जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19
नंतरची चांगली बातमी म्हणजे आमच्या सोसायटीमधील दोन्ही पॉझिटिव्ह पेशंट बरे होऊन घरी परतले. त्यावेळी त्यांचे स्वागत घंटा / थाळ्या वाजवून आणि रोषणाई करून करण्यात आले.*********************************************************** आता हे झाले सोसायटीच्या पातळीवर.. आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला आणि पुढील गोष्टी ठरवल्या. तुम्हाला त्या उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. घरी महत्वाच्या वस्तूंची साठवणूक, घरकामाची विभागणी वगैरे मुद्दे सोडून देऊ.. आत्तापर्यंत सर्वांना याचा अंदाज आला असेलच. १) सोसायटीमध्ये जे लोकं पुढाकार घेऊन सर्व गोष्टी मॅनेज करत आहेत त्यांना सहकार्य करा. त्यांना सर्व गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या. २) जगभरात कशी वाईट परिस्थिती आहे आणि भारतात / महाराष्ट्रात / पुण्यात / गल्लीत किती रूग्ण सापडले वगैरे अनावश्यक ब्रेकिंग न्युजचा ताण येत असेल तर सरळ टीव्ही बंद करा आणि दुसरे एखादे हलके फुलके चॅनेल किंवा पुस्तकं यांच्याकडे मोर्चा वळवा. ३) सतत टीका करणारे, फेसबुकवर वचावचा भांडणारे आणि नेहमी निगेटिव्ह राहणार्या लोकांना फाट्यावर मारा. आपली मनस्थिती उत्तम ठेवा. ४) होम वर्कआऊट सारखे एखादे अॅप मिळवा आणि शक्य तितका व्यायाम करा. मला या अॅपबद्दल सायकल सायकल ग्रुप / निनाद आचार्य कडून कळाले. ५) आपल्या आजुबाजूच्या मेडिकल / किराणा दुकानदारांचे नंबर हाताशी ठेवा. क्वारंटाईन असताना ते आपल्याला आवश्यक त्या वस्तू सोसायटी गेटवर पोहोचवू शकतात. ६) हात धुवत राहणे आणि बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे / आंघोळ व सर्व कपडे धुणे यांत कोणताही आळस करू नका. ७) क्वारंटाईन दरम्यान झोपेचे शेड्युल सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. मी सुरूवातीला पहाटे ४ पर्यंत जागे राहून वेब सिरीज बघणे, पुस्तके वाचणे वगैरे उद्योग केले पण आता ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. ****************************************************** एकूण काय.. थोडे दिवस क्वारंटाईन मध्ये काय होणार हा प्रश्न पडला, पण सोसायटीमधील दक्ष नागरिकांच्या मदतीने कोणाचीही कोणतीही गैरसोय झाली नाही. सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले. हा झाला माझा अनुभव.. तुमचेही अनुभव लिहा आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी कांही सूचना असतील तर नक्की सांगा. ******************************************************
In reply to उत्तम नियोजन. by सस्नेह
त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या.ट्रम्प तात्या पासून ते उद्धव ठाकरे अन् नरेंद्र मोदीं पासून ते तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षा पर्यंत प्रत्येक जण जमेल तसा सावरायचा, परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा, रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्याचा त्याचवेळी अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण प्रत्येक वेळी अचूक आणि परिपूर्ण असेलच नाही. अभूतपूर्व अशा संकटात काय करायचं याचे कोणतेही पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही. अशावेळी आपण वैयक्तिक स्वतःच्या पातळीवर किमान खालील गोष्टी करू शकतो. १. स्वतःची जमेल तितकी काळजी घेणं. २. उगाच, टाईमपास, पाय मोकळे करायला, मला काय होत नाही, मला अमुक खाऊशी वाटतंय म्हणून तमुक आणायला, घराबाहेर पडणं टाळणं. ३. खरे खोटे कसलेच मेसेज न पसरवणे. ४. जमल्यास, येताजाता घरात अथवा फोनवर, समाज माध्यमांवर फालतू चर्चा (ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही) न करणं ५. जर कुणी मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक निष्काळजी पणा करत नसेल तर निगेटिव्ह टिपण्णी अथवा टीका टाळून आपलं मत (लई आग्रह न करता ) मांडणं. ६. जग खूप सुंदर आहे, फक्त भांडण अन् मतभेद सोडून देता आले पाहिजेत.
In reply to ट्रम्प तात्या पासून ते उद्धव by सुबोध खरे
In reply to ट्रम्प तात्या पासून ते उद्धव by सुबोध खरे
In reply to ट्रम्प तात्या पासून ते उद्धव by सुबोध खरे
>>> सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले.हा कळीचा मुद्दा आहे. आम्हीही आमच्या सोसाइटीत अनेक कडक निर्बंध घातले आहेत आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल करत आहोत. ९८% (हा आकडा precise आहे!) रहिवासी सहकार्य करतात आणि उरलेले काही-ना-काही खुसपट काढत राहतात. अर्थात सोसाइटी सांभाळणं हा thankless job (मराठी?) आहे आणि त्याउलट अनेकांचे शिव्याशाप ऐकावे लागतात ते वेगळेच. सोसाइटीच्या कायप्पा समूहात पोस्ट केलेले काही संदेश - २५ मार्च २०२० Important Update Dear Residents, Considering alarming news-reports about multiple COVID-19 infections in areas in Hyderabad, the regulatory directions include but not limited to, the following - 1. Let's ALWAYS wear masks to step out of our home 2. Let's maintain social distance (no groups roaming around) 3. Let's rub sanitizer on hands when necessary 4. Let's avoid using lifts whenever possible (to avoid touches) 5. Let's NOT step out of our premises unless very urgent and important 6. Let's NOT invite outsiders into our premises 7. Let's not allow outsiders into our premises except - a. Cooking gas cylinder delivery persons b. Plumber c. Electrician (These persons are allowed only with mask, gloves and are sanitized) 8. Let's collect outside delivery from security gate 9. Let's dump garbage ONLY in the bins, no door-to-door collections 10. Lets follow regulatory guidelines very strictly All the common amenities, including clubhouse, library, gym, yoga-room, kids' play area, sports courts, swimming pool will be closed till further notice. Any delivery from outside, milk, newspapers, flowers etc will be done only till security gate. Residents are to collect the stuffs from there. Our society is infection-free, at least till now. Let's be extra cautious for the safety of ourselves, our family members and our neighbours. Thank you for abiding by the regulatory directions that we recieved from Police and other regulatory bodies. Stay home, stay safe. Thank you. -Team EC २७ मार्च २०२० IMPORTANT AND URGENT: Vegetables in Our Premices Dear Residents, We have spoken to municipal commissioner and CI, *** PS for the arrangement of vegetables sale in our premises. The authority will visit our premises and make necessary arrangements for the sale of vegetables with all the regulatory precautions. *. Proper space will be allocated for the seller. *. Lime / muggu markings with one meter distance will be put for the buyers. *. The seller will have masks and gloves. *. Sanitization and hygiene will be maintained. *. The sale timings will be as per regulatory norms. *. Residents my avail this hygienic arrangement as per their requirement. Let's buy vegetables / groceries only from the authorised sources. Let's prevent COVID-19 virus enter our premises. Thank you. -Team EC
In reply to अनुभवकथन आवडले, मोदक. by वामन देशमुख
In reply to तुमच्या सुचानांमध्ये by तुषार काळभोर
In reply to हं... by वामन देशमुख
In reply to अनुभवकथन आवडले, मोदक. by वामन देशमुख
In reply to माहितीपूर्ण धागा by मराठी कथालेखक
In reply to सात मजली बिल्डिंग आहे. सामान by मोदक
In reply to तुमच्या बिल्डिंग वा by मराठी कथालेखक
नाही.
>>>तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ?
फक्त आमची सोसायटी सील केली होती. सोसायटी जवळची म्हणजे साधारण ५०० / ७०० मीटरपेक्षा लांब असलेली दुकाने सुरूच होती. त्या भागातील दुकानदारांचे मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर केले गेले. किराणा मालाची व्यवस्था त्या त्या दुकानदारांनी केली. भाजी आणि दुधाच्या पिशव्या अशाच पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. हे सर्व सामान गेटमधून आत दिले जात होते. सोसायटीच्या आतून कोणालाही बाहेर जाण्याची आणि कोणालाही बाहेरून आत येण्याची परवानगी नव्हती.
>>>सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ?
फळभाजी विक्रेता आणि किराणा दुकानदारांचे नंबर वगैरे व्यवस्था प्रशासनाने केली. पालिकेचे अधिकारी सोसायटीला नियमीतपणे भेट देत होते.. पोलिस पाहिले नाहीत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येऊन सॅनिटायझेशन, धूर मारणारी यंत्रे आणून फ्युमिगेशन असे बरेच कांही सतत सुरू होते. वयस्कर लोकांच्या तब्बेतीचे अपडेट घेतले जात असावेत. आमच्या तब्बेतीचे अपडेट्स कुणीही विचारले नाहीत.
>>>तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ?
सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश लोक अत्यावश्यक सेवेत असल्याने आजिबात नकारात्मक सूर उमटला नाही. "त्यांच्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे" असा विचार मुळीच केला गेला नाही. उलट एकदा एका पेशंटच्याच घरी कोणत्यातरी वस्तूची आवश्यकता असताना तातडीने त्या त्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोचवल्या गेल्या.
सिक्युरिटी गार्डच्या जेवणाची काळजी सोसायटीमधील सर्वांनी उत्साहाने पार पाडली आणि जनरल औषधे किंवा कांहीही गोष्टींची आवश्यकता लागल्यास सर्वांनी बिन्धास्त सोसायटी गृपवर मेसेज पाठवून सोसायटीमध्येच सगळ्या गोष्टींची सोय शोधली.In reply to >>>तुमच्या बिल्डिंग वा by मोदक
In reply to सिक्युरिटी गार्ड्सना घरी by मराठी कथालेखक
सिक्युरिटी गार्ड्सनी घरी जाण्याचे प्रमाण कमी केले होते. क्लब हाऊसमध्ये त्यांच्या विश्रांतीची सोय केली होती.
>>>तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ?
सर्वसाधारणपणे स्त्रिया वैयक्तिक आरोग्याशी संबंधित गोष्टींची इतकी हातातोंडाची लढाई करत नाहीत. पण जर कांही अडचणी आल्या असतील तर ते प्रश्न त्यांच्या त्यांच्या ग्रुपद्वारे सोडवले गेले असतील. कारण मेन ग्रुपवर असा कांहीच विषय निघाला नाही.
>>>एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ?
आता असे आहे.. ही अभूतपूर्व परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा बघत आहोत आणि प्रार्थना करूया की हे सगळे लवकर संपेल.
आपण / सरपंच / नगराध्यक्ष / महापौर / आमदार / मुख्यमंत्री / पंतप्रधान / राष्ट्रपती हे सर्वजण ही परिस्थिती पहिल्यांदाच बघत आहेत. लॉकडाऊन होईल आणि महिनोन्महिने रेल्वे / विमान सेवा बंद राहतील असे आपल्याला कधीतरी वाटले होते का..? ९/११ ला अमेरिकेने सर्व विमाने विमानतळावर उतरवली हे बहुतेक अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आज भारतात तसेच घडते आहे. "लॉकडाऊन होऊन सोसायटी सील कसे करणार..?" हे जसे जानेवारी २०२० मध्ये कुणालाच माहिती नव्हते त्याच प्रमाणे "लोकं कामाला जाऊ लागले आणि रूग्ण सापडला की सोसायट्या कसे सील करणार..?" हे त्या त्या वेळी बघू आणि उत्तरे शोधू. In reply to >>>सिक्युरिटी गार्ड्सना घरी by मोदक
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by मराठी कथालेखक
In reply to तुम्हाला आणखीही प्रश्न असतील by मोदक
"मोदी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय रोजगार देणार आहे..?" हा लाचार प्रश्ननाही हो.. आता मोदींकडून काही अपेक्षाच राहिली नाही :)
"आहे त्या परिस्थितीमधून आपल्या पातळीवरून कसा मार्ग काढायचा आहे..?" हे उत्तर आपण शोधायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.हो.. तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..
In reply to आता विषय निघालाच आहे तर ... by मराठी कथालेखक
बरोबर.. आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो. त्यामुळे किमान आपल्यासारख्या लोकांनी कुणाकडूनच काहीच अपेक्षा करू नये.
तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..
तुमचा हा निष्कर्ष म्हणजे सिलेक्टिव रिडींगचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात माझा देश उद्योग आणि उत्पादनात आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मला आजिबात वाईट वाटणार नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मानभावीपणा करत कुणाला अशा एखाद्या गोष्टीची टवाळी करावी असे वाटत असेल तर त्याने स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे - हे माझे वैयक्तिक मत. In reply to आता मोदींकडून काही अपेक्षाच by मोदक
स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहेकुणाच्याच नाही. ना मोदी ना अन्य कुणी. ना भाजप ना काँग्रेस. एक गोष्ट आहे साधीशी - भिकारी आणि चोर सोडले तर स्वतः कष्ट करुन खाणारा प्रत्येक जण आत्मनिर्भरच. लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे साधन हिरावले गेले (किंवा अनिश्चित काळाकरिता बंद पडले) त्यामुळे ती व्यक्ती परावलंबी झाली अशावेळी तिला 'आत्मनिर्भर बन' म्हणणे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. बाकी तुमच्या धाग्यावर विषयांतर नको असे तुम्हीच सुचवले होते म्हणून मला वाटते ही चर्चा इथे थांबवावी (मोदींचा विषयही मी काढला नव्हताच, असो).
In reply to स्वत:च्या निष्ठा नक्की by मराठी कथालेखक
In reply to स्वत:च्या निष्ठा नक्की by मराठी कथालेखक
In reply to लॉकडाऊनने अनेकांचे उपजीवेकेचे by सुबोध खरे
असे होऊ नये म्हणून श्री मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा म्हणून आवाहन केले आहे.बरोबर आहे. पण "मेक इन इंडिया" अभियान आधीच होतं ना. आता या परिस्थितीत "आत्मनिर्भर व्हा" अशा आवाहनाचा काय अर्थ घ्यायचा ? जर्मनी, अमेरिका ई देशांत उद्योगांना अर्थिक मदतही मिळाली आहे (व्हॉटस अॅप व येथील पोस्ट वाचून समजले त्याप्रमाणे) बाकी एरवी सरकारने (फक्त केंद्र असे नाही तर राज्य, स्थानिक) उद्योगांकरिता फार असं वेगळं काही केलं नाही तरी चालेल पण फक्त कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम असावी, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, भ्रष्टाचार यांना पुर्णतः मोडीत काढायला हवे, औगद्योगिक तंटे (जसे पेमेंट बुडविणे, कराराच्या अटी न पाळणे ई) त्वरेने निकालात निघून न्याय मिळेल याची व्यवस्था करावी. मग प्रगती करण्यास उद्दोजक सक्षम आहेतच. या मातीत टाटा , किर्लोस्कर , जगदाळे असे अनेक उद्योजक स्वतःच्या हिमतीवर पुढे आले आहेत. पण त्याचवेळी अनेक जण व्यवसायात पडायला घाबरतात कारण भ्रष्टाचार, गुंडगिरी याची भिती.
आज स्थिती काय आहे? हे तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी आपल्याकडील बहुतेक उद्योग स्वस्तात मिळणाऱ्या चिनी माल खरेदी करण्याच्या सोप्या वृत्तीचे झाले आहेत.ही खूप नॉर्मल आहे. जेव्हा जे स्वस्त आणि सहज मिळतं ते माणूस तिथूनच घेतो स्वतः विकसित करण्याच्या भानगडीत पडत नाही. गरज ही शोधाची जननी आहे. मी स्वतः काही रेसिपीज इतक्याकरिता शिकलो की ते पदार्थ सहसा कोणत्या हॉटेलमध्ये मिळत नाहीत आणि जिथे ते मिळतात तिथेही खूप महाग होते. जो हाडाचा उद्योजक आहे त्याला माहिती आहे की किंमत कशी नियंत्रणात ठेवायची. पण रक्तात उद्योजकता नसलेला व्यक्ती नोकरीच करेल. आणि आता त्याची नोकरी गेली असेल तर त्याला सरकारी सहाय्य गरजेचे आहे. तो लगेच आत्मनिर्भर बनू शकत नाही.
परंतु एकदा मोदी द्वेषाचा चष्मा लावला कि कुणीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला तरी तो आपल्या डोक्यात शिरतच नाहीहा तुमचा गैरसमज. मी मोदी विरोधक नाही. २०१४ साली मोदी सत्तेवर आलेत तेव्हा मलाही खूप आनंद झाला. त्यांच्या गुजरातच्या विकासबद्दल खूप ऐकले होते आणि आता देशाचाही विकास वेगाने होईल असे स्वप्न होते. पण नंतर पदरी निराशाच आली. पण ते असो. मात्र मोदींवर केलेली टीका तुम्ही व्यक्तिशः खूपच मनाला लावून घेता असं दिसतंय.
In reply to असे होऊ नये म्हणून श्री मोदी by मराठी कथालेखक
In reply to स्वत:च्या निष्ठा नक्की by मराठी कथालेखक
In reply to आता मोदींकडून काही अपेक्षाच by मोदक
आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो.फार काही वेगळी अशी देशसेवा नसेन करत पण वर्षाला सहा आकडी टॅक्स भरतो. वाहतुकीपासून सगळे नियम पाळतो. लॉकडाऊनलाही तात्विक विरोध असला तरी ते पाळतो आहेच. तसेच आणखी काही वैयक्तिक गोष्टी/निर्णय आहेत जे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फक्त देशाकरिताच नाही तर पुर्ण जगाकरिता, निसर्गाकरिता , पर्यावरणाकरिता लाभकारकच आहेत. असो. तो पुर्णतः वेगळा विषय होईल.
In reply to आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार by मराठी कथालेखक
In reply to वर्षाला सहा आकडी टॅक्स भरतो. by सुबोध खरे
हि बाब अनाठायी आणि अनावश्यक आहे.टॅक्स भरणं अनाठायी आणि अनावश्यक आहे ?
In reply to हि बाब अनाठायी आणि अनावश्यक by मराठी कथालेखक
In reply to आपण किती कर भरतो याची by सुबोध खरे
In reply to तो प्रतिसाद एकतर तुम्हाला by मराठी कथालेखक
मी गेले सहा-सात वर्षे जालावरमी गेले सहा-सात वर्षे मिपावर आहे
In reply to दुरुस्ती by मराठी कथालेखक
In reply to मग मी सहा आकडी कर भरतो हे by सुबोध खरे
किंवा एखादा सात आकडी कर भरत असेल तर तो तुमच्या पेक्षा जास्त हुशार?असेलही..पाच आकडी भरणाराही माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल. मुळात मी माझ्या हुशारी बद्दल बोललोच नव्हतो. प्रश्न होता समाजाला काही देण्याचा तेव्हा मी उत्तर दिले होते. इतरही काही उल्लेख होते त्या उत्तरात पण तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग केले असावे, तसेच प्रश्नही वाचला नसावा. असो.
मग मी सहा आकडी कर भरतो हे लिहिण्याची इथे काय गरज होती?बाकी माझा प्रत्येक प्रतिसाद पोस्ट करण्यापुर्वी तुमच्याकडे परीक्षणाला द्यावा काय ? कशाची गरज आहे आणि कशाची नाही हे तुम्ही ठरवावे काय ? तुमच्या धाग्यांत , अनेक प्रतिसादातील तपशीलाचीही अशा प्रकारे कुणी विनाकारण चिकित्सा केली तरी तुम्हाला चालेल का ? असो. आता या विषयावर अधिक वाद होवू नये अशी माझी इच्छा आहे.
In reply to आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार by मराठी कथालेखक
त्यांची उद्दिष्टे विकृत किंवा लोकांना त्रास देण्याची नक्कीच नाहीत.लोकांना त्रास द्यायचं उद्दिष्ट नाही पण लोकांना त्रास तर होतो आहेच ना? निरर्थक बंधनं म्हणजे नागरी स्वातंत्र्याचा संकोच नव्हे काय? करोना हां सर्दी किंवा फ्लू पेक्षा घातक रोग नसतांना धडधाकट लोकांवर टाळेबंदी का लादली जातेय? आ.न., -गा.पै.
In reply to खरी अडचण सोसायट्यात नाहीच आहे by आयर्नमॅन
In reply to सहमत. असे कुणाचे अनुभव असतील by मोदक
जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19टायटल वाचून सामान्यजन जे गोंधळलेले नसतील ते गोंधळात पडून जातील पावसाळ्यातील एक दिवस, मी पाहिलेला हिटलर, रेड लाईट मधील एक संध्याकाळ इसिस प्रमुखासोबत केलेला नाश्ता अथवा आशा शब्द योजनेतून सुरू होणारे बरेच एस्से हे यु नो अशी थिंग स्पष्ट करत असतात जी इतरेजनांच्या नजरेतून सुटलेली तरी आहे अथवा नजरेच्या टप्यात कधी येऊच शकलेली नाही अथवा ती आशा वेळी घडली जेंव्हा वाचक पृथ्वीवरच न्हवता पण सदरील लेख वाचल्यावर तर असे काहीच नसल्याने मोठ्या अपेकसेने काय नक्की घडले तरी काय असावे असा विचार करत धागा वाचल्यावर भयंकर हिरमोड झाला... खोदा पहाड निकला चुहा अशी काहीशी भावना झाली
In reply to जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - by आयर्नमॅन
In reply to अभिप्रायाचे स्वागत आहे. मुळात by मोदक
In reply to मूलभूत अधिकार धाब्यावर बसवले जाताहेत by गामा पैलवान
भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाहीसंचारस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे हे खरं पण आणीबाणी जाहीर झाली तर इंटरनेट व फोनवरही बंधने येवू शकतील... बाकी या लॉकडाऊनविषयी काही याचिका दाखल झाल्या आहेत किंवा कसे ?
In reply to भारताच्या नागरिकांना by मराठी कथालेखक
In reply to विषयांतर होत आहे. by मोदक
In reply to विषयांतर होत आहे. by मोदक
विषयांतर होत आहे.खरंय.. पण गापैंचा एक धागा उखडला गेला आणि आता तो साईड इफेक्टवाला धागाही वाचनमात्र केला आहे. मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. असो..
In reply to विषयांतर होत आहे. by मराठी कथालेखक
मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं.
एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला.. तुम्ही ते सदस्य आणि अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी त्यावर काहीही उपाय केला नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.
बघा विचार करा. इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?In reply to मिपावरील by मोदक
एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.बरोबर आहे उगा धोरणे निष्पक्ष की लवचिक याचा ऊहापोह आजिबात करू नये
In reply to मिपावरील by मोदक
खाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.ते माझं मी बघेन. तुमचा धागा आहे , मी तुमच्याशी चांगल्याप्रकारे चर्चा करत होतो. पण तुम्हाला वाकड्यात घुसायची हौस आहे का ? मी आणि मालक काय ते बघून घेईन. तुमच्या मालकीची नाही ना वेबसाईट ?
थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.उगाच वाईट भाषा वापरुन तुम्ही स्वतःची पातळी दाखवत आहात. अपमान मलाही करता येतो.
इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?तुमचा धागा आहे आणि मी तुमची खोडी काढली नव्हती. फालतूत वाद करु नका.
- हजारो मेले ते कोविद मुले नाहीअमेरिकेत दोन महिन्यांत जर खरोखंच ८८०००+ मेले असते तर काय हाहाकार उडाला असता! विदर्भात मोवाड नावाचं एक गाव वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. तिथे जुलै १९९१ मध्ये भयानक महापूर आला होता व आख्खं गाव पाण्याखाली गाडलं गेलं होतं. परिस्थिती इतकी वाईट होती की प्रेतांची मोजदाद करणंही अशक्यं बनलं होतं. मृतांचा अधिकृत आकडा ५०० होता तर अनधिकृत आकडा २०००+. लक्षांत घ्या, २४ तासांत फक्त २००० लोकं मेल्याने भीषण रोगराई माजली होती. तर चिमुकल्या UK मध्ये ६० दिवसांत ३५०००+ लोकं मेल्याने काय हाहाकार माजायला हवा होता बरं? संदर्भ : २० मार्च ते २० मे या कालांतराचा तक्ता - https://www.worldometers.info/coronavirus/country/uk/ करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. आ.न., -गा.पै.
In reply to हजारो जण खरोखरंच मेले होते तेव्हा .... by गामा पैलवान
In reply to हजारो जण खरोखरंच मेले होते तेव्हा .... by गामा पैलवान
करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड.
ओके गापै.
आंम्ही वेगळ्या जगात रहात आहोत आणि तुम्ही वेगळ्या. तुमच्या जगात प्रॉब्लेम नसल्याने तुम्ही सुखी आणि निवांत आहात. मग आमच्या जगात प्रॉब्लेम आहेत तर आंम्हाला आमचे प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवूद्या.
तुमच्या जगात प्रश्न नाहीत हा तुमचा मुद्दा कळाला आहे - आता त्या मुद्दयाचा जप प्रत्येक धाग्यावर करून नक्की काय साध्य करीत आहात..?In reply to करोना हे थोतांड आहे आणि by मोदक
भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ?इंग्लंडचं जाऊ द्या. तो भारतापेक्षा बराच प्रगत आहे असं गृहीत धरूया. इटलीतला लोम्बार्डी तर भारतासारखाच आहे ना? गर्दी, धूर, धूळ, प्रदूषण, इत्यादि भारतीय महानगराइतकं नसलं तरी बाकीच्या युरोपपेक्षा जास्त आहे. तिथे म्हणे प्रेतं पुरायला जागा अपुरी पडू लागली. मग उघड्यावर सडलेल्या किंवा नुसतं पडलेल्या प्रेताचा एखादा फोटो कुठेतरी मिळेल काय? नुसते मोठमोठे आकडे टाकल्याने ती विश्वासार्ह बातमी होत नसते. आ.न., -गा.पै.
फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!थोतांड उकलणं हे सत्य शोधण्यापेक्षा फारंच सोपं असतं. मी संपूर्ण सत्य माहीत असल्याचा दावा केला कुठेही नाहीये. माझ्या कथनात त्रुटी आहेत हे मान्य. पण आपण सगळ्यांचे अनुभव जर एकत्र मांडले तर त्यातून सत्याच्या अधिक जवळ जाता येईल. जनज्ञान किंवा Crowdsourcing the Truth असंही म्हणता येईल. आ.न., -गा.पै.
In reply to सत्यशोधन व थोतांडशोधन by गामा पैलवान
In reply to तुमच्या माहितीचे सोर्स उघडे करा by आयर्नमॅन
In reply to सत्यशोधन व थोतांडशोधन by गामा पैलवान
In reply to दोन तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होतं by तुषार काळभोर
In reply to प्रत्येक गोष्टीत पुरावा कसा देणार by नेत्रेश
In reply to सब माया है by तुषार काळभोर
In reply to मौसमी विषाणू व अतिरिक्त मृत्यूदर by गामा पैलवान
In reply to गापैंच्या निसटत्या बाजू १ by माहितगार
१७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत.जर मृत्यूदर १७०० ते २८००० असा दीर्घ हेलकावे घेणारा असेल तर १७००० ही सरासरी निरर्थक ठरते. अशा वेळेस विस्तारकला ( = ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ) विचारात घ्यावी असं माझं मत आहे. २८००० च्या पार्श्वभूमीवर ४०००० हा आकडा अतिरिक्त नाही. २.
घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल ....भावना व गणित यांची गल्लत होऊ नये असं माझं मत आहे. भावना महत्त्वाच्या आहेत, पण सध्या मुद्दा सांख्यिकीचा आहे. ३.
शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ?बाब गंभीर आहे, पण अवाढव्य नाही. ४.
टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहेतैवान व व्हियेतनाम हे अपवाद धरावेत का? तैवानमध्ये टाळेबंदी नाही ( पण कडक नियम आहेत ) : https://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2020/04/23/2003735146 व्हियेतनाममध्ये करोना मृत नाहीत : Remarkably, for a country that shares a 870-mile porous border with China and is far less wealthy than other Asian nations such as South Korea and Taiwan, Vietnam has suffered no deaths from the pandemic. संदर्भ : https://www.telegraph.co.uk/news/2020/05/02/life-lockdownvietnam-reopens-tentatively-zero-deaths/ तैवान व व्हियेतनाम यांच्या एकत्रित उदाहरणांवरून दिसतं की सरसकट टाळेबंदी न करताही करोनाशी लढत देता येते. ५.
शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ?फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो हे मान्य. पण मृत्यूदरही त्याच वेगाने वाढतो हे अमान्य. मृत्यूदर नक्कीच आटोक्यात ठेवता येतो, पण केव्हा? जर गंभीर रोगी वेगळे केले तर आणि तरंच. जर सरसकट टाळेबंदी व लोकं सरसकट रुग्णालयात भरती केले तर आरोग्यव्यवस्थेवर अविरत ताण येतो. त्यामळे ज्या करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर आहे अशांना उपचार मिळंत नाहीत. ६.
१७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ?हे मृत्यू फ्लू या आजारांमुळे झालेले नसून आधीच असलेल्या व्याधी अधिक वेगाने पसरून झालेले मृत्यू आहेत. फ्लू हे केवळ तात्कालिक कारण आहे. ७.
औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?माझ्या माहितीप्रमाणे फ्लू वर लस नाही. आ.न., -गा.पै.
In reply to मोदक तुमच्या सोसायटित कोरोना by palambar
सर्वांनी स्वयंप्रेरित होऊन