कोरोना गीत

Primary tabs

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जे न देखे रवी...
4 Apr 2020 - 6:20 pm

कोरोना गीत

पुरोगामी प्रतिगामी आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

भक्त द्वेष्टे आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

सश्रद्ध अश्रद्ध आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

ईश्वर अल्ला आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

फेकु पप्पू आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

भारत पाक आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

इटली चीन आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

अम्रिका युरोप आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

मंदीर मस्जिद आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

गरीब श्रीमंत आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

हिंदु मुस्लिम आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

स्त्री पुरुष आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

माणुस प्राणी आम्हाला नाही ठाउक
चल रे कोरोना टुणुक टुणुक

विज्ञान संशोधन आम्हाला आहे ठाउक
पळ रे कोरोना चुणुक चुणुक

कवी-आम्ही सोताच!

काहीच्या काही कविताकविता

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Apr 2020 - 7:11 pm | कुमार१

छान .

प्रचेतस's picture

4 Apr 2020 - 8:31 pm | प्रचेतस

मस्त.

धर्मराजमुटके's picture

4 Apr 2020 - 8:37 pm | धर्मराजमुटके

मस्त.

पाषाणभेद's picture

7 Apr 2020 - 8:34 am | पाषाणभेद

परेड सावधान!
सामनेसे टुणुक टुणुक चलेगा टुणुक टुणुक चल!

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2020 - 4:01 pm | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ! बाये मुड टुणूक टुणूक, दहिने मुड टूणुक टुणुक, पिछे मुड टुणुक टुणुक

कंजूस's picture

7 Apr 2020 - 9:06 am | कंजूस

वा!

मन्या ऽ's picture

7 Apr 2020 - 11:16 am | मन्या ऽ

छानेय!

मदनबाण's picture

8 Apr 2020 - 4:21 pm | मदनबाण

छान कविता प्रकाका !

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Rising

मार्कस ऑरेलियस's picture

8 Apr 2020 - 4:29 pm | मार्कस ऑरेलियस

विज्ञान संशोधन आम्हाला आहे ठाउक
पळ रे कोरोना चुणुक चुणुक

>>>

उद्या जर "चीनच्या संशोधकानीच करोना विषाणु जैविक शस्त्र म्हणुन विकसीत केला होता" हे सिध्द झाले तर हे विज्ञानाला अगदीच गोड गोड मानणारी माणसं कसली भारी तोंडावर पडतील नै ! एकदम जळगाव जोशी स्टाईल ! मजा येईल =))))

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2020 - 10:31 am | प्रकाश घाटपांडे

विज्ञानाला नैतिकता व मानवता या मूल्यांची जोड हवीच. अणुशक्ती संहारक म्हणून ही वापरता येते व मानवी जीवन समृद्ध व सुखी करण्यासाठी पण वापरता येते. थोडक्यात विज्ञान संशोधन हे विवेकी माणसाच्या हातात राहिले तर ठिक आहे नाहीतर ते संहारक म्हणून वापरले जाईल. फक्त विज्ञान श्रेष्ठ व बाकी कनिष्ठ असे म्हणणे अविवेकी आहे हे मान्यच.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2020 - 5:02 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी ! आवडली +१