जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19
फारच निराशा वाटतेय आज
आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले
आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे
सामान संपत चालले आहे
सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही
अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय
सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत
काय होणार कळत नाही
******************************
प्राजक्ता २१ यांचा हा प्रतिसाद वाचून बरेच दिवस टंकाळा करत असलेला अनुभव शब्दबद्ध करूयाच असा विचार केला.
लॉकडाऊनच्या दुसर्याच आठवड्यात आमच्या सोसायटीमध्ये एक पेशंट सापडला. मी जिथे राहत आहे तेथील अनेक रहिवासी "अत्यावश्यक सेवा" गटातील असल्याने सोसायटीमध्ये लवकरच करोना पेशंट सापडेल याची शक्यता वाटत होतीच. त्याप्रमाणे एक दिवस संध्याकाळी बातमी आली की अमुक अमुक फ्लॅटमधील तमुक तमुक सरांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.
नंतर एकच धांदल उडाली आणि सोसायटीचे सर्वच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप खर्याखोट्या माहितीने भरून वाहू लागले.
"नक्की काय झाले आहे" ही माहिती खूप कमी लोकांना होती आणि बहुदा त्यांना या कठीण परिस्थितीत "सबसे तेज" वगैरे व्हायचे असावे.. करोना पॉझिटिव्ह असलेल्या सरांचा मेडिकल रिपोर्टच कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मात्र या मेसेजकडे लोकांनी दुर्लक्ष केले असावे कारण थोड्यावेळाने चर्चा सुरू झाली, की ज्या सरांना करोना झाला आहे त्यांचे नांव गुप्त ठेवायला हवे वगैरे वगैरे..
मी या सगळ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ऑफिसचे काम करण्यात गुंतवून घेतले.
यथावकाश कॉर्पोरेशनचे लोक गेटवर पहार्यासाठी येऊन बसले आणि सोसायटीच्या सगळ्या वाटा रोखल्या गेल्या. एक फ्लेक्सही आणून लावला. त्यावर "या परिसरातील एक रहिवासी करोनाबाधीत आढळल्याने या भागातील प्रवेशावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले आहेत" अशी सूचना आणि "उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल" असा लाल रंगात आदेशही रंगवला होता. सोबत आपत्कालीन विभाग, तक्रार निवारण अधिकारी यांचे फोन नंबर आणि एक ट्विटर हँडल अशी सर्व माहिती होती.
सोसायटीमधील कांही लोकांनी पुढाकार घेऊन एक टास्क फोर्स स्थापन केला आणि पुढील पद्धतीने क्वारंटाईन / आयसोलेशनची काळजी घेतली.
१) प्रत्येक बिल्डिंगचे लिडर ठरवले. सोसायटीत १५ बिल्डिंग आहेत. त्या १५ लिडर्सनी मिळून आपआपल्या बिल्डींगमध्ये फ्लोअर लिडर ठरवले. सोसायटीच्या ग्रुपवर सूचना देऊन सामुदायिक गोंधळ व प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देण्याऐवजी; सर्व महत्वाच्या सूचना त्या त्या लिडर्सना दिल्या गेल्या आणि बिल्डिंगनुसार त्या पुढे सरकवल्या गेल्या.
२) भाजी, दूध यांची सोय सोसायटी / कॉर्पोरेशनने मिळून केली आणि शक्य आहे त्या सर्व प्रकारच्या भाज्या, रोजचे दूध, दही, ताक वगैरे सोसायटीच्या गेटवर मिळेल याची व्यवस्था केली. अॅमेझॉन, बिग बास्केट आणि सुपर डेली वगैरे सर्व डिलिव्हरी एजंट्सना गेटपाशीच थांबवले गेले. याची सुरूवात खरेतर लॉकडाऊन नंतर लगेच झाली होती, त्यावेळी मेन गेट उघडे असायचे. पॉझिटिव्ह पेशंट सापडल्यानंतर गेट बंद झाले व वस्तूंची डिलिव्हरी गेटवरून होऊ लागली.
३) सोसायटीमध्ये राहणार्या वय वर्षे ६० च्या वरच्या सर्व ज्येष्ठ लोकांची एक यादी करण्यात आली आणि त्यांना असलेले आजार विस्तृतपणे नोंदवून त्याचा एक डेटाबेस तयार केला.
यानंतरच्या आठवड्यात आंम्ही राहतो त्या बिल्डिंगमध्येच आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली.
मग आमच्यासाठी नियम आणखी कडक झाले. पूर्वी बिल्डिंग ते मेन गेट असे जाऊ शकत होतो; ते ही बंद झाले. लोकांना घरातून बाहेर पडायचे नाही याच्या सक्त सूचना दिल्या गेल्या. लिफ्ट बंद करण्यात आली आणि जिन्याच्या प्रवेशद्वाजवळ बॅरीकेट रचून जिना बंद करण्यात आला.
यानंतर जे सामान आंम्हाला गेटपर्यंत जाऊन घ्यावे लागत असे ते सामान घरात कसे मिळेल याची आखणी करण्यात आली आणि बिल्डिंग लिडर्सनी सिक्युरीटी गार्डच्या मदतीने रोज आमच्या बिल्डिंगचे सामान गेटपासून तळमजल्यापर्यंत आणले जाईल याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने फ्लोअर लिडर तळमजल्यावर येत आणि आपल्या मजल्यावरचे सामान घेऊन जात.
साधारणपणे अशी व्यवस्था होती..
१) संपूर्ण सोसायटीसाठी, भल्यापहाटे दुधाच्या पिशव्या तर दुपारी कधीतरी भाजीच्या पिशव्या सोसायटी गेटवर पोहोचत असत. (भाजी व फळांची लिस्ट एक दिवस आधी गोळा केली जाई)
२) त्यातल्या आमच्या व पहिला पेशंट सापडलेल्या बिल्डिंगच्या पिशव्या वेगळ्या करून सिक्युरिटी गार्ड त्या त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पोहोचवत असत.
३) सिक्युरिटी गार्ड कडून हिरवा झेंडा मिळाला की बिल्डिंग लिडर पहिल्या मजल्यावरच्या फ्लोअर लिडरला सूचना देई की तळमजल्यावरून सामान घेऊन जाणे. पहिल्या मजल्याचा लिडर सामान घेऊन घरात पोहोचला की मग दुसर्या मजल्यावरचा लिडर बाहेर पडून तळमजल्यावरून सामान घेऊन जाई.. अशा प्रकारे एका मजल्यावरच्या लोकांचा दुसर्या मजल्यावरील लोकांशी १००% संपर्क टाळला गेला.
हे सर्व कम्युनिकेशन वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवून केले गेले. (सोसायटी लिडर्स, बिल्डिंग लिडर्स आणि फ्लोअर लिडर्स)
यथावकाश सोसायटीवर आलेले निर्बंध आणखी कोणत्याही पॉझिटिव्ह केस शिवाय हटवले गेले.
नंतरची चांगली बातमी म्हणजे आमच्या सोसायटीमधील दोन्ही पॉझिटिव्ह पेशंट बरे होऊन घरी परतले. त्यावेळी त्यांचे स्वागत घंटा / थाळ्या वाजवून आणि रोषणाई करून करण्यात आले.*********************************************************** आता हे झाले सोसायटीच्या पातळीवर.. आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला आणि पुढील गोष्टी ठरवल्या. तुम्हाला त्या उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. घरी महत्वाच्या वस्तूंची साठवणूक, घरकामाची विभागणी वगैरे मुद्दे सोडून देऊ.. आत्तापर्यंत सर्वांना याचा अंदाज आला असेलच. १) सोसायटीमध्ये जे लोकं पुढाकार घेऊन सर्व गोष्टी मॅनेज करत आहेत त्यांना सहकार्य करा. त्यांना सर्व गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या. २) जगभरात कशी वाईट परिस्थिती आहे आणि भारतात / महाराष्ट्रात / पुण्यात / गल्लीत किती रूग्ण सापडले वगैरे अनावश्यक ब्रेकिंग न्युजचा ताण येत असेल तर सरळ टीव्ही बंद करा आणि दुसरे एखादे हलके फुलके चॅनेल किंवा पुस्तकं यांच्याकडे मोर्चा वळवा. ३) सतत टीका करणारे, फेसबुकवर वचावचा भांडणारे आणि नेहमी निगेटिव्ह राहणार्या लोकांना फाट्यावर मारा. आपली मनस्थिती उत्तम ठेवा. ४) होम वर्कआऊट सारखे एखादे अॅप मिळवा आणि शक्य तितका व्यायाम करा. मला या अॅपबद्दल सायकल सायकल ग्रुप / निनाद आचार्य कडून कळाले. ५) आपल्या आजुबाजूच्या मेडिकल / किराणा दुकानदारांचे नंबर हाताशी ठेवा. क्वारंटाईन असताना ते आपल्याला आवश्यक त्या वस्तू सोसायटी गेटवर पोहोचवू शकतात. ६) हात धुवत राहणे आणि बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे / आंघोळ व सर्व कपडे धुणे यांत कोणताही आळस करू नका. ७) क्वारंटाईन दरम्यान झोपेचे शेड्युल सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. मी सुरूवातीला पहाटे ४ पर्यंत जागे राहून वेब सिरीज बघणे, पुस्तके वाचणे वगैरे उद्योग केले पण आता ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. ****************************************************** एकूण काय.. थोडे दिवस क्वारंटाईन मध्ये काय होणार हा प्रश्न पडला, पण सोसायटीमधील दक्ष नागरिकांच्या मदतीने कोणाचीही कोणतीही गैरसोय झाली नाही. सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले. हा झाला माझा अनुभव.. तुमचेही अनुभव लिहा आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी कांही सूचना असतील तर नक्की सांगा. ******************************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूलभूत अधिकार धाब्यावर बसवले जाताहेत
भारताच्या नागरिकांना
विषयांतर होत आहे.
विषयांतराबद्दल क्षमस्व
विषयांतर होत आहे.
मिपावरील
मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं.एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे. तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला.. तुम्ही ते सदस्य आणि अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी त्यावर काहीही उपाय केला नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे. बघा विचार करा. इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?एक सदस्य म्हणून सुचवू का..?
खाद्याच्या खाजगी जागेत जाऊन
हजारो जण खरोखरंच मेले होते तेव्हा ....
हि कसली विचित्र तुलना !
करोना हे थोतांड आहे आणि
करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड.ओके गापै. आंम्ही वेगळ्या जगात रहात आहोत आणि तुम्ही वेगळ्या. तुमच्या जगात प्रॉब्लेम नसल्याने तुम्ही सुखी आणि निवांत आहात. मग आमच्या जगात प्रॉब्लेम आहेत तर आंम्हाला आमचे प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवूद्या. तुमच्या जगात प्रश्न नाहीत हा तुमचा मुद्दा कळाला आहे - आता त्या मुद्दयाचा जप प्रत्येक धाग्यावर करून नक्की काय साध्य करीत आहात..?अतीतीव्र अनुमोदन
झक्कास!!
प्रेतं पुरायला जागा अपुरी ?
सत्यशोधन व थोतांडशोधन
तुमच्या माहितीचे सोर्स उघडे करा
सकृत दर्शनी आपण चीनची व त्याचा पोपट WHO
दोन तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होतं
वस्तुनिष्ठ निकष
प्रत्येक गोष्टीत पुरावा कसा देणार
सब माया है
मौसमी विषाणू व अतिरिक्त मृत्यूदर
गापैंच्या निसटत्या बाजू १
माझा प्रतिसाद
मोदक तुमच्या सोसायटित कोरोना
अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने
अत्यंत वाचनिय धागा
लेख आणि उपाययोजना आवडल्या,
लॉक डाउनच असाही परिणाम -माझ्या चुलतभावाने बाहेरुन कुलूप लावलेय
संपादक मंडळ ,
WHO वर मुळीच विसंबून ना राहता
पाऊले उचलली
दोन प्रातिनिधिक करोनामृत्यू
आता सोसायटीत आणि परिसरात कसे काय आहे ?
हा लेख आज पुन्हा वाचायला