लघुकथा- परी

Primary tabs

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
23 Sep 2019 - 11:22 pm

------------------------
लघुकथा- परी
-----------------------
त्या चिमुरड्याने शेजारी नवीन रहायला आलेल्या चिमुरडीला घरी बोलावलं . खेळायला .
पोरगी भलतीच गोड होती. एखादी परी ? …
त्याच्या घरात काचेच्या हंडीमध्ये मासे होते. रंगीबेरंगी ,चमकणारे, गप्पी मासे. तिला गम्मत वाटली .
गालावर हात ठेऊन ती आश्चर्याने म्ह्णाली ,” अय्या !फिश!”
मग तिने मोजायची सुरुवात केली.” एक दोन तीन चाल .ए, चाल माशे आहेत .”
“नाही गं ! पाच माशे आहेत.”
“नाही ले, चालच आहेत.”
“तुला माइती का मला माइती? माजे माशे आहेत ! तू मोजायला चुकतीये.”
त्यावरून दोघे भांडले .ती परी गेली घरी.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला .सवयीप्रमाणे माशांकडे गेला .हंडीत चार मासे मजेत फिरत होते. पाचवा- तळाशी पांढरं पोट वर करून निपचित पडला होता.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

24 Sep 2019 - 7:36 am | आनन्दा

हायला!

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2019 - 8:32 am | ज्योति अळवणी

नक्की परी न?

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2019 - 8:32 am | ज्योति अळवणी

नक्की परी न?

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 8:37 am | जॉनविक्क

वकील साहेब's picture

24 Sep 2019 - 11:11 am | वकील साहेब

परीच्या निरागस नजरेने तरंगणारे तेव्हडेच मासे मोजलेत. आणि एक गट्टी होता होता राहिली.
छान.
बाकी बिपिनराव बालकथा छान लिहितात तुम्ही. या अगोदरच्या हि सर्व कथा छानच होत्या.
त्यात पहिला प्रवास आणि काळा वाघ या माझ्या मुलीला विशेष आवडलेल्या कथा.

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Sep 2019 - 8:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचक मंडळींचे आभार

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 9:04 pm | जॉनविक्क

मिपावर या प्रकाराला श श क म्हNतात. अट एकच 100 शब्दात कथा संपवायची :)

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Sep 2019 - 9:02 pm | बिपीन सुरेश सांगळे

वकील साहेब
नमस्कार आणि धन्यवाद

मी हि मुलांची कथा पण मोठ्यांसाठी लिहिलेली आहे .
याचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेळ्या प्रकारे लावला आहे .
वाचकांचे हे स्वातंत्र्य मी मान्य करतो

मी लिहिलेल्या इतर मोठ्यांच्या कथा वाचल्या आहेत का ?

"त्यात पहिला प्रवास आणि काळा वाघ या माझ्या मुलीला विशेष आवडलेल्या कथा."-
बरं वाटलं वाचून

पुन्हा एकदा आभार
कळावे

विजुभाऊ's picture

26 Sep 2019 - 1:25 pm | विजुभाऊ

मिपावर काळी मावशी आणि चोर नावाची एक कथा आहे
लिंक सापडली की देतो इथे. ती पण वाचा एकदा

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Sep 2019 - 9:09 pm | बिपीन सुरेश सांगळे

जॉन
आभार

ही अगदी मोजून शशक आहे

पण

समजा शत शब्दापेक्षा जास्त असेल तर लघु कथा म्हणायला हरकत नसावी
कळावे
धन्यवाद

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 9:36 pm | जॉनविक्क

मी हि मुलांची कथा पण मोठ्यांसाठी लिहिलेली आहे .
याचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेळ्या प्रकारे लावला आहे .
वाचकांचे हे स्वातंत्र्य मी मान्य करतो

हम्म. आपणही मुले काय करतात एकमेकांशी एखाद्या घटनेबाबत कशी वागतात हे बघता बघता त्याचे मोठ्यांच्या अनुशँगाने अन्वयार्थ लावून योग्य आयोग्याची समज मुलांना देत असतो. त्यामुळे नाण्याला नेहमी दोन बाजू असतातच हेच अधोरेखित होते.