विनवणी

Primary tabs

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
26 Mar 2020 - 4:53 pm

राहु दे तव सर्व जिवलग खास तव यादीमध्ये
पण मला त्या 'भाव'गर्दित मुळिच तू मोजू नको

चालु दे संवाद प्रेमळ त्या तुझ्या मित्रासवे
धाडिला मी जो बदाम मुळिच तू पाहू नको

घेउनी दोस्तास जा तू पेयप्राशनकारणे
फक्त 'त्या' अपुल्या ठिकाणी त्यास तू नेऊ नको

प्रश्न चावट तो विचारिल, ऐकुनी हसशील तू
आपले हळवे इशारे त्यावरी उधळू नको

राहु दे मज एकला, मम स्मरणतीरी गे सखे
रांगेत मी राहीन येथे, तू असे समजू नको

- चलत मुसाफिर

कविताप्रेमकाव्य