माझे नेहरवायण १

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 May 2018 - 3:46 pm

* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__

विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली. खरे म्हणजे अगदी डिस्कव्हरी इंडिया लिहून प्रकाशित होई पर्यंतही भारत आणि जगाचा इतिहास वेगाने बदलत होता आता तर तो आणखी बदलला आहे . पुढच्या भागात डिस्कव्हरी इंडिया पीडीएफ माध्यमातून पुन्हा एकदा वाचनास घ्यावी आणि त्यात व्यक्त नेहरू आणि तथ्यात काळाच्या ओघात पुन्हा एकदा आढावा घ्यावा अशी इचछा आहे. पण तत्पुर्वी एखाद दोन लेखातून नेहरुंबद्दलच्या एखाद दोन सबळ टिंकांचा उहापोह करण्याचा मानस आहे.

शालेय वयातून बाहेर पडताना ज्या अनेक पूजांचा ( आस्था आणि श्रद्धांचा नव्हे ) त्याग करताना मी शब्द पूजा आणि व्यक्ती पूजेचा त्याग केला . अर्थात व्यक्ती पूजेचा त्याग केला म्हणजे व्यक्ती द्वेषाने जागा घेतलीच पाहिजे असेही नसावे. त्या प्रमाणे इतर अनेक व्यक्तींप्रमाणे गांधी नेहरूंच्या मर्यादा असणार हे मनाने स्वीकारले तरी वेदनाकोष टाईप राग अनेकांत दिसतो तो नव्हता , अथवा अगदी कपाळावर फारशा आठ्या नव्हत्या .

समोर आलेली टीका सर्वसाधारणपणे चिमूटभर मिठाच्या अंदाजाने स्वीकारावी असाच काय तो अगदी अलीकडॆ पर्यंतचा हिशेब होता . म. गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वर्तन स्थानिक आफ़्रिकनांच्या प्रति वर्णवादी होते याची गेल्या दोन एकवर्षात माहिती होई पर्यंत त्यांच्या बद्दल कपाळावर आठी नव्हती, त्यांचे आफ्रिकेतील वर्तन वर्णवादी होते हे स्वीकारावे लागण्याने कपाळावर पहिली आठी पडली . असेच काहीसे नेहरूंच्या बाबतही झाले.

नेहरूंच्या नंतरच्यांनी घराणेशाही चालविली तर त्याचा दोष नंतरच्या पिढयांना देता येईल नेहरूंना नाही असाच विचार मी करत असे . नेहरूंचे लेडी माउंट बेटनं बरोबरचे जे काही संबंध होते ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा भाग होते, कुणाच्या व्यक्तिगत जीवनावर हकनाक टिकाकारणे कधी श्रेयस्कर ना वाटल्याने अशा टीकेची दखल घ्यावी असे कधी वाटले नाही.

अज्ञेयवाद, नेहरूंवीय समाजवाद, गांधीवाद, सेक्युलॅरिझम या विचारसरणी आहेत पटो ना पटो, त्यांची स्वतः:ची वेगळी विचारसरणी टिकेसही; आयडियालॉजीवर टीका केली म्हणजे त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केलीच पाहिजे असे नसावे म्हणून अशा अंगाने सहसा आपला पास असे. काँग्रेसच्या पदावरून अथवा पंतप्रधान पदावरून त्यांनी घेतलेले निर्णय त्यातील खास करून काश्मीर निर्णय किंवा चीनसंबंध या बद्दलही कदाचित असहमती होऊ शकतात , नेहरुंच्या पदावरून झालेल्या काही चुकांना एरर ऑफ आयडियालॉजी किंवा एरर ऑफ जजमेंट या सदरात मोडता येऊ शकते. म्हणून बेनिफिट ऑफ डाउट दिल्याने, काही साशंकताबद्दल चिमूटभर मीठ घेऊन बघितले तरी कपाळावर आठी आली नव्हती.

पण अलिकडल्या वर्षात वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या वेळी नेहरूंच्या आजूबाजूंच्या लोकांविषयी इंग्रजी विकिपीडियावर वाचनाचे योग आले, तसे नेहरूंच्या एका वर्तना बद्दल नाही म्हटले तरी भुवई उंचावली; ती म्हणजे नेपोटीझम म्हणजेच घराणेशाही. घराणेशाहीस नेहरूंनी स्वतः:च बर्‍यापैकी राबवले नाही ना या साशंकतेने. खासकरून दिल्ली गोल्फ क्लब च्या उच्च्भ्रू सरंजामशाहीला नेहरुंनी पाठीशी घातले. जिथे अगदी गेल्या वर्षी एका मेघालयाच्या स्त्रीचा पोशाख आणि व्यवसायावरून अनमान केला गेला, तेव्हा नेहरूंच्या सरंजामी इतिहासाकडे नेमके कसे बघावे असा प्रश्न पडला .

मोतीलाल नेहरूनंतर (जवाहरलाल नेहरूंचे वडील) पाचच वर्षात जवाहरलाल नेहरूंना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले पण स्वतः: जवाहरलाल नेहरू कोंग्रेसमध्ये आधी आले होते, त्यामुळे त्याबाबत कुणी अधिक चिकित्सा खासकरून स्वातंत्र्य आंदोलन चालू असण्याच्या काळात करणार नाही हे समजता येते.

एखाद्या सरंजामशाही समर्थकाने घराणेशाही राबवली तर आश्चर्याचे वाटतं नाही, पण नेहरूंवीय आयडियॉलॉजी सरंजामशाहीची खूपही समर्थक नसावी असा माझा समज होता. पंतप्रधान मिळाल्यानंतर त्यांच्या घराण्यातील फक्त विजयालक्ष्मी पंडितांना सरकारी पदाचा लाभ झाल्याचे मला माहीत होते. पण इंग्रजी विकिपीडियावरील विविध संदर्भ बरोबर असतील तर हि संख्या जराशी अधिक नाहीना अशी अलीकडे साशंकता वाटते. इथे मला टीका करायची म्हणून टीका करण्यात रस नाही पण नेहरूंच्या भोवतालची नेहरू घराण्यातील एक एक मंडळी तपासण्याची इच्छा जरूर आहे.

नेहरुंचे जावई म्हणजे इंदिरा गांधींचे पती फिरोझ गांधी स्व प्रतिभेचे होते त्या शिवाय काँग्रेसच्या हातात एका हाती सत्ता असण्याच्या काळात सासर्‍यावरही उघड टीका करणे आणि भ्रष्टाचाराचे आद्य विरोधक होण्याचे क्रेडिट फिरोझ गांधीना देऊन, नेपोटीझमच्या आक्षेपातून सुरवातीसच वगळले पाहिजे

ब्रिजलाल नेहरू ज. नेहरूंचे काका होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मधून जाऊन पुढे काश्मीरच्या विलानीकरणाच्या वेळी तेथील तत्कालीन महाराजा हरिसिंगाकडे नौकरीस होते, काश्मीर विलीनीकरणात ब्रिजलालांची नेमकी भूमिका माहीत नाही, पण फुलं ना फुलाची पाकळी मदत झाली असण्याची शक्यता विचारात घेऊ शकतो. तेव्हा ब्रिजलालांना १९५५ मध्ये पद्मभूषण दिले असेल तर समजण्यासारखे असू शकेल. ब्रिजलालांची पत्नी रामेश्वरी नेहरूंचे स्त्री विषयावर काम होते त्यांना मिळालेला परदेशप्रवासाची संधी समजता येते .

ब्रिजलाल आणि रामेश्वरी नेहरूंचा मुलगा ब्रजकुमार नेहरू जात्याच हुशार असला तरी सर्वसामान्य चाकरमान्यापेक्षा पोझिशन मधली प्रगतीवर नेहरू आडनावाचा प्रभावाची प्रथमदर्शनी जागा जाणवते अर्थात घराण्यातले असले तरी एकदा गव्हर्नरपदावरून इंदिरा गांधींचे ना ऐकण्याचाही म्हणजे पुरेशा स्वतंत्र प्रज्ञेचा मान महाशयाना जातो. ब्रज कुमार नेहरू प्रमाणेच नेहरूंचे अजून एका चुलत भाऊ रतन कुमार नेहरुंनाही पोझिशन मधली प्रगती वर नेहरू आडनावाचा प्रभावाची जागा प्रथमदर्शनी जाणवते .

उमा नेहरू त्यांच्या चुलत भाऊ शामलाला यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी श्याम कुमारी खान स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता नाही असे नाही . त्या उत्तरप्रदेशातून काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडून गेल्या आणि नंतर मृत्यू पर्यंत राज्यसभेवर होत्या . त्यांचे स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष काम होते. श्याम कुमारी खान यांचे पुत्र अरुण नेहरू यांना तिकीट देऊन निवडून आणणे मात्र प्रथमदर्शनी तरी नेपोटीझम म्हणजे घराणेशाहीचा प्रयोग दिसतो . पण या घराणेशाहीची क्रेडिट इंदिरा गांधींचे जाते .

नेहरुंच्या सर्वात लहान बहीण कृष्णा हाथीसिंग अचानक अमेरिकेत जाऊन व्हॉइस ऑफ आमेरिकासाठी काम करताना दिसतात , भारतीय स्वातंत्रया नंतरच्याच काळात तिबेट मध्ये आताच्या बांगलादेशातून हिंसक कारवायांसाठी बहुधा सीएआयए चा हस्तक्षेप चालू होता. हे भारताने -नेहरुंनी -डोळे झाक केल्या शिवाय सहज शक्य नसावे , शिवाय तत्कालीन तिबेट मधील आंदोलनातील हिंसकते बद्दल भारतात कधी बोलले जाताना दिसत नाही या अर्थी तिबेटात जो काही हस्तक्षेप चालू होता त्यास नेहरूंची मुक संमती होती का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि मग अचानक कृष्णा हाथीसिंग अचानक अमेरिकेत जाऊन व्हॉइस ऑफ आमेरिकासाठी काम करणे अधोरेखीत होते. कृष्णा हाथीसिँगांच्या पतींना मुंबई महापालिकेत निवडून आणण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवाराने हाणून पाडला असावा . कदाचित त्या नंतर कृष्णा हाथीसिंग आणि त्यांची पुढची जनरेशन मात्र अमेरिकेत स्थायिक झालेली दिसते .

(ज. नेहरु यांच्या पत्नी) कमला नेहरू यांच्या बाजूने नातेवाईक कैलाशनाथ कौल यांनी स्वतंत्र भारतात नेशनल बॉटनिकल रिसर्च संस्थेची लखनवला स्थापना १९४८ मध्ये करून चांगले काम केले तरी प्रगतीत आणि टिकून राहण्यात नेहरूंच्या नाते संबंधांचा फायदा झाला असणार, यांचे जरी सोडून दिले तरी , त्यांची पत्नी शीला कौल आणि मुलगी दीपा कौल यांना घराण्याचा उत्तरप्रदेशीय राजकारणात स्थान मिळण्यात फायदा झाला असावा असे दिसते.

इंग्रजी विकिपीडियावर शिवराजवती नेहरू असे एका नाव दिसते , नेहरू घराण्यातले नेमके नाते माहीत नाही पण लखनऊचे पहिले खासदारापद मिळालेले दिसते. हि तशी प्रसिद्धीच्या वलयातली मंडळी, प्रसिद्धीच्या वलया बाहेर असलेल्या किंवा सुस्प्ष्टपणे नेहरु गांधी आडनाव नसले तरी नाते संबंधात राहीलेल्या इतरांनी काही लाभ पदरात पाडून घेतले का हा अभ्यासाचा विषय असावा.

एवढे सारे छिद्रान्वेषण करण्याचा उद्देश्य काय ?, तर नेहरू घराणेशाही राबवण्यात सक्रीय सहभागी किंवा त्याबद्दल जाणीव पूर्वक डोळे मिटून घेत होते का ? हे का तपासावे लागते ? केवळ इंदिरा गांधी ना मंत्रिपद दिले आणि लाल बहादूर शास्त्री नंतर त्या पंतप्रधान झाल्या म्हणून नव्हे त्याही पूर्वी १९५९ मध्ये कोंग्रेस मध्ये अनेक दिग्गज नेते अजूनही शिल्लक असताना त्या सर्वाना बाजूस ठेऊन इंदिराजींना काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्याचा एक प्रकार झाला, तो आता काँग्रेसच्या ना बदलता येणाऱ्या इतिहासाचा -कमी चर्चीत पण त्यांच्या आणि नेहरु-इंदिरा गांधी परिवाराच्या राजकीय प्रगतीतील महत्वाचा - साशंकीत भाग आहे, याची बहुसंख्य जनतेस कल्पना नसते -जशी अलिकडे पर्यंत मलाही नव्हती. कारण काँग्रेसजन काही गोष्टी सोईस्करपणे उल्लेख करावयाचे टाळतात त्या पैकी ही एक बाब असावी.

वस्तुतः लोकशाही म्हणजे सामान्य जनतेचे राज्य. आणि नेमके हेच स्वप्न म. गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने सर्वसामान्य जनतेस दाखवून स्वातंत्र्य आंदोलनात ओढले तेव्हा दाखवलेले गाजर / आश्वासन / प्रॉमीस सर्वसामान्य जनतेच्या कल्याणार्थ , सर्वसामान्य जनतेच्या राज्याचे होते. पण नेहरु -इंदिरा गांधी परिवाराचा व्यवहाराची दिशा 'सर्वसामान्य जनतेच्या कल्याणार्थ ' चा क्लेम करताना सर्वसामान्य जनतेचे आमच्या परिवारा पुढे झुकलेले राज्य अशी नेहरुं पासूनच बदलत गेलेली दिसते.

तत्कालीन डेहराडूनचे खासदार महावीर त्यागी यांनी या बद्दल त्यांचा आक्षेप हिंदीतून पत्र लिहून नोंदवला .

He urges Nehru, in eloquent Hindi, to be wary of "charan chumbaks" or courtiers. "Just as in the days of the Mughals, ministers would play with the Nawab's children, today you are being worshipped, your worshippers have put up bholi-bhali Indu's name for the post of the Congress president. And perhaps you have accepted it without blinking an eye."

Please don't be under the misapprehension that this lining up of supporters for the proposal to put up Indu's name is entirely due to the force of her personality. It is being done hundred per cent to please you."

"You should stop the election of Indu as president of the Congress. Or you should give up the post of PM and through Indu strengthen the Congress organisation," he suggests. He adds the "Congress parliamentary party, which is suppressed due to your weighty presence to discuss any issue independently, will get energised by your going out".

अशी टीका करणारे महावीर त्यागी नेहरू आणि काँग्रेससाठी कुणी त्रयस्थ अथवा राजकीय विरोधक नव्हते, वस्तुतः मोतीलाल आणि जवाहरलाल या पिता पुत्रातील मतभेद दूर करण्यात त्यांनी मदत केली होती .

Tyagi sought also to inculcate independence in others : He was critical of the tendency among political workers obsequiously to touch their leaders' feet and lashed out also at some senior bureaucrats who, he observed, had started touching ministers' feet. (Touching of Leaders' Feet : Tyagi Deplores Tendency, The Tribune, Ambala, 26 June 1959) At the 1957 session of the All India Congress Committee (AICC), Tyagi suggested abandoning the practice of the Congress President nominating all the members of the Congress Working Committee. Though his suggestion that 10 out of the 21 Working Committee members ought to be elected was not accepted, Jawaharlal Nehru agreed with Tyagi that the same members ought not to be re-nominated year after year. (Economic Weekly, 7 September 1957) [Wikipedia contributors. (2018, March 30). Mahavir Tyagi. In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 07:29, May 26, 2018, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Mahavir_Tyagi&oldid=833173330 ]

या वरून काँग्रेस वर्किंग कमिटीचे १० सदस्य सुद्धा निवडणुकीतून घेण्यास नेहरू तयार नव्हते . तेव्हा इंदिराजींची काँग्रेस अध्यक्ष पदी १९५९ ची निवड किती लोकशाही पद्धतीची होती या बद्दल प्रश्नचिन्ह शक्य आहे का

महावीर त्यागिनी आक्षेप नोंदवणाऱ्या पत्राचा शेवट खालील प्रमाणे केलं

He ends by saying he has spent a sleepless fortnight for not having written this letter, and will sleep now. "May God bless you with long life. I for one cannot last long in this atmosphere."

तरीही ते इंदिरा गांधींनी काँग्रेसचे पहिले विभाजन घडवले तो पर्यंत ते काँग्रेस सोबत होते .

याला नेहरूंनी थातुर मातुर उत्तर देऊन दुर्लक्ष केले . धोब्याच्या आक्षेपांवरून नेहरूंनी पत्नीचा त्याग करावा अशी अपेक्षा महावीर त्यागी ठेवता नसावेत पण पदांच्या वाटपाचा प्रकार त्यांना खुपलेला दिसतो . आणि इथे महात्मा गांधींच्या स्वप्नातली व्यक्तिगत त्यागास तयार असलेल्या राम राज्याची कल्पना वस्तूत: लोप पावते . १९५९ मध्ये इंदिरा गांधींना अध्यक्षपद देणे याची सहसा नेपोटीझम शिवाय व्याख्या होऊ शकत नव्हती . ह्याला अपवाद म्हणता येते का ? नेहरूंचे इतर कुटुंब सदस्यही घराण्याच्या नावाचा लाभ घेताना पाहतो तेव्हा तो केवळ योगा योग म्हणून शिल्लक राहातो का ? आणि त्यानंतर अजून चार पिढ्यापुढे घराणे शाही चालू राहाते हा योग योग्य असतो का ?

नव्या काळातला नवा जावई , कायद्यात भले बसत असेल पण जमिनींच्या प्रकरणात इंटर्नल ट्रेडिंग म्हणावे अशा प्रकारांच्या जवळ दिसतो आणि त्या वर पांघरूण घातले जाते, तेथे अधिक बोलण्यासारखे -घराणेशाहीचे समर्थन करण्यासाराखे - काही शिल्लक ऊरते ? ( काँग्रेस समर्थकांनी विरोधकांचा भ्रष्टाचार दाखवू नये , एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही हे लक्षात ठेवावे)

आणि मग आम्ही असे एकाधिकारशाही आणि नेपोटीझम जोपासणाऱ्या एखाद्या घराण्याच्या पाचव्या पिढीपर्यंत येऊन थांबतो !

लोक निवडून देत आहेत म्हणून आम्ही आहोत ह्या वाक्यातली अर्ध-असत्य दृष्टीस सहज गोचर होत नसते. - तुम्ही पण राजलीय घराणेशाही जोपासा आम्ही पण राजकीय घराणेशाही जोपासतो, 'आपापसात हितसंबंध जोपासू , अवघी राबवू आधूनिक सरंजामशाही ' असा हा हिशेब असतो. जिथे राजकीय नेतृत्वाचा आधिकार प्राप्तीसाठी कक्तृत्वाची सर्वसामान्य नेतृत्वास संधी नाकारुन, जन्मच्या आधारावर मर्यादीत केली जाते. ह्याला जनतेचे राज्य म्हणतात ?

आपला पक्ष जर प्रगतीशील आहे आणि जनतेस घराण्याचीच गरज आई तर तो मान आंबेडकरांच्या वंशजाना का जाऊ नये ? - नाही मी त्यांच्याही राजकीय घराणेशाहीचा समर्थक नाही- वस्तूत: कोणत्याही वंशजांच्या पुर्वाजानी देशासाठी समाजा साठी काही त्याग केले असतील तर भविष्यात आपल्याच पिढ्या सत्तेत ठेवाव्यात या उद्देशाने नसावे आणि असे काही स्वार्थी उद्देश्य मागे राहिले असेल आणि मागच्या पिढ्यांच्या त्यागाचा मोबदला म्हणून पदे हवी असतील तर जसे -ब्रिटिश सरकार आधीच्या सरंजामदारांना रुसुम-तनखा म्हणून
ठराविक रक्कम देत असे,- दुसर्‍या बाजीरावास त्या काळात सालाना ८ लाख रुपये जन्मजात गादी न वापरण्याचे मिळत - तसे नेपोटीझम आणि हितसंबंध मागच्या दाराने जोपासण्यापेक्षा, समोरून काय पाचशे हजार कोटी हवे असतील ते घ्यावे आणि देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या संधी ठराविक घराण्यांपलीकडे सर्वसामान्य जनतेतून येणार्‍या सामान्य लोकांनाही समान स्वरूपात उपलब्ध करून द्याव्यात असे प्रांजळ पणे वाटते .

इथे केवळ अमुकच पक्षाच्या अमुकच घराण्यावर टीका का आहे असा प्रतिवाद कुणीही शोधू नये . मी सातत्याने अ ते ज्ञ पक्ष किंवा घराणी , घराणेशाहीस एकसारख्या नियमाने नाकारतो .

निवडणुका लढवताना जशी आर्थिक आणि इतर माहिती राजकीय उमेदवारांना द्यावी लागते तशी किती नातेवाईकांना मागे निवडून दिले गेले किती पदे दिली आणि सध्या कितीजणांना तिकीट दिले आहे या सगळ्याचा गोषवारा ‘घराणेशाही लोकशाहीस हितकारक नसते या ‘ घोषवाक्याचा ठळक उल्लेख सर्वत्र करून प्रकाशित करणे तसेच मतदान यंत्रावरही चिन्हा सोबत घराणेशाही उमेदवार असे नामांकन करणे आवश्यक करणे गरजेचे असावे . आणि एखादा कोड ऑफ कंडक्ट असावा. ( नाहीतर भ्रष्टाचाराच्याआरोपाखाली पाय उतार व्हावे लागणारा एखादा राजकीय नेता आपल्या पत्नीचे मुलांचे काही कतृत्व नसताना मुख्यमंत्रीपद वाटताना दिसतो - एक सुज्ञ सजग नागरीक म्हणून लोकशाहीची अशी लाजिरवाणी शोभा खरेच आपल्या मनाला पटते का ? आणि नेपोटीझमची -घराणेशाहीची अशी सर्व सुरवात भारताच्या पहिल्या पंतप्रधानापासून होताना पहाणे स्पृहणीय वाटते का ? स्वतंत्र भारतची राज्य घटना लिहिणार्‍या घटना सभेचे हेच आदर्श असते तर, राजकीय पुढार्‍यांच्या नातेवाईकांसाठी इंग्लंडा प्रमाणे उमरावसभेची योजना केली गेली नसती का ?)

पुढच्या भागातून लेखाच्या सुरवातीस म्हटल्या प्रमाणे डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुर्नवाचना करताना त्यात आलेलया विविध विषयां पूर्णमागोवा घेण्याचा मनोदय आहे .

काही संदर्भ

* http://archive.indianexpress.com/news/the-nehru-papers-when-an-mp-wrote-...

* https://daily.bhaskar.com/news/NAT-TOP-who-had-opposed-indira-gandhis-ap...

* Nehru–Gandhi family इंग्रजी विकिपीडिया लेख

* https://is.cuni.cz/webapps/zzp/download/140042468/?lang=cs राजकीय घराणेशाही बाबत एक शोध प्रबंध

इतिहासव्यक्तिचित्रणराजकारणमत

प्रतिक्रिया

शाली's picture

27 May 2018 - 7:32 am | शाली

लेख आवडला. सविस्तर प्रतिक्रिया सवडीने देईन.

माहितगार's picture

27 May 2018 - 9:20 am | माहितगार

प्रतिक्षा असेल.

सुहासवन's picture

27 May 2018 - 7:35 am | सुहासवन

लेखाची सुरूवात आणी शेवट हयात थोडी सरमिसळ झालीय का?

माहितगार's picture

27 May 2018 - 9:23 am | माहितगार

सरमिसळ नाही, लेखन एका बैठकीत न झाल्याने लेखन जरासे पुढे मागे झाले होते, ते आता जरासे पुर्नरचीत केले आहे. मन मोकळ्या प्रतिसादासाठी आभार.

मदनबाण's picture

27 May 2018 - 9:49 am | मदनबाण

दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया
म्हंटले कि मला मालिका आठवते... आणि त्याचे गाणे देखील ! राजकारण आणि अर्थशात्र म्हंटले या मालिके बरोबरच चाणाक्य या मालिकेचा देखील प्रभाव माझ्यावर अजुनही जाणवतो ! चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा आवाज आजही ऐकावा वाटतो आणि मालिकांचा "दर्जा" कसा असावा याचा बेंचमार्क या मालिका असाव्यात असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही !

अशीच अजुन एक मालिका उपनिषद गंगा आहे आणि तिचा ही प्रभाव माझ्यावर झालेला आहे.

बाकी घराणेशाही म्हंटली तर राजकारण आणि बॉलिवूड मध्ये ती पाय रोवुन उभी असलेली आपल्याला स्पष्ट दिसते ! या दोन्हींमध्ये दांभिकता देखील तितकीच उठुन दिसते.

इतर येणारे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

माहितगार's picture

27 May 2018 - 10:25 am | माहितगार

...बाकी घराणेशाही म्हंटली तर राजकारण आणि बॉलिवूड मध्ये ती पाय रोवुन उभी असलेली आपल्याला स्पष्ट दिसते ! या दोन्हींमध्ये दांभिकता देखील तितकीच उठुन दिसते.

खासगी क्षेत्रात ही समान संधीचे महत्व असते पण मालकाने मुलाला दिलेली संधी तेवढी खुपत नाही कारण जे काही नफा नुकसान आहे ती व्यावसायिकाची एका अर्थाने निजी बाब असते.

राजकारणातली घराणेशाही अधिक खुपते कारण - सर्वसामान्य जनतेच्या नेतृत्वाच्या संधी आणि स्वप्ने हिरावली जाण्याचा इथे धोका मोठा
असतो- राजकारणातली घराणेशाही लागे-बांधे आणि हितसंबंधांच्या संरक्षणावर जगावयास लागलेली असते. असे वाटते.

माहितगार's picture

27 May 2018 - 10:36 am | माहितगार

दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया दुरचित्रवाणि मालिकेचे सर्व भाग कोणत्या दुव्यावर बघण्यास उपलब्ध असल्यास दुवा अवश्य द्यावा. (मी स्वतः काही भाग पाहीले आहेत.) काय आहे ईंदिरा गांधी घराणे सत्ते पासून दूर जाईल तेव्हाच त्यांना आपण नेहरु तत्वज्ञानाला आणि काँग्रेसच्या मूळात अभिप्रेत वैचारीक बैठकीला आपण घराणेशाही आणि नेहरुंच्या पुस्तकांवरच्या कॉपीराईट मध्ये बांधून संपवले आहे हे लक्षात येईल, तो पर्यंत नाही असे वाटते. महत्व म. गांधी आणि नेहरुंच्या कालसुसंगत तेवढ्या विचारांना असावयास हवे घराण्यास नाही पण नेमके उलटे घडणे ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे.

एक वेळ परंपरावाद्यांनी सरंजामदार आणि उमरावांची बाजू घेतली असती तर समजण्यासारखे होते पण इथे नेमके उलटे घडताना दिसते आहे, परंपरावादी स्वतः ला सरंजामशाही पासून दूर नेण्याचे किमान काही प्रयत्न करताना दिसताहेत तर ज्यांनी सरंजामशाही विरोधी असावयास हवे त्यांचेच पाय कर्णाच्या रथाच्या चक्रासारखे घराणेशाहीत घट्ट रोवले जाताना दिसताहेत याचा शेवट काय असेल हे ओळखण्यास भविष्यवेत्त्याची आवश्यकता नसावी

माहितगार's picture

27 May 2018 - 10:40 am | माहितगार

२००६ नंतर ज्ञानकोशीय कामात व्यस्त होण्याने टिव्ही पहाणे कमी झाले त्याच काळात हि उपनिषद गंगा हि सिरीयल येऊन गेली असावी . मला कल्पना असती तर नक्किच बघितली असती आणि स्वड झाल्यास युट्ञूबवर नक्कीच बघेन.

मदनबाण's picture

27 May 2018 - 4:52 pm | मदनबाण

दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया दुरचित्रवाणि मालिकेचे सर्व भाग कोणत्या दुव्यावर बघण्यास उपलब्ध असल्यास दुवा अवश्य द्यावा.
https://www.youtube.com/user/PublicResourceOrg/videos
किंवा इथुन सर्व भाग पाहता येतील. :- https://www.youtube.com/watch?v=lwbo5xjBD90&list=PL-k_liNMvNQAT5G52uCfWF...

प्रजेचे सुख तेच राजाचे सुख हे ज्या देशातील राज्यकर्त्यांना समजते आणि त्या दॄष्टीने जिथे पाउले उचलली जातात तिथे खर्‍या अर्थाने ज्ञान, व्यापार,कला यांचे स्थान प्रबळ होतेआणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुखी आणि संपंन्न होते. आपल्या देशातील राजकारणी नेमकी हेच गोष्ट करण्याची टाळत आले आहेत आणि स्वतःची आणि स्वसंबंधीतांचे हित सांभाळत आले आहेत. प्रत्येक गोष्टीत "राजकारण" करण्याच्या प्रवॄत्तीमुळेच देशाची अवस्था आज अशी आहे.या राजकारण्यांच्या राष्ट्र / राज्य यांच्या प्रति असलेल्या कर्त्व्याचे मोजमापन करणारी कुठलीच व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. स्वतःचाच पगार स्वतःच वाढवुन घेण्याच्या "माजावर" ही पोहचली आहेत तर इतर सोयी सुविधांचा अपहार किती होत असावा याची कल्पना न केलेलीच बरी !
असो...
२००६ नंतर ज्ञानकोशीय कामात व्यस्त होण्याने टिव्ही पहाणे कमी झाले त्याच काळात हि अपनिषद गंगा हि सिरीयल येऊन गेली असावी . मला कल्पना असती तर नक्किच बघितली असती आणि स्वड झाल्यास युट्ञूबवर नक्कीच बघेन.
मी स्वतः सगळे भाग पाहिलेले नाहीत पण जशी सवड मिळेल तसे भाग पाहत असतो... राजकारण आणि चाण्यक्य यांचा आधी वर उल्लेख केल्यामुळेच खाली एक भाग देतो... सगळे भाग एकाच चॅनलखाली मला अजुन दिसले नाहीत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

महाभारतातही कर्ण,अर्जुन ज्या देवांचे अवतार आहेत ते रदबदली/याचना करायला येतात आपापल्या मुलांसाठी (!)

नेहरुंवर ( अथवा इतर शक्तिमान नेते) टीका करायची झाली तर अमचे तेवढे वाचन नाही. हे सर्व नेते त्यांची धोरणे रेटत असतात आणि अशां लोकांने चमचे होऊन बय्राच गोष्टी मिळवणाय्रा लोकांचे कोंडाळे अवतीभवती असते.

खरं म्हणजे देशातल्या जनतेचा पैसा वापरून उठसूठ सर्व मुख्य पुल,विमानतळ,रस्ते,बंदरे यांना यांच्या घराण्यातील लोकांनी नावे देण्याचा सपाटा लावलेला दिसतो. मी पंतप्रधान झालो तर प्रथम ही सर्व नावेच काढून टाकेन.

माहितगार's picture

27 May 2018 - 11:21 am | माहितगार

महाभारतातही कर्ण,अर्जुन ज्या देवांचे अवतार आहेत ते रदबदली/याचना करायला येतात आपापल्या मुलांसाठी (!)

:)) जुनी खोड आहे तर , भारतीय राजकर्त्यांची ! आताचे राजकारणी त्यागी रामराज्याचे नाव घेऊन, प्रत्यक्षात महाभारतीय परंपरा जपतात असे म्हणणे वावगे नसावे, नेहरुंनी त्यांच्या भारताच्या डिस्कव्हरीतून सोडलेला प्वाईंट आपण बरोबरच पकडलात. घराणेशाहीवर बोट ठेवण्यासाठी अजून या पेक्षा अधिक काय वाचन हवे .

तुमचे मनापासून कौतुक . खरे तर भारत वर्षामध्ये घराणे शाही पूर्वापासून आहे. रामाचा वंश कुठून सुरु झाला आणि तो कुठ पर्यंत होता याची एक १०० पिढ्यांची यादी काही दिवसापूर्वी वाचनात आली . या ईश्वाकू वंशात अतिशय पराक्रमी राजे झाले. जैन धर्मातील निमी नावाचे तीर्थांकर याच वंशाचे. तसेच गुप्त वंशात हि झाले. हे जेव्हा राज्य करत होते तेव्हाच्या काळास सुवर्णकाळ असे म्हणत . चंद्रगुप्त ... समुद्रगुप्त ,विष्णू गुप्त वगैरे . या राज घराण्यात सुद्धा नालायक राजे होते. पण आपल्या ऋषी मुनींची अशी धारणा होती कि अश्या राज घराण्यात काही गुण हे वंश परंपरा येतात आणि राज्य करण्यासाठी जे आवश्यक गुण असतात ते अश्या घराण्यातील मुलात उपजत असतात आणि योग्य म्हणजे राजा किवा राज्यकर्ते होण्यास जे शिक्षण आवश्यक असते ते देऊन या गुणांचा उत्कर्ष करता येतो . भारताच्या मानसिकतेत हे इतके बिंबले आहे कि लोकशाहीत सुद्धा आता शहराशहरात असे राजे निर्माण होत आहेत. तर मुद्दा हा कि घराणेशाही हि इतक्या सहजासहजी अजिबात जाणार नाही . कपूर घराण्यातील मुले त्यांच्या अंगभूत गुणामुळे आणि योग्य संधी मिळाल्यामुळे पुढे आली. ज्यांच्यात हे गुण नव्हते ते आपोआप मागे पडले. शशी कपूर च्या पुढच्या पिढीचे फारसे नाव झाले नाही जेवढे राज कपूरच्या पुढच्या पिढीचे झाले.
मला वाटते कि लोकशाहीत फक्त निवडून आले म्हणून त्यांची योग्यता न पाहता आपला देश चालवायला देणे या सारखा दुसरा मूर्ख पणा नाही ,म्हणून या घराणेशाही मुळे देश चालवायला योग्य असे काही नेते आपल्याला मिळालेत का ? लोकशाहीमुळे तरी मिळालेत का ? याचा खरा शोध घ्यावा. मला वाटते कि लोकशाही काय किवा राजेशाही काय या पद्धती मुळे देशाचा उत्कर्ष होतोय का हा खरा प्रश्न आहे. तसे नसेल तर त्या दोन्ही पध्दतीत काही आमुलाग्र बदल घडवायला हवा.
बाकी आपल्या सारख्या देशात जिथे बहुतांश लोक हे जाती कडे पाहून मते देतात किवा काही रूपयासाठी आपले मत विकतात किवा मत देतच नाहीत अश्या देशात लोकशाही कितपत योग्य आहे या बद्दल माझ्या मनात शंका आहे. . माझे असे मत आहे कि आपल्या देशात लोकशाही फक्त नावाला आहे ...इथे घराणेशाहीच वेगळे नाव घेऊन वावरते आहे.
आपल्या या विचारमंथनातून कृती करण्यास योग्य मुद्दे बाहेर येतील या बद्दल माझ्या मनात शंका नाही . आपल्या पुढील लेखनाला खूप शुभेच्छा. प्रतीक्षेत आहे.

विजुभाऊ's picture

28 May 2018 - 12:49 pm | विजुभाऊ

या ईश्वाकू वंशात अतिशय पराक्रमी राजे झाले.

हे वाक्य " कपूर" घराण्यात अनेक नामवंत अभिनेते झाले. असेही वाचता येईल
खरेतर ते पराक्रमी असतील पण केवळ राजघराण्यात जन्माला आले म्हणून त्याना पराक्रम गाजवण्यासाठीचे शिक्षण आणि संधी मिळाली.
सिनेमात ही संधी घराण्यामुळे आणि त्या वातावरणात राहिल्यामुळे मिळते.
सिनेमात ज्याला सिनेमाचे कसलेच वलय नाही त्याला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळणे हेच जवळजवळ अशक्यप्राय असते.

कपिलमुनी's picture

27 May 2018 - 12:12 pm | कपिलमुनी

सध्या सगळ्या पक्षात घराणेशाही आहे.
पूर्वी जनता घराणेशाही सहज स्वीकारत असे.
आता मात्र तशी परिस्थिती राहीलि नाही.

लोक जोवर घराणेशाहीने झालेल नेत्याला मत देत राहतील तोवर हे चालू राहणार .
आपल्याकडे आई वडिलांनी पोराचा भले करायचा असते ही कॉमन समजूत आहे. प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.

माहितगार's picture

27 May 2018 - 2:21 pm | माहितगार

...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.

नक्कीच चांगला एक्सक्युज आहे :) पण मग असे राकारणात करण्यास सरंजामशाही किंवा राजेशाहीच म्हणावे, लोकशाही जनतेचे राज्य म्हणण्याचे ढोंग रचून जनतेची फसवणूक करु नये. अश्या पद्धतीचे समर्थन एकवेळ व्यवसायाधारीत जन्माधारीत जातीयतेचे समर्थन करणर्‍यांनी केले तर समजण्यासारखे आहे. मी / आम्ही क्षत्रीय परीवारातील आहोत आणि आमचीच मुले राज्यकर्ती राहतील कारण ती जन्माने क्षत्रीय आहेत हेच वाक्य मी / आम्ही राजकीय परीवारातील आहोत आणि आमचीच मुले राज्यकर्ती राहतील कारण आम्ही जन्माने राजकीय परिवारातील आहोत . पण असे समर्थन तथाकथीत पुरोगामी प्रगतीशील लोकशाहीवादी करत असतील तर तो विरोधाभास ठरणार नाही का ?

माहितगार's picture

27 May 2018 - 3:40 pm | माहितगार

...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.

सकाळाचे मंगल हे लोकशाहीचे उद्दिष्ट असेल तर याचे परीक्षण ज्ञानदेवांच्या पसायदाना सोबत करणे वावगे नसावे . पसायदानाच्या अनुषंगाने र काही मुद्दे अधोरेखित करता येतात का ते पाहूया . ज्ञानदेव जो जे वांछील तो ते लाहो , स्व धर्म सूर्ये पाहो म्हणतात खरे पण त्या आधी खळांची व्यंकटी सांडलेली असण्याचा आग्रह धरतात . आणि जन्माधारित जातीयवाद जुना असो वा नवा ती खल प्रवृत्ती नव्हे काय ? चंद्र लांच्छनहीन असावा अशी अपेक्षा करतात पण इतरांच्या समान संधी डावलून केवळ स्वतः:साचा मुले आणि स्वतः:चेच कुटुंबीय पुढे करणे लांछनीय नाही का ?

केवळ आपलेच अपत्य आणि आप्त यांचे मंगल = सकाळाचे मंगल असा अर्थ काढणे विपर्यस्त ठरत नाही का ?

लोक जोवर घराणेशाहीने झालेल नेत्याला मत देत राहतील तोवर हे चालू राहणार .

लोक परकीय सत्तेस ‘जु’मानत होते तो पर्यंतच परकीय सत्ता होती , पण नेहरूंनीच अन्याय कारक ‘ जु ‘ ना मानण्याचे आवाहनास जनतेने प्रतिसाद दिला . देश इथे प्रत्येकाचा आहे कि काही मोजक्या राज परिवारांचे राखीव कुरण आहे ? एक सुज्ञ सजग नागरीक म्हणून लोकशाहीची थट्टा ना स्विकारता प्रत्येक सुज्ञ सजग नागरीकाने घराणेशाहीस नकार दिला तर घराणे शाहीचा ‘ जु ‘ सहज झुगारता येऊ शकेल. स्वतः:च्या अधिकारासाठी हातात गीता घेऊन प्रयत्न करण्याचे महात्मा गांधी आवाहन करत होते तेव्हा भारतात केवळ १२ टक्के लोक साक्षर होते पण त्यांच्यासाठी त्यांचे राज्य असेल या अपेक्षेने आजच्याच जनतेच्या मागच्या शतकातील पूर्वज स्वातंत्र्य आंदोलनात उतरले . त्यांच्या त्यागाने नव्या पिढ्यानी साक्षरता शिक्षण घेतले तरी घराणेशाहीचे ‘जू आपापापल्या मानेवरून फेकण्याचे धारिष्ट्य होता नाही ! “...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.” या आणि अशा अनेक एक्स्क्यूजेसना स्वीकारून माना खाली घालून दशको न दशके आपण सर्व पुढे जात आहोत ? वाढलेल्या साक्षरता शिक्षण आणि जागरूकतेने घराणेशाहीचा आजार नाकारण्याचा विवेक अद्याप का तयार होत नाही ? हा अनाकलनीय प्रश्न का असावा ?

तिमा's picture

27 May 2018 - 3:30 pm | तिमा

काही वर्षांपूर्वी मी एका ओळखीच्या पत्रकाराशी , भारतीय राजकारणातली घराणेशाही, यावर चर्चा केली होती. त्याच्याकडून जी , मला कल्पना नसलेली माहिती समोर आली, ती लिहितो. ती बरोबर आहे का नाही, हे वाचकांनी ठरवावे.
राजकारणातल्या घराणेशाहीला मूळ कारण आहे भ्रष्टाचाराचे. एखाद्या नेत्याने त्याच्या हयातीत, स्वतःसाठी आणि पक्षाच्या नांवाने, अमाप पैसा कमावलेला असतो. तो मेल्यावर, किंवा काही कारणाने पदावरुन बाजूला झाल्याने, पक्षाला त्या पैशाची गरज असते. म्हणून पक्षही, त्यांच्या सोईसाठी त्याच्या वारसाला गादीवर बसवतो. शिवाय, तो मेल्यानंतर जो इमोशनल गेन असतो, त्याचाही निवडणुकीत फायदा उठवायचा असतोच. भारतीय जनतेचीही मानसिकता, घराणेशाहीला अनुकूल असल्याने, हा लोकशाहीवरचा अत्याचार आहे, हे त्यांना कळतच नाही. ज्यांना कळते, ते मूठभर असतात.
एखाद्या परिवाराची अशी सत्ता, अनेक पिढ्या चाललेली असेल, तर आत्ताच्या पिढीपर्यंत, त्यांचे 'संचित पुण्य' फारच वाढलेले असते. त्यामुळे अशा 'पुण्यवान' परिवाराला विरोध करुन, पायावर धोडा पाडून घेण्यापेक्षा, त्याची हांजी हांजी करुन, सत्तेत रहाण्यातच शहाणपणा असतो. अशामुळे, त्या परिवाराला पक्षांत विरोधच होत नाही.

माहितगार's picture

27 May 2018 - 4:24 pm | माहितगार

राजकारणातल्या घराणेशाहीला मूळ कारण आहे भ्रष्टाचाराचे. एखाद्या नेत्याने त्याच्या हयातीत, स्वतःसाठी आणि पक्षाच्या नांवाने, अमाप पैसा कमावलेला असतो. तो मेल्यावर, किंवा काही कारणाने पदावरुन बाजूला झाल्याने, पक्षाला त्या पैशाची गरज असते. म्हणून पक्षही, त्यांच्या सोईसाठी त्याच्या वारसाला गादीवर बसवतो. शिवाय, तो मेल्यानंतर जो इमोशनल गेन असतो, त्याचाही निवडणुकीत फायदा उठवायचा असतोच.

जवळपास असेच आहे, त्यांनी स्वतः:- खरे म्हणजे सर्वसामान्य जनतेस हे दिसत असते , सगळा खेळ त्यांच्या समोर त्यांच्या नावाने चाललेला असतो - सांगण्यासारखे बरेच किस्से आहेत , पण जी माय बाप घराणे शाहीस जनता घराणे शाहीस मते देते त्यांचे समर्थन काते त्यांनी स्वतः अशी माहिती शेअर केल्यास माहितीस वस्तुनिष्ठता येऊ शकते - जोडीला एवढेच कि घरातली माणसेच असली कि भ्रष्टाचार दबलेला राहातो अथवा दाबणे सोपे राहाते . दुसऱ्र्या बाजूला जात बिरादरी आधारित उपकृतांची संस्कृती जोपासली जाते . खरेतर ‘आशा आणि उपकार यांचे गणित जुळणारे नसते ‘ पण मानवी आशा मोठी चिवट असते . सायबांनी दिलाय ना चिटकवून मग पगार होईल सरकार सबसिड्या वाटेल तेव्हा . जनतेचा हिशेब म्हणजे पगार / लाभ पदरात पडला तर सायबामुळे, , सत्तेत असून विलंब लागला तर विरोधकांमुळे , आणि सत्तेत नसले आणि आश्वासने पदरी पडली नाय तर सरकार दोषी . कायच लाभ झाला नाही तरी known devil is better than unknown saint या न्यायाने समर्थन मिळत राहाते . इमिडेट उपकृत करणारे स्थानिक नेते असतात , ग्रामीण भागातले लग्न समारंभ बघा लग्नाच्या नवरामुलामुली ऐवजीवरचे हे ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगरसेवक मंडळीच सत्कार मूर्ती असतात . या स्थानिक पुढाऱ्यांना त्यांच्या वरचे उपकृत करून ठेवतात . सगळा प्रकार तसा आयजीच्या जीवावर बायजी ची स्वप्ने उधार असा असतो. आयजीच्या जीवावर बायजी उद्धाराचे रहाटगाडे साखळीने घराणेशाहीस जनतेचा पैसा बसल्या बसल्या ओतता राहाते . जनतेस हे कळेल आणि घराणेशाही नाकारणे चालू करेल तो त्यांच्यासाठी सुदीन

अवांतर, घराणेशही म्हटली तर ती अमेरिकेत पण चुकलेली नाही -
१. थोरल्या बुश नंतर काही दिवसांनी धाकले बुश अध्यक्ष झाले.
२. बिल भौंनंतर हिलरीताई निवडणूक लढवत आहेतच. यावेळेस काय असेल ते माहीत नाही, पण २०१६ ला त्या प्रायमरी जिंकल्य होत्याच ना!