✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लघुकथा- परी

ब
बिपीन सुरेश सांगळे यांनी
Mon, 09/23/2019 - 23:22  ·  लेख
लेख
------------------------ लघुकथा- परी ----------------------- त्या चिमुरड्याने शेजारी नवीन रहायला आलेल्या चिमुरडीला घरी बोलावलं . खेळायला . पोरगी भलतीच गोड होती. एखादी परी ? … त्याच्या घरात काचेच्या हंडीमध्ये मासे होते. रंगीबेरंगी ,चमकणारे, गप्पी मासे. तिला गम्मत वाटली . गालावर हात ठेऊन ती आश्चर्याने म्ह्णाली ,” अय्या !फिश!” मग तिने मोजायची सुरुवात केली.” एक दोन तीन चाल .ए, चाल माशे आहेत .” “नाही गं ! पाच माशे आहेत.” “नाही ले, चालच आहेत.” “तुला माइती का मला माइती? माजे माशे आहेत ! तू मोजायला चुकतीये.” त्यावरून दोघे भांडले .ती परी गेली घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला .सवयीप्रमाणे माशांकडे गेला .हंडीत चार मासे मजेत फिरत होते. पाचवा- तळाशी पांढरं पोट वर करून निपचित पडला होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
5158 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

हायला!

आनन्दा
Tue, 09/24/2019 - 07:36 नवीन
हायला!
  • Log in or register to post comments

नक्की परी न?

ज्योति अळवणी
Tue, 09/24/2019 - 08:32 नवीन
नक्की परी न?
  • Log in or register to post comments

नक्की परी न?

ज्योति अळवणी
Tue, 09/24/2019 - 08:32 नवीन
नक्की परी न?
  • Log in or register to post comments

म्हणजे मासे पाचच होते की

जॉनविक्क
Tue, 09/24/2019 - 08:37 नवीन
  • Log in or register to post comments

.

वकील साहेब
Tue, 09/24/2019 - 11:11 नवीन
परीच्या निरागस नजरेने तरंगणारे तेव्हडेच मासे मोजलेत. आणि एक गट्टी होता होता राहिली. छान. बाकी बिपिनराव बालकथा छान लिहितात तुम्ही. या अगोदरच्या हि सर्व कथा छानच होत्या. त्यात पहिला प्रवास आणि काळा वाघ या माझ्या मुलीला विशेष आवडलेल्या कथा.
  • Log in or register to post comments

वाचक मंडळींचे आभार

बिपीन सुरेश सांगळे
Tue, 09/24/2019 - 20:56 नवीन
वाचक मंडळींचे आभार
  • Log in or register to post comments

लघुकथा न्हवे शतशब्द कथा

जॉनविक्क
Tue, 09/24/2019 - 21:04 नवीन
मिपावर या प्रकाराला श श क म्हNतात. अट एकच 100 शब्दात कथा संपवायची :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपीन सुरेश सांगळे

वकील साहेब

बिपीन सुरेश सांगळे
Tue, 09/24/2019 - 21:02 नवीन
वकील साहेब नमस्कार आणि धन्यवाद मी हि मुलांची कथा पण मोठ्यांसाठी लिहिलेली आहे . याचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेळ्या प्रकारे लावला आहे . वाचकांचे हे स्वातंत्र्य मी मान्य करतो मी लिहिलेल्या इतर मोठ्यांच्या कथा वाचल्या आहेत का ? "त्यात पहिला प्रवास आणि काळा वाघ या माझ्या मुलीला विशेष आवडलेल्या कथा."- बरं वाटलं वाचून पुन्हा एकदा आभार कळावे
  • Log in or register to post comments

मिपावर काळी मावशी आणि चोर

विजुभाऊ
गुरुवार, 09/26/2019 - 13:25 नवीन
मिपावर काळी मावशी आणि चोर नावाची एक कथा आहे लिंक सापडली की देतो इथे. ती पण वाचा एकदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपीन सुरेश सांगळे

जॉन

बिपीन सुरेश सांगळे
Tue, 09/24/2019 - 21:09 नवीन
जॉन आभार ही अगदी मोजून शशक आहे पण समजा शत शब्दापेक्षा जास्त असेल तर लघु कथा म्हणायला हरकत नसावी कळावे धन्यवाद
  • Log in or register to post comments

मी हि मुलांची कथा पण

जॉनविक्क
Tue, 09/24/2019 - 21:36 नवीन
मी हि मुलांची कथा पण मोठ्यांसाठी लिहिलेली आहे . याचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेळ्या प्रकारे लावला आहे . वाचकांचे हे स्वातंत्र्य मी मान्य करतो
हम्म. आपणही मुले काय करतात एकमेकांशी एखाद्या घटनेबाबत कशी वागतात हे बघता बघता त्याचे मोठ्यांच्या अनुशँगाने अन्वयार्थ लावून योग्य आयोग्याची समज मुलांना देत असतो. त्यामुळे नाण्याला नेहमी दोन बाजू असतातच हेच अधोरेखित होते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा