असा एक शत्रूच खुद्दार व्हावा.
पुरावा परंतू न गद्दार व्हावा.
अशी स्निग्ध व्हावी घरे ही नभाची.
उभ्या आसमंतात उद्धार व्हावा.
कुण्या मोगऱ्याचा दिसावा पसारा.
उभा श्वास माझा ग मंदार व्हावा .
कशाला कुणाची करावी अपेक्षा.
स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा.
तुझ्या स्पंदनाची गती सैल व्हावी .
नि डोळ्यांत साऱ्या ग अंधार व्हावा .
-कौस्तुभ
वृत्त - भुजंगप्रयास
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6660
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा !
धन्यवाद
In reply to व्वा ! by संजय क्षीरसागर
उत्तम जमलिये
आभारी आहे
In reply to उत्तम जमलिये by चांदणे संदीप
आवडली. स्पर्धेसाठी पाठवायची
धन्यवाद
In reply to आवडली. स्पर्धेसाठी पाठवायची by कानडाऊ योगेशु
वाह!
धन्यवाद
In reply to वाह! by मन्या ऽ
कशाला कुणाची करावी अपेक्षा.
आभार
In reply to कशाला कुणाची करावी अपेक्षा. by राघव
मस्त
धन्यवाद
In reply to मस्त by गणेशा