✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३

अ
अहम्_लिखामि यांनी
गुरुवार, 12/12/2019 - 13:21  ·  लेख
लेख
पहिले भाग प्रकाशित केलेले आहे भाग ३ या अश्या गोकुळात ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ८ भावंडं जमायचो. दुपारी बदाम सात चा कार्यक्रम ठरलेला असायचा, हरेल त्याने ४ वाजता येणारी कुल्फी खाऊ घालायची. खाऊ घालायची म्हणजे काय तर स्वतः सगळ्यात शेवटी खायची सगळ्यांना आणून दिल्या नंतर कारण पैसे तर आजोबाच द्यायचे. या बदाम साथ च्या खेळात माझ्या सारख्या प्रामाणिक खेळाडूंना जिंकायचा काहीही मार्ग नव्हता हे मला कळले जेंव्हा मोठ्या मामीच्या चटई खालून २ राजे अचानक बाहेर आले. तो पर्यंत राजा आला कि सगळ्यांना कळेल कि अश्या पद्धीतींनी मोठ्यांनी आवाज काढायचा असाच वाटायचं. life is unfair if you play fair हे पहिल्यांदा शिकलो ते ह्याच पत्याच्या डावावर. असो मामी एव्हढी पत्त्यांची फिरवाफिरवी कधीच जमली नाही आणि आता खूप वर्षात मामी सोबत खेळायचा chance पण आला नाही. या ८ भावंडं मध्ये सगळ्यात समजूतदार मोठी मावस बहीण. आपण सगळ्यात मोठे आहोत आणि या सगळ्या भावंडाची चूक ती आपली चूक असा समजून बिचारीनि आपल बालपण घालवल. कोणाला कुठलेली न्याय हवा असल्यास सगळ्यात पहिले हिच्या कडे तक्रार जायची. आणि हिच्या कोर्टात स्वभावाने गरीब असलेल्यांना झुकती बाजू, म्हणून मोठा मामे भाऊ, मोठी मामे बहीण आणि हिचीच धाकटी बहीण स्वतःचा न्याय निवाडा करून घ्यायचे. या तिघां मध्ये आलटून पालटून cricket bat नि मारा मारी झालेली पण मी पहिली आहे. त्यातल्या त्यात मी, धाकटा मामे भाऊ, धाकटी मामे बहीण ये चिल्लर लोक योग्य मार्गानी तक्रार करायचे. माझा सक्खा धाकटा भाऊ पण दांडगट पण सगळ्यात लहान असल्यामुळे असा निकाल त्याच्याच बाजूने लागायचा. रात्री झोपायला आजोबा गच्चीवर घेऊन जात. ते स्वतः झोपायला येई पर्यंत सगळ्यांचा गप्पांचा फड रंगात असे. मग पुन्हा Evil Dead ची पारायणे होत आणि आम्ही देवाचा धाव सुरु करे पर्यंत आजोबा अवतरत. आजोबांचा तसा दरारा होता. एकदा पाऊस पडायला लागला आणि आम्ही उठून पाळणार तितक्यात आजोबा गरजले कि कोणीही उठायचे नाही. पाऊस आता जाईल. डोक्यावर गोधडी घ्या आणि झोपा चुपचाप. त्या पावसालाच आमची दया आली बहुतेक, मुलं आपल्यामुळे भिजतील म्हणून खरचं पडला नाही बिचारा. आता आमच्या वडिलांना, मामांना पाहिलं कि आजोबा लोकांनी, नातवंडाबाबत, इतके मवाळ धोरण घेणे कधीपासून लागू झाले हे जाणून घ्यायची इच्छा होते. आता आजोबांना जाऊन १५ वर्ष झाली. दरवर्षी वर्गात पहिला नंबर काढणारी म्हणून त्यांना माझा खूप कौतुक होतं. आजीला जाऊन पण २ वर्ष झाली. ती खूप सुंदर crochet करायची. स्वयंपाक तर नाही पण तिची हि कला शिकून घ्यायची सदबुद्धी मला झाली आणि आता तिचा वारसा थोडा बहुत पुढे चालवते. तिने माझ्या वडिलांकरता स्वेटर विणले होते आणि आता मी भाच्ची करता टोपी विणू शकते, हाच काय तो माझा तिला नमस्कार. या घराला मी तरी नेहमी आजीचं घर असच म्हणलं. ती असे पर्यंत ते कधीही आजोबांच किंवा मामा मामीच घर नव्हतच मुळी. तिच्या असण्यानं आजोळ काय असत हे कळलं. आता हळूहळू मामा / मामी कडे जाऊन येते अस बोलायची सवय लागते आहे. पण ते म्हणताना सुद्धा आपण आजीला betray तर करत नाही असा विचार डोकावतोच. असो. हे माझ्या डोक्यातले खुळ. खरंतर मामा आणि मामीनी सुद्धा हे घर नेहमीच आमच्याकरता उघडं ठेवलं आहे. आम्ही सगळे भावंडं जमायचं एकमेव ठिकाण म्हणजे हे घर. अजूनही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
2319 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

तीनही भाग वाचले. छान लिहिलंय.

पद्मावति
गुरुवार, 12/12/2019 - 17:47 नवीन
तीनही भाग वाचले. छान लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अहम्_लिखामि
Fri, 12/13/2019 - 15:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

लहाणपणाच्या आठवणी छानच आहेत

पाषाणभेद
Fri, 12/13/2019 - 10:28 नवीन
लहाणपणाच्या आठवणी छानच आहेत पण..... भाग १ - 12 Dec 2019 - 1:14 pm भाग २ - 12 Dec 2019 - 1:19 pm भाग ३ - 12 Dec 2019 - 1:21 pm एवढ्या लवकर तर रजनीदेखील लिहू शकत नाही. आपण हे तिनही भाग निरनिराळे लिहीले होते काय? तसे नसावे तर मग एकाच धाग्यात का टाकले नाहीत? अन तिन भाग करण्याचे कारण काय? दुसरे असे की आधीचे लेख सरळ सरळ तिन पायर्‍यांनी खाली गेले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अहम्_लिखामि
Fri, 12/13/2019 - 15:14 नवीन
अहो ब्लॉगर वर लिहिले आणि इथे सोबत प्रकाशित केले. ३ भाग कारण मला feedback मिळाला होता कि लेख खूप मोठा झालाय. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छान लिहिलंय. .

मुक्त विहारि
Fri, 12/13/2019 - 15:19 नवीन
आवडलं..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा