गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले! ;)
तसा कुठे मी दाराच्या चौकटीत बसतो
कसातरी मी जिमेत घुसतो वजन मारतो
काहीच्याबाही मी चरलेले असते, अन
अनेकदा मी, भसाभसा फैलावत असतो
सिट्प सारखे मारुन काही भागत नाही
अनुत्तरित मेदाचा 'गठ्ठा' 'मागे' उरतो!
मला पाहिजे साय, मला हे बरे उमगते
बोका बनुनी बशा बशा धुंडाळत फिरतो
इतके हाणतो सगळे नक्की जाते कोठे?
उत्तर मिळण्याआधी 'काटा' पुढे सरकतो!
ओषट हसून मी केकाचे क्रीम चाटतो
वजन घटवण्याआधी 'रंगा' मणभर चरतो!
चतुरंग
प्रतिक्रिया
3 Nov 2008 - 3:21 am | मीनल
इतके हाणतो सगळे नक्की जाते कोठे?
ही ही ही ही ही ही !
मीनल.