pmpml प्रवासाचा सुखदायक अनुभव !!!

स्मिता दत्ता's picture
स्मिता दत्ता in जनातलं, मनातलं
18 Nov 2019 - 10:33 am

परवा हडपसरला काही कामानिमीत्त जायचे होते. इतक्या लांब कसे ज्याचे ते पाहत होतो आम्ही, तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले. म्हणून मग मनपा ला गेलो तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले. तसे त्या बस स्टॉप ला गेलो. तिकडे १११ लागलेलीच होती. मस्त एसी गाडी अर्थात इलेकट्रीक बस होती ती. पहिल्यांदाच त्या बस मध्ये बसायला मिळाले. थोड्याच वेळात ड्राईव्हर कंडक्टर आले आणि बस सुरु झाली. अतिशय आरामदायक आणि कसलेही धक्के न बसता प्रवास चालू झाला. बस फिरत फिरत दांडेकर पूल स्वारगेट असे करत कॅम्प मधून हडपसर रोड ला लागली. बाहेर बघत प्रवास चालू होता. बाहेरचं दृश्य काही फार सुखावह नव्हतं पण आम्ही आरामात एसी बस मध्ये असल्याने प्रवास कंटाळवाणा आणि त्रासदायक नव्हता. नाहीतर इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हटल्यावर काटाच आलेला. परत येतानाही आम्हाला पुन्हा डांगे चौक ची तशीच इलेक्ट्रिक बस मिळाली , त्यामळे दोन्हीवेळा आरामदायक प्रवास झाला. खरोखर अशा आरामदायक बसेस जर सगळीकडे सुरु झाल्या तर किती मजा येईल असा विचार सहजच मनात आला.

बाकी रस्ते, त्यावरची धूळ,गर्दी, कचरा, बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणे सारं काही खुपत होतच. तेव्हा स्मार्ट सिटी साठी आपल्या महापालिकेने केलेला आटापिटा पहिला कि खरच चीड आणि कीव दोन्ही येते प्रशासनाची. या अशा सुविधा नागरिकांना मिळत असताना स्वतःला स्मार्ट सिटी म्हणवून घेण्याच्या हिमतीची दाद द्यावी तेवढी थोडीच!!!

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

यांचा पिकप फार तगडा असतो कारण वेग येण्यासाठी मोटरचा करंट वाढवणे इतकेच करावे लागते, जे काही मिलीसेकंदातही साध्य होउ शकते, त्यामुळे ट्राफिकमधे या अतिशय आरामदायी अनुभव देतात पुन्हा 1रुपया किलोमीटर म्हणजे काहीच खर्च नाही. तसेच आवाज प्रदूषण जवळपास शून्य. अर्थात शांतता अपघातांना आमंत्रण देऊ नये म्हणून आता गाड्याना स्पीकर्सही असतात ज्या आवडीचा इंजिनाचा आवाज वेगानुसार सभोवताली प्रक्षेपीत करतात व तो हवा तो सेटही करता येतो अथवा सायलेंट मोडवरही वाहन चालवता येते

यशोधरा's picture

18 Nov 2019 - 11:34 am | यशोधरा

हो, मस्त आहे ही बस, एकदम आरामदायी.

या बसेसचे नाव काय आहे? एसी बस/इलेक्ट्रिक बस?

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2019 - 12:46 pm | चौथा कोनाडा

ओलेक्ट्रा असं या बसचं नाव / व्रॅण्डनेम आही.

माझाही योग आला पण दोनतीनदा या बसने प्रवास करायचा. खुपच छान वाटतं या बसने प्रवास करायला.
पण पुण्याच्या कारभारी लोकांनी पुणे शहर, बीआरटी, वाहतुक यांची इतकी वाट लावून ठेवलीय की कधी काय बंद पडेल याचा नेम नाही.
या बस बाबतदेखिल पुढं यशस्वी होईलच असा आशावादी नाहीय.

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2019 - 4:27 pm | मराठी कथालेखक

सगळ्याच बसेस अशा हव्यात.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2019 - 8:10 am | तुषार काळभोर

आता असलेल्या olektra बस पुष्कळ (१०-१५-२० वर्षे) टिकाव्यात अशी सदीच्छा.
कधी तरी महिन्यातून एखाद्या वेळी वाघोली ते हडपसर किंवा बायपास ते हडपसर असा बसप्रवास होतो. तेव्हा ओलेक्ट्रा मिळावी, ही मनोकामना आहे.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 7:09 pm | मुक्त विहारि

ह्या अशा बसेस सर्वच शहरात हव्यातच.

त्यामुळे प्रदुषण कमी व्हायची शक्यता आहे.

तेजस आठवले's picture

21 Nov 2019 - 7:27 pm | तेजस आठवले

तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले.

तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले.

पुण्यात माहिती विचारल्यानंतर तुम्हाला ती मिळाली ह्या दोन वाक्यातच गहिवरून आल्याने पुढील लेख उच्च मनोकायिक अवस्थेत वाचला गेला आहे.
पीएमपीएलने उद्या छोटी चार्टर विमाने उडवायला चालू केली तर वैमानिक भर हवेत केबिन दरवाजा उघडून पचकन पिचकारी मारून अवघ्या पुण्यावर थुंकण्याचा आनंद मिळवतील कि काय अशी भीती आहे.

ह. घ्या.