✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

pmpml प्रवासाचा सुखदायक अनुभव !!!

स
स्मिता दत्ता यांनी
Mon, 11/18/2019 - 10:33  ·  लेख
लेख
परवा हडपसरला काही कामानिमीत्त जायचे होते. इतक्या लांब कसे ज्याचे ते पाहत होतो आम्ही, तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले. म्हणून मग मनपा ला गेलो तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले. तसे त्या बस स्टॉप ला गेलो. तिकडे १११ लागलेलीच होती. मस्त एसी गाडी अर्थात इलेकट्रीक बस होती ती. पहिल्यांदाच त्या बस मध्ये बसायला मिळाले. थोड्याच वेळात ड्राईव्हर कंडक्टर आले आणि बस सुरु झाली. अतिशय आरामदायक आणि कसलेही धक्के न बसता प्रवास चालू झाला. बस फिरत फिरत दांडेकर पूल स्वारगेट असे करत कॅम्प मधून हडपसर रोड ला लागली. बाहेर बघत प्रवास चालू होता. बाहेरचं दृश्य काही फार सुखावह नव्हतं पण आम्ही आरामात एसी बस मध्ये असल्याने प्रवास कंटाळवाणा आणि त्रासदायक नव्हता. नाहीतर इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हटल्यावर काटाच आलेला. परत येतानाही आम्हाला पुन्हा डांगे चौक ची तशीच इलेक्ट्रिक बस मिळाली , त्यामळे दोन्हीवेळा आरामदायक प्रवास झाला. खरोखर अशा आरामदायक बसेस जर सगळीकडे सुरु झाल्या तर किती मजा येईल असा विचार सहजच मनात आला. बाकी रस्ते, त्यावरची धूळ,गर्दी, कचरा, बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणे सारं काही खुपत होतच. तेव्हा स्मार्ट सिटी साठी आपल्या महापालिकेने केलेला आटापिटा पहिला कि खरच चीड आणि कीव दोन्ही येते प्रशासनाची. या अशा सुविधा नागरिकांना मिळत असताना स्वतःला स्मार्ट सिटी म्हणवून घेण्याच्या हिमतीची दाद द्यावी तेवढी थोडीच!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3697 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

इलेक्टरीक बस अफलातून प्रकरण आहे

जॉनविक्क
Mon, 11/18/2019 - 11:08 नवीन
यांचा पिकप फार तगडा असतो कारण वेग येण्यासाठी मोटरचा करंट वाढवणे इतकेच करावे लागते, जे काही मिलीसेकंदातही साध्य होउ शकते, त्यामुळे ट्राफिकमधे या अतिशय आरामदायी अनुभव देतात पुन्हा 1रुपया किलोमीटर म्हणजे काहीच खर्च नाही. तसेच आवाज प्रदूषण जवळपास शून्य. अर्थात शांतता अपघातांना आमंत्रण देऊ नये म्हणून आता गाड्याना स्पीकर्सही असतात ज्या आवडीचा इंजिनाचा आवाज वेगानुसार सभोवताली प्रक्षेपीत करतात व तो हवा तो सेटही करता येतो अथवा सायलेंट मोडवरही वाहन चालवता येते
  • Log in or register to post comments

हो, मस्त आहे ही बस, एकदम

यशोधरा
Mon, 11/18/2019 - 11:34 नवीन
हो, मस्त आहे ही बस, एकदम आरामदायी.
  • Log in or register to post comments

या बसेसचे नाव काय आहे? एसी बस

कंजूस
Mon, 11/18/2019 - 11:50 नवीन
या बसेसचे नाव काय आहे? एसी बस/इलेक्ट्रिक बस?
  • Log in or register to post comments

ओलेक्ट्रा असं या बसचं नाव /

चौथा कोनाडा
Mon, 11/18/2019 - 12:46 नवीन
ओलेक्ट्रा असं या बसचं नाव / व्रॅण्डनेम आही. माझाही योग आला पण दोनतीनदा या बसने प्रवास करायचा. खुपच छान वाटतं या बसने प्रवास करायला. पण पुण्याच्या कारभारी लोकांनी पुणे शहर, बीआरटी, वाहतुक यांची इतकी वाट लावून ठेवलीय की कधी काय बंद पडेल याचा नेम नाही. या बस बाबतदेखिल पुढं यशस्वी होईलच असा आशावादी नाहीय.
  • Log in or register to post comments

पीएम्पी ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस

चौथा कोनाडा
Mon, 11/18/2019 - 12:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सगळ्याच बसेस अशा हव्यात.

मराठी कथालेखक
Mon, 11/18/2019 - 16:27 नवीन
सगळ्याच बसेस अशा हव्यात.
  • Log in or register to post comments

किमान

तुषार काळभोर
गुरुवार, 11/21/2019 - 08:10 नवीन
आता असलेल्या olektra बस पुष्कळ (१०-१५-२० वर्षे) टिकाव्यात अशी सदीच्छा. कधी तरी महिन्यातून एखाद्या वेळी वाघोली ते हडपसर किंवा बायपास ते हडपसर असा बसप्रवास होतो. तेव्हा ओलेक्ट्रा मिळावी, ही मनोकामना आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
गुरुवार, 11/21/2019 - 19:09 नवीन
ह्या अशा बसेस सर्वच शहरात हव्यातच. त्यामुळे प्रदुषण कमी व्हायची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

तेव्हा मनपा वरून बस असते असे

तेजस आठवले
गुरुवार, 11/21/2019 - 19:27 नवीन
तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले.
तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले.
पुण्यात माहिती विचारल्यानंतर तुम्हाला ती मिळाली ह्या दोन वाक्यातच गहिवरून आल्याने पुढील लेख उच्च मनोकायिक अवस्थेत वाचला गेला आहे. पीएमपीएलने उद्या छोटी चार्टर विमाने उडवायला चालू केली तर वैमानिक भर हवेत केबिन दरवाजा उघडून पचकन पिचकारी मारून अवघ्या पुण्यावर थुंकण्याचा आनंद मिळवतील कि काय अशी भीती आहे. ह. घ्या.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा