मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;)
होता खमंग, होता चकणाहि खास बाकी
सारेच टुन्न होती पण आसपास बाकी
जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी
मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही
हातात फक्त काजू करणे खलास बाकी!
फुटलेत पेग सारे अन् फोडलेत काही
उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी
धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा
अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी
ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा
सांगू तिला कसे मी? करणे कयास बाकी
अद्याप दूर आहे घरचीच वाट माझ्या
अद्याप मारतो हा तोंडास 'वास' बाकी
म्हणुनीच बांधली का 'देशी दुकान धारा'
पिउनी विलायती ही होणेच लास बाकी
आहेच नाव खोटे, मेल्या तरी तुझेही
'रंगा' तुझाच आहे अज्ञातवास बाकी
चतुरंग
प्रतिक्रिया
4 Nov 2008 - 11:31 pm | आजानुकर्ण
हा हा. मस्त.
आपला
(बेवडा) आजानुकर्ण
4 Nov 2008 - 11:33 pm | सर्वसाक्षी
चतुरंगमहाशय,
आज फारा दिवसांनी कडक माल मिळाला! धन्यवाद.
एकुण काव्यातली (विडंबनातली) दारुबंदी उठलेली दिसते:)
झकास!
5 Nov 2008 - 12:37 am | प्राजु
जबरदस्त..
बरेच दिवसांनी फुल टॉस मिळालेला दिसतो आहे.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Nov 2008 - 12:48 am | विसोबा खेचर
फुटलेत पेग सारे अन् फोडलेत काही
उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी
वा रंगाभैय्या, क्या केहेने...! :)
आपला,
(मॅक्डोवेल नंबर वन किंवा रॉयलस्टॅगच्या चपटीचा प्रेमी!) तात्या.
5 Nov 2008 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मजा आली वाचायला!
(रक्तवर्णवारूणीप्रेमी) अदिती
5 Nov 2008 - 2:02 pm | बिपिन कार्यकर्ते
श्रीमान रंग्या नवटाककर यांची ही कविता अतिशय वास्तवदर्शी आहे. खास करुन या ओळी.
बिपिन कार्यकर्ते
5 Nov 2008 - 3:13 pm | घाशीराम कोतवाल १.२
टुन्न्न झालो मी आता नाही उरलि
काहि बाकि
दारु चिज है खराब आओ ईस खराबी को दुनियासे दुर करे
साला एक बोतल तुम खतम करो एक हम कतम करे
व्होड्का प्रेमी कोतवाल बरं?
5 Nov 2008 - 6:03 pm | मूखदूर्बळ
मस्त लिहीलय :)
आवडल विडंबन :)
5 Nov 2008 - 7:29 pm | विनायक प्रभू
चतुरंगजी मस्तच जमली आहे की दोन कार्बन, पाच हायड्रोजन आणि एक ओएच ची केमिस्ट्री.
5 Nov 2008 - 7:37 pm | प्रकाश घाटपांडे
म्हणुनीच टाकला का 'मिसळपावी धागा'
अडीच पेग पिउनी चतुरंग खलास बाकी
प्रकाश घाटपांडे
6 Nov 2008 - 10:19 am | चतुरंग
सर्व रसिकांस धन्यवाद!
(खुद के साथ बातां : रंगा, चकणा नीट बघून आणत जा रे, ह्या वेळी थोडे कच आले दाताखाली अशी काही रसिकांची तक्रार आहे, ऐकतोस ना? :? :W )
चतुरंग
6 Nov 2008 - 3:15 pm | दत्ता काळे
म्हणुनीच बांधली का 'देशी दुकान धारा'
पिउनी विलायती ही होणेच लास बाकी
.. हे झक्कास
21 Mar 2013 - 2:06 pm | उत्खनक
हे विडंबन आवडण्याचं खास कारण म्हणजे मूळ गझल वाचायला यामुळे मिळाली. खरंच अप्रतीम कलाकुसर आहे मिलिंद फणसेंची!
[रंगाष्टाईल] खुद के साथ बातां:
पुर्वीची आंतरजालीय निकोपता आजकाल फारशी दिसत नाही, का तुझा अभ्यास कमी पडतोय रे उत्खनका??
21 Mar 2013 - 4:24 pm | प्यारे१
>>>पुर्वीची आंतरजालीय निकोपता आजकाल फारशी दिसत नाही, का तुझा अभ्यास कमी पडतोय रे उत्खनका??
एका लग्नाची गोष्ट मध्ये म्हटल्यासारखं ... इकडून चहा घ्यावं तिकडून दूध घ्यावं असं सुरु होतं 'तेव्हा' !
हनिमून संपून संसार सुरु झालाय मिपाचा.
काहींनी सवतेसुभे काढले ,
काही घरातच राहून रुसवा धरुन राहिले,
काही उसासे टाकू लागले,
काही बंद खोलीत बोलू लागले,
काहींनी संन्यास घेतला,
काही साता समुद्रापार गेले नि
काही आमचं तिकडं कसं बरं चाललंय म्हणायला अधून मधून वाकुल्या दाखवू लागले.
संसार म्हटलं की असं होणारच नाही का? ;)
21 Mar 2013 - 3:43 pm | llपुण्याचे पेशवेll
लई जोरात येलकम बॅक.
21 Mar 2013 - 3:47 pm | llपुण्याचे पेशवेll
चायल जुनीच कविता आहे वाट्टं. मला वाटले रंगाशेठ परतून आले की काय? सध्या कार्यमग्नतेमुळे वेळ मिळत नाही म्हटले.