Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रेयासन्जय on गुरुवार, 07/04/2019 - 10:06
पृथ्वी उवाच.... तलखी ने कासावीस हा जीव, दाह घेई सर्वांगाचा ठाव, उदरात घुसमटे बीजांचा जीव, निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव. आक्रमू दे आकाश हे जलदांनी, येऊ दे रे आभाळ हे भरूनी, लखलखत्या विद्युल्लतानी, रणसंगर होऊ दे ह्या गगनी. घननीळ बरसता बेधुंद, मेदिनीस कस्तुरी सुगंध, जीवनामृत शोषितील ही रंध्र, भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध डोळ्यात आणोनि प्राण, विनविती माझे पंचप्राण, मेघराजा तुजला माझी आण, दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण. © श्रेया राजवाडे, जुन 2019

Submitted by श्वेता२४ on गुरुवार, 07/04/2019 - 11:18

Permalink

वा!

आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 07/04/2019 - 12:11

Permalink

छान आहे.

छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/04/2019 - 12:24

Permalink

सुंदर

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 07/04/2019 - 18:24

Permalink

उत्तम

अर्थवाही पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 07/05/2019 - 00:15

Permalink

मला वाटलं...

पृथ्वी शॉ उगाच काहीतरी बोलतोय पण ये तो कविताच निकली. ;) असो, चांगला प्रयत्न. पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by इरामयी on Sun, 07/07/2019 - 12:28

Permalink

छान आहे. तलखी - खासच!

छान आहे. तलखी - खासच!
  • Log in or register to post comments

Submitted by अधाशी on Tue, 07/09/2019 - 18:48

Permalink

फारच छान कविता आहे. कशी सुचते

फारच छान कविता आहे. कशी सुचते तुम्हाला काय माहित. दैवी देणगीच आहे ही..
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 07/09/2019 - 19:01

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Wed, 07/10/2019 - 01:57

Permalink

एक एक ओळ म्हणजे दागिना आहे

एक एक ओळ म्हणजे दागिना आहे नुसता दागिना.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4639 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com