राहु दे तव सर्व जिवलग खास तव यादीमध्ये
पण मला त्या 'भाव'गर्दित मुळिच तू मोजू नको
चालु दे संवाद प्रेमळ त्या तुझ्या मित्रासवे
धाडिला मी जो बदाम मुळिच तू पाहू नको
घेउनी दोस्तास जा तू पेयप्राशनकारणे
फक्त 'त्या' अपुल्या ठिकाणी त्यास तू नेऊ नको
प्रश्न चावट तो विचारिल, ऐकुनी हसशील तू
आपले हळवे इशारे त्यावरी उधळू नको
राहु दे मज एकला, मम स्मरणतीरी गे सखे
रांगेत मी राहीन येथे, तू असे समजू नको
- चलत मुसाफिर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2031
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिलजले की गझल
दिलजले की गझल :)
चांगली आहे! आवडली
:)
In reply to दिलजले की गझल by रंगीला रतन
धन्यवाद