Skip to main content

पृथ्वी उवाच

लेखक श्रेयासन्जय यांनी गुरुवार, 04/07/2019 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वी उवाच.... तलखी ने कासावीस हा जीव, दाह घेई सर्वांगाचा ठाव, उदरात घुसमटे बीजांचा जीव, निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव. आक्रमू दे आकाश हे जलदांनी, येऊ दे रे आभाळ हे भरूनी, लखलखत्या विद्युल्लतानी, रणसंगर होऊ दे ह्या गगनी. घननीळ बरसता बेधुंद, मेदिनीस कस्तुरी सुगंध, जीवनामृत शोषितील ही रंध्र, भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध डोळ्यात आणोनि प्राण, विनविती माझे पंचप्राण, मेघराजा तुजला माझी आण, दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण. © श्रेया राजवाडे, जुन 2019
लेखनविषय:

वाचने 4657
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आवडली कविता.

अर्थवाही पुलेशु

पृथ्वी शॉ उगाच काहीतरी बोलतोय पण ये तो कविताच निकली. ;) असो, चांगला प्रयत्न. पुलेशु! Sandy