भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
29 Oct 2019 - 11:07 am

1

पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद)
लेखक: सुधीर काळे
भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत. “This is All India Radio, the news read by Melvil Demello”[१] किंवा "आकाशवाणी, मी अमूक-अमूक आपल्याला बातम्या देत आहे" सारख्या बातम्यांच्या कार्यक्रमापासूनच माझ्या बाह्य जगाच्या आठवणी सुरू होतात. आमच्या घरी टाइम्स ऑफ इंडिया येई, पण इंग्रजी समजत नसल्याने फक्त क्रिकेटचे पान मी वाचत असे. घरीसुद्धा वातावरण राजकीय नव्हते त्यामुळे गप्पाही त्या तर्‍हेच्या नसत.
शाळेतल्या शेवटच्या वर्षांपासूनच नव्हे तर पुढे कॉलेजला गेल्यावरसुद्धा ’नेहरू म्हणजे एक खूप थोर नेते आहेत’ हीच त्यांची छाप मनावर ठसलेली होती. कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला आल्यावर पंडित नेहरूंच्या पुणे भेटीत रेसकोर्सवरील त्यांच्या जाहीर भाषणाला गेल्याचे मला आठवते. पण तिथे इतकी तुफान गर्दी होती कीं मी जिथे उभा होतो तिथून ते एकाद्या ठिपक्यासारखेच दिसत होते व त्या काळच्या लाऊडस्पीकर्सची जी अवस्था होती त्यामुळे ते काय बोलले ते नीट ऐकूसुद्धा आले नाहीं. पण नेहरूंचे ’दर्शन झाल्या’चाच आनंद प्रचंड होता. त्याच भेटीत ते फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून उघड्या गाडीतून जात असताना (त्यावेळी Road Show हा शब्द अजून प्रचारात आलेला नव्हता) त्यांचे जवळून दर्शन झाले. त्यांना मिळालेले हार वगैरे ते जनतेच्या दिशेने उधळत चालले होते. (ती प्रथा मात्र आजही तशीच आहे.) जमलेल्या इतर लोकांप्रमाणे मी सुद्धा त्यांना हात हलवून अभिवादन केल्याची व टाळ्या वाजविल्याचीही आठवण आजही ताजी आहे.
नेहरू सत्तेवर आले तेंव्हां भारताचा चित्रफलक (canvas) कोरा-करकरीतच होता. देश मोठ्या प्रमाणावर शेतीप्रधानच होता. उद्योगधंदे नांवालाच होते. अशा परिस्थितीत नेहरूंनी “परमिट राज”ला जन्म दिला. त्यात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारही सुरू झाला तो जवळ-जवळ १९९२ सालापर्यंत अखंडपणे चालू होता. शेवटी नरसिंह राव यांनी जागतिक बॅंकेच्या दबावाखाली का होईना पण हे परमिट राज्य बरखास्त केले व खुल्या अर्थव्यवस्थेचा शुभारंभ केला.
नेहरूंनी बरेच अवजड उद्योग भारतात स्थापले. पण समाजवादी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर असल्यामुळे आणि ’परमिट राज’ असल्यामुळे हा सारा विस्तार सरकारी क्षेत्रातच झाला. नेहमी शब्दांचे अवडंबर माजविण्याची संवय असलेल्या नेहरूंनी या उद्योगांना “आधुनिक भारताची नवी तीर्थक्षेत्रें” असे नांवही दिले. पण हे सर्व उद्योग घाट्यातच चालले, त्यांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारही होऊ लागला, दर वर्षी होणार्‍या तोट्यांमुळे त्याचा बोजा सरकारी खजीन्यावरच पडत गेला व शेवटी एक-एक करून या सार्‍या उद्योगांचे खासगीकरण करावे लागले.
एक गोष्ट नेहरूंनी चांगली केली ती म्हणजे अनेक धरणांची उभारणी. भाकडा-नांगल, कोयना, रिहंद अशा अनेक धरणांची बांधणी नेहरूंच्या कार्यकालात झाली. त्यातही जरी भ्रष्टाचार झाला असला तरी ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे मात्र आजवर डौलात उभी आहेत. तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरावरील महामार्गांचीही निर्मितीही या कालखंडात सुरू झाली. हे पाऊल नक्कीच सकारत्मक होते व त्याचे श्रेय नेहरूंनाच द्यायला हवे. पण त्यांच्या मनावर समाजवादी विचारांचा मजबूत पगडा असल्यामुळे या सर्वांची प्रगतीही खूपच मंदगतीने झाली.
आधी म्हटल्याप्रमाणे नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचा चित्रफलक कोरा-करकरीतच होता व कुणीही जरी पहिला पंतप्रधान झाला असता तरी अशा तर्‍हेची भरघोस प्रगती झालीच असती. वल्लभभाई जर पंतप्रधान झाले असते तर ती प्रगती आणखी जास्त झाली असती का, खासगी क्षेत्रात जास्त झाली असती का हे प्रश्न मनात येतातच, पण तरीही जे नेहरूंनी केले त्याचे श्रेय त्यांना नक्कीच द्यावयास हवे व ते मी देतोच.
तसेच कूळकायद्यामार्गे “कसेल त्याची जमीन” हा कायदा आणून शेतकर्‍यांना स्वत:ची जमीन उपलब्ध करून दिल्याचे श्रेयही नेहरूंना जाते.
अशी कांहीं कामे नेहरूंनी चांगली केली असली तरी त्यांनी केलेल्या चुका इतक्या गंभीर आहेत कीं शेवटी जमाखर्च मांडल्यावर नेहरूंचे खाते माझ्या मते बुडीत खात्यांतच जाते!
आता नेहरूंच्या चुकांकडे वळू या!
नेहरूंची सर्वात मोठी चूक होती देशाची फाळणी स्वीकारण्याची. याला गांधीही जबाबदार होते. फाळणी होईल ती माझ्या मृत देहावरून असे म्हणणारे गांधी असे कसे निवळले? नेहरू व जिन्ना हे दोघेही बॅरिस्टर होते पण जिन्ना स्वभावाने ज्याला आज आपण ’चालू’ म्हणतो त्यातले वाटतात. म्हणूनच ते आपली खेळी चातुर्याने खेळले व त्यातून पाकिस्तान निर्मून त्यांनी भारताला एक कायमची डोकेदुखी निर्माण करून ठेवली. येथे नेहरूंनी आपला चालूपणा दाखवून जिन्नांची खेळी मोडीत काढायला हवी होती. पण त्यांना ते जमले नाहीं. शिवाय जिन्ना हे कॅन्सरने आजारी होते व पाकिस्तानच्या निर्मितीनंतर एक वर्षाच्या आतच त्यांचे निधन झाले. ही माहिती नेहरूंना कशी मिळाली नाहीं? ती त्यांनी कां मिळविली नाहीं? इथेही नेहरूंचा भोळेपणा म्हणा किंवा त्यांच्या स्वभावातील ’चालूपणा’चा अभावच आड आला व त्यामुळेच त्यांना ही माहिती मिळू शकली नसावी. पण ही माहिती न मिळविणे हीसुद्धा एक चूकच म्हणायला हवी. माझ्या मते कुठल्याही देशाचा प्रमुख (पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष) स्वभावाने चालूच असला पाहिजे, benevolent shrewdness is a must, फक्त त्याच्या ’चालूपणा’त क्रौर्य असता कामा नये व स्वार्थापोटी देशाला लुटून नग्नावस्थेत आणण्याची प्रवृत्ती मात्र असता कामा नये.
या सर्व प्रकारात एड्वीना माऊंटबॅटन यांचा कितपत हात होता? असेही वाचनात आलेले आहे कीं भारताला स्वातंत्र्य द्यावयाचे ठरल्यावर आधीच्या व्हॉइसरॉयच्या जागी तातडीने लॉर्ड माऊंटबॅटन यांची व्हॉइसरॉय म्हणून नेमणूक करण्यात आली.

फाळणीच्या चुकीनंतर नेहरूंची झालेली घोडचूक होती काश्मीर प्रश्नाची हाताळणी! त्यातही योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे, नको तेथे दुष्टाबरोबर सचोटीने किंवा रास्तपणे वागणे (to deal with fairness with crooks) हे राजकारणात बसत नाहीं, “तेथे पाहिजे जातीचे, येर्‍या-गबाळ्याचे काम नोहे” हेच तत्व अशा जागी लागू होते व तेच तत्व वापरले पाहिजे! नेहरूंना आपण कसे ’सरळ’ आहोत हे दाखविण्याची व स्वत:ची प्रतिमा जगभर मिरविण्याची हौस होती व त्यापायी त्यांनी देशहिताकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल. या त्यांच्या भूमिकेमुळे कश्मीरचा एक मोठा भाग पाकिस्तान बळकावून बसला आहे.
त्यातलीच पुढची घोडचूक म्हणजे काश्मीरला ’खास’ दर्जा देणे. हे कलम केवळ शेख अब्दुल्ला यांच्या स्वार्थी हट्टापायी घातले गेले. या कलमामुळे शेख अब्दुल्ला परिवाराला जणू जहागीरच प्रदान करण्यात आली. या कलमामुळे काश्मिरी लोकांना भारतात कुठेही वसण्याचा व कुठलीही जमीन वा मालमत्ता विकत घेण्याचा हक्क दिला गेला पण बाहेरीळ भारतीयांना मात्र काश्मीरमध्ये जमीन वा मालमत्ता विकत घेण्याचा हक्क दिला गेला नाहीं! आहे कीं नाहीं स्वत:च्याच पायावर कुर्‍हाड मारून घ्यायचा आत्मघाती प्रकार? ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करून मोदींनी या एकतर्फी कलमाच्या घोडचुकीला तिलांजली दिली. या कलमाला डॉ. बाबासाहेब अंबेडकरांचाही खंबीर विरोध होता. कां कुणास ठाऊक पण हे काम पूर्ण न करता नेहरू इंग्लंडला चालले होते. अब्दुल्ला मखलाशी करावयास आले तेंव्हा नेहरूंनी त्यांना सरदार पटेल यांच्याकडे पाठविले. पटेल यांनाही हे मान्य नव्हते पण नेहरूंनी मान्य केले होते म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत केवळ सौजन्य म्हणून पटेलांनी ते कलम घातले पण चातुर्याने त्यात “तात्पुरते, क्षणिक आणि अस्थायी (temporary & transient)” हे शब्द घुसवून ठेवले. नेहरूंनी त्यानंतरच्या सत्तेवरील १४ वर्षात हे कलम रद्द केले नाहीं. ही सुद्धा नेहरूंची घोडचूकच. आज-कालच असेही वाचनात आले कीं १९६४ साली ते रद्द केले जाईल असे लोकसभेत सांगण्यातही आले होते (नेहरूंनी कीं शास्त्रींनी ते मला माहीत नाहीं) पण तरीही ते रद्द केले गेले नाहीं. नेहरू १९६४ साली निधन पावले त्या गोंधळात ते राहून गेले असेल काय? शक्य आहे. शेवटी ते कलम ५ ऑगस्ट २०१९ रोजी भरपूर मताधिक्याने दोन्ही सभागृहांत मंजूर करून घून रद्द करण्यात आले.
नंतर नेहरूंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राकडे नेण्याची चूक केली. माझ्या तरुणपणी जेंव्हा हा प्रश्न खूप चर्चिला जात असे त्यावेळी सर्व वृत्तपत्रांतून अशी समजूत करून देण्यात येत होती कीं प्रथम भारतीय सेनेने तथाकथित ’टोळीवाल्यां’ना पराभूत करून मागे रेटले पण जेंव्हां आपले सैन्य पाक लष्कराशी भिडले तेंव्हा “आता हा प्रश्न आंतरराष्ट्रीय झालेला असून तो संयुक्त राष्ट्राकडेच नेला पाहिजे व तिथेच न्याय होईल” या (भोळसट) भावनेने नेहरूंनी तो संयुक्त राष्ट्रांकडे नेला. दुसराही एक प्रवाद असाही आहे कीं या युद्धात एक वेळ अशी आली कीं कुणीच विजयी ठरेना. म्हणून तो संयुक्त राष्ट्राकडे नेला गेला. कारण कांहींही का असेना पण हा निर्णय चुकीचाच होता असे आता दिसून आलेले आहे.
याहून मोठी चूक अशी कीं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने १९४८ साली स्पष्ट निर्णय दिला कीं प्रथम पाकिस्तानने आपले सर्व सैन्य-टोळीवाले आणि त्यांचे नेहमीचे (’खडे’) सैन्य-पूर्णपणे मागे घ्यावे, पाकिस्तानने आपले सर्व सैन्य असे मागे घेतल्यानंतर भारतानेही आपले जवळ-जवळ सगळे सैन्य मागे घ्यावे (फक्त कायदा व सुरक्षिततेसाठी लागणारे सैन्य भारताने काश्मीरमध्ये ठेवायचे होते) व हे झाल्यानंतर सार्वमत घ्यायचे होते. (http://unscr.com/en/resolutions/47) पाकिस्तानने आपले सैन्य मागे घेतलेच नाहीं व त्यामुळे सुरक्षा समितीचा हा निर्णय कुचकामी ठरला. पण मग नेहरूंनी हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत ठणकावून कां नाहीं मांडले? “अमूक-अमूक तारखेपर्यंत जर पाकिस्तानने आपले सैन्य मागे घेतले नाहीं तर १९४८ सालचा सुरक्षा समितीचा निर्णय मोडल्याची जबाबदारी पाकिस्तानवर राहील व मग सार्वमत घ्यावयाचा प्रश्न रद्दच समजला जाईल” असे नेहरूंनी कां नाही सुरक्षा समितीपुढे ठणकावून मांडले? कारण यानंतर अनेक वर्षे “चोराच्या उलट्या बोंबा” या न्यायाने पाकिस्तान सार्वमतासाठी जगभर कोकलत राहिला व आजही इम्रान खान तेच बडबडत आहे! त्यावेळी जर नेहरूंनी ठणकावून सांगितले असते व “आज या ठरावाची अमलबजावणी करा, अन्यथा यापुढे कधीच सार्वमताला भारत मान्यता देणार नाहीं” असा रोख-ठोक पवित्रा जर नेहरूंनी घेतला असता तर आजच्या बर्‍याच समस्या उभ्याच राहिल्या नसत्या. पण नेहरूंचा गुळमुळीत पवित्रा आपल्याला बाधला.
त्यावेळी निर्माण झालेली काश्मीरची समस्या आजपर्यंत तशीच ठसठसत राहिली आहे. आणि याला नेहरूच पूर्णपणे जबाबदार आहेत.
१९४६ पासून त्यांनी केलेल्या अनेक चुकांच्या यातना भारत आजपर्यंत सोसत आहे. आता त्यांच्या आणखी कांहीं चुकांची जंत्री इथे देत आहे. मराठीत म्हण आहेच कीं कोळसा उगाळावा तितका काळाच राहातो, त्याचा रंग कांहीं बदलत नाहीं. नेहरूंच्या निर्णयांचेही तसेच आहे.
भारताची घटना नेहरूंच्या थेट निरीक्षणाखाली तयार होत होती. त्यात ज्या अनेक चुका झाल्या त्यालाही ते आणि त्यांचे गुळमुळीत धोरणच कारणीभूत होते. कारण त्यांनी जर कुठल्या मुद्द्याला विरोध केला असता तर तो मुद्दा बाहेरच काढला गेला असता!
सर्वांना एकच कायदा (Common Civil Code) लागू करण्याऐवजी नेहरूंनी हिंदू व मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या कायद्यांची योजना केली. त्यामुळे बहुपत्नीकत्वाची ’सोय’ व तीन वेळा ’तलाक’चा उच्चार करून घटस्फोट मिळावयाची ’सोय’ यासारखे चुकीचे कायदे केले गेले व ते ७० वर्षे तस्से ठेवले गेले. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांतून या कायद्यांची हकालपट्टी झाली असली तरी भारतात गठ्ठामतदानाच्या हव्यासामुळे येथील मुस्लिम महिलांना न्याय मिळत नव्हता. याला पूर्णपणे नेहरूंना व कॉंग्रेस पक्षालाच जबाबदार धरावे लागेल. (पुढे राजीव गांधींनीसुद्धा याच हव्यासापायी शहा बानूच्या बाबतीत हीच चूक केली होती!) शेवटी २०१९ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने मुस्लिम महिलांना ’अर्धा’ न्याय मिळवून दिला. एकपत्नित्वाचा भोग अजून रद्द करवयाचा आहेच.
नेहरूंच्यातर्फे असे एक चुकीचे ’समीकरण’ प्रस्थापित करण्यात आले कीं भारताला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ गांधी-नेहरूंच्या नेतृत्वामुळे. यात अनेक थोर क्रांतिकारकांना जो सन्मान मिळायला हवा होता तो त्यांना मिळूच देण्यात आला नाहीं. सर्वात घटिया काम जर नेहरूंनी केले असेल तर नेताजी सुभाषबाबूंच्यावर केलेला अन्याय. या क्रांतिकारकाला पूर्णपणे झालोळून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. आझाद हिंद सेनेतर्फे सुभाषबाबूंनी ब्रिटिशांविरुद्ध थेट युद्ध पुकारले होते त्या मुद्द्यावर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला चालविला होता, कित्येक आझाद हिंद सैनिकांवरसुद्धा खटले घालण्यात आले होते. पण नेहरूंनी त्यात सुभाषबाबूंच्या बाजूने खटपट केलीच नाहीं उलट त्यांच्या त्रासांत भरच घातली असेच दिसते. सुभाषबाबूंना भारतीयांच्या मनोपटलावरून पुसून टाकायचे नेहरूंचे प्रयत्न पूर्णपणे असफल झाले व त्यांची प्रतिमा झळाळतीच राहिली व प्रत्येक दिवशी सुधारतच गेली. सध्या तर पंतप्रधान मोदी सुभाषबाबूंच्या कर्तृत्वाला व त्यांच्या योगदानाला योग्य महत्व देऊन त्यांच्या प्रतिमेचे पुनरुज्जीवन घडवून आणत आहेत. पण त्यामुळे नेहरूंनी केलेली चूक जास्तच उठून दिसते. नेहरूंच्या अनेक चुकांमध्ये सुभाषबाबूंवर हेतुपुरस्सर केलेला अन्याय ही सर्वात मोठी आणि दुष्ट चूकच म्हणावी लागेल.
पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेला मान्यता देऊन नेहरूंनी आणखी एका मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला. त्यातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. महाराष्ट्राला ’संयुक्त महाराष्ट्र’ मिळाला नाहीं तोही त्यांच्यामुळेच! तो न दिल्याचा राग मराठी जनतेला नक्कीच आला होता तरी नेहरूंच्याबद्दल आदर नाहींसा झाला नव्हता. शेवटी त्यांच्या छाताडावर बसून मराठी जनतेने संयुक्त महाराष्ट्र मिळविलाच, पण तेथेही “यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा अमृतकलश आणला” या नांवाखाली कांहींसे श्रेय उपटण्याची संधी नेहरूंनी सोडली नाहीं.
नेहरूंच्या सर्वात मोठ्या घोडचुका परराष्ट्रीय धोरणात घडल्या पण त्यातील सर्वात मोठ्या व आपल्याला त्रासदायक ठरलेल्या चुका चीनच्या बाबतीत घडल्या व त्याही १९४९ सालापासून!
स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर चीनने सर्व संबंधित राष्ट्रांना पत्र लिहून कळविले होते कीं जे कांहीं करार चीनबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात झाले होते ते चीन प्रबळ नसताना त्याच्यावर लादण्यात आलेले होते व त्या सर्व करारांबाबत तो पुन्हा नव्याने वाटाघाटी करू इच्छितो. असे पत्र चीनने भारतालासुद्धा पाठविले होते. चीनने आपल्याला लिहिलेल्या या महत्वाच्या पत्राकडे केलेले दुर्लक्ष ही नेहरूंची पहिली घोडचूक होती. इतर अनेक राष्ट्रांनी तशा वाटाघाटी केल्याही पण नेहरूंना वाटले कीं आपल्या ’हिंदी-चिनी-भाई-भाई’ घोषणेमुळे व आपल्या वैयक्तिक लोकप्रिय प्रतिमेमुळे चीन सद्यस्थितीला मान्यता देऊन टाकेल. पण चिनी नेतृत्व असे भोळसट नव्हते व त्यातूनच अक्साई चिन हातातून गेला व अरुणाचलप्रदेशाबद्दल वाद निर्माण झाला. परिणामत: १९६२ चे युद्ध झाले व या युद्धात भारताला नामुष्कीपूर्वक पराजय स्वीकारावा लागला.
दुसरी घोडचूक होती तिबेटवरील चीनच्या कबजाला मान्यता देणे. खरे तर तिबेट हा स्वायत्त, निमस्वतंत्र विभाग होता. तिबेटमध्ये चीनचा राजदूतसुद्धा नेमलेला असे. तरीही या कबजाला मान्यता देऊन नेहरूंनी इतिहासात पहिल्यांदाच चीनची सरहद्द भारताच्या सरहद्दीला भिडवू दिली आणि त्यातून एक कायमची डोकेदुखी निर्माण केली. भारताने तिबेटच्या कबजाला मान्यता दिली नसती तर कदाचित् तिसरे विश्वयुद्ध झाले असते का? मला नाहीं वाटत. आपण जर चीनच्याविरुद्ध ठामपणे उभे राहिलो असतो तर चीनने माघारच घेतली असती. पण “ज्याला दुखतंय् तोच गप्प बसलाय् मग आपल्याला काय करायचंय् इथे मधे पडून?” असाच विचार सार्या बलवान राष्ट्रांच्या मनात आला असणार व ते मग जोरात पुढे आले नाहींत. पण नुकसान झाले ते भारताचे व तेही केवळ नेहरूंच्या मूर्ख निर्णयांमुळे!
या युद्धाचा नेहरूंना इतका जबरदस्त धक्का बसला कीं त्यांची तब्येत झपाट्याने खालावत गेली आणि शेवटी त्यांचे १९६४ साली निधन झाले.
चीनबरोबरचे युद्ध पेटले त्या वेळी मी इंजिनियरिंग कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात होतो व त्यावेळच्या प्रथेनुसार इतर विद्यार्थ्यांबरोबर मोठे-मोठे कारखाने पहावयाच्या सहलीवर (Study Tour) गेलो होतो. (गमतीने या सहलींना ’भारतदर्शन’ सहल म्हटले जाई!). आम्ही पुणे सोडले तेंव्हां युद्धाच्या शक्यतेच्या बातम्या वृत्तपत्रात येत होत्या व त्या बातम्याही भयावहच होत्या. युद्ध खरोखर ’पेटल्याची’ बातमी कलकत्त्यातील माझ्या मामांच्या घरी मी बसलेलो असताना मी प्रथम ’आकाशवाणी’वर ऐकली. खरेच वाटेना! (त्याकाळी दूरदर्शनचे आगमन व्हावयाचेच होते!) मग परत आल्यावर जाहीर निदर्शनांतही भाग घेऊन “च्याऊ-माऊ कच्चा खाऊ” अशा ’इनोदी’ घोषणा मनापासून दिल्याचेही आठवते. त्याकाळी सगळेच तरुण इतके भोळे (कीं brainwashed?) होते कीं इतका दारुण पराभव होऊनही नेहरूंचे कांही चुकले असे कधी वाटलेच नव्हते. उलट चाऊ-माओनी “विश्वासघात केल्याचाच राग जास्त आला होता! युद्धाच्या बातम्याही आपल्या एका सैनिकापुढे चीनचे २०-२५ सैनिक कसे उभे होते व तरीही आपले सैन्य कसे धैर्याने लढले व शेवटी त्यांना कशी ’यशस्वी माघार’ (?) घ्यावी लागली याबद्दलच असत.
पुढे एका कॉंग्रेसपक्षाच्या बैठकीतील त्यांचा छातीवर हात ठेवून कोलमडतानाचा फोटो पाहिल्यावर ते बरेच आजारी असल्याचे लक्षात येऊन “नेहरूंशिवाय आपला देश कसा चालेल” हेच विचार डोक्यात थैमान घालू लागले होते. इतका विश्वास आतासुद्धा त्यांच्यावर होता. ’नेहरूंनंतर कोण?’ हाच एक ज्वलंत प्रश्न सगळ्या जनतेत चर्चेत होता. नंतर २७ मे १९६४ साली त्यांचे निधन झाल्याचे ’कॅफे गुडलक’मध्ये चहा पिताना पहिल्यांदा ऐकल्यावर डोळ्यांना अश्रुधारा लागल्या हेसुद्धा लक्षात आहे. माझ्या पिढीतील सर्वांसारखा मीसुद्धा नेहरूंचा ’परमभक्त’च होतो. (“भक्त” ही नवी शिवी अजून जन्माला यावयाची होती!) ती ’भक्ती’ची भावना अगदी मी २० वर्षाचा होईपर्यंत तशीच होती कारण आम्हाला वृत्तपत्रात ज्या बातम्या येत तेवढ्याच माहीत असत आणि वृत्तपत्रांत सर्व बातम्या नेहरूंच्या थोरवीबद्दलच्याच असत. पुढे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळेपर्यंत माझे इंग्रजी जरासे सुधारले व आमच्या कॉलेजच्या वाचनालयात इंग्रजीमधील अनेक भारतीय तसेच TIME व तत्सम परदेशी नियतकालिके वाचायला मिळू लागली व आमच्या दृष्टीकोनात प्रगल्भता आली व दृष्टिकोनाचे क्षितिजही विस्तारले व तेंव्हापासून नेहरूंची प्रतिमा ’सत्या’च्या निकशावर तोलली जाऊ लागली.
चीनबरोबरच्या युद्धातील पराभवावरील पुस्तकेही मला वाचायला मिळाली. सर्वात प्रथम वाचले ते The Untold Story हे ले. ज. कौल यांचे पुस्तक, त्याच्या पाठोपाठ वाचले ब्रिगेडियर जॉन दळवी यांचे ’Himalayan Blunder’ हे पुस्तक आणि ही दोन पुस्तके वाचल्यावर नेहरूंच्या डोक्यामागील तेजोवलय (halo) हळू-हळू अंधुक होत-होत पार नाहींसे झाले. त्यांच्या चुका इतक्या गंभीर आहेत कीं मी त्यांना आता भारताचे सर्वात निकृष्ठ पंतप्रधान मानू लागलो आहे.
नेहरूंची कोती, स्वार्थी आणि देशहिताला बाधक प्रवृत्ती कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या स्वातंत्र्यपूर्व निवडणुकीपासूनच दिसू लागली होती. ’पटेल विरुद्ध नेहरू’ अध्यक्षपदाच्या संघर्षात गांघीजींचा वरदहस्त पूर्णपणे डोक्यावर असूनही १५ पैकी १२ प्रादेशिक कॉंग्रेस समित्यांनी पटेल यांना मत दिल्याने व एकानेही नेहरूंना मत न दिल्याने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून अतीशय लोकप्रिय व जनतेचे लाडके म्हणून पुढे आणले जाणारे नेहरू एकमताने व बिनविरोध निवडले गेले होते ही एक लोणकढी थापच होती हे कॉंग्रेस पक्षाकडील कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट होते.[२]
२० एप्रिल १९४६ रोजी गांधीजींनी ’आपली निवड नेहरू असल्याचे’ जाहीर केली. तरीही कॉंग्रेस पक्षाला वल्लभभाईच हवे होते कारण ते एक थोर प्रशासक, कुशल संयोजक आणि अतीशय वास्तववादी, व्यवहारी नेते आहेत अशीच सर्व कॉंग्रेस नेत्यांची भावना होती.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच १९४० ते १९४६ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेल्या मौलाना आझाद यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष व्हावयाची इच्छा प्रकट केली. पण नेहरूंची नजर त्या पदावर होती. एकाही प्रादेशिक समितीने नेहरूंना मत दिले नसल्याने आलेला पेचप्रसंग सोडविण्याच्या दृष्टीने गांधीजी नेहरूंना म्हणाले कीं एकाही प्रादेशिक समितीने तुम्हाला मत दिलेले नाहीं आहे. फक्त कार्यकारी समितीच्या कांहीं सभासदांनी तुम्हाला मत दिले आहे.....
या मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी नेहरूंनी तोंडाला सोयिस्करपणे कुलूप ठोकले. मग ’जवाहरलाल दोन नंबरचे सत्तास्थान स्वीकारणार नाहींत’ आणि ’ नेहरूंना सर्वोच्च पद न दिल्यास ते बिथरून विरोधी पक्षात जातील व मग दुही माजेल’ असे गांधीजींना सांगण्यात आल्यावर गांधीजींनी पटेल यांना माघार घ्यावयास सांगितले. हा वल्लभभाईंच्यावर अन्यायच होता, तरी वल्लभभाईंना गांधीजींच्याबद्दल प्रचंड आदर वाटत असल्यामुळे त्यांनी तो निर्णय मान्य करून दुसर्‍या क्रमांकाचे स्थान स्वीकारले. यात वल्लभभाईंचा मोठेपणा आणि नेहरूंचा कोतेपणा आणि स्वार्थी वृत्तीच स्पष्टपणे दिसली.
भारताचे भावी प्रथम राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनाही हा निर्णय आवडला नव्हता कारण गांधीजींनी हा निर्णय नेहरूंच्या आकर्षक व्यक्तिमत्वाकडे झुकून दिला होता असे त्यांना वाटले. त्यांना “नेहरू ब्रिटिशांसारखेच वागतील” ही भीती होती. (पुढे नेहरूंच्या मर्जीविरुद्ध सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला गेल्याबद्दल राजेंद्रप्रसाद यांना त्यांच्या निवृत्तीनंतर नेहरूंनी अतीशय निर्दयपणे वागविल्याचे सर्वांनी वाचले असेलच. जागेअभावी ती माहिती आणखी कधीतरी देईन.)
मौलाना आझाद यांनी आधी नेहरूंची बाजू घेतली होती, पण शेवटी त्यांनीसुद्धा आपली ही चूकच झाल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या अपल्या पुस्तकात[३] स्पष्टपणे लिहिलेले आहे.
अशा तर्‍हेने पं. नेहरू अध्यक्षपदी निवडून आले व पुढे पहिले पंतप्रधानही झाले.
नेहरूंच्या ९३ घोडचुका (blunders) या नांवाचे एक पुस्तक माझ्या वाचनात आले, ते मी अर्धेच वाचू शकलो कारण अमेरिकेला येण्यासाठी निघत असताना अनवधानाने ते भारतातच राहून गेले व त्यामुळे ते मी पूर्ण वाचू शकलेलो नाहीं.. त्यातल्या कांहीं पुनरुक्ती जरी सोडल्या तरी किमान ४० ते ५० घोडचुका तरी नक्की नेहरूंच्या नांवावर आहेत. पण मला आंतरजालावर १३ चुकांचा संदर्भ मिळाला त्या अभिजीत चावडा यांनी ट्विटर माध्यमातून प्रकाशित केलेल्या आहेत. mynation.com/views/architect-modern-india-13-jawaharlal-nehru-blunders-pi6yxk या दुव्यावर छान माहिती आहे. त्यांच्या (@IndianInterest) १३ डिसेंबर १६ च्या https://twitter.com/IndianInterest/status/809385312891699201 या ट्वीटमध्ये तर या विषयावरील माहितीचे भांडारच आहे व ती ट्वीट सर्वांनी संपूर्णपणे वाचावी अशीच आहे. तेथे नेहरूंच्या अनेक चुकीच्या निर्णयाची माहिती उपलब्ध आहे त्यांचा सारांश असा:
नेहरूंनी अंदमान द्वीपसमूहातील कोको हे बेट मूर्खासारखे म्यानमारला देऊन टाकले. आता म्यानमारने ते चीनला वापरायला दिलेले असून चीनने तेथे विमानतळ व नौदलासाठी सोय केली आहे व आपल्यावर पहाराच बसविला आहे. अगदी मूर्खासारखा निर्णय होता तो! (https://twitter.com/IndianInterest/status/719840525830885376)
याच दुव्यावर मणिपूर राज्यातील काबो नांवाचे खोरे ब्रिटिशांच्या काळापासून म्यानमारला भाडेपट्टीवर दिलेले होते. ते परत भारतात सामील करून घ्यावयाच्याऐवजी नेहरूंनी लोकसभेला न विचारता जणू स्वत:ची जहागीर असल्यासारखे म्यानमारला दान करून टाकले ही माहिती आहे.
नेपाळचे राजे त्रिभुवन यांच्या कारकीर्दीत भारताबरोबर विलीन व्हायची इच्छा प्रकट केली होती. याचा उल्लेख https://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/Should-the-1950-treaty-... या दुव्यावर वाचायला मिळतो. अट होती की त्यांना भारताचे राष्ट्रपतीपद देण्यात यावे. पण नेहरूंनी विलीनीकरणास मान्यता दिली नाहीं. परिणामत: तिथे चीनने आता बळकट पावले रुतविली आहेत व त्याद्वारा चीन आपल्याला थेट शह देऊ लागला आहे. (http://sites.rootsweb.com/~nplwgw/ & https://www.rediff.com/news/2001/jun/12inter.htm)
आता ग्वादर बंदराकडे येऊ या. ओमानच्या सुलतानांनी ग्वादर हे बंदर १९५८ साली भारताला १० लाख डॉलर्सना विकण्याचा प्रस्ताव दिला होता नेहरूंनी नाकारला होता. नेहरूंच्या अदूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण![४]
इकॉनॉमिक टाइम्स’मधील वृत्तानुसार अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १९६२ सालच्याही पूर्वी अण्वस्त्राच्या विघटनासाठी भारताला मदत देऊ केली होती पण नेहरूंनी ती मूर्खासारखी नाकारली![५]
१९५० साली अमेरिकेने आणि १९५५ साली रशियाने भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर कायम स्वरूपाची जागा देऊ केली होती. Republic of China या नांवाने ओळखल्या जाणार्या तैवानला बाजूला सारून भारताला ती जागा देऊ केली होती, पण नेहरूंनी People’s Republic of China या नांवाने ओळखल्या जाणार्या साम्यवादी चीनला ती द्यावी असे सांगत तो प्रस्ताव नाकारला! आता या मूर्खपणाला काय म्हणावे? पुढे जेंव्हां चीनला ती जागा मिळाली तेंव्हां चीनने भारताकडे ढुंकूनही न पाहाता ती स्वीकारली!
या घटनेचा नेहरूंनी इन्कार केला असला तरी आता नवीन पुरावा उपलब्ध झालेला आहे. (https://www.wilsoncenter.org/publication/not-the-cost-china-india-and-th...) या दुव्यावरील “Not at the Cost of China: New Evidence Regarding US Proposals to Nehru for Joining the United Nations Security Council” या लेखात त्याचा उल्लेख आहे.[६] आता अजून काय पुरावा हवाय्?
नेहरूंचा सर्वात मोठा अपराध म्हणजे त्यांनी भारतावर लादलेली घराणेशाही! १९४६ साली ’चोरून’ मिळविलेली सत्ता त्यांनी स्वत: तर सोडली नाहींच पण कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी इंदिरा गांधींना बसवून त्यांनाही सत्तेच्या रांगेत आणून उभे केले. इंदिरा गांधींनी मग आधी संजयला, त्याच्या मृत्यूनंतर एक वैमानिक असलेल्या राजीवला सत्तेच्या रांगेत उभे केले. पाच वर्षे कॉंग्रेस पक्षाचीच नरसिंह राव यांची सत्ताही या घराण्याला पसंत नव्हती म्हणून चतुर इटालियन सूनबाईने दहा वर्षे एका ’होयबा’ गादीवर बसवून राज्य केले. १९७७ सालची मोरारजींची व नंतर २००० ची पाच वर्षे अटलजींची कारकीर्द सोडल्यास गांधी घराण्यानेच भारतावर राज्य केले आहे.
नेहरूंना भारतात लोकशाही रुजविण्याबद्दल श्रेय दिले जाते ते कितपत खरे आहे? याच लेखातील हा “नेहरूंना सर्वोच्च पद न दिल्यास ते बिथरून विरोधी पक्षात जातील व मग दुही माजेल आणि जवाहरलाल दोन नंबरचे सत्तास्थान स्वीकारणार नाहींत” असे गांधीजींना कां सांगण्यात आले? असे कळल्यावरच गांधीजींनी पटेल यांना माघार घ्यावयास सांगितले. हा भाग जर नीटपणे वाचला आणि दोन ओळींमधला न लिहिलेला भाग जर वाचला (i.e. reading between the lines!) तर त्यांना असे श्रेय मुळीच देता येणार नाहीं. जशी इंदिरा गांधींनी सत्ता जाणार असे दिसल्यावर आणीबाणी घोषित केली तशी नेहरूंनी केली नसती? सुदैवाने त्यांच्यावर हा प्रसंग आलाच नाहीं. आता लोकशाही रजविण्याचे श्रेय त्यांना द्यायचे कीं नाहीं हे ज्याने-त्याने आपले-आपले ठरवावे, पण इथे कांहींशी भुरकट रंगाचा भाग आहेच (gray area)!
मी नेहरूंना आपल्या सर्व पंतप्रधानांमध्ये सर्वात निकृष्ठ पंतप्रधान समजतो याचे कारण आता समजले असेल अशी आशा करतो. मी शक्यतो सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ज्यांची कारकीर्द संपलेली आहे अशा आजवरच्या भारताच्या पंतप्रधानांपैकी माझ्या मते सर्वोत्कृष्ठ तीन पंतप्रधानांची यादी अशी:
प्रथम क्रमांक: नरसिंह राव (कॉंग्रेस पक्ष) त्यांना लोकसभेत बहुमतसुद्धा नव्हते तरीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली!
द्वितीय क्रमांक: इंदिरा गांधी (कॉंग्रेस पक्ष) त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले पण बांग्लादेश निर्मितीसाठी त्यांना द्वितीय क्रमांक द्यावा असे मला वाटते.
तृतिय क्रमांक: लाल बहादुर शास्त्री. (कॉंग्रेस पक्ष) ते कदाचित प्रथम क्रमांकावर येण्याच्या योग्यतेचे होते पण त्यांच्या ताश्कंद येथील संशयास्पद अकाली निधनामुळे त्यांची कारकीर्द कर्तृत्ववान झाली असली तरी ती फारच छोटी झाली. त्यामुळे मला त्यांना तृतिय क्रमांक द्यावा लागत आहे.
सर्वात निकृष्ठ पंतप्रधान: जवाहरलाल नेहरू (कॉंग्रेस पक्ष)
टिपा:
[१] मेल्विल डि मेलो (१९१३ ते १९८९) हे ’ऑल इंडिया रेडियो’वरील (पुढे ’आकाशवाणी’) एक भारतीय वृत्त प्रक्षेपक होते.
[२] https://theprint.in/opinion/jawaharlal-nehrus-election-as-indias-first-p... या श्री. मख्खन लाल यांच्या लेखावरून.
[3] मौलाना अबुल कलम आझाद आपल्या १९५९ साली त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात लिहितात, “मी २६ एप्रिल १९४६ रोजी म्हणजेच निवडणुकीच्या तीन दिवस आधी नेहरूंना अध्यक्षपदासाठी समर्थन दिले. पण जवाहरलाल यांनी ज्या चुका केल्या त्या वल्लभभाईंनी कधीच केल्या नसत्या. मी त्यावेळी नेहरूंना समर्थन देण्याची जी चूक केली ती माझी सर्वात वाईट राजकीय चूक होती व त्याबद्दल मी स्वत:ला कधीच माफ करू शकत नाहीं. त्या चुका मी केल्या नसत्या तर गेल्या दहा वर्षांचा इतिहास वेगळाच लिहिला गेला असता.
[४] dailyo.in/politics/chabahar-gwadar-port-india-pakistan-china-ties-cpec-afghanistan/story/1/11256.html या दुव्यानुसार ओमानच्या सुलतानाने ग्वादर हे बलोचिस्तानातील बंदर भारताला १० लाख डॉलर्सला देण्याचा प्रस्ताव दिला होता पण तोसुद्धा स्वीकारावयास नेहरूंनी नकार दिला. पुढे हे बंदर पाकिस्तानने ३० लाख डॉलर्स देऊन विकत घेतले व तेथे आता चीन आपल्या नौदलासह येऊन बसला आहे व पाकिस्तानकडून ४० वर्षाच्या करारावर भाडेपाट्टी करारावर त्याने या बंदराचा ताबा घेतला आहे. आज चीन-पाकिस्तान व्यापारी महामार्ग याच बंदरापासून सुरू होतो. भारताने जर सुलतानाची देणगी स्वीकारली असती तर आपल्याला असे अनेक फायदे मिळाले असते. पण नेहरूंच्या अदूरदृष्टीमुळे ही चांगली संधी भारताने वाया घालविली.
आश्चर्याची गोष्ट अशी कीं सुलतानाच्या या देणगीचे पत्र भारताकडील कागदपत्रात उपलब्ध नाहींय्. नेहरूंनी आपल्या नकाराच्या पत्रासोबत त्यांना आलेले सुलतानाचे अस्सल पत्रही परत पाठविले असाही उल्लेख माझ्या वाचनात आलेला आहे. आज भारत सरकारकडे या पत्राची प्रत उपलब्ध नाहीं. (After independence, according to the diplomatic community grapevine, Gwadar was administered by India on behalf of the Sultan of Oman as the two countries enjoyed excellent relations. When the Khan of Kalat asked the Sultan to return Gwadar to Pakistan, reportedly, the Sultan first offered it to India, but India declined to accept the gift.
India would have had not only an enclave on Pakistan’s Makran coast, but also a deep water port. In hindsight, not accepting the priceless gift from the Sultan of Oman was a huge mistake at par with the long list of post-independence strategic blunders.
[५] https://economictimes.indiatimes.com/news/defence/nehrus-refusal-of-kenn... खालील दुवा पहा. जर नेहरूंनी केनेडींचा मदतीचा प्रस्ताव स्वीकारला असता तर भारत चीनच्याही आधी आशिया खंडातील पहिले अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले असते! जर नेहरूंनी केनेडींचा मदतीचा प्रस्ताव स्वीकारला असता तर १९६२ साली भारतावर आक्रमण करण्याची चीनची हिंमतच झाली नसती व १९६५ साली भारतावर आक्रमण करण्याची अयूब खानलाही हिंमत झाली नसती! जर नेहरूंनी केनेडींचा मदतीचा प्रस्ताव स्वीकारला असता तर भारत आण्विक पुरवठाकार गटाचा (Nuclear Suppliers Group) संस्थापक सदस्य झाला असता. हा प्रस्ताव नाकारून नेहरूंनी भारताचे अतोनात नुकसान केले आहे!
[६] आता नेहरू व त्यांच्या भगिनी यांच्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवरील कायम स्वरूपाच्या जागेबद्दलचा पत्रव्यवहार उपलब्ध झालेला आहे तो इंग्रजीतच देत आहे. [China* stands for Republic of China as Taiwan was then known & China# stands for People’s Republic of China!]
The 1950 American Offer
(Bold letters have been done by me for emphasis)
What was the context of the US offer for India to join the UN Security Council? Nehru’s reference to the USA’s offer is frustratingly vague with no hint of the circumstances or timing in which it was made. However, research done in the correspondence of Mrs. Vijaya Lakshmi Pandit, Nehru’s sister, and holder of various major diplomatic positions in the late 1940s and early 1950s, illuminates the subject. In late August 1950, Pandit wrote to her brother from Washington, DC, where she was then posted as India’s Ambassador to the United States:
One matter that is being cooked up in the State Department should be known to you. This is the unseating of China* as a Permanent Member in the Security Council and of India being put in her place. I have just seen Reuter’s report of your answer to the same question. Last week I had interviews with [John Foster] Dulles and [Philip] Jessup, reports of which I have sent to Bajpai. Both brought up this question and Dulles seemed particularly anxious that a move in this direction should be started. Last night I heard from Marquis Childs, an influential columnist of Washington, that Dulles has asked him on behalf of the State Department to build up public opinion along these lines. I told him our attitude and advised him to go slow in the matter as it would not be received with any warmth in India.[9] Vijaya Lakshmi Pandit to Jawaharlal Nehru, 24 August 1950, in Vijaya Lakshmi Pandit Papers 1st Installment (Pandit I), Subject File No. 59, Subject: 1949-51, Letters to Jawaharlal Nehru from VL Pandit sent during her tenure as Indian Ambassador to the United States of America, 132, Nehru Memorial Museum and Library, New Delhi (NMML).
Nehru’s response within the week was unequivocal:
In your letter you mention that the State Department is trying to unseat China* as a Permanent Member of the Security Council and to put India in her place. So far as we are concerned, we are not going to countenance it. That would be bad from every point of view. It would be a clear affront to China# and it would mean some kind of a break between us and China#. I suppose the state department would not like that, but we have no intention of following that course. We shall go on pressing for China’s# admission in the UN and the Security Council. I suppose that a crisis will come during the next sessions of the General Assembly of the UN on this issue. The people’s government of China# is sending a full delegation there. If they fail to get in there will be trouble which might even result in the USSR and some other countries finally quitting the UN. That may please the State Department, but it would mean the end of the UN as we have known it. That would also mean a further drift towards war.
India because of many factors is certainly entitled to a permanent seat in the security council. But we are not going in at the cost of China.[10] Jawaharlal Nehru to Vijaya Lakshmi Pandit, 30 August, 1950, in Pandit I, Subject File No. 60, Subject: 1949, 1950-51, Letters received by V.L. Pandit as Ambassador to Washington from Jawaharlal Nehru concerning India’s relations with US, Pakistan and other countries and developments at home, 137, NMML
NMML stands for ’Nehru Memorial Museum and Library (NMML), New Delhi’

इतिहासविचार

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

29 Oct 2019 - 11:21 am | सुधीर काळे

फाळणीपूर्व चर्चासत्र
छायाचित्र कांहीं उमटत नाहींये

सुमो's picture

29 Oct 2019 - 11:35 am | सुमो

ची ही लिंक वापरली आहे तुम्ही.
https://postimg.cc/WdzP7Fg8 त्यामुळे नाही दिसत फोटो.

Direct link वापरा.
https://i.postimg.cc/t4tCpFgK/image.png
दिसेल फोटो.

वाटाघाटी

सुधीर काळे's picture

29 Oct 2019 - 11:23 am | सुधीर काळे

छायाचित्र काही उमटत नाहीय
फाळणीपूर्व चर्चासत्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2019 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक गोष्ट नेहरूंनी चांगली केली ती म्हणजे अनेक धरणांची उभारणी. भाकडा-नांगल, कोयना, रिहंद अशा अनेक धरणांची बांधणी नेहरूंच्या कार्यकालात झाली. त्यातही जरी भ्रष्टाचार झाला असला तरी ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे मात्र आजवर डौलात उभी आहेत. तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरावरील महामार्गांचीही निर्मितीही या कालखंडात सुरू झाली. हे पाऊल नक्कीच सकारत्मक होते व त्याचे श्रेय नेहरूंनाच द्यायला हवे. पण त्यांच्या मनावर समाजवादी विचारांचा मजबूत पगडा असल्यामुळे या सर्वांची प्रगतीही खूपच मंदगतीने झाली.आधी म्हटल्याप्रमाणे नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचा चित्रफलक कोरा-करकरीतच होता व कुणीही जरी पहिला पंतप्रधान झाला असता तरी अशा तर्‍हेची भरघोस प्रगती झालीच असती. वल्लभभाई जर पंतप्रधान झाले असते तर ती प्रगती आणखी जास्त झाली असती का, खासगी क्षेत्रात जास्त झाली असती का हे प्रश्न मनात येतातच, पण तरीही जे नेहरूंनी केले त्याचे श्रेय त्यांना नक्कीच द्यावयास हवे व ते मी देतोच.

पंडित नेहरुंना आपल्याला जर अतिशय निकृष्ट पद्दतीचा पंतप्रधान ठरवायचं असेल तर वरील उतारा वगळायला पाहिजे होता असे वाटले, त्यामुळे त्यांच्यावरील चुकांकडे फारसं वाचकांचं लक्ष जाणार नाही, गेले तरी तितके ते ठाशीव पद्धतीने येणार नाही असे वाटले. ;)

बाकी, पंतप्रधान पं.ज.नेहरुंच्या चुका, घोडचुका निवांत वाचेन. सध्या केवळ पोच. स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आत्तापर्यंत केवळ एकच होतकरु पंतप्रधान झालेला मी मानतो. फक्त मी त्यांचा नावाचा उल्लेख जरा वेगळा करतो म्हणून ते नाव लिहित नाही. =))

आपलं पुन्हा एकदा मिपावर नव्याने स्वागत करतो. आपल्या लेखनात नेहरुंच्या चुका घोडचुका यात भर घालण्यासाठी आमचे काही मिपाकर मित्र इथे आहेतच ते योग्य भर घालतील,आपल्याला भरपूर समर्थन देतीलच. आपणास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

29 Oct 2019 - 3:09 pm | जेम्स वांड

चुका, घोडचूका, धादांत चुका मांडायच्या होत्या तर सुरवातीचा वर्ख कश्याला लावलाय?

आमच्या घरी टाइम्स ऑफ इंडिया येई, पण इंग्रजी समजत नसल्याने फक्त क्रिकेटचे पान मी वाचत असे. घरीसुद्धा वातावरण राजकीय नव्हते त्यामुळे गप्पाही त्या तर्‍हेच्या नसत.

कमाल आहे हो! टाईम्स येई, इंग्रजी येत नसे म्हणून तुम्ही फक्त स्पोर्ट्स पेज वाचायचे म्हणता? मला वाटते तुम्हाला नक्की इंग्रजी कळत नसे का राजकारण ह्याच बाबतीत तुमचा गोंधळ उडालेला दिसतोय.

बाकी स्पष्ट मत मांडायचं झालं तर मला हा लेख निरर्थक वाटतो, नेहरूंनी चुका केल्या आहेतच त्यात दुमत नाही पण त्याकरता नेहरूंचा पार विद्वेष करावा इतपत मला तरी मान्य नाही, किंवा त्यांना देव्हाऱ्यात बसवणेही मंजूर नाही. तसंही एडविना वगैरे यशस्वी उल्लेख आल्यावर लेख वाचायची खास इच्छा उरत नाहीच.

एकंदरीत हा लेख "Proofs telling how Nehru was wrong in everything under the sun" सारखा सज्जड अभ्यासू गूगल सर्च टाकून लिहिलेला दिसतो. ह्याला प्रत्युत्तर म्हणून जर कोणी "proofs telling how Nehru was responsible for peace across universe" असा अभ्यासू सर्च केला तर अजून एक लेख लिहिला जाऊ शकतो निवांत. पण तो न लिहिला जावा इतकीच माझी प्रार्थना कारण मिपावर झाल्या तितक्या प्रचारकी पिंका पुरेश्या आहेत आजवरच्या.

सुधीर काळे's picture

31 Oct 2019 - 1:06 am | सुधीर काळे

अकरावीपर्यंत नेमलेल्या पुस्तकांच्या बाहेरचे इंग्रजी खरंच समजत नसे. फक्त क्रिकेटच्या बातम्याच कळत. अर्थात घरीही राजकारणाबद्दल फारशी चर्चा नसे त्यामुळे त्यात पारसा रसही नव्हता!

तो वर्ख नसून नेहरूंचे स्थान माझ्या मनात त्यावेळी खरंच तसे उच्च होते, ते गेल्याचे कळताच खरंच मी अश्रू ढाळले आहेत. पण मग ते मनातून उतरत गेले!
त्याची कारणे होती नंतर केलेले वाचन आणि त्यावरून नेहरूंच्या चुका लक्षात आल्यावर एका 'हिरो'चे 'व्हिलन'मध्ये झालेले रूपांतर!

वैयक्तिक टिपण्णी टाळली तर अभ्यासू प्रतिक्रिया कदाचित वाचनीय होतील.
यानिमित्ताने माहीतगार यांची ही लेखमाला आठवली - https://www.misalpav.com/node/42678

जेम्स वांड's picture

29 Oct 2019 - 3:39 pm | जेम्स वांड

माहितगार साहेबांचे लेख वाचण्याइतप्त अजून माझी मिपातपश्चर्या झालेली नाहीये. सहसा मी राजकीय लिहीत नाही, मला माझे ललीतलेखन लखलाभ हा माझा पिंड झाला. पण म्हणून काहीही कसे वाचणार?

तुम्ही लिहिलेत ते कोणाला उद्देशून ते मला माहिती नाही पण मी काळेंच्या लेखनात जाणवलेली विसंगती दाखवली आहे (इंग्रजीच्या बाबतीत) अन इतर मते लेखावर (फक्त अतिशय स्पष्टपणे भीडभाड न ठेवता) लिहिली आहेत.

तरीही जर ही मते तुम्हाला (किंवा अगदी काळे सरांनाही) वैयक्तिक वाटत असली तर मी सपशेल माफी मागतो. कारण फुकट वितंडवाद घालणे माझी तरी प्रकृती नाही(च)

माननीय संपादक मंडळ ह्यांनी माझ्या कॉमेंटमध्ये काही उणे वाटत असल्यास ती तडक उडवून लावावी ह्या नम्र विनंतीसहित मी ह्या धाग्यावर इथेच थांबतो.

ओम शांती.

गॅरी ट्रुमन's picture

29 Oct 2019 - 10:14 pm | गॅरी ट्रुमन

मी काही कारणाने मिपापासून दूर आहे आणि पूर्वीप्रमाणे परत यायची शक्यता जवळपास शून्य. या लेखाची लिंक शाळेच्या कायप्पा ग्रुपवर आली आणि काळेकाकांचा लेख म्हटल्यावर नुसता हा प्रतिसाद द्यायला इथे आलो आहे. मला वाटते की नेहरूंच्या धोरणांकडे अधिक वस्तुनिष्ठ पध्दतीने बघायला हवे. नेहरूंच्या काही चुका अगदीच हिमालयीन होत्या यात काहीच शंका नाही. पण अन्य काही गोष्टींसाठी त्यांना झोडपणे योग्य नाही असे मला तरी वाटते.

नेहरू सत्तेवर आले तेंव्हां भारताचा चित्रफलक (canvas) कोरा-करकरीतच होता. देश मोठ्या प्रमाणावर शेतीप्रधानच होता. उद्योगधंदे नांवालाच होते. अशा परिस्थितीत नेहरूंनी “परमिट राज”ला जन्म दिला.

याविषयी काही गोष्टी लिहाव्याशा वाटतात. १९४४/४५ मध्ये दुसरे महायुध्द संपायला आले असताना देशातील मोठ्या उद्योजकांनी 'बॉम्बे प्लॅन' म्हणून आपल्या मागण्या मांडल्या होत्या. या प्लॅनमध्ये जे.आर.डी. टाटा, जी.डी.बिर्ला, कस्तुरभाई लालभाई इत्यादी आठ उद्योजकांचा समावेश होता. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सरकारचा अर्थकारणात सहभाग मोठ्या प्रमाणावर हवा, पब्लिक सेक्टर मोठा हवा इत्यादी मागण्या त्या प्लॅनमध्ये केल्या गेल्या होत्या. नेहरूंच्या सरकारने एका अर्थी त्याच मागण्या अंमलात आणल्या. मी स्वतः असल्या प्रकाराच्या अगदी विरोधात आहे. मी उजवा तर आहेच पण बर्‍याच अंशी अगदी ऑस्ट्रीअन आहे. तरीही कदाचित त्यावेळी अशी धोरणे अंमलात आणणे ही काळाची गरज असेल असे मला वाटते. नेहरूंवर विश्वास नसेल तरी जे.आर.डी टाटांवर तर विश्वास ठेवायला हरकत नसावी. त्यातही उद्योजकांना उद्योग सुरू करण्यापूर्वी स्वतः त्यात प्रवेश करावासा वाटतो पण एकदा त्यांनी उद्योग सुरू केला की मग मात्र नव्यांना त्यात प्रवेश द्यावा असे वाटत नाही आणि मग ते 'प्रोटेक्शनिझम' राबवावे अशी मागणी करतात. मुंबई लोकलमध्ये गाडी स्टेशनात येईपर्यंत मला त्यात चढायला मिळाले पाहिजे पण मी एकदा चढलो की मग इतर कोणी चढता कामा नये असा काहींचा दृष्टीकोन असतो त्यातला हा प्रकार झाला. त्या उद्योजकांनी कदाचित या कारणाने आपल्या मागण्या मांडल्या असतील. कारण काहीही असले तरी ती कदाचित काळाची गरज होती.

लायसेन्स,परमीट,कोटा सिस्टीमला नेहरूंनी का जन्म दिला? मला वाटते की याचे कारण म्हणजे त्यावेळी रिसोर्सेसची टंचाई होती. त्यामुळे उपलब्ध रिसोर्सेसचा वापर योग्य व्हावा अन्यथा काही उद्योगांना रिसोर्सेस वापरायला मिळायचे नाहीत म्हणून रेशनिंग करणे गरजेचे असावे. नेहरूंनंतर इंदिरा गांधींच्या काळातही ही पध्दत चालू ठेवायची कदाचित गरज नसावी. पण तो दोष नेहरूंचा नाही.

वर म्हटल्याप्रमाणे समाजवाद वगैरे प्रकारांचा मी अगदी कट्टर विरोधक आहे. तरीही २०१९ चे मापदंड आपण १९५० च्या परिस्थितीला लाऊ शकतो का याविषयी साशंक आहे.

नंतर नेहरूंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राकडे नेण्याची चूक केली.

याविषयी मी मिपावर मागे लिहिलेला प्रतिसाद इथे जसाच्या तसा देतो.

"काश्मीरात पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यावर तत्कालीन महासत्तांनी (अमेरिका, इंग्लंड) अगदी पहिल्यापासून पाकिस्तानला अनुकूल अशीच भूमिका घेतली होती. त्याचे कारण स्पष्ट होते. काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता तिकडे बेस स्थापन करता आल्यास आजूबाजूच्या बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होणार्‍यातले होते.आणि असा बेस स्थापन करायला नेहरूंचा भारत कदापि मान्यता देणार नाही पण पाकिस्तान देईल हे न कळण्याइतके अमेरिकेचे नेते दुधखुळे नव्हते.तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन देणे क्रमप्राप्त होते.

आपल्याला २०१३ मध्ये बसून १९४७-४८ मध्ये नक्की काय घडले हे classified documents आपल्याकडे नसताना सांगता येणे कठिण आहे.तेव्हा इतर अनेक लोक तर्क करतात तसा हा माझा तर्कच समजा.काश्मीर प्रश्नावर अमेरिका भारताला समर्थन देत नाही हे समोर दिसतच होते.पाकिस्तानच्या बाजूने १९४७-४८ मध्येच अमेरिका युध्दात उतरली असती का?आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्की देता येणार नाही पण नंतरच्या काळात अनेक ठिकाणी अमेरिकेने ज्या पध्दतीने स्वत:चा स्वार्थ साधायला नाक खुपसले ते पाहता ती शक्यता अगदी ०% असे वाटत नाही.तसे झाले असते तर साध्या शब्दात सांगायचे तर आपल्याला पार्श्वभागाला पाय लावून पळ काढावा असता.अमेरिकेशी लढण्याइतके त्या काळी प्रबळ होतो का?आणि असे होण्याची शक्यता किती याची माहिती आपल्याला २०१३ मध्ये आहे त्यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरूंना जास्त असणार यात शंका नाही.

तेव्हा काय करा?जग त्यावेळी भारताला महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखत होते.तसेच युनोमध्ये आपण प्रश्न नेण्यामुळे भारत सरकारला शांतता हवी आहे ही high ground position भारताला घेता येणे शक्य झाले.तेव्हा शांतता पाहिजे असलेल्या महात्मा गांधींच्या देशाविरूध्द उघड उघड position घेणे हे अमेरिकेतल्या लोकांना विकता येणाऱ्यातली गोष्ट नव्हती (not easy to sell). सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोत नेला तो UN Charter च्या Chapter 6 अंतर्गत.या चॅप्टर अंतर्गत युनोमध्ये आणलेल्या प्रश्नांवर युनोने पास केलेले ठराव संबंधित देशांसाठी बंधनकारक नसतात.तेव्हा युनोने आपल्या बाजूने ठराव पास केल्यास तो आपला विजय आणि आपल्या विरूध्द ठराव पास केल्यास त्याला फाट्यावर मारणे या दोन्ही गोष्टी करता येण्यासारखी ही खेळी होती.नंतरच्या काळात युनोने युध्दबंदी करायचा ठराव पास करूनही त्या ठरावाला ७-८ महिने फाट्यावर मारून आपले सैन्य लढतच होते यावरून ही गोष्ट लक्षात येईलच.

आणि काश्मीर-युनोचा विषय निघालाच आहे म्हणून नंतरच्या युध्दबंदीचा विषयही निघणार म्हणून आधीच लिहितो.काळेकाकांच्या धाग्यावरील चर्चेत थत्तेचाचा, धनंजय इत्यादींचे मुद्दे परत मांडायचे टाळतो. या दुव्यावर २ जानेवारी १९४९ चा इंडिअन एक्सप्रेस बघता येईल.त्या पेपरमध्ये काश्मीरातील युध्दबंदीची बातमी आहे.त्या बातमीत एक वाक्य आहे: "it seems that Pandit Nehru took his cabinet colleagues into confidence". जर नेहरूंनी काश्मीर प्रश्नाचा विचका केला आणि सरदार पटेलांच्या हातात सुत्रे असती तर प्रश्न चुटकीसरशी सुटला असता असे म्हणणाऱ्यांना मला एक प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो:काश्मीरात युध्दबंदी करायच्या निर्णयाविरूध्द सरदार पटेलांनी राजीनामा का दिला नाही?पंतप्रधानांशी मतभेद झाले म्हणून मंत्र्यांनी राजीनामे द्यायचे प्रकार झाले का नव्हते? त्यातून काश्मीर प्रश्न म्हणजे कुठचा तरी क्षुल्लक प्रश्न नव्हता की ज्यावरून डावलले जाणे पटेलांनी फारसे गांभीर्याने घेतले नसते.तसेच शामाप्रसाद मुखर्जी सुध्दा त्यावेळी नेहरूंच्या मंत्रीमंडळात मंत्री होते.त्यांनी नंतर लियाकत अली खान-नेहरू कराराच्या विरोधात राजीनामा दिला पण काश्मीरातील युध्दबंदीच्या विरोधात राजीनामा दिला नाही.याचा अर्थ हा काश्मीरात युध्दबंदी करणे हा घुसखोरांना अजून मागे पिटाळणे शक्य नाही हे लक्षाय येऊन सर्वानुमते घेतलेला निर्णय होता.मग त्या निर्णयाचे "खलनायक" एकटे नेहरू कसे?"

"हिंदू विवेक केंद्राच्या या वेबपेजवर बीजेपी टुडे या नियतकालिकात फेब्रुबारी २००२ मध्ये प्रसिध्द झालेला लेख दिला आहे.त्या लेखात तरी असे म्हटले आहे की डिसेंबर १९४७ मध्येच नेहरूंना काश्मीरमधील युध्द पाकिस्तानात न्यायचे होते. काश्मीरात जड जाते हे लक्षात येताच १९६५ च्या युद्धात शास्त्रींनी पश्चिम पंजाबात आघाडी उघडून पाकिस्तानचे नाक दाबले होते आणि तोंड उघडायचा प्रयत्न केला होता.तो प्रकार १९४७ मध्ये करावा असे नेहरूंना वाटत होते पण तसे करण्यापासून नेहरूंना माऊंटबॅटननी परावृत्त केले आणि युनोमध्ये जायचा सल्ला दिला.नक्की कोणत्या कारणाने माऊंटबॅटनने नेहरूंना परावृत्त केले हे त्या लेखात दिलेले नाही आणि याविषयी आपल्या कल्पना लढविण्याशिवाय आपण फार काही करू शकत नाही.पण याविषयीचा माझा तर्क असा---पाकिस्तानने त्यावेळीही आपले सैनिक काश्मीरात लढत आहेत हे मान्य केले नव्हते तर दोष "Non-state actors" वर ढकलला होता. हे Non-state actors चं खटलं अगदी कसाबपर्यंत चालू आहे.तेव्हा या परिस्थितीत पाकिस्तानवर हल्ला करणे म्हणजे परिस्थिती अजून चिघळवणे आणि कदाचित एक Pandora's box उघडणे असा त्याचा अर्थ झाला असता.त्यावेळची भारतीय लष्कराची स्थिती आणि देशाचीच एकूण स्थिती लक्षात घेता अमेरिका या भानगडीत पडली असती तर ते भारताला परवडणाऱ्यातले नक्कीच नव्हते. राज्यकर्त्यांना सगळी परिस्थिती बघून हात दगडाखाली असताना कोणतेही अविचारी पाऊल उचलता येत नाही/तसे पाऊल उचलल्यास ते आत्मघाताला निमंत्रण ठरू शकते. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे असे खरोखरच झाले असते का याची माहिती आज आपल्याला आहे यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरूंना नक्कीच जास्त असणार आणि तेवढा benefit of doubt मी नेहरूंना नक्कीच देतो. आणि खरोखरच नेहरूंनी सियालकोट,लाहोर, गुजरात आणि झेलमवर हल्ले केले असते आणि त्याचे उलटे परिणाम झाले असते तर नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य धोक्यात आणले म्हणून उलटा दोषही नेहरूंच्याच माथी आला असता."

(http://www.misalpav.com/comment/493031 या लेखात लिहिलेले प्रतिसाद)

बाकी नेहरूंविषयी जवळपास सगळे मुद्दे मान्य. मला व्यक्तिशः नेहरू आवडत नाहीत पण म्हणून माझ्या मते ज्या मुद्द्यांवर त्यांच्यावर टिका करणे असमर्थनीय आहे त्यावर मी तरी टिका करणार नाही. या लेखात न आलेल्या आणखी दोन गोष्टी नेहरूंनी वाईट केल्या--
१. चीनला उगीच उसकावले. चीनचा सुरवातीला नेफा/अरूणाचल प्रदेशमध्ये तितका इंटरेस्ट नव्हता तर चीनचा खरा इंटरेस्ट लडाखमध्ये अक्साई चीनमध्ये होता. १९४८-४९ मध्ये भारत सरकारने प्रसिध्द केलेल्या अधिकृत नकाशांमध्येही त्या भागात दोन देशांमधील सीमा 'अनडिफाईन्ड' आहे असेच म्हटले होते. पण १९५३ मध्ये नेहरूंच्या सरकारने दिलेल्या अनाकलनीय आदेशानुसार तो भाग भारतात दाखवायला सुरवात केली गेली आणि तो पण आपलाच प्रदेश असा दावा आपण करायला सुरवात केली. याविषयी ए.जी.नुरानींनी फ्रंटलाईनमध्ये अनेक लेख लिहिले आहेत. त्यानंतर चीनने अरूणाचल प्रदेशवर दावा करायला सुरवात केली. हा दावा म्हणजे बारगेनिंग चीप होती असे मला वाटते. म्हणजे समजा 'अ' ही गोष्ट हवी असेल तर त्याबरोबरच 'ब' वर पण दावा करायचा आणि वाटाघाटींच्या वेळी 'तुम्ही अ वरचा दावा सोडा आम्ही ब वरचा दावा सोडतो' असे प्रपोजल मोठ्या उदार अंतकरणाने द्यायचे हा प्रकार अनेक ठिकाणी होतो. त्याप्रमाणे चीन 'ब' म्हणून अरूणाचल प्रदेश वापरत असेल असे मला तरी वाटते. किंबहुना तुम्ही अक्साई चीनवरचा दावा सोडा आम्ही अरूणाचल वरचा दावा सोडतो हे प्रपोजल घेऊन चौ एन लाए १९६० मध्ये भारतात आले पण होते. पण नेहरूंनी ते ऐकले नाही. त्यानंतर १९६२ च्या युध्दात चीनने अरूणाचल व्यापला होता आणि चीनी सैन्य आसामात तेझपूरपासून ३० किलोमीटर्सवर आले होते. तिथून त्यांनी माघार घेतली पण अक्साई चीन व्यापला तो अजून सोडला नाही. म्हणजे १९६२ मध्येही चीनला अरूणाचलमध्ये तितका इंटरेस्ट नव्हता असेच दिसते. त्यावेळी पण त्यांनी अरूणाचल व्यापून ठेवला असता तर आपण त्यांना काहीही करू शकलो नसतो. नंतरच्या काळात मात्र राजकारण बरेच बदलले आणि चीनने अरूणाचलवरही आपला दावा करायला सुरवात केली.

२. इंदिरांच्या काळात उठल्यासुटल्या राष्ट्रीयीकरण करायची घाणेरडी पद्धत झाली त्याची मुहूर्तमेढ नेहरूंनी रोवली होती. सुरवातीला एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. १९५५ मध्ये दालमिया म्हणून खाजगी विमा कंपनीच्या मालकाने त्या कंपनीत भ्रष्ट्राचार केला हे लोकसभेत नेहरूंचे जावई फिरोज गांधींनी उघडकीस आणले. त्यानंतर नेहरूंनी सगळ्या विमा उद्योगाचेच राष्ट्रीयीकरण केले. समजा रामलिंग राजूने सत्यममध्ये भ्रष्टाचार केला म्हणून नुसत्या सत्यमचे नाही तर सगळ्या आयटी कंपन्यांचे (टीसीएस, इन्फोसिस, विप्रो वगैरे) राष्ट्रीयीकरण करण्याचा हा प्रकार होता. या राष्ट्रीयीकरणातून एलआयसी आणि जीआयसी चा जन्म झाला. पुढे हरिलाल मुंदडा या उद्योजकाने अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांच्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन आपल्या कंपनीचे शेअर एलआयसीला चढ्या भावाने विकले. ही गोष्ट पण फिरोज गांधींनीच लोकसभेत जाहिर केली. त्यानंतर अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे खाजगी कंपनीत भ्रष्टाचार होत होता तसा सरकारी कंपनीतही होतच होता. खाजगी कंपनीत भ्रष्टाचार झाला म्हणून त्या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले असेल तर सरकारी कंपनीत भ्रष्टाचार झाल्यावर काय करायला हवे होते? आंतरराष्ट्रीयीकरण?

ट्रुमन

शाम भागवत's picture

29 Oct 2019 - 10:27 pm | शाम भागवत

ट्रुमन यांचे स्वागत.

सुधीर काळे's picture

30 Oct 2019 - 7:46 am | सुधीर काळे

अतीशय मुद्देसूद प्रतिसादाबद्दल ट्रुमनचे अभिनंदन! माझे उत्तर असे.....
आपल्याकडे साधनसंपत्तीची (resources) कमतरता होती तर परदेशी साधनसंपत्ती कां नाहीं येऊ दिली हे कळत नाहीं व येथेच मला नेहरूंची समाजवादाकडे किंवा रशियाकडे झुकणारी वृत्ती दिसते. या धोरणाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण काय घालविले हेच पाहिले पाहिजे.
त्यावेळी भारताने अमेरिकेची बाजू कां नाहीं घेतली, रशियाची कां घेतली हेही कळत नाहीं. मी नेहमी विचार करतो कीं आपण जर अमेरिकेची मैत्री स्वीकारली असती तर हा सर्व इतिहास किती वगळा झाला असता! आज आपण बघितले आहे कीं १९५० साली अमेरिकेने आपल्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीवर तैवानच्या जागी कायम स्वरूपात निमंत्रित केले होते, नकाराधिकारासह. ते निमंत्रण आपण कां नाकारले? चीनसारख्या श्त्रूसाठी! याचा पुरावा म्हणून विजयालक्ष्मी पंडित व नेहरूंच्यामधील पत्रव्यवहारही उपलब्द्ध आहे (म्हणजे नेहरू आधी खोटे बोलले होते?). याचाच अर्थ असा कीं आपण उघड-उघड रशियाच्या व चीनच्या बाजूचा आपला कल दाखवावयाच्या आधी अमेरिका आपल्याशी मैत्री ठेवू इच्छित होती. हेच पुन्हा केनेडींच्या अण्वस्त्रांमधील मदतीच्या संदर्भात पुन्हा दिसते. तो प्रस्तावही नेहरूंनी नाकारला. आज पाकिस्तानच्याऐवजी भारत जर नाटोमध्ये किंवा सीटोमध्ये सामील झाला असता तर किती फायदा झाला असता हे आपण तर्काने तरी पहायला नको का?
१९५५ साली रशियाने आपल्याला हेच निमंत्रण दिले होते पण आपली चीनवरील माया उतू चालली होती! येथे दूरदृष्टीचा अभाव दिसत नाहीं का?
आपणच जर अमेरिकेचे मैत्रीसाठीचे प्रयत्न ठोकरून दिले मग अमेरिकेकडे दुसरा काय विकल्प होता. पाकिस्तानशी मैत्रीकरण्यासाठी आपण आपल्या चुकीच्या धोरणाने भाग पाडले नाहीं का? अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उतरली असती तर आपण रशियाला निमंत्रण दिलेच असते. पण आपण चुकीची मैत्री का निवडली हे तपासणे महत्वाचे आहे.
युनोने निर्णय दिल्यानंतरसुद्धा जर पाकिस्तानने आपले सैन्य मागे घेतले नाही त्याचा ’गाजावाजा’ नेहरूंनी कांनाहीं केला? आता पाकिस्तानने अमक्या तारखेच्या आत जर सैन्य मागे घेतले नाहीं तर काश्मीर प्रश्न न सुटण्याची जबाबदारी पूर्णपणे पाकिस्तानवर नेहरूंनी कां नाहीं ढकलली? तशी ढकलली असती तर आजच्या चोराच्या उलट्या बोंबा तरी ऐकाव्या लागल्या नसत्या!
डिसेंबर १९४७ मध्येच नेहरूंना काश्मीरमधील युध्द पाकिस्तानात न्यायचे होते. मग का नाही नेले? आधी माउंटबॅटनना इथे ठेवलेच का? नेहरूंनी जिन्नांसारखे गवर्नर जनरलपद कां नाहीं स्वीकारले? जर जिन्नांनी स्वीकारले व काश्मीरवर हल्ला चढवायला आपल्या सैन्याला (तथाकथित टोळीवाल्यांना) आज्ञा दिली तसे नेहरू दुसरी आघाडी उघडू शकले असते. पण ते पद त्यांनी घेण्याबाबत आग्रह कां नाहीं धरला? भीती? जिन्नांना भीती का नव्हती?

आनन्दा's picture

30 Oct 2019 - 1:31 pm | आनन्दा

काळे काका, पूर्वी मिपावर आदित्य कोरडे यांची एक लेखमाला काश्मीर वरती होऊन गेली.
समकालीन संदर्भ शोधून काश्मीर प्रश्नाचा उत्तम मागोवा घेतला आहे.
https://misalpav.com/node/38386

यामध्ये नेहरूंना दोष देणे तितकेसे योग्य ठरत नाही. काश्मीर प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत, आणि काहीच बरोबर किंवा चूक नाही.
असो, मी बोलण्यापेक्षा हे सगळेच मुळातून वाचणे अधिक संयुक्तिक ठरेल.

आनंदा, तुझ्या सूचनेनुसार मी कोरडे यांच्याशी संपर्क साधला असून लवकरच जरा जास्त माहिती मिळवेन. ही मैत्री जमवून दिल्याबद्दल आभारी आहे.

गॅरी ट्रुमन's picture

31 Oct 2019 - 4:29 pm | गॅरी ट्रुमन

आपल्याकडे साधनसंपत्तीची (resources) कमतरता होती तर परदेशी साधनसंपत्ती कां नाहीं येऊ दिली हे कळत नाहीं व येथेच मला नेहरूंची समाजवादाकडे किंवा रशियाकडे झुकणारी वृत्ती दिसते.

बरोबर आहे पण नुकतेच स्वातंत्र मिळाले असतानाची मानसिकता आणि आपण आता विचार करतो ती मानसिकता यात बराच फरक असू शकतो. २०१९ च्या मानसिकतेतून विचार केला तर कदाचित त्यावेळच्या मानसिकतेचा आपल्याला अंदाज येणार नाही. भारतात ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यात पहिल्यांदा व्यापार करायला आली आणि मग त्या कंपनीने हातपाय पसरत पूर्ण देश आपल्या कबजात आणला. परत असे काही व्हायला नको म्हणून परदेशी साधनसंपत्ती किंवा कोणतेच व्यापारी संबंध नकोत ही मानसिकता त्यावेळी झाली असायची शक्यता आहे. अशी मानसिकता बनणे बरोबर आहे असे मी म्हणत नाही. शेवटी मी पण २०१९ मधील एक सामान्य माणूस आहे. १९४७ मध्ये राज्यकर्ते नक्की कोणत्या अंगाने विचार करत असतील याविषयी आपण केवळ कल्पना करू शकतो.

त्यावेळी भारतात भांडवल आणि भांडवलशाही या दोन्ही गोष्टी कळत/नकळत साम्राज्यवादाशी निगडीत केल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या व्यवस्थेला विरोध करणारी डावी विचारसरणी अनेकांना आपली वाटत असे. भगतसिंगांसारखे क्रांतिकारकही डाव्या विचारांचे होते. त्यावेळी डाव्या विचारांचा नक्की कसा वाईट परिणाम होईल हे आमच्या फ्रेडरिक हायेकसाहेबांसारख्या थोड्याच लोकांना कळले होते. ते विचार भगतसिंगांना जवळचे वाटले तसे नेहरूंनाही. आता यात भगतसिंग सशस्त्र क्रांतीवाले तर नेहरू अहिंसक चळवळीतले. हा जसा त्यांच्यात फरक होता त्याचप्रमाणे नक्की त्यांना जे विचार आपले वाटले त्यात रंगछटेचा फरक असेलही- म्हणजे भगतसिंगांना गडद लाल रंग आपला वाटला असेल आणि नेहरूंना त्यामानाने फिका लाल रंग.

माझा स्वतःचा कम्युनिस्टांवर अगदी प्रचंड राग आहे- किंबहुना ज्याला 'पॅथोलॉजिकल हेटरेड' म्हणता येईल असा आहे. म्हणून भगतसिंग विचारांनी कम्युनिस्ट असल्यामुळे कित्येक वर्षे मला भगतसिंगांविषयीही इतर अनेकांना वाटतो तसा आदर कधीच वाटला नाही. आजही बर्‍याच अंशी ती अढी कायमच आहे तरीही त्याकाळात कम्युनिझमचे दुष्परिणाम तितक्या प्रमाणावर सगळ्यांना माहित नव्हते आणि भगतसिंग होते त्या वयात आदर्शवादी मनोवृत्ती असते या कारणाने तेवढा बेनेफिट ऑफ डाऊट नक्कीच देता येईल- यायला हवा. तशीच काहीशी गोष्ट नेहरूंबाबत.

त्यावेळी भारताने अमेरिकेची बाजू कां नाहीं घेतली, रशियाची कां घेतली हेही कळत नाहीं.

त्यावेळी म्हणजे नक्की कधी? १९४७ मध्ये की नंतर? १९४७ मध्येच काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आणि बाजूला चीनमध्ये यादवी चालू होती हे लक्षात घेता अमेरिकेला काश्मीरमध्ये हातपाय पसरायचे असतील ही भिती नेहरूंना नक्कीच वाटली असेल. आता असे दुसर्‍या देशाचे अस्तित्व आपल्या देशात सहन करायचे असेल तर स्वातंत्र्यलढा तरी कशाला लढला? असे नेहरू कधीच मान्य करणार नाहीत हे अमेरिकेला कळले नव्हते असे अजिबात नाही. त्यामुळे अगदी पहिल्यापासून अमेरिकेने पाकिस्तानचीच बाजू घेतली होती. अशावेळी आपण अमेरिकेची बाजू कशी घेणार होतो? त्यातही वर म्हटल्याप्रमाणे नेहरूंवर समाजवादाचा पगडा होता आणि साम्राज्यवादाला त्यांचा विरोध होता त्यामुळे अमेरिकेपेक्षा रशिया त्यांना जवळचा वाटला हे नक्कीच. आणि दुसरे म्हणजे नेहरू हे हॅरो आणि केंब्रिजचे प्रॉडक्ट होते. असे टिपीकल ब्रिटिश लोक अमेरिकेविषयी थोडासा तुच्छतेचा भाव ठेऊन असतात. म्हणजे अमेरिकन्स हे संस्कृती नसलेले, व्हॅगॅबॉन्ड बॉईज वगैरे. कदाचित नेहरूंचा अमेरिकेविषयी तसा दृष्टीकोन असेलही. हे तसा दृष्टीकोन ठेवायचे समर्थन नाही पण त्यावेळी मानसिकता कशी असेल याविषयी माझा तर्क समजा.

सुरवातीलाच वितुष्ट आल्यावर मग अमेरिकेबरोबर संबंध कसे सुधारणार होते? १९४९ मध्ये भारतात दुष्काळ असताना अमेरिकेहून धान्य आयात करायच्या वेळेस अमेरिकेने काही अटी घातल्या होत्या तेव्हा 'We will not accept aid with strings attached' असे काहीसे नेहरू म्हणाले होते. सांगायचा मुद्दा की मानवीय आधारावर दिलेल्या मदतीसाठी पण अमेरिका आपल्याला अटी घालत होती.

अर्थात नेहरूंचे नंतर नक्कीच चुकले. एकतर भारत देश आपल्या नागरिकांचे पोट भरायला असमर्थ होता पण सगळ्या जगाला तत्वज्ञान शिकवायला पुढे हे चित्र उभे राहिलेच. कोणी विचारले नसताना प्रत्येक ठिकाणी लेक्चरबाजी करायला जायचे आणि परत त्यांच्याकडूनच धान्य घ्यायचे हे प्रकार कोण ऐकून घेणार होते?

उरलेला प्रतिसाद नंतर. सांगायचा मुद्दा हा की मी नेहरूंचे किंवा त्यांच्या विरोधकांचे यापैकी कोणाचेही वकीलपत्र घेऊन आलेलो नाही. त्यावेळी नक्की काय झाले असेल आणि नेहरू नक्की तसे का वागले याविषयी माझे तर्क सादर करत आहे एवढेच.

गॅरी ट्रुमन's picture

31 Oct 2019 - 6:15 pm | गॅरी ट्रुमन

१९५० साली अमेरिकेने आपल्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीवर तैवानच्या जागी कायम स्वरूपात निमंत्रित केले होते, नकाराधिकारासह. ते निमंत्रण आपण कां नाकारले? चीनसारख्या श्त्रूसाठी! याचा पुरावा म्हणून विजयालक्ष्मी पंडित व नेहरूंच्यामधील पत्रव्यवहारही उपलब्द्ध आहे (म्हणजे नेहरू आधी खोटे बोलले होते?). याचाच अर्थ असा कीं आपण उघड-उघड रशियाच्या व चीनच्या बाजूचा आपला कल दाखवावयाच्या आधी अमेरिका आपल्याशी मैत्री ठेवू इच्छित होती. हेच पुन्हा केनेडींच्या अण्वस्त्रांमधील मदतीच्या संदर्भात पुन्हा दिसते. तो प्रस्तावही नेहरूंनी नाकारला.

हे सगळे मुद्दे मान्य. तरीही एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला अमेरिकेच्या ऑफरमधील घी दिसते पण त्याबरोबर कोणता बडगा होता का हे केवळ राज्यकर्त्यांना दिसू शकते. असा कोणता बडगा होताच किंवा नव्हताच हे मला माहित नाही. पण असू शकेल ही शक्यता ध्यानात घ्यायला नको का? शेवटी आंतरराष्ट्रीय संबंधात कोणी कोणावरही विनाकारण काहीही परत न मिळता उपकार करत नसतो. त्या मदतीसाठी जी किंमत अमेरिका मागत होती ती आपण चुकवायला तयार नसू तर? की प्रत्येकवेळी अमेरिका सांगेल तसेच आपण करावे अशी अपेक्षा असेल तर आपल्या स्वातंत्र्याला काय अर्थ राहिला?

युनोने निर्णय दिल्यानंतरसुद्धा जर पाकिस्तानने आपले सैन्य मागे घेतले नाही त्याचा ’गाजावाजा’ नेहरूंनी कांनाहीं केला? आता पाकिस्तानने अमक्या तारखेच्या आत जर सैन्य मागे घेतले नाहीं तर काश्मीर प्रश्न न सुटण्याची जबाबदारी पूर्णपणे पाकिस्तानवर नेहरूंनी कां नाहीं ढकलली? तशी ढकलली असती तर आजच्या चोराच्या उलट्या बोंबा तरी ऐकाव्या लागल्या नसत्या!

हे पूर्ण मान्य.

डिसेंबर १९४७ मध्येच नेहरूंना काश्मीरमधील युध्द पाकिस्तानात न्यायचे होते. मग का नाही नेले?

मी पाच वर्षांपूर्वी घर घेतले. अजून काही वर्षांनी किंबहुना आताच मला पण वाटते की मला आणखी एक खोली हवी होती. पण म्हणून मला कोणी 'मग का नाही घेतली' असा प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर देऊ? माझ्याकडे आणखी एका खोलीसाठी जे काही लाख रूपये लागले असते तेवढे नव्हते. मला वाटते मला म्हणायचा मुद्दा मी पुरेसा स्पष्ट केला आहे.

अजून चर्चा रंगल्यास परत येईन.

शाम भागवत's picture

31 Oct 2019 - 10:19 pm | शाम भागवत

याच तुम्ही.
:)

पूर्विसारखी अयोग्य भाषा आता फारशी वापरली जात नाही. समोरच्याचा आदर ठेऊनच लिहिलं जातंय हल्ली मिपा वर.

हस्तरसाहेब, काळे साहेब चर्चा थांबवू नका.

गॅरी ट्रुमन's picture

1 Nov 2019 - 9:39 am | गॅरी ट्रुमन

पूर्विसारखी अयोग्य भाषा आता फारशी वापरली जात नाही.

छे हो कुठचे काय. इथे काड्या घालणार्‍यांना राजाश्रय मिळतो. बहुतेक साहित्य संपादक पदही मिळते. असले प्रकार बघितल्यावर लक्षात आले की हे ठिकाण आता आपले राहिलेले नाही. तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पहावे हेच उत्तम. ध्यानीमनी नसताना काळेकाकांच्या या लेखाची लिंक शाळेच्या कायप्पा ग्रुपवर आली.अनेकदा काळेकाकांच्या मतांपेक्षा माझी मते वेगळी असतात तरी त्यांच्याशी चर्चा करायला आवडते म्हणून अनेक महिन्यांनंतर इथे आलो इतकेच.

गुडबाय.

शाम भागवत's picture

1 Nov 2019 - 2:41 pm | शाम भागवत

:)
Ok

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2019 - 10:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण कोणाला उद्देशून प्रतिसाद लिहिला आहे माहिती नाही, पण काहीही असो. आपले लेखन वाचायला नेहमीच आवडलं. आपले अभ्यासू प्रतिसाद नेहमीच आवडले. खासगी ठिकाणीही आपण मिपावर यावे असे अनेकदा लिहिले आहे. एखाद्या विषयावर प्रत्येकाचा एक दृष्टिकोण असतो, तो समजून घ्यायला अशा विविध मतांची आवश्यकता असते असे मला वाटते.

>>>>गुडबाय

मिपाचा प्रवास कधीच कोणावाचून थांबलेला पाहिलेला नाही. शुभेच्छा...!!!

-दिलीप बिरुटे

मीसुद्धा 'मिसळपाव'वरून नाहींसा झालो त्याला हेच कारण होते. वर असं लिहिण्याला "मिसळपाव" जता 'हटके' असं संस्थळ असल्याची मस्तीसुद्धा होती. भयंकर 'कंपूगिरी'सुद्धा होती. मी परत आलो ते एक-दोन सभासदांनी मला 'आता मिसळपाव पूर्वीसारखे राहिले नाहीं, खूप सुधारले आहे'असा प्रेमळ आग्रह केला तेव्हांपासून मी मधून-मधून इथे पुन्हा लिहू लागलो. आज तरी मला मिसळपाव खरंच सुधारल्यासारखे स्पष्ट दिसते आहे व हा एक निरोगी बदल आहे असेच मी म्हणेन. मिसळपाव असाच निरोगी राहील हीच आशा आणि अपेक्षा!

<<हे सगळे मुद्दे मान्य. तरीही एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला अमेरिकेच्या ऑफरमधील घी दिसते पण त्याबरोबर कोणता बडगा होता का हे केवळ राज्यकर्त्यांना दिसू शकते. >> अमेरिकेची हद्द आपल्या हद्दीपासून खूपच दूर होती पण त्यावेळच्या सोवियेत संघराज्याची हद्होअफगाणिस्तानला चिकटली होती व खूपच जवळ होती. रशियाचा बडगा मात्र दिसला नाहीं अमेरिकेचा दिसला? म्हणूनच मला वाटते की नेहरूंना पहिल्यापासूनच साम्यवाद/समाजवाद जास्त प्रिय होते व त्यामुळेच त्यांनी असे एकतर्फी निर्णय घेतले असे मला वाटते.
आज अमेरिकेची मदत घेऊन पाकिस्तानने फायदा खूप घेतला पण आजही तो अमेरिकेला भीक घालत नाही हेही आपण पाहातोच आहोत ना?
थोडक्यात मी जे लिहिले आहे ते बरोबरच आहे असे मला वाटते. नेहरूंचा निर्णय तर्कशुद्ध नव्हता पण त्यांच्या मानसिक कलापोटी घेतला गेला होता.

गॅरी ट्रुमन's picture

1 Nov 2019 - 9:30 am | गॅरी ट्रुमन

तसा व्हिएटनामही अमेरिकेपासून खूप दूर होता. पण अमेरिकेने काड्या घालायच्या त्या घातल्याच ना? तेव्हा अंतर हा मुद्दा तितका व्हॅलिड नसावा.

रशियाचा बडगा होताच. पूर्व जर्मनीपासून सगळ्या पूर्व युरोपने तो अनुभवला होता. त्यातही हंगेरी आणि चेकोस्लाव्हाकियाने जास्त. तो बडगा अगदी उघड उघड होता. अमेरिकेचा बडगा कदाचित जास्त सटल असेल त्यामुळे तो तितकाच वाईट असला तरी दिसायला त्यामानाने निरूपद्रवी दिसत असेल.

सांगायची गोष्ट ही की आता म्हणजे २०१९ मध्ये आपल्याला १९४७ पासून काय झाले हे माहित आहे म्हणून आपण हे सगळे बोलत आहोत. ही एका अर्थी पश्चातबुध्दी आहे. शीतयुध्दात अमेरिकेचा विजय झाला, रशियाचे विघटन झाले हे सगळे आपल्याला माहित आहे. कम्युनिझम या बोगस प्रकाराचा अंततः पराभव होणे क्रमप्राप्त आहे. कारण ती पध्दत मानवी स्वभावाच्याच विरोधात आहे आणि त्यामुळे अनैसर्गिक आणि कृत्रिम आहे. अशी कोणतीही पध्दत फार काळ यशस्वी होणे शक्य नाही. पण शॉर्ट रनमध्ये लष्करी सामर्थ्याच्या बडग्याच्या जोरावर ही पध्दत यशस्वी होत आहे असे दिसू शकते. अशा शॉर्ट रनमध्ये अमेरिकेऐवजी समजा रशियाचा विजय झाला असता तर आपण रशियाच्या जवळ होतो याबद्दल नेहरू आणि इंदिरा गांधींचे त्याच पश्चातबुध्दीच्या जोरावर आभार मानलेही असते.

तेव्हा परत एकदा-- २०१९ मध्ये बसून आताचे मापदंड लावून आपण हे सगळे बोलत आहोत. पण १९४७ मध्ये नक्की कोणत्या परिस्थितीत ते निर्णय घेतले गेले होते? एकतर स्वातंत्र्यलढा म्हणून जे काही होते त्यात काँग्रेसचा सहभाग जास्त होता आणि मुस्लिम लीगचा विशेष नाही. पाकिस्तान बनलेल्या प्रदेशात राहिलेल्यांना त्यामानाने आपसुक स्वातंत्र्य मिळाले (बरेच लोक म्हणतात की भारतालाही आपसूकच स्वातंत्र्य मिळाले :) ) आणि भारत सोडून जावे लागणे ही ब्रिटिशांना अगदी भळभळती जखम वाटली असेल यात शंका नाही. अशावेळी इंग्लंड आणि त्यांचा मित्रदेश अमेरिकेचा ओढा ब्रिटिशांना देशातून हाकलायचा प्रयत्न करणार्‍या भारतीयांपेक्षा पाकिस्तानकडे असायची शक्यता जास्त असे वाटले तर १९४७ मध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांचे काय चुकले? अशी सुरवातच अविश्वासाने झाल्यावर भारत-अमेरिका संबंधात दुरावा येणे क्रमप्राप्त नाही का? आज माझ्या पिढीला आणि त्यापुढील पिढीला अमेरिकेविषयी नक्कीच ओढा वाटतो पण तसाच ओढा १९५० च्या दशकात तरूण आणि मध्यमवयीन लोकांना वाटायचा का?

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे त्यावेळी त्या परिस्थितीत नेहरूंनी काही निर्णय घेतले. अशा निर्णयांमागे नेहरूंची स्वतःची आयडियॉलॉजीकल कन्व्हिक्शन असतीलही. भविष्यात ते निर्णय चुकीचे सिध्द झाले तरी त्यावेळच्या परिस्थितीत आणि त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आणि त्यावेळच्या मानसिकतेप्रमाणे कदाचित तेच निर्णय सर्वोत्तम असतील. जोपर्यंत आपण स्वतःला १९४७ मधील परिस्थितीत नेऊ शकत नाही तोपर्यंत नक्की कोणत्या कारणाने असे निर्णय घेतले गेले हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे २०१९ मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीवरून नेहरूंना सुळावर चढवू नये.

सुधीर काळे's picture

31 Oct 2019 - 10:35 pm | सुधीर काळे

<<डिसेंबर १९४७ मध्येच नेहरूंना काश्मीरमधील युध्द पाकिस्तानात न्यायचे होते. मग का नाही नेले?>>
एकदा हरीसिंग यांनी आपले संस्थान बारतात विलीन केल्यानंतर आपण त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर येतेच! पाकिस्तानने आपल्ला मुलू़ख घेतला होता तो परत घेणे आपले कर्तव्यच होअसतेहे काम वेळेवर केले असते तर संपूनच गेले असते किंवा संपेपर्यंत चालवायलाच हवे होते. प्रत्येक दिशेला 'अक्साई चिन' बनवणे परवडणार होते काय?
त्या मानाने पाकिस्तान जास्त हुशार निघाला असे वाटत नाही का? साधनसामुग्री आपल्यापेक्षा कमी असूनही त्याने हिंमत दाखविली पण आपण नाहीं दाखविली हे माउंटबॅटनमुळेच ना? त्याला आणलाच कशाला या समीकरणात?

अप्रतिम ,तुम्ही मिपावर कायम यावे

गॅरी ट्रुमन's picture

29 Oct 2019 - 10:17 pm | गॅरी ट्रुमन

दुसरे म्हणजे फाळणी केल्याबद्दल नेहरूंना दोष दिला जातो. पण फाळणीच्या प्रस्तावाला सरदार पटेलांनी पण मान्यता दिलीच होती याकडे दुर्लक्ष केले जाते. आणि भारत-पाकिस्तान गुण्यागोविंद्याने एकत्र राहणे शक्य होते असे खरोखरच वाटते का? समजा १९४७ मध्ये फाळणी न करता यादवीचा धोका पत्करून देश एक वगैरे ठेवला असता तर जे १९४७ मध्ये झाले ते पुढची अनेक वर्षे होत राहिले असते आणि आणखी काही वर्षांनी कदाचित १९६० च्या दशकात फाळणी झालीच असती.

सुधीर काळे's picture

31 Oct 2019 - 2:43 am | सुधीर काळे

माझ्या याच लेखाला (इतरत्र प्रकाशित) तिथल्या एका वाचकाने एक छान प्रतिसाद दिला आहे. तो म्हणतो कीं फाळणी अटळ आहे असे ठरल्यावर दोन्ही समाजांनी (हिंदू आणि मुसलमान) ब्रिटिशांनाच फाळणी करूनच या दोन्ही देशांना स्वातंत्र्य द्यायला हवे होते.

मराठी कथालेखक's picture

30 Oct 2019 - 12:57 pm | मराठी कथालेखक

माझा या विषयात फारसा अभ्यास नाही पण अभ्यास वाढावा म्हणून मी हा लेख वाचला, गॅरी ट्रूमन यांच्या प्रतिक्रियाही अशाच अभ्यासपूर्ण आहेत. तेव्हा काळे साहेब आणि ट्रुमन साहेब दोघांचे आभार.
फाळणी संदर्भात अजून काही पैलू लक्षात यावे या दृष्टीने "Viceroy's House" हा चित्रपटही बघण्याजोगा आहे.

पिक्चर बीबीसीने बनवलाय. कितपत विश्वास ठेवायचा कळत नाही. पण सिनेमा आवडला. इंग्लंडमधलं सरकार बदललं. मत बदलली. तसा व्हाॅईसराॅय बदलू शकतोही.
असो.

विजुभाऊ's picture

30 Oct 2019 - 4:28 pm | विजुभाऊ

नेहरुंनी चूका केल्या असतील कदाचित घोडचुका केल्या असतील पण त्या चुका म्हणूनच पहायला हव्यात.
ग्वादर बंदर हे पाकिस्तानच्या मुखावरील बंदर ते घ्यायचे आणि सांभाळत बसायचे हा विचार त्यामागे असू शकेल.
आजही श्रीलंकेकडून हंबनटोटा विमानतळ भारताने लीजवर घेतलाय. प्रत्यक्षात त्याचा काहीच वापर होत नाही. हे व्यापारी दृष्ट्या परवडणारे नाही. चिनने हंबनटोटा बंदर जर घेतले नसते तर आपणही तो विमानतळ घेतला नसता. लश्करी दृष्ट्या चीनवर दबाव ठेवण्याचा एक मार्ग यासाठी घेतलाय. भारताची तेवढी आर्थीक ताकद आहे देखील
ग्वादार बंदराचा विचार या दृष्टीने त्यावेळी करता असेल. अर्थात त्यावेळेस भारताची आर्थीक ताकद नसेल.
पण याचा अर्थ नेहरू हे सर्वात निकृष्ट अदूरदर्शी होते.असा होत नाही.
मोरारजी देसाई यांनी उद्योग , संरक्षण , अर्थ संदर्भात जे निर्णय घेतले त्या तूलनेत हे काहीच नाही असे म्हणायला हवे. मोरारजी मुळे भारत कितीतरी क्षेत्रात मागे फेकला गेला

अमेरिकेशी मैत्री केली असती तर साधनसंपत्तीची कधीच कमतरता पडली नसती. आणि तेच चुकले. रशियाकडेसुद्धा अमेरिकेइतकी साधनसंपत्ती नव्हतीच. आणि आपण रशियाचे जवळ-जवळ मांडलीकच झालो होतो. कित्येक वेळी रशियाची चूक असूनसुद्धा आपण त्याच्यावर टीका केली नाही, उदा. हंगेरी.

रविकिरण फडके's picture

31 Oct 2019 - 7:45 am | रविकिरण फडके

तुम्ही विचारता,
"नेहरूंची सर्वात मोठी चूक होती देशाची फाळणी स्वीकारण्याची. याला गांधीही जबाबदार होते. फाळणी होईल ती माझ्या मृत देहावरून असे म्हणणारे गांधी असे कसे निवळले?"
ह्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर (ते तुम्हाला पटेल वा नाही पटणार) हवे असल्यास प्रा. शेषराव मोरेंचे '१९४७: काँग्रेसने अँड गांधीजींनी अखंड भारत का नाकारला' हा ग्रंथ अवश्य वाचावा.
माझ्या आठवणीप्रमाणे, मिपावर कुणीतरी ह्यावर लिहिलेही आहे पूर्वी.

रविकिरण फडके's picture

31 Oct 2019 - 7:54 am | रविकिरण फडके

माफ करा.
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? असे कृपया वाचावे.

नितिन थत्ते's picture

31 Oct 2019 - 8:12 pm | नितिन थत्ते

>>>त्यावेळी भारताने अमेरिकेची बाजू कां नाहीं घेतली, रशियाची कां घेतली हेही कळत नाहीं.

आपल्या शेजार्‍यांनी अमेरिकेची बाजू घेतली ना !! त्यंचं अमेरिकेने काय करून ठेवलंय हे पाहिलेलं बरं !!!

अमेरिकेने पाकिस्तानचे काहीही वाईट केलेले दिसत नाही, उलट पाकिस्ताननेच अमेरिकेला ओरबाडून खाल्ले आहे आणि वर चीनशी 'म्होतूर' लावून अमेरिकेची पार वाट लावून टाकली आहे!

पंतप्रधानच नाही तर जे जे संबंधित होते त्यांचं खूप चुकलं आहे .
भारत देशासाठी काश्मीर च भिजत घोंगड राहिले.
पाकिस्तान साठी पूर्व पाकिस्तान डोके दुखी ठरला आणि युद्ध करण्याची वेळ आली .
एक धर्म असला तरी बांगला भाषिक आणि उर्दू भाषिक एक राहू शकत नाहीत .
आणि भु सिमा सुद्धा एकमेकांना मिळत नाहीत .
तरी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान निर्माण करणे म्हणजे मूर्ख पणाच.
भारतात सुधा काही आलबेल नाही.
त्याला स्वतंत्र मिळवून स्व शासन निर्माण करण्याची घाई हेच कारण आहे

चांगला मुद्दा आहे.
याच लेखाला फेसबुकवर एका वाचकाने छान प्रतिसाद दिला आहे. तो म्हणतो की भारताने इंग्लंडलाच फाळणी करायला सांगायला हवे होते व मगच स्वातंत्र्य स्वीकारायला हवे होते. जे कांहीं वादविवाद असतील ते इंग्लंडशी घालून मग देश हाती घ्यायला हवा होता.

शेवटी कप्तान या नात्याने नेहरूंच्यावरच ती जबाबदारी येऊन पडते. त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांचाही सहबाग असेल, मंत्रीमंडळातील सहकार्यांचाही सहबाग असेल, पण शेवटी या सर्वांच्या वतीने कप्तानाच जबाबदार धरले जाते व ते योग्यही आहे.

डँबिस००७'s picture

1 Nov 2019 - 12:53 am | डँबिस००७

भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?

भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान यात काही शंकाच नाही. जेंव्हा पंतप्रधान पदावर अयोग्य अश्या व्यक्तींची नेमणुक होते तेंव्हा त्या पदाची गरीमा ही जातेच. जेंव्हा काँग्रेसच्या प्रादेशीक समितीं नी नेहरुंचे नाव सुचवले / निवडले नव्हते त्यावरुनच हे कळते की नेहरु काय योग्यतेचे होते. एकंदरीत देशाच्या सर्वोच्च पदावर महात्मा गांधींजींनी एका अश्या माणसाला बसवले जो त्या पद भुषवायच्या ला यकीचा नव्हता. अहिंसेवर अति विश्वास, लोकांवर दुसर्या देशावर अति भरोसा, अति साम्यवादाकडे झुकाव हे गुण नेत्यात असणे धोक्याचे होते.

समोर आलेल्या अनेक संध्या नहरुंच्या मुर्खपणामुळे दवडल्या गेल्या हे सर्वां समोरच आहे. पण अश्या काही गो ष्टी आहेत ज्या सार्वजनीक झाल्या नाहीत. नेहरुंचे पी ए म ओ मथाई ह्यांच्याच पुस्तकातला एक उतारा आहे.
In his book Mathai has shown immense respect towards Nehru but he has even openly spoken out of the intimate relationship Nehru had with Edwina, Padmaja Naidu (Sarojini Naidu’s daughter), Mridula Sarabhai and many others. Nehru was deeply busy in impressing these ladies that he forgot to take care of India. Eventually, India lost the 1962 Indo-China war.

हिंदु बद्दल द्वेष भावना नेहरुंमध्ये होती हे कोणा पासुन लपुन राहिलेले नाही. राजेंद्र प्रसाद ह्यांनी सोमनाथ मंदिर जिर्णोद्धाराच्या नंतरच्या मंदिर ओपनींग समारंभाला राष्ट्रपती ह्या नात्याने जाऊ नये अश्या मताचे नेहरु होते. त्यांनी जा ऊच नये असा आग्रह धरलेला असताना ही
राजेंद्र प्रसाद ह्यांनी सोमनाथ मंदिर ओपनींग समारंभाला हजेरी लावली . पण त्याची फार मोठी किंमत राजेंद्र प्रसाद चुकवावी लागली.
राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती पदावरुन निवृत्त झाल्यावर नेहरुंनी त्यांचे हाल केले. त्यातच राजेंद्र प्रसाद यांचा श्वास रोगाने मृत्यु झाला. सरदार पटेलांचाही मृत्यु त्याच प्रकारे झालेला होता. म गांधीजीच्या मृत्युबद्दलही संशयाला बरीच जागा आहे. म गांधीजीच्या मृत्यु नंतर त्यांच्या शवाचे पोस्ट मॉर्टेम झाले नाही. गोळ्या लागल्यावर सुद्धा त्यांना ई स्पितळात हलवल गेल नाही. २० मिनीट त्याना सभागृहातच जमिनीवर ठेवण्यात आले होते. सुब्रमनियम स्वांमीनी म गांधीजींच्या मृत्युबाबत नेहरुंच्या संबंधांबाबत बरेच प्रश्न विचारलेले आहे. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/subramania...

आझाद हिंद सेनेला डिस मँटल करणे. दुसर्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याला व मित्र राष्ट्राच्या सैन्याला देण्यात आलेली शस्त्र भारतात बनवलेली होती. १९४७ च्या पुर्वी भारतात बरेच शस्त्र निर्मिती कारखाने ब्रिटीशांनी उभारलेले होते. त्यातले बहुतांश शस्त्र निर्मिती कारखाने
नेहरुंनी पुर्णपणे बंद केले. दुसर्या महायुद्धानंतरही भारताला अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा अट्टहास म गांधीजींनी व नेहरुनी केला. जो हास्यास्पद होता. स्वातंत्र्यानंतर सैन्याचा कारभार पुर्ण पणे भारतीयांच्या हातात आलेला नव्हता त्यावेळच्या ब्रिटीश अधिकार्यांने नेहरुंना भारतीय सैन्या बद्दल , आधुनिकीकरणा बद्दल काय प्लॅन आहे अस विचारल त्यावेळेला नेहरुंनी त्याला सांगीतल की भारताला सैन्याची गरज नाही. फक्त्त पोलिसांची गरज आहे.

सर टोबी's picture

1 Nov 2019 - 11:10 pm | सर टोबी

आणि त्या टोकाच्या असल्या तरी हरकत नाही. सहसा अशा कोणत्याही धागा लेखकांच्या किंवा प्रतिसादकांच्या दाव्यांचा मी सहसा प्रतिवाद केला नाही (खास करून जेंव्हा त्यांच्या निष्ठा विवेकापेक्षा वरचढ होताहेत असले वाटले तेंव्हा.) परंतु प्रस्तुत लेखकांचा त्याला अपवाद आहे कारण एके काळचे नेहरू भक्त ते टोकाचा तिरस्कार असा बराच मोठा पल्ला त्यांच्या बुध्दिने गाठला आहे. त्यांनी आपल्याकडे नीरक्षीर विवेक बुद्धी आहे असे म्हटले जरी नसले तरी तसे त्यांच्या लिखाणामधून तसे व्यक्त होत आहे. तेंव्हा विद्यमान पंतप्रधानांचे स्थान त्यांच्या लेखी काय आहे तेही सांगून टाकावे.

सुधीर काळे's picture

5 Nov 2019 - 4:42 am | सुधीर काळे

कारकीर्द संपल्यावर देईन (मी जिवंत असलो तर)!

प्रियाभि..'s picture

2 Nov 2019 - 11:59 pm | प्रियाभि..

तुम्ही नीट वाचलेच नाही किंवा तुम्हाला वेगळाच अर्थ समजला आहे असे मला वाटते.

सुधीर काळे's picture

5 Nov 2019 - 4:53 am | सुधीर काळे

मी नीट वाच होते ४५-५० वर्षांपूर्वी! त्यामुळे त्यातले मुद्दे आता लक्षात नाहींत पण वाचले तेंव्हां खूप पटले होते.

गॅरी ट्रुमन,

आज माझ्या पिढीला आणि त्यापुढील पिढीला अमेरिकेविषयी नक्कीच ओढा वाटतो पण तसाच ओढा १९५० च्या दशकात तरूण आणि मध्यमवयीन लोकांना वाटायचा का?

माझ्या मते वाटायला हवा. निदान रशियाइतका तरी. कारण की १९३० व ४० च्या दशकात अमेरिकेचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास भक्कम नैतिक पाठिंबा होता (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/India%E2%80%93United_States_relations#Brit... ). दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस रुझव्हेल्ट भारतास स्वातंत्र्य देण्याबद्दल बराच आग्रही होता व त्याने तशी चर्चिलकडे मागणी देखील केली होती (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/India%E2%80%93United_States_relations#Worl... ).

तसंच नेहरू व केनेडी हे मित्र होते. या मैत्रीचा परिणाम म्हणजे भारत अमेरिकेच्या जवळ जाण्यात झाला. पण केनेडींची हत्या झाली आणि परिस्थिती झपाट्याने बदलंत गेली.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

4 Nov 2019 - 12:42 am | कपिलमुनी

कोणी कोणाला ऊकृष्ठ की निकृष्ट मानावे ? याबद्दल वैयक्तिक मते काहीही असू शकतात . कदाचित हा प्रतिसाद मिपावरचा आजपर्यंतचा सर्वात निकृष्ट प्रतिसाद असेल

काळेंच्या जिलब्या सर्वात निकृष्ट आहेत . असेही कोणाचे मत असेल .

अशा लेखासाठी गावाकडच्या म्हणीं लागू पडतात , पण सार्वजनिक पटलावर लिहिता येत नाहीत.

भारतीय घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्ययाचा विजय असो.

कपिलमुनींचा प्रतिसाद पार डोक्यावरून गेला. पुन्हा एकदा समजेल अशा बाषेत लिहिल्यास उत्तर देता येईल.

शशिकांत ओक's picture

11 Nov 2019 - 11:13 pm | शशिकांत ओक

चौधरी चरण सिंह यांनी मोरारजी देसाई यांच्याशी दगाबाजी करून स्वतः उपपंतप्रधान असूनही त्यांना पाडले. औट घटकेचे ७ महिनेच पंतप्रधान पद भोगले.
इंदिरा गांधी यांनी आधी समर्थन देऊन नंतर आमच्यावरच्या सर्व केसेस मागे घ्यायला दबाव आणला तो न पेलल्याने राजिनामा देऊन गेले.
मला वाटते ते सर्वात जास्त निरुपयोगी असावेत. हौसेने पंतप्रधान बनायला व लाल किल्ल्यावरून भाषण करायला मिळावे म्हणून हा खटाटोप त्यांनी केला असे म्हटले जाते...
असतात असे हौशे नवशे... आत्ता तरी काय चाललय?

नितिन थत्ते's picture

14 Nov 2019 - 8:08 am | नितिन थत्ते

बरं, ते स्विस बँकेतल्या पैशांचं काय झालं हो?

ऋतुराज चित्रे's picture

14 Nov 2019 - 9:28 am | ऋतुराज चित्रे

मिपावर पैशासंबंधी कुठलेही प्रश्न सरकारला विचारू नये, मग तो काळा असो व सफेद.

सुबोध खरे's picture

14 Nov 2019 - 12:03 pm | सुबोध खरे

३०० कोटी रुपये स्वीस बँकेच्या खात्यात पडून आहेत ज्यावर दावा लावायला यायची कोणाची हिम्मत होत नाहीये.
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/no-claimants-fo...

https://www.livemint.com/news/india/india-switzerland-agree-to-work-clos...

Finally! India gets info on Swiss bank account holders in fight against black money

https://www.businesstoday.in/current/economy-politics/black-money-swiss-...

अभ्यास वाढवा __/\__

नितिन थत्ते's picture

16 Nov 2019 - 8:35 am | नितिन थत्ते

अहो प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये मिळू शकतील* इतका काळा पैसा स्विस बँकेत होता ना? \
की वैदिक गणितानुसार १५ लाख गुणिले भारतातील कुटुंबांची संख्या = ३०० कोटी होतात?

*मिळणार होते/देणार होते वगैरे मी काही म्हटलेले नाही.

नितिन, प्रत्येक घटनेला मुहूर्त लागतो. ३७० बद्दलह्र्र मोदीद्वेष्टे हाच प्रश्न इतक्याच खइतक्याच आणि उपरोधिकपणे विचारीत. पण मुहूर्त आल्याबरोबर तो मुद्दा संपला. आता स्विस बँकेचा मुहूर्त कधी लागतो ते पाहू. त्या आधी बेनामी संपत्तीचा मुहूर्त लागणार अशी हवा आहे.

सुधीर काळे's picture

15 Nov 2019 - 7:04 am | सुधीर काळे

कृपया "३७० बद्दलह्र्र मोदीद्वेष्टे हाच प्रश्न इतक्याच खइतक्याच " ऐवजी "३७० बद्दलही मोदीद्वेष्टे हाच प्रश्न इतक्याच खवचटपणे आणि" असे वाचावे.

श्रीरंग_जोशी's picture

14 Nov 2019 - 9:57 am | श्रीरंग_जोशी

'माहितीची सोयीस्कर मोडतोड करुन हवे तसे निष्कर्ष काढणार्‍या' या लेखनाशी सहमत नसलो तरी प्रस्तुत लेखकाला तसे नि:संकोचपणे व जाहीरपणे मांडण्याचा हक्क आहे असे माझे मत आहे. डोन्ट स्पेअर मी शंकर म्हणणार्‍या नेहरुंचा हा उदारमतवाद माझ्यासारख्या लोकशाहीप्रेमी माणसाला हेच शिकवतो.

हा विषय मिपाच्या बोर्डावर असल्याने या धाग्यावर काही दुवे देतो. उस्मानाबादचे राज कुलकर्णी पंडीत नेहरुंचे अभ्यासक आहे.
त्यांच्या काही व्याख्यानांच्या चित्रफीती

टीपः तिसरी चित्रफीत व्याख्यानाची नाहीये.

राज कुलकर्णी यांचा ब्लॉग देखील वाचनीय आहे.

पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो.

श्रीरंग, असे 'मोघम' लिहिण्यापेक्षा मी लिहिलेल्या प्रत्येक मुद्द्याला मुद्देसूदपणे उत्तर दिलेस तर जास्त शोभून दिसेल. मी माझ्या परीने सत्यलेखनाचा प्रयत्न केलेला आहे. जर राज कुलकर्णी यांचा ई-मेल तुझ्याकडे असेल तर दे म्हणजे मी त्यांना माझा लेखच पाठवतो व त्यांच्याकडून हजामत तरी करून घेतो किंवा शाबासकी मिळवितो. दोन्हीची तयारी आहे माझी.

श्रीरंग_जोशी's picture

15 Nov 2019 - 9:44 am | श्रीरंग_जोशी

माझ्या दुर्दैवाने माझ्याजवळ मोकळ्या वेळेचीच टंचाई असल्याने वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात बर्‍याच ठरवलेल्या गोष्टी करायचे राहून जाते. एवढेच काय तर मिपावरच्या दर्जेदार लेखनाचा आस्वाद घेणे अन त्याला प्रतिसादाद्वारे दाद देणे हेदेखील राहून जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनाचा प्रतिवाद करण्यासाठी वेळ घालवणे मला अशक्य आहे. यदाकदाचित वेळ उपलब्ध असताही तर तो या कामात घालवण्यापेक्षा दुसर्‍या कुठल्या विधायक कामात घालवल्याने अधिक समाधान लाभेल.

तुम्हीही फसवणूक सारखे पुस्तक व पाकिस्तानमधल्या वृत्तमाध्यमांतले लेख मराठीत अनुवादित करून विधायक कार्य केले आहे व करत असता.

राज कुलकर्णी यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधता येईल. त्यांना या लेखाचा दुवा पाठवण्यापूर्वी त्यांचे जालावर सहज उपलब्ध असलेले लेखन एकदा नजरेखालून घातले तर उत्तम.

सुधीर काळे's picture

29 Nov 2019 - 12:19 am | सुधीर काळे

श्रीरंग-जी, जर तुमच्याकडे राज कुल्कर्णी यांचा ईमेल आयडी असेल तर देणे म्हणजे मी त्यांना माझा हा लेख पाठवून देऊ शकेन.
तसेच त्यांचे जे तीन दुवे दिले आहेत ते सगळे ध्वनीफीती आहेत. त्यांचा ब्ल्~ओग अजून पाहिला नाहीं.

श्रीरंग_जोशी's picture

29 Nov 2019 - 10:45 am | श्रीरंग_जोशी

राज कुलकर्णी यांचा ईमेल पत्ता मला ठावूक नाही. मी त्यांना फेसबुकवर फॉलो करतो. त्यांना फेसबुकवर संदेश पाठवण्याचा पर्याय वापरावा ही विनंती.

मला कृपया नावानेच संबोधावे ही आणखी एक विनंती :).