आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३

अहम्_लिखामि's picture
अहम्_लिखामि in जनातलं, मनातलं
12 Dec 2019 - 1:21 pm

पहिले भाग प्रकाशित केलेले आहे

भाग ३
या अश्या गोकुळात ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ८ भावंडं जमायचो. दुपारी बदाम सात चा कार्यक्रम ठरलेला असायचा, हरेल त्याने ४ वाजता येणारी कुल्फी खाऊ घालायची. खाऊ घालायची म्हणजे काय तर स्वतः सगळ्यात शेवटी खायची सगळ्यांना आणून दिल्या नंतर कारण पैसे तर आजोबाच द्यायचे. या बदाम साथ च्या खेळात माझ्या सारख्या प्रामाणिक खेळाडूंना जिंकायचा काहीही मार्ग नव्हता हे मला कळले जेंव्हा मोठ्या मामीच्या चटई खालून २ राजे अचानक बाहेर आले. तो पर्यंत राजा आला कि सगळ्यांना कळेल कि अश्या पद्धीतींनी मोठ्यांनी आवाज काढायचा असाच वाटायचं. life is unfair if you play fair हे पहिल्यांदा शिकलो ते ह्याच पत्याच्या डावावर. असो मामी एव्हढी पत्त्यांची फिरवाफिरवी कधीच जमली नाही आणि आता खूप वर्षात मामी सोबत खेळायचा chance पण आला नाही. या ८ भावंडं मध्ये सगळ्यात समजूतदार मोठी मावस बहीण. आपण सगळ्यात मोठे आहोत आणि या सगळ्या भावंडाची चूक ती आपली चूक असा समजून बिचारीनि आपल बालपण घालवल. कोणाला कुठलेली न्याय हवा असल्यास सगळ्यात पहिले हिच्या कडे तक्रार जायची. आणि हिच्या कोर्टात स्वभावाने गरीब असलेल्यांना झुकती बाजू, म्हणून मोठा मामे भाऊ, मोठी मामे बहीण आणि हिचीच धाकटी बहीण स्वतःचा न्याय निवाडा करून घ्यायचे. या तिघां मध्ये आलटून पालटून cricket bat नि मारा मारी झालेली पण मी पहिली आहे. त्यातल्या त्यात मी, धाकटा मामे भाऊ, धाकटी मामे बहीण ये चिल्लर लोक योग्य मार्गानी तक्रार करायचे. माझा सक्खा धाकटा भाऊ पण दांडगट पण सगळ्यात लहान असल्यामुळे असा निकाल त्याच्याच बाजूने लागायचा.
रात्री झोपायला आजोबा गच्चीवर घेऊन जात. ते स्वतः झोपायला येई पर्यंत सगळ्यांचा गप्पांचा फड रंगात असे. मग पुन्हा Evil Dead ची पारायणे होत आणि आम्ही देवाचा धाव सुरु करे पर्यंत आजोबा अवतरत. आजोबांचा तसा दरारा होता. एकदा पाऊस पडायला लागला आणि आम्ही उठून पाळणार तितक्यात आजोबा गरजले कि कोणीही उठायचे नाही. पाऊस आता जाईल. डोक्यावर गोधडी घ्या आणि झोपा चुपचाप. त्या पावसालाच आमची दया आली बहुतेक, मुलं आपल्यामुळे भिजतील म्हणून खरचं पडला नाही बिचारा. आता आमच्या वडिलांना, मामांना पाहिलं कि आजोबा लोकांनी, नातवंडाबाबत, इतके मवाळ धोरण घेणे कधीपासून लागू झाले हे जाणून घ्यायची इच्छा होते.

आता आजोबांना जाऊन १५ वर्ष झाली. दरवर्षी वर्गात पहिला नंबर काढणारी म्हणून त्यांना माझा खूप कौतुक होतं. आजीला जाऊन पण २ वर्ष झाली. ती खूप सुंदर crochet करायची. स्वयंपाक तर नाही पण तिची हि कला शिकून घ्यायची सदबुद्धी मला झाली आणि आता तिचा वारसा थोडा बहुत पुढे चालवते. तिने माझ्या वडिलांकरता स्वेटर विणले होते आणि आता मी भाच्ची करता टोपी विणू शकते, हाच काय तो माझा तिला नमस्कार.

या घराला मी तरी नेहमी आजीचं घर असच म्हणलं. ती असे पर्यंत ते कधीही आजोबांच किंवा मामा मामीच घर नव्हतच मुळी. तिच्या असण्यानं आजोळ काय असत हे कळलं. आता हळूहळू मामा / मामी कडे जाऊन येते अस बोलायची सवय लागते आहे. पण ते म्हणताना सुद्धा आपण आजीला betray तर करत नाही असा विचार डोकावतोच.
असो. हे माझ्या डोक्यातले खुळ. खरंतर मामा आणि मामीनी सुद्धा हे घर नेहमीच आमच्याकरता उघडं ठेवलं आहे. आम्ही सगळे भावंडं जमायचं एकमेव ठिकाण म्हणजे हे घर. अजूनही.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 Dec 2019 - 5:47 pm | पद्मावति

तीनही भाग वाचले. छान लिहिलंय. आवडलं.

अहम्_लिखामि's picture

13 Dec 2019 - 3:12 pm | अहम्_लिखामि

धन्यवाद

पाषाणभेद's picture

13 Dec 2019 - 10:28 am | पाषाणभेद

लहाणपणाच्या आठवणी छानच आहेत पण.....

भाग १ - 12 Dec 2019 - 1:14 pm
भाग २ - 12 Dec 2019 - 1:19 pm
भाग ३ - 12 Dec 2019 - 1:21 pm

एवढ्या लवकर तर रजनीदेखील लिहू शकत नाही. आपण हे तिनही भाग निरनिराळे लिहीले होते काय?
तसे नसावे तर मग एकाच धाग्यात का टाकले नाहीत?
अन तिन भाग करण्याचे कारण काय?
दुसरे असे की आधीचे लेख सरळ सरळ तिन पायर्‍यांनी खाली गेले.

अहम्_लिखामि's picture

13 Dec 2019 - 3:14 pm | अहम्_लिखामि

अहो ब्लॉगर वर लिहिले आणि इथे सोबत प्रकाशित केले. ३ भाग कारण मला feedback मिळाला होता कि लेख खूप मोठा झालाय. :(

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 3:19 pm | मुक्त विहारि

आवडलं..