पुण्यात सुद्धा लवकरच पाऊस पडेल. गुगल वर पुणे वेदर सर्च केलं तर पाऊस चालू असल्याचं चिन्ह दिसत होतं. पुढचे दोन अडीच तास आकाश ढगाळ असल्याचं फोरकास्त दाखवत होतं.

मग पाऊस पडत नाही, कडक ऊन पडले आहे, हे सिद्ध करायची जबाबदारी माझी ना?
की लोकांनी पाऊस पडतोय , हे सिद्ध करावं?
की गुगल, हवामान विभाग, यांनी ऊन नाही पडलेलं , हे सिद्ध करावं?

आणि सगळ्यांनी दाखवून दिलं की बाबा पाऊस पडतोय, तरी मी पाऊस वगैरे काही नसतो, हे तर कडक ऊन पडलं आहे, असं सांगत राहिलो तर मी सर्वात जास्त ज्ञानी आहे, जे भारी तज्ञांना कळत नाही, ते मला समजलंय, हे सिद्ध होईल ना?

गामा पैलवान's picture

22 May 2020 - 1:25 am | गामा पैलवान

पैलवान,

बाहेर पावसात जाऊन उभं राहिलं तर माणूस ओला होईल. माणूस ओला होणे हा वस्तुनिष्ठ अनुभव आहे.

करोनाच्या बाबतीत असा वस्तुनिष्ठ निकष काय लावायचा? किंबहुना असा काही निकष नाही, हा माझा आक्षेप आहे.

आ.न.,
-गा.पै.

लॉस एंजेलीसमध्ये रुग्णालयांनी कोव्हीडले मेलेल्या लोकांची प्रेते जागा नसल्यामुळे वातानुकुलीत कंटेनरमध्ये ठेवली आहेत. त्यांचे दफन करायला २ ते ३ महीन्यांचा वेट ताईम आहे. त्यातल्या एका रुग्णालयांने (बहुधा चुकीने) वातानुकुलीत नसलेल्या कंटेनरमध्ये बॉडीज ठेवला होत्या. त्या कंटेनरमधुन वास येउ लागल्यावर प्रशासनाला समजले, व त्यांनी चुक सुधारली. हे सर्व टीव्ही वा बातम्यांमधे दाखवत होते.

केवळ अमेरीकेत मृतांचा आकडा अत ९६००० झाला आहे. सर्व मोठी शहरे लॉकडाउन आहेत / होती. ट्रीलियनस डॉलर्सची हेल्प सरकारने अगोदरच दीली आहे. सरकारने सर्व टॅक्सपेअर्सच्या खात्यात १५०० ते ३००० डॉलर्स जमा केले आहेत. छोट्या मोठ्या उद्योगांना हजारों लाखों डॉलर्सची मदत मीळाली आहे. लाखो छोटे उद्योग बंद पडुन कोट्यावधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. ३ कोटीच्या वर लोकांनी अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी अर्ज केला आहे. आणखी लाखों / कदाचीत करोडो लोक अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी पात्र नाहीत, पण त्यांनी रोजगार गमावला आहे. सरकार आणी स्वयंसेवी संस्था रोज कोट्यावधी लोकांना फुकट जेवण पुरवत आहेत.

आता आणखी काय हाहाकार उडायचा बाकी राहीला आहे?

तुषार काळभोर's picture

22 May 2020 - 6:38 am | तुषार काळभोर

ते लॉस एंजेलिस चे हॉस्पिटल - ती बातमी खोटी आहे.
९६००० - आकडा खोटा आहे.
ती मिलियन बिलियन डॉलर्स ची पॅकेज - थोतांड आहे. त्या नोटा नकली असतील. अमेरिकन सरकार अमेरिकन लोकांना मूर्ख बनवतेय.

पैलवान,

तुम्ही seasonal flu नावाची संज्ञा ऐकली असेल. युरोप व अमेरिकेत फ्लूचा मौसम असतो. इंग्लंडमधल्या मौसमी फ्लू चं वर्तन चमत्कारिक राहिलं आहे. हा मौसम डिसेंबर ते मार्च धरला जातो. त्यावर इथे एक लेख आहे (इंग्रजी दुवा) : https://fullfact.org/health/coronavirus-compare-influenza/

इंग्लंडात २०१४-१५ साली या फ्लू पायी २८०००+ मृत्यू झालेले. तर २०१८-१९ साली फक्त १७०० होते. सरासरी १७००० आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचे ३६००० मृत्यू अवाढव्य नाहीत. मौसमी फ्लू बरोबर करोना नामे नवा भिडू मैदानात दाखल झालाय. हा नवा भिडू जरा जास्त खतरनाक आहे. पण इतकी पळापळ व टाळेबंदी करायची गरज नाहीये.

करोना व मौसमी फ्लू यावर इथे एक तौलनिक लेख आहे : https://www.itv.com/news/2020-02-06/how-does-the-wuhan-coronavirus-compa...

या लेखानुसार सार्स चा मृत्यूदर १०% आहे, करोनाचा २% आहे तर मौसमी फ्लूचा १% आहे. करोनातनं पुढे सार्स उत्पन्न झाला तर आणि तरंच करोना घातक ठरतो.

अंगात करोना सापडला म्हणून बोंबलंत सुटून काहीही फायदा नाही. ज्यांना त्रास होतोय अशांवर आणि फक्त अशांवरच दृष्टी ( = फोकस) हवी. कारण की करोनातून पुढे गंभीर गुंतागुंत उत्पन्न होते.

मरायला टेकण्याची शक्यता आहे त्यांना सोडून इतरांवर फोकस जातोय जो अनावश्यक असून करोनाप्रवण लोकांसाठी प्राणघातक आहे.

इंग्लंड मधील करोनाचा मृत्यूदर घटून हिवाळ्याच्या सर्वसाधारण मृत्यूदरावर आला आहे : https://www.theguardian.com/society/2020/may/21/english-death-rate-now-a...

या लेखातही Daily hospital deaths of patients with Covid-19 in England peaked at 891, असंच म्हंटलं आहे. with याचा अर्थ 'करोनासंगे मृत' असा घ्यायचा असून 'करोनामुळे मृत' असा घ्यायचा नसतो.

तात्पर्य : करोनामृतांचे आकडे जसेच्या तसे घ्यायचे नसून अतिरिक्त मृत्यूदर पाहायला हवा.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

23 May 2020 - 7:51 am | माहितगार

१) गापैंनी इंग्लंडाचे उदाहरण दिले आहे १७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत. मागील अधिकतम मृत्यू दराचा आकडा २८००० घेतला तरी ३० टक्क्याच्या आसपास अधिक मृत्यू होताना दिसतात. (मागच्या महिन्याभरात बातमी वाचली तेव्हा ईटलीत ४९ टक्के मृत्यूदर अधिक राहीला होता) . घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ?

२) टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे. हाँगकाँग चे लोक शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी स्वतःहून घेतात टाळेबंदीची गरज पडत नाही. जिथे लोक स्वतःहून काळजी घेत नाहीत ईतरांमध्ये रोग प्रसारणा बाबत बिनधास्त असतात तिथे टाळेबंदीची गरज भासते.

३) शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ?

४) गापै इन्फुएन्झाचे उदाहरण देतात १७०० ते १७००० मृत्यू . एका अतिरेक्याने १० माणसे मारली एक विमान कोसळून १०० गेले तर हळहळ होते १७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ? श्वसन विषयक आजारांना एवढे किरकोळीत काढत गेल्यानेच शारिरीक अंतर मास्कचे वापर बारकाईने स्वच्छता या गोश्टी टळ्त आल्या आहेत औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?

गामा पैलवान's picture

27 May 2020 - 1:49 am | गामा पैलवान

माहितगार,

माझा प्रतिसाद सांगतो.

१.

१७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत.

जर मृत्यूदर १७०० ते २८००० असा दीर्घ हेलकावे घेणारा असेल तर १७००० ही सरासरी निरर्थक ठरते. अशा वेळेस विस्तारकला ( = ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ) विचारात घ्यावी असं माझं मत आहे. २८००० च्या पार्श्वभूमीवर ४०००० हा आकडा अतिरिक्त नाही.

२.

घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल ....

भावना व गणित यांची गल्लत होऊ नये असं माझं मत आहे. भावना महत्त्वाच्या आहेत, पण सध्या मुद्दा सांख्यिकीचा आहे.

३.

शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ?

बाब गंभीर आहे, पण अवाढव्य नाही.

४.

टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे

तैवान व व्हियेतनाम हे अपवाद धरावेत का?

तैवानमध्ये टाळेबंदी नाही ( पण कडक नियम आहेत ) : https://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2020/04/23/2003735146

व्हियेतनाममध्ये करोना मृत नाहीत : Remarkably, for a country that shares a 870-mile porous border with China and is far less wealthy than other Asian nations such as South Korea and Taiwan, Vietnam has suffered no deaths from the pandemic. संदर्भ : https://www.telegraph.co.uk/news/2020/05/02/life-lockdownvietnam-reopens...

तैवान व व्हियेतनाम यांच्या एकत्रित उदाहरणांवरून दिसतं की सरसकट टाळेबंदी न करताही करोनाशी लढत देता येते.

५.

शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ?

फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो हे मान्य. पण मृत्यूदरही त्याच वेगाने वाढतो हे अमान्य. मृत्यूदर नक्कीच आटोक्यात ठेवता येतो, पण केव्हा? जर गंभीर रोगी वेगळे केले तर आणि तरंच. जर सरसकट टाळेबंदी व लोकं सरसकट रुग्णालयात भरती केले तर आरोग्यव्यवस्थेवर अविरत ताण येतो. त्यामळे ज्या करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर आहे अशांना उपचार मिळंत नाहीत.

६.

१७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ?

हे मृत्यू फ्लू या आजारांमुळे झालेले नसून आधीच असलेल्या व्याधी अधिक वेगाने पसरून झालेले मृत्यू आहेत. फ्लू हे केवळ तात्कालिक कारण आहे.

७.

औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?

माझ्या माहितीप्रमाणे फ्लू वर लस नाही.

आ.न.,
-गा.पै.

मोदक तुमच्या सोसायटित कोरोना संसर्ग झालेल्यांना अंदाजे कशामुळे झाला हे कळाले का?

अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने दिवसभरात अनेक वेगवेगळ्या लोकांमध्ये मिसळावे लागते. त्यातून कुठूनतरी विषाणूबाधा झाली असावी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 May 2020 - 2:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रांजळ लेख आवडला...
काही प्रतिसादही वाचनिय आहेत.
पैजारबुवा,

लेख आणि उपाययोजना आवडल्या, तुम्हाला आणि तुमच्या सोसायटीवाल्याना शुभेच्छा. बाकी २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार हे नक्की. 

लॉक डाउनच असाही परिणाम -माझ्या चुलतभावाने बाहेरुन कुलूप लावलेय

ऑफिसच्या WFH च्या गडबडीत (२ मॉनिटर,cpu आणि सामान घेऊन यायच्या घाईत )मी आमच्या जुन्या घरी आले (तिथे range पण चांगली मिळते म्हणून पण ) माझे घर दुसरीकडे आहे जिथे माझे पेरेंट्स आणि बहीण राहते पण त्या वेळेस कामाच्या घाईत हे जवळ म्हणून इकडे आले
इकडे माझे काकाकाकू (ज्ये ना ) आणि मी'दोन वेगवेगळ्या घरात पण एक कॉमन दार आणि एंट्रन्स असे राहतो माझा चुलत भाऊ थोडे जवळच दोन बिल्डिंग सोडून वाहिनी भाच्यासोबत राहतो काका काकूंची जेवण्याची सोय तो करतो (तीन वेळेला डबे आणून देतो ) आणि इकडे machine मध्ये त्या सर्वांचे कपडे काका धुतात (mutual अडजस्टमेन्ट ) आमचे स्वैपाकपाणी वेगळे आहे (माझे मी करते त्यांचा डबा येतो) आमच्या घराला मागून एक जिना आहे पण तिथून ये जा करणे सुरक्षित नाहीये (त्याला लागून असलेलया चाळीतले मागे सांगितल्याप्रमाणे खोकत,शिंकत असतात म्हणून आणि इतरही कारणांनी ) सुरक्षिततेच्या दृष्टीने मागचे दार कुलूपबंद केले आहे त्यामुळे मला काकांच्या घरातून ये जा करावी लागते तसेही इतके वर्ष एक कॉमन एंट्रन्स म्हणूनच सगळे वापरायचे
सध्या लॉक डाऊन च्या काळात त्याचे आणि काका काकूंचे वाजत असते सारखे म्हणजे तोच दटावत असतो आणि ते निमूटपणे ऐकत असतात असो तो त्यांचा वैयक्तिक विषय
माझे काका ज्ये ना असून त्यांना घरी बसवत नाही म्हणून ते सारखे बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबायचे त्यांना दम्याचा त्रास आहे ते या बाबतीत त्याचे ऐकत नव्हते आणि त्याची नजर चुकवून खाली जाऊन इतरांशी गप्पाटप्पा करायचे तर त्यांना रोखण्यासाठी माझ्या भावाने घराला बाहेरून कुलुप घातले आहे आणि माझी अडचण केली मी ३-५ दिवस किन्वा आठवड्याने सामान आणण्यासाठी बाहेर पडते (काका रोजच थोडा वेळ खाली जायचे आत्ता आम्ही तिघे कुलूपबंद आहोत) आणि हे पण मला रविवारी सामान आणण्याच्या वेळेस त्यांनी सांगितले मला जर बाहेर जायचे असेल तर त्याला फोन करून बोलवायचे आणि नंतर मी जायचे
काकांसाठी त्याने हे केले म्हणून मी काही बोलले नाही पण काल आणि आज एकंदर असे वाटले कि त्याने हे मुद्दामून माझी अडचण करण्यासाठी केले कि काय काकांचे नाव पुढे करून
काल त्याने माझ्या भाच्याला (वय-७वर्षे )एकट्यालाच इकडे दुपारी असेच पाठवले होते
तसेच रोज तो सकाळी ८-८. ३० दरम्यान येतो तेव्हा मी पर्वा दूध आणि इतर सामान घेऊन यायला वेळ लागला तर ओरडत होता
आज तो सकाळी ६. ४५ लाच आला जेव्हा मला दुकाने उघडी नसल्याने आणि कचरा गाडी देखील अली नसल्याने बाहेर जाताच आले नाही
दुपारी किराणावल्याने काही सामान खालच्या एका काकूंकडे ठेवले तो डबा घेऊन आल्यावर ते आणता येईल ह्या बेताने मी तयार होऊन बसले तर तो मुद्दाम उशिरा आला आणि किल्लीच आणली नाही शेवटी त्यांचा डबा खिडकीतून येईना आणि मलाही जायचे म्हणल्यार परत त्याने जाऊन किल्ली आणली आणि मग मी सामान घेऊन आले तेव्हा तो म्हणाला कि मी सारखे फोन केल्यावर येणार नाही त्याच्या यायच्या वेळेस च मी जायचे आणि आदल्या दिवशी त्याला फोन करून सांगायचे काही असले तर मी बर म्हटले (अडला नारायण गाढवाचे पाय धरी करणार काय शेवटी ?)
नंतर मी माझ्या घरात आले असता काकू त्याला बहुतेक माझ्याबद्दलच सांगत होती कि ती ३-४ दिवसात जाते किंवा तिला सामान द्यायचे का तर तो म्हणाला कि आपला काही संबंध नाही तिलाच अड्जस्ट करावे लागेल
लॉक डाऊन सुरु व्हायच्या काळात पण त्याने असाच त्रास दिला होता तेव्हा बाबांनी त्याला मलापण डबा देण्यास सांगितले असता तेव्हाही त्याने तिचे ती करेल/बघेल असे सांगितले होते आणि मुद्दामून इकडच्या दाराने ये जा करण्यास सांगितले होते पण आम्ही सुरक्षिततेचे कारण सांगून आणि मी तशीही रोज बाहेर पडतच नाही म्हणून कॉमन एंट्रन्स चालू ठेवला होता पण आत्ता काकांचे कारण पुढं करून तो मुद्दामून त्रास देत आहे आणि काका ऐकत नव्हते म्हणून काही बोलताही येत नाहीये लॉक डाऊन उठून माझ्या घरी जायला मिळेल म्हणून वाट बघतीये तर आमचा भाग containment झोन आणि रे झोन असल्यामुळे कठीणच होतेय आणि WFH चा पसारा घेऊन जाणे अवघडच आहे नाहीतर नोकरीवरून सुट्टी घ्यावी सरळ
आज ह्या सगळ्यामुळे फार ताण येऊन शेवटी मी कामावरून सुट्टी घेतली
घरी आई बाबांना फोन करून सांगत असते पण त्यांना ताण यायला नको बाबा त्याला फोनवरून झापतात पण त्याने परिस्थिती अजूनच बिघडते
लहानपणी एकत्र कुटुंब असताना माझ्या आईने त्याला असेच कशावरून तरी थोडेसे मारलं (पूर्वी एकत्र कुटुंबात ह्या गोष्टी कॉमन होत्या) आणि माझी आई नोकरी करणारी आणि काकू गृहिणी त्यामुळे मिळणाऱ्या सोयी सवलतीत फरक ह्या सगळ्याचा सूड तो आत्ता उगवतोय असे वाटतेय
काय करावे क्या परिस्थितीत?
लोकडाऊनचा असाही फायदा उचलणारी मानसिकता बघायला मिळाली

Prajakta२१'s picture

1 Jun 2020 - 12:39 am | Prajakta२१

संपादक मंडळ ,
वेगळा धागा काढल्याने वरील प्रतिसाद डिलिट करावा हि विनंती
धन्यवाद

https://www.esakal.com/global/vietnam-does-not-have-single-coronavirus-d...
ह्या वरील लिंकमध्ये व्हिएतनाम या छोट्या पण गरीब देशाने काय उपाययोजना केल्या याची चांगली माहिती दिली आहे
WHO वर मुळीच विसंबून ना राहता वेळीच उपाययोजना केल्या हे उल्लेखनीय
एकंदरीतच ह्या प्रकारात (कोरोनाच्या साथीत ) WHO खूप संशयास्पद आहे
WHO ला वेळीच फाट्यावर मारून आपण उपाययोजना चालू करायला हव्यात
आधीही WHO चे ऐकले नसते तर बरे झाले असते असे वरील बातमीवरून वाटले

चौकस२१२'s picture

1 Jun 2020 - 5:31 am | चौकस२१२

WHO ला फाट्यावर ना मारता , त्यांचे आणि स्वतःचे आणि इतर सामान जडण घडण असणाऱ्या देशांचे काय चालले आहे , आपल्याला काय जमेल इत्यादी विचार करून माझ्य देशाने पाऊले उचलली त्यात लोकडवून हे होतेच..
भारताशी तुलना नाही होऊ शकत मान्य मग भारताची तुलना चीन शी किंवा इंडोनेशिया शी करा विएतनाम किंवा स्वीडन शी नाही
चीन मध्ये सुद्धा अघोरी लोकडवून झाले
मग भारताचेच का चुकले ? आज जर काँग्रेस चे सरकार असते तर त्यांनी काय केले नसते?

गामा पैलवान's picture

2 Jun 2020 - 7:06 pm | गामा पैलवान

लोकहो,

मागील आठवड्यात करोनाचे दोन मध्यमवयीन मृत्यू ऐकले.

मृत्यू १.
नाव : दिलीप (बदललेले )
वय वर्षे : ५९
रुग्णालय : नाणावटी (मुंबई विलेपारले)

ऐकीव कथा : व्यक्ती राहायला मुंबईत दादरला. घरीच असतांना खोकला सर्दी वगैरे किरकोळ लक्षणांना सुरुवात झाली. लक्षणं जरा लांबल्याने करोना तपासणी केली. तर करोना सापडला. ताबडतोब पारल्याच्या नाणावटीत अतिदक्षता विभागात दाखल केलं. प्रकृती सुधरेना. पण लक्ष द्यायला कोणी नाही कारण रुग्णालयात रुग्णांची (?!) अभूतपूर्व गर्दी उसळली होती. अधून मधून बातम्या यायच्या की रक्तशोधनी ( = डायालिसीस) लावली आहे. एके दिवशी फोन आला की बॉडी घेऊन जा. नशीब जोरावर म्हणून देह मिळाला. नाहीतर महापालिकेने परस्पर विल्हेवाट लावलीही असती.

करोना गंभीर असून मूत्रपिंडाच्या कार्यात प्राणघातक हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. प्रस्तुत प्रसंगी केवळ दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे.

मृत्यू २.
नाव : माहीत नाही.
वय वर्षे : ५५
रुग्णालय : मुंबई (पण कोणतं ते माहीत नाही)
व्यवसाय : डॉक्टर
कार्य : करोना रुग्णसेवा

ऐकीव कथा : करोना रुग्णालयात सतत काम केल्याने संसर्ग झाला. हे त्या डॉक्टरला माहीत होतं. प्रकृतीस उतार पडेना म्हणून त्याला अतिदक्षता विभागात हलवलं. तिथे तीव्र हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक) झाला. करोनामुळे मृत असा छाप लागला.

फ्लू गंभीर असून संसर्ग वाढल्यास हृदयाच्या कार्यात हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. मला स्वत:ला २०१९ साली फ्लू झालेला असतांना हृदयाच्या पिशावीस सूज आली. ही सूज पुढे हृदयापर्यंत पोहोचल्याने एक विस्फारजाळी ( = स्टेंट ) टाकावी लागली होती. करोना फ्लू सारखाच विकार असल्याने जर वेळीच रुग्णाच्या प्रकृतीस उतार पडला नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवते. पण लक्षात कोण घेतो.

असो.

वरील दोन्ही मृत्यू सहज टाळता येण्याजोगे होते. वेळीच लक्ष द्यायला पाहिजे. पण इथे तर सगळे महत्त्वाचे लोकं करोनाच्या नावाने उर बडवण्यात मग्न झालेत. बहुतांश वैद्यकीय सामुग्री करोनाचं भयावडंबर, विलगीकरण आणि टाळेबंदी यासारख्या निरर्थक बाबींत खर्ची पडते आहे. ज्यांना खरीखुरी गरज आहे त्यांना धत्तुरा मिळतोय. कोणाच्या पायांत कुणाचा पायपोस आहे, ओळखा पाहू !

गणेश लोखंडेचे आजी व मामा उपचार नाकारल्याने मेले. बातमी : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/two-members-of-the-...

हे दोन्ही मृत्यू करोनाच्या थोतांडामुळेच झालेत. दिसला करोना, मारला छाप आन बशीवला आडोश्याला हास्पिटलात. याला उपचार म्हणंत नाहीत. अशाने रुग्णालय हे संसर्गाचं केंद्र बनण्याचा धोका असतो. पण लक्षात कोण घेतो.

करोना + मूत्रपिंडविकार = प्राणाघात
करोना + हृदयविकार = प्राणाघात

ही समीकरणं सरकारच्या कधी लक्षांत येणार? सरसकट छाप मारणं कधी बंद होणार?

आ.न.,
-गा.पै.

हा लेख आज वाचला. खूपच छान रितीने तुमच्या सोसायटीत एकंदरित नियोजन आणि त्याची अम्मलबजावणी केली गेली.
तुम्ही दिलेले सल्ले खूपच कामाचे आहेत.
आता सोसायटीत आणि परिसरात कसे काय आहे ?
आम्ही जवळपास महिनाभराच्या करोना अनुभवातून पार पडून आता ठीक झालो आहोत. त्याबद्दल 'कोविडः एक इष्टापत्ती ?? ' हा लेख लिहीला आहे.