मैत्री!

Primary tabs

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
20 Mar 2020 - 10:59 pm

टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का!

'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119
------
मैत्री!

बाईचे दो सख्खे मैतर
पहिला काका दुसरा अप्पा
रोज मारते अलटुन पलटुन
हाटसापवर गुलुगुलु गप्पा

मैतर दोघे पक्के डांबिस
बाई त्यांचा नाजुक बिंदू
आव परंतू आणिति ऐसा
विनयाचे जणु साती सिंधू

रोजरोजच्या गप्पा ओल्या
खूष जाहती अप्पा काका
पाहु लागती स्वप्ने चावट
मनात बांधुन "वाडा" पक्का

परंतु बाई आहे खमकी
दाद कशी ती लागू देइल!
झुलवत ठेवी दोघांनाही
धाडुन चावट बदाम, स्माइल

दोघांमंध्ये संख्या छत्तिस
तोंड पाहणे पसंत नाही
परंतु बाई भाग पाडते
हसुन बोलण्या दोघांनाही

बाईचे ते बदाम पाहुन
दोघे होती कासावीस
"वाड्यावरती कशि आणावी?"
विचार करती रात्रंदीस

मनातला तो रगेल वाडा
रोज बांधिती रोज तोडिती
लाखोली वाहुन मैत्रीला
दोहों मैतर "हात चोळती"

कविताप्रेमकाव्यविनोद