असा एक शत्रूच खुद्दार व्हावा

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
9 May 2020 - 12:38 pm

असा एक शत्रूच खुद्दार व्हावा.
पुरावा परंतू न गद्दार व्हावा.

अशी स्निग्ध व्हावी घरे ही नभाची.
उभ्या आसमंतात उद्धार व्हावा.

कुण्या मोगऱ्याचा दिसावा पसारा.
उभा श्वास माझा ग मंदार व्हावा .

कशाला कुणाची करावी अपेक्षा.
स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा.

तुझ्या स्पंदनाची गती सैल व्हावी .
नि डोळ्यांत साऱ्या ग अंधार व्हावा .

-कौस्तुभ
वृत्त - भुजंगप्रयास

वृत्तबद्ध कविताकविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

9 May 2020 - 1:36 pm | संजय क्षीरसागर

कल्पनाविष्कार आणि वृत्ताचा मेळ छान जमलाय!

कौस्तुभ भोसले's picture

9 May 2020 - 2:15 pm | कौस्तुभ भोसले

धन्यवाद

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 2:30 pm | चांदणे संदीप

आवडले.

सं - दी - प

कौस्तुभ भोसले's picture

9 May 2020 - 3:19 pm | कौस्तुभ भोसले

धन्यवाद

कानडाऊ योगेशु's picture

9 May 2020 - 3:31 pm | कानडाऊ योगेशु

आवडली. स्पर्धेसाठी पाठवायची होती कि.
ते भुजंगप्रयास नसुन भुजंगप्रयात आहे.

कौस्तुभ भोसले's picture

9 May 2020 - 4:01 pm | कौस्तुभ भोसले

भुजंगप्रयात किंवा भुजंगप्रयास दोन्ही शब्द वापरू शकतो आपण

मन्या ऽ's picture

9 May 2020 - 7:03 pm | मन्या ऽ

वाह!

कौस्तुभ भोसले's picture

10 May 2020 - 6:42 pm | कौस्तुभ भोसले

धन्यवाद

कशाला कुणाची करावी अपेक्षा.
स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा.
- - हे कडवे खूप आवडले.

कौस्तुभ भोसले's picture

10 May 2020 - 6:41 pm | कौस्तुभ भोसले

आभारी आहे

गणेशा's picture

10 May 2020 - 11:51 pm | गणेशा

मस्त

कौस्तुभ भोसले's picture

11 May 2020 - 10:56 pm | कौस्तुभ भोसले

धन्यवाद