द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

Primary tabs

II श्रीमंत पेशवे II's picture
II श्रीमंत पेशवे II in काथ्याकूट
3 Jan 2019 - 12:42 pm
गाभा: 

भारतीय नीति विश्लेषक संजय बारू याचं एक संस्मरण आहे. ते २००४ ते २००८ या काळात तत्कालीन पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांचे प्रसार माध्यमाचे सल्लागार आणि सहाय्यक होते.
पेंगुइन इंडिया द्वारा प्रकाशित 'एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'या पुस्तकात त्यांच्यावर आरोप केला होता कि तत्कालीन काबीनेट च काय तर PMO प्रधान मंत्री कार्यालय सुद्धा मनमोहन सिंगांच्या अधिकारात किंवा नियंत्रणात नव्हते. त्यांच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे जास्त अधिकार होते. आणि मनमोहनसिंग तिचे सहाय्यक होते. सत्तेची दोन केंद्रे असू शकत नाहीत , त्यामुळे लोकांमध्ये भ्रम तयार होतो. आणि हि गोष्ट श्री बारू यांनी मन्मोहानांच्या लक्षात आणून दिली होती.
द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हे पुस्तकं प्रसारित व्हायच्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य करून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले होते.
पुस्तकातील आरोपा अनुसार पंतप्रधान मुद्दाम त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते हे खरे आहे. हे 2 जी, सीडब्ल्यूजी आणि कोलगेटमुळे झाले का? निवडणुकांनुसार, भाजपने असेही वचन दिले की "आम्ही या देशात परस्पर पंतप्रधान देऊ इच्छित नाही."

द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर , या पुस्तकाचे श्री हंसल मेहता द्वारा बॉलिवूड च्या सिनेमात रुपांतर केले गेले आहे. या मध्ये श्री अनुपम खेर हे प्रमुख भूमिकेत ,पूर्व प्रधान मंत्री मनमोहनसिंग यांची भूमिका साकारणार आहेत. येत्या काही दिवसात हा सिनेमा प्रदर्शित होत असून याचा सर्वस्वी परिणाम खूप रोचक असणार आहे.

प्रतिक्रिया

Blackcat's picture

3 Jan 2019 - 1:32 pm | Blackcat (not verified)

पुस्तक 2014 च्या निवडणुकीआधी
आणि सिनेमा 2019 च्या निवडणुकीआधी

या योगायोगाने कौतुक वाटते

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सत्य हे सत्य असते, मग ते निवडणूकी अगोदर, निवडणूक चालू असताना आणि निवडणूकीनंतरही सत्यच असते. किंबहुना, निवडणूकीपूर्वीच सत्य जनतेसमोर येणे आबश्यक असते, याबाबत काही संशय नसावा.

निवडणूकीनंतर सत्य माहित झाल्यावर डोक्यावर हात मारून काहीच फायदा नाही.

२०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ते आजतागायत, बारू यांच्या पुस्तकात खोटेपणा आहे असा गंभीर दावा, आरोप, कोर्ट खटला, इत्यादी कृती काँग्रेससकट कोणाहीकडून केली गेलेली नाही.

Blackcat's picture

3 Jan 2019 - 2:31 pm | Blackcat (not verified)

लिहिणार्याचे विचार आहेत , सत्य असेलच वगैरे नाही , असे कोपर्यात कुठेतरी छापले असेलच ना ?

नाटक सिनेमाने मत बदलले असते तर एव्हाना नोटेवर नथुराम आला असता.

विष्णुपंत पाग्नीस तुकाराम बनले , ते तुकारामच राहिले,
पोंक्षे नथुराम बनला , तोही नथुराम असल्यागतच फिरत असतो म्हणे,

आता हे तिसरे उदाहरण ठरेल असे वाटते .

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

२०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ते आजतागायत, बारू यांच्या पुस्तकात खोटेपणा आहे असा गंभीर दावा, आरोप, कोर्ट खटला, इत्यादी कृती काँग्रेससकट कोणाहीकडून केली गेलेली नाही. हे ठळक शब्दांत लिहिलेले असतानाही...

आता, बारूंवर खटला चालविण्याची हिंमत न केलेल्या काँग्रेसच्या अनेक खंद्या जाणकार संविधान व कायदा तज्ज्ञांपेक्षा, तुम्ही जास्त हुश्शार आहात, असा तुमचा दावा असल्यास, आम्ही हसण्यापेक्षा जास्त काय करू शकतो? =))

नेहमीच्या सवयीप्रमाणे संबंध नसलेल्या इतिहास-भविष्यकाळात भरकटत गेला आहात यावरूनच, "शस्त्रे टाकून चुकीच्या वाटेने पळून गेला आहात", हे सिद्ध झाले आहे... मिपाकर सुजाण आहेत, ते सगळे समजतात. स्वतःची अजून किती नाचक्की करून घेणार आहात ???!!! =)) =)) =))

अवांतर : विचार फारच अवास्तव भरकटत जाणे, प्रकृतीला ठीक नसते असे म्हणतात. ;) :)

Blackcat's picture

3 Jan 2019 - 3:24 pm | Blackcat (not verified)

तसे तर करकरेंच्या पुस्तकावरही कुणी केस केलेली नाही ना?

कुणी केस केली नाही , म्हणजे लिहिणार्याचे सगळे खरे का ?

( आता मी भित्रा , शस्त्र फेकलेला वगैरे नाही , हे कोणत्या कोर्टात जाऊन सिद्ध करायचे ? )

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 4:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

परत व्हॉटअबाऊटरी ???!!!

हेच, सद्य मुद्यावर तोंड बंद झाल्याचे लक्षण असते . =))

करकरेंच्या पुस्तकात कोणाचे नाव घेऊन असे आरोप केले आहेत का?

आपला सहज मनात प्रश्न आला म्हणून विचारतो.. हिंदू दहशतवाद म्हणून सरसकट आरोप करणे वेगळे आणि पुराव्यानिशी नाव घेऊन आरोप करणे वेगळे

आनन्दा's picture

3 Jan 2019 - 7:05 pm | आनन्दा

आणि असतील तर करकरेंच्या पुस्तकावर इथे एक रसग्रहण होऊनच जाऊ द्या.. तुम्हाला पण निवडणुकीच्या निमित्ताने राळ उठवायची आहेच, आम्हाला पण थोडं ज्ञान मिळालं तर मिळेल. हा का ना का.

वेळ मिळेल तेव्हा बघा. सगळे आरोप नाव घेउन केलेले आहेत

एक प्रश्न मला आता पडलाय की यांच्याकडे इतके सज्जड पुरावे आहेत तर मग हे इतकी वर्षे काय करत होते? आणायचे की सगळे साथीदार जगासमोर. सुब्रमण्यम स्वामींचे उदाहरण घ्या.. त्यांच्याकडे पुरावे आले, त्यांनी सरळ न्यायालयीन लढाई सुरू केली. पुस्तक लिहत बसले नाहीत. न्यायालयात टिकण्याची खात्री नसलेले लोक व्याख्याने आणि पुस्तके लिहत बसतात.

जाताजाता, मी साधारण 15 मिनिटे विडिओ ऐकला, पण करकरे सोडून कोणाचे नाव कानावर पडले नाही. आर एस एस वगळता. ते पण इतक्या सावधपणे घेतले आहे की त्याबद्दल न्यायालयात जाणे मला तरी शक्य वाटत नाही.

पुस्तकाबद्दल मात्र काही माहीत नाही. पण कोर्टाने करकरेंची फाईल पुन्हा ओपन करायला नकार दिला असे वाचले.

सुबोध खरे's picture

3 Jan 2019 - 7:32 pm | सुबोध खरे

लिहिणार्याचे विचार आहेत , सत्य असेलच वगैरे नाही , असे कोपर्यात कुठेतरी छापले असेलच ना ?

मोगा खान

हे तुमच्या प्रतिसादातपण कोपऱ्यात लिहीत चला

कारण तसेही सत्य आणि तुमच्या प्रतिसादांचा फारसा संबंध नसतोच.

केवळ काड्या टाकणे सोडले तर.

डँबिस००७'s picture

3 Jan 2019 - 7:12 pm | डँबिस००७

एरवी तोंड फाटेस्तोवर स्तुती करत असता आता हातभर फाटलेली शिवुन घ्या !

डँबिस००७'s picture

3 Jan 2019 - 7:13 pm | डँबिस००७

हे काळ्या मनी मौ ला आहे !!

अनुप ढेरे's picture

4 Jan 2019 - 1:02 pm | अनुप ढेरे

हॅहॅहॅ,
पंजाब निवडणुकांआधी उडता पंजाब, राजस्तान निवडणूकांआधी पद्मावत आणि २००९ निवडणूकांआधी फिराक
:)

बुद्धीमान परंतु अत्यंत अनाकर्षक व्यक्तीमत्वाच्या पंतप्रधानावर आधारीत असलेला हा सिनेमा बघावा असे अजीबात वाटत नाहीये. कोणी कीतीही शिव्या देवोत की उदो उदो करोत पण भारताच्या सर्व.पंतप्रधानांपैकी एक इंदिरा गांधी आणि दुसरे नरेंद्र मोदी ह्या दोनच व्यक्ती मला आवडतात.
अर्थात हे संपुर्माणपणे माझे वैयक्तिक मत आहे.

*संपुर्णपणे असे टायपायचे होते :)

गामा पैलवान's picture

3 Jan 2019 - 7:11 pm | गामा पैलवान

टर्मिनेटर,

तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा आदर आहे. एक गोष्ट नजरेस आणून द्यावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही या चित्रपटाकडे रंजनमूल्याच्या दृष्टीने पहात आहात. मनमोहनसिंग अनाकर्षक पंतप्रधान असल्याने प्रस्तुत चित्रपट रटाळ असू शकतो. पण तरीही सिंगांनी केलेली भारताची हानी उघड्यावर यायला हवीये. ती दिलखेचक पद्धतीनेच यावी अशी अपेक्षा ठेवणं कितपत सयुक्तिक आहे? मला म्हणायचंय की चित्रपट आकर्षक जरूर बनवावा, पण मग तो वास्तवापासून दूर जाण्याची शक्यता असते.

अगदी हाच नियम अनाकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या मोरारजी देसाई व इंदरकुमार गुजराल या दोन माजी पंतप्रधानांनाही लागू होतो. जरी यांची प्रतिमा सोज्वळ असली तरी या दोघांनी भारतीय हेरखात्याचं अपरिमित नुकसान केलं आहे. हे दोघे व मनमोहन सिंग यांच्या राजवटी भारताला अत्यंत घातक होत्या.

आ.न.,
-गा.पै.

मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल एकमेव पन्तप्रधान आहेत ज्यानि २००८ मधिल जागतिक आर्थिक मंदी च्या भयानक अडचणीतुन देशाला वाचवले होते आणि परिणाम स्थिर ठेवले होते. इतर देशांत काय काय झाले हे अवश्य बघा. नोटबंदी चे भिषण परिणाम जी डी पी २ टक्क्यान्नी खाली येईल हे फक्त मनमोहन सिन्ग यांनिच सान्गितलेले होते. तिथे भाजप सरकार सपशेल फेल झाले हेही लोकान्नि पाहिले आहे. माहितिचा अधिकार मनमोहन सिन्ग यान्च्याच सरकारने दिला आहे. अशी कित्येक कामे आहेत जी मनमोहन सिन्ग यान्च्यामुळे देशात चान्गली आर्थिक परिस्थिति आहे. भारताला घातक राजवटीचे लेबल मनमोहन सिन्ग यान्ना लावण्यापुर्वि जरा खरेच अभ्यासून बघा की एवढा प्रामाणीक आणि मुख्य म्हणजे खोटे न बोलणारा पंतप्रधान भारताला मिळाला होता. सध्याचे पंतप्रधान तर रोजच खोटे बोलतात :)

मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल एकमेव पन्तप्रधान आहेत ज्यानि २००८ मधिल जागतिक आर्थिक मंदी च्या भयानक अडचणीतुन देशाला वाचवले होते आणि परिणाम स्थिर ठेवले होते. इतर देशांत काय काय झाले हे अवश्य बघा. त्या परिणाम स्थिर ठेवण्या साठी राबवलेल्या अविचारी योजनांमूळेच उद्भवलेल्या परिस्थिती मधून बाहेर येण्यासाठी मोदिंना नोटाबंदी सारखे कठोर पाऊल उचलायला लागले. विस्तृत माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/JIqd_T_uf0E

Blackcat's picture

4 Jan 2019 - 6:59 pm | Blackcat (not verified)

मोदी तर बोलत होते इंदिराजींनी नोटांबनदी करायला हवी होती
तेंव्हा तर मनमोहन नव्हते ना ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

आर्थिक अनाचार तर इंदिरा गांधी किंवा त्यांच्या अगोदरपासून चालू होता... आता हाताबाहेर जाऊ राहिला होता, इतकेच.

१. बँकाचे राष्ट्रियिकरण करण्यामागे सर्वसामान्य लोक व लहान शेतकर्‍याला सुलभ कर्ज मिळावे हा उद्येश सांगितला गेला होता... सरकारी आशिर्वादाने, ते कर्ज कोणाला सुलभपणे मिळत होते व त्यामुळे किती एनपीए गोळा होते गेले, हे सांगायलाच हवे का?

२. गरिबी हटाव, रेशन कार्ड, अन्नसुरक्षा, इत्यादी अनेक नार्‍याखाली योजना व सबसिड्या जाहीर झाल्या आणि शतहजार करोडोंनी पैसे वाटले गेले, तरीही, अनेक दशकांनंतरही, शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत... ते पैसे कोणत्या 'गरिबांच्या' खिशात गेले, हे सांगायलाच हवे का?

३. मनमोहमानांच्या 'मौनामागे' आणि 'पोलिटिकल कंपलशंन्सच्या' मागे किती भ्रष्टाचार लपवायचे प्रयत्न झाले... ते जगजाहीरच आहे, हे सांगायलाच हवे का?

स्वार्थी हितसंबंध आणि दुराग्रह यांचा चष्मा उतरवल्यास अजून खूप काही दिसेल. पण मुद्दा सिद्ध करायला इतके पुरेसे आहे.

Blackcat's picture

4 Jan 2019 - 9:10 pm | Blackcat (not verified)

कुठल्या जगात अन कुठल्या कोर्टात जाहीर झाले आहे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 9:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

उगी, उगी, वरून डोळे उघडायचा आदेश आला ही सत्य दिसू लागेल... तोपर्यंत करा सहन, त्याला इलाज नाही. =))

ट्रम्प's picture

6 Jan 2019 - 8:10 am | ट्रम्प

पटतात सगळे मुद्दे !!!

हे विधान सप्रमाण सिद्ध करा.

सागर साहेब, वाट पहातोय... कि तुम्ही पण पप्पू सारखी पोकळ बडबड करताय?

मंडल आयोगानंही बर्‍याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे.

टर्मीनेटर's picture

12 Jan 2019 - 3:51 pm | टर्मीनेटर

एक गोष्ट नजरेस आणून द्यावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही या चित्रपटाकडे रंजनमूल्याच्या दृष्टीने पहात आहात.

गा.पै. साहेब मी केवळ याच चित्रपटाकडे नाही तर, चित्रपट माध्यमाकडेच रंजनमूल्याच्या दृष्टीने पहातो. वेळ आणि पैसा खर्च करून सिनेमागृहात जाऊन जर काही Larger than life बघायला मिळणार नसेल किंवा मनोरंजन होणार नसेल तर त्या पेक्षा असल्या विषयांवरच्या डॉक्युमेंटरी युट्युबवर बघणे पसंत करतो.

अगदी हाच नियम अनाकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या मोरारजी देसाई व इंदरकुमार गुजराल या दोन माजी पंतप्रधानांनाही लागू होतो. जरी यांची प्रतिमा सोज्वळ असली तरी या दोघांनी भारतीय हेरखात्याचं अपरिमित नुकसान केलं आहे. हे दोघे व मनमोहन सिंग यांच्या राजवटी भारताला अत्यंत घातक होत्या.

या वाक्यांशी पूर्णपणे सहमत!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Jan 2019 - 2:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चित्रपट आवर्जून बघायलाच हवा. अनुपम खेर ह्यांनी सिंगांची भूमिका उत्तम वठवली आहे असे ट्रेलरवरून दिसते.चित्रपटात मनमोहनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोनिया-राहूलवर गोळी मारायचाही प्रयत्न आहे असे वाचले आहे. भाजपावाले त्याचे निश्चित स्वागत करतील ह्यात शंका नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रपटात मनमोहनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोनिया-राहूलवर गोळी मारायचाही प्रयत्न आहे असे वाचले आहे.

अग्गो माई,

तसे असले तरच ते सत्याच्या जास्त जवळ असेल नाही का? मनमोहन यांना पुढे करून सोनिया-राहूल देशावर गोळ्या चालवत... आपले ते... देशाचे सरकार चालवत होते, हे तुझ्यासारख्या मुरलेल्या राजकारण्याला सांगायचे म्हणजे कृष्णाला अर्जुनाने गीता सांगितल्यासारखे होईल, नाही का?! =)) =)) =))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Jan 2019 - 3:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा हा. नक्कीच. सोनिया/राहुल पंतप्रधानांना सल्ले देत असत हे वाचले आहे. पण सरकर चालवत असत हे जरा अती वाटते. राहूलची आता पर्यंतची राजकीय प्रगती यथातथाच आहे. २०१४ पासून तो कोणत्या प्रश्नावर मुद्देसूद बोलला असे दिसले नाही. सोनियाही तर्हेवाईक म्हणाव्या लागतील. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 4:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

अग्गोबाई माई,

सगळ्या फाईल्स सोनियाच्या घरून पास होऊन आल्यावरच पंतप्रधानांना सही करायला मिळत होत्या, ही जगजाहीर गोष्टही तुम्हाला माहित नाही???

आतापर्यंत तुमच्या राजकीय हुशारीबद्दलचा सगळा आदर धुळीला मिळाला की हो! ऑं? :( =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनमोहनसिंगांचा मसुदा ते परदेशदौऱ्यावर असताना राहूलने भर पत्रकारपरिषदेत टराटर फाडला होता, हे आठवणीवर जरा जोर दिल्यास आठवू शकेल. पंतप्रधानांचा इतका अनादर सल्ला देणारा नाही तर आज्ञा देणाऱ्यापेक्षा जास्त वरचढ ताकद असलेलाच करु शकतो. वेक अप माई, वेक अप ! =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2019 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथल्या काहींचे वय बहुतेक खूपच लहान आहे, त्यामुळे त्यांना नजिकचा इतिहास माहित (किंवा लक्षात राहिला) नाही असे दिसते. त्यांच्यासाठी, युपिए काळात पंतप्रधानपदाची खरी सुत्रे कोणाच्या हातात होती ते स्पष्टपणे दाखवणारा व्हिडिओ इथे दिसेल...

https://twitter.com/AmitAgarwal9/status/1080901179360522240

रागा ला चित्रपटा मध्ये खुप च सयंमी आणि प्रगल्भ दाखवले आहे , हा रागावर अन्याय नाही का ? = ) = )

सिनेमात दाखवलेले रागा फार स्मार्ट आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 4:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉन्ग्रेसचा यावर आक्षेप असला तर तो योग्य आहे. :)

सुबोध खरे's picture

3 Jan 2019 - 7:34 pm | सुबोध खरे

))==((
LLRC

स्वलिखित's picture

4 Jan 2019 - 1:38 pm | स्वलिखित

लोल

गामा पैलवान's picture

3 Jan 2019 - 7:14 pm | गामा पैलवान

ट्रम्प,

हा पप्पूवरील अन्याय नसून प्रेक्षकांवरील अन्याय आहे. पप्पूस न्याय व अन्याय यांतला फरक कळंत नाही. प्रेक्षकांना कळतो.

आ.न.,
-गा.पै.

आनन्दा's picture

3 Jan 2019 - 7:06 pm | आनन्दा

ट्रेलर बघितला

अनुपम खेर यांची देहबोली तेव्हढी पटली नाही.

बाकी छान आहे.

चौकटराजा's picture

4 Jan 2019 - 7:31 am | चौकटराजा

खरे तर भारताचे एकूण प्रधान मंत्री यावर नजर टाकता यातील अनेक जण अपघातानेच पी एम झाल्याचे दिसून येईल !

एकाचा तर पंतप्रधान पदासाठी अपघात घडवून आणला.

अर्धवटराव's picture

6 Jan 2019 - 10:22 am | अर्धवटराव

हि कुठली घटना ? (कि कॉन्स्परसी थेअरी?)

ट्रम्प's picture

4 Jan 2019 - 5:26 pm | ट्रम्प

65 लाख लाइक्स आणि 61 हजार डिसलाइक्स भेटले आणि 5 करोड़ लोकांनी हा ट्रेलर पहिला . अगदी टाइमिंग साधून रिलीज केला आहे , 2019 च्या निवडणुकी मध्ये भाजपला कदाचित फायदा होईल .

विशुमित's picture

4 Jan 2019 - 5:42 pm | विशुमित

म्हणजे जवळपास 4कोटी लोकानी काहीच प्रतिक्रीया दिली नाही. 120 कोटी लोकानी तर यू ट्यूब वर ट्रेलर पण नाही पाहिला.
===
आपल्याकडे जनता कधी किर्तनाने सुधारली नाही अन तामाशाने बिघडली नाही.

ट्रम्प's picture

4 Jan 2019 - 8:09 pm | ट्रम्प

सर्व सामान्य लोकांना ' एक्सिडेंटल पी एम ' हा विषय पटलेला आहे , म्हणूनच ज्यास्त लाइक्स भेटल्या आहेत . ज्या प्रमाणे एक्सिट पोल चाचणी थोड्यशा मतदारा वर केली जाते त्याच प्रमाणे इंटरनेट , यु ट्यूब वापरणाऱ्या सुशिक्षित जामतीने सध्यातरी लाइक्स ठोकल्या आहेत .
आता नेहमीप्रमाणे लाइक्स आणि डिसलाइक्स मधील एवढा मोठा फरक आणि त्याचा अर्थ समजून न घेता ब्लैणकेट्स घ्या आणि झोपा = )

का कोणास ठाऊक सुशिक्षीत शब्द वाचला की मला स्मित हास्य करु वाटते.
...
बाकी भारतात फक्त 61लाखच सुशिक्षित लोक आहेत हे वाचुन डोले पाणवले!!
...
असो तात्या लगे रहो..!

मार्मिक गोडसे's picture

4 Jan 2019 - 5:52 pm | मार्मिक गोडसे

२०१४ ला दिलेली विकासाची आश्वासनं पुरी केली असती तर आज असे चित्रपटाकडे वेड्या आशेने पहावे लागण्याची वेळ आली नसती.

एक चित्रपट काँग्रेस ला सत्तेत येण्यापासुन रोखू शकतो ,
म्हणूनच तमाम काँग्रेसजन त्या सिनेमाच्या बंदी साठी सरसावले आहेत .आणि अश्वाशने पूरी करण्यासाठी जनता किमानअजुन 5 वर्ष भाजप ला सत्ता देणार हे नक्की .

Blackcat's picture

4 Jan 2019 - 8:22 pm | Blackcat (not verified)

बाजपेयींची 5 अन मोदींची 5 , या 10 वर्षात काय केले, हे सांगण्या ऐवजी नेहरू ते मनमोहन सगळे कसे वाईट होते , हे दाखवण्यापलीकडे मोदींकडे काही उरलेले नाही, ही त्यांची मोठी शोकांतिका आहे,

आणि मग त्याचा आधार घेऊन , हमको नई दुनिया बनानी है , ही टेप.

ग्रीनडेलवाल / वोलदेमोर्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे .

राघव's picture

9 Jan 2019 - 3:37 pm | राघव

कोणाला सांगायचं आणि कशाला.. हा प्रश्न आहे.
सांगून किंवा न सांगूनही समोरचा "ऐकायचं नाहीच" या हेक्यानं अडलेला असेल, तर उगाच कशाला सांगायचं?

आपल्या या महान देशात (आपल्या नजरेने जग काय समजत ते नेपाल पण भारताला दम देतो ह्यावरून ठरवावे )
पक्ष आध्यक्ष हाच खरा pm किंवा cm aasto ,,he nagad सत्य आहे

Rajesh188's picture

4 Jan 2019 - 9:52 pm | Rajesh188

Amit Shah he speaks आहेत .नरेंद्र मोदी सर्वेसर्वा आणि अमित शाह खेळणं आहे .पण इतिहासात आशा घटना नाहीत

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2019 - 6:29 pm | प्रसाद_१९८२
प्रसाद_१९८२'s picture

6 Jan 2019 - 10:55 am | प्रसाद_१९८२

वरिल व्हिडीओत मौनीबाबा सोनिया गांधींच्या आधी खुर्चीवर बसू नयेत म्हणून दोन लोकांनी त्यांना धरुन ठेवले होते व सोगा खुर्चीत बसल्यानंतरच, मौनीबाबांना बसवले खुर्चीत त्या दोन लोकांनी. च्यायला काय अवस्था केली होती भारताच्या पंतप्रधानाची, एका इटालीयन बाईने.

कळसुत्री बाहुली बद्दल विडिओ बरच काही सांगतोय ,
पण काही कॉन्ग्रेसधारजिनन्या गुलामाच्यां गळ्यातील साखळदंड तोडून त्यांना स्वतंत्र करण्याचा कितीही प्रयत्न केला तरिही ते स्वतःला गुलामच समजतात कारण तो 70 वर्षांच्या गुलामगिरी चा परिणाम आहे .

ट्रम्प's picture

6 Jan 2019 - 11:52 am | ट्रम्प

1. एक बार गलती की थी तो 10 साल के लिए बिना आवाज का प्रधानमंत्री मिला था,
इस बार गलती करेंगे तो बिना दिमाग का प्रधानमंत्री मिलेगा !

2. विकास पागल हो सकता है, परन्तु पागल का विकास कभी नहीं हो सकता!
नमो को वोट दिया जा सकता है,
परन्तु नमूने को नहीं,
कोई शक??

NiluMP's picture

7 Jan 2019 - 6:06 pm | NiluMP

:-)

आनन्दा's picture

6 Jan 2019 - 2:08 pm | आनन्दा

आ गया ना औकाद पे!!
संम पाहताय ना?

तुमचं बर आहे ज्यास्त परीक्षण करत बसायच नाही . मतिमंद , बारबाला , नाही तर रिमोट कंट्रोल्ड कोणीही चालते .
वैचारिक दिवाळखोरी झाली की असे होते .

गब्रिएल's picture

6 Jan 2019 - 2:15 pm | गब्रिएल

आता, "तसले" देशाची काळजी आनी जन्तेचचे भलं तरी कर्तात.

तुमच्ये मालक, जन्ता येक खोटंनाटं ब्वोलून येडबंबू बनवायची चीज आसती आसं समज्तात. त्ये फकस्त देश इकून सोत्ताची तुम्बडी भरत्यात आणी त्यातल्ये थोड्ये तुकडे त्येंच्या चेल्यांसाटी (कोन कोन त्येंना गुलाम्बी म्हंत्यात) उर्ले सुरले तुकड्ये फ्येकतात. च्येल्यांची तीच लायकी हाये आसं म्हनतात. एकाद्या चेल्यानं जर्रा गडबड क्येली कि त्येला सिद्दा पार्टीतून हाकलून द्येतात (जास्त गडबड क्येली तर जगातून्बी हाकलतात आसंबी म्हंतात). अंडरग्राऊंडमे जाना आसान हय, मगर भाईर पडना नामुमकिन हाये, भाय. मंग काय? त्येंच्या गुलामान्ला... आपलं च्येल्यान्ला... मतीमंद नेत्यासाटी सोत्ताचा आत्मा इकून कायबाय येडबंबूगत बोलाय्ला आनी लिवाय्ला लागतंय बगा. लई ब्येकार, ब्येच्चारे. =)) =)) =))

तेजस आठवले's picture

7 Jan 2019 - 3:06 pm | तेजस आठवले

वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करण्याचे कारण समजू शकेल का? कागलकरांचे एक सोडून द्या, त्यांना संमचा आशीर्वाद असावा कदाचित, आपले काय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2019 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

या दुव्यातील लेखातील मजकूर आणि संसदेतल्या भाषणाचा व्हिडिओ यांच्यामध्ये फारच रोचक माहिती आहे...

https://www.inreportcard.in/news-list-detail.aspx?opedid=1573&fbclid=IwA...

काँग्रेसने राफालं प्रकरणाचा निष्कारण गाजावाजा केल्यामुळे, शेवटी काँग्रेसच्याच जुन्या कपाटातली हाडे बाहेर पडू लागली आहेत, असे दिसते आहे ! :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Jan 2019 - 6:20 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे कनेक्शन्स जबरदस्त आहेत. शिवाय तिकडे ऑगस्टा वेस्टलँडवाला मिशेलपण पिसं उखडणार दिसतय!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2019 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

गापै साहेब,

मुद्दे सापडत नसल्याने खाजगीवर घरणार्‍यांची पातळी किती घसरली आहे, हे सगळे पाहत आहेत आणि त्यांची (घसरलेली) किंमत ठरवत आहेतच. तेव्हा त्यांना अनुल्लेखाने मारणे जास्त योग्य होईल.

यासंबंधात, रागाच्या खाजगी जीवनाबद्दल माध्यामांत उपलब्ध असलेल्या असंख्य गोष्टींपैकी एक जरी बाहेर काढलीत, तर मधमाशांचे सगळे मोहोळ चावल्यासारखे पिसाळून हीच मंडळी, "हा व्यक्तिगत हल्ला आहे. हा इन्टॉलरन्स आहे" असे किंचाळत थयथयाट करू लागतील. पण आपण त्यांच्याइतक्या खालच्या स्तरावर जायचे टाळूया.

स्मिता.'s picture

6 Jan 2019 - 4:58 pm | स्मिता.

या धाग्यावर न बोलायचं ठरवलं होतं पण काही लोक एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलतात की निषेध नोंदवावासा वाटला.

राजकिय मतभिन्नता असण्याला ना नाही, ते लोकशाहीचं लक्षण आहे. पण आपण सार्वजनीक मंचावर कोणावर काय चिखलफेक करतोय याचे थोडेतरी भान ठेवावे.

तसेच मला इतर समंजस मिपाकरांना सांगावसं वाटतंय की Please, don't feed the trolls. तुम्ही कितीही मुद्देसूद उत्तरं दिलीत तरी ट्रोलिंग या एकमेव उद्देशाने भारलेल्या आयडीचे लिखाण सतत खालच्या थरालाच जात आहे.

Blackcat's picture

8 Jan 2019 - 3:55 pm | Blackcat (not verified)

अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील न्यायालयाने दिले आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

म. फि. हुसेनने हिंदू देवीदेवतांची नग्न चित्र काढली, पिके सारखे हिंदूंच्या देवांची चेष्टा करणारे एवढंच काय सेक्सी दुर्गा असे नाव मुद्दाम असलेले कितीतरी चित्रपट आले. तसेच हिंदू राजांची बदनामी करणारे चित्रपट आले. तेव्हा मात्र ते त्या कलाकारांचे अविष्कार स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य असतं. संपूर्ण देश असहिष्णू झाला म्हणून पुरोगाम्यांनी किती आदळआपट केली.

मग हा तर जीवित व्यक्तींवरचा चित्रपट आहे. त्यापुढे जाऊन चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित त्या पुस्तकावर कधी आक्षेप, आरडाओरडा झालेला किंवा बंदी आलेली ऐकिवात नाही. असे असूनही चित्रपट एवढा का खुपावा? हे त्या कलाकारांचे अविष्कारस्वातंत्र्य का नाही? पुरस्कार परत करणाऱ्यांपैकी एकानेही ब्र उच्चारला नाही. प्लॅकार्ड घेऊन कोणी तुनळी वर व्हिडीओ टाकले नाहीत. यालाच म्हणतात गोची होणे.

तेजस आठवले's picture

9 Jan 2019 - 4:31 pm | तेजस आठवले

+1

हे ब्येस झालंय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचीच गरज असते.

Blackcat's picture

8 Jan 2019 - 11:45 pm | Blackcat (not verified)

दी अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर भारतातील करविषयक कायदे मोडल्याचा आरोप असतानाच आता त्यांच्यावर ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटला फसवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमध्ये न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल करण्यात आला आहे. कलाकृती ब्रिटिश आहे की नाही यावर शिक्कामोर्तब करणारी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युट ही संस्था आहे. फिल्म ब्रिटिश असेल तर 25 टक्क्यांपर्यंत करसवलत मिळते. त्यासाठी चित्रपटाच्या खर्चापैकी किमान 10 टक्के खर्च इंग्लंडमध्ये झालेला असावा लागतो आणि निर्माती कंपनी इंग्लंडच्या कॉर्पोरेशन टॅक्सप्रणालीमध्ये असावी लागते.
व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन, बाँबे कास्टिंग टॅलेंट मॅनेजमेंट प्रा.लि., बोहरा ब्रॉस ग्रुप फर्म व होरायजन आउटसोर्स सोल्युशन्स यांनी गोलगोल फिरवणारे व्यवहार दाखवून बाँबे कास्टिंग टॅलेंट मॅनेजमेंट प्रा.लि.नं अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरसाठी जास्त पैसे गुंतवल्याचे दाखवल्याचा दावा इंग्लंडमधल्या स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. बोहरा ब्रदर्स एक निर्माते असून करसवलत मिळवण्यासाठी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखर सम्राट रत्नाकर गुट्टे यांचे पूत्र विजय गुट्टे हे व्हीआरजी डिजिटलच्या संचालक मंडळावर नोव्हेंबर 2018 पर्यंत होते. डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटीआयनं 2 ऑगस्ट रोजी गुट्टे यांना अटकही केली होती व ते आता जामिनावर बाहेर आहेत.

https://www.loksatta.com/manoranjan-news/the-accidental-prime-minister-d...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Jan 2019 - 11:36 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ब्लॅक कॅट्या, अरे हे चालयचेच. बाकी बॉलिवूडमध्ये पांढर्याचा काळा/काळ्याचा पांढरा करून चित्रपट बनवले जातात.
बोहरा बंधू ह्या व्यवसायात अनेक वर्षे आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Sunil_Bohra

म्हणजे चिंधीचोराने ठगावरं पिक्चर काढला = )

एकदम बरोबर विचार मांडले आहेत !!!! म्हणून आज पासून मी फक्त गोरगरीबांच्या कैवारी काँग्रेसला च मत देणार !!!

कारण काँग्रेस तर कायमच कायद्याचा मान ठेवण्याची वर्तणुक करत असते . विशेष म्हणजे जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत संशयित लोकांना मानानेच वागवले पाहिजे , भले ते दिवसा ढवळ्या दरोडे टाकणारे असूदेत . हजारो मोठे गुन्हे सिद्ध नाही झाले तरी चालतील पण यत्किंचित गुन्ह्या साठी सिनेमा काढून बदनामी करणे हे कायद्याचा अपमान आहे !!!!

बिचारी ती माता मायदेश सोडून भारताला आपला देश मानते काय , स्वतःचा मुलगा अद्वितीय दैदीप्यमान , अलौकिक बुद्धिने तेजपुंज असताना एम एम ला पंतप्रधान करवून देशासाठि केलेल्या त्यागाचा आदर्श घडवते काय , पण याचे तमाम भाजप समर्थकाना काहीच कौतुक नाही ? नतद्रष्ट मेले !!!

' भारतीय कायद्यात च तरतूद आहे नवऱ्या नंतर स्थावर जंगम ,विहीर, झाड़े , शेती इत्यादि चा मालकी हक्क त्या स्रीला आणि मुलांना मिळेल ' या अर्थाने ती अबला माता ओळखीच्या चार जुन्याजाणत्या समजसेवकांच्या मदतीने देश चालवीन्याचा कसोशीने प्रयत्न करत होती आणि भाजप ने त्या मातेला व तिच्या निरागस मुलाला त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवले , न केलेल्या आर्थिक घोटाळ्या वरुन पूर्ण देशात त्यांची बदनामी करून सत्तेपासून दूर केले , आरे कुठ फेडाल हे पाप ? लक्षात ठेवा देव बघतोय सगळ !!!!

एम एम ने लालू सारख्या थोर समाजसेवी माणसांना निवडणूक बंदी चा अध्यादेश काढला होता तो आदेश आमच्या राजकुमार ने एकदा लहान असताना फाडल्या चे देशवासियानी याची देहि / डोळा बघितले होते , ती उर्मी आणि तड़फ राजकुमारा नां पंतप्रधान पदापर्यंत घेवून घेली असती पण देशातील मूर्ख जनता नरेंद्र मोदी नावाच्या राजघरान्याचे पाठबळ नसलेल्या माणसाच्या मागे ऊभी राहिली , तेव्हां पासून जनता कर्माची फळे भोगत आहे .

त्या कपटी भाजपच्या नेत्यांनी 5 वर्षात देशाची / प्रत्येक नागरिकाची प्रगती न करता नोटबंदी , 15 लाख , स्वाभिमानी हिंदुत्व , काळा पैसा , राममंदिर , अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा या असल्या फालतू मुद्द्यावर गुंतवून ठेवले आणि आता अजुन 5 वर्ष सत्ता मागत आहेत , अरे आम्ही काय मूर्ख आहोत का राजघराणे सोडून पुन्हा भाजप ला मत द्यायला ? आता आम्ही आमच्या अबला म्याडम आणि त्यांच्या निरागस मुलाला च सत्ते वर बसवणार कारण त्यांच्याकडे वंशपरम्परने जनतेची सेवा करण्याचे गुण आहेत .

Blackcat's picture

9 Jan 2019 - 3:58 pm | Blackcat (not verified)

मायमाता अन पुत्र दोघेही त्यांच्या मतदार संघातून निवडून येतात , इतर उमेदवार ( भाजपाची आले त्यात ) पडतात , त्याला मातेने काय करायचे ?

तसेही भाजपा राज्यात निवडणुकीतून पडलेले लोक राज्यसभेतून पुनर्जन्म घेऊन डायरेकत कॅबिनेटमध्ये घुसतात , इलेक्षणाची गरजच नाही.

मग मायमाता अन पुत्र जिंकतात , ह्यावर का पॉट दुखवून घ्यायचे ?

प्रसाद_१९८२'s picture

9 Jan 2019 - 5:10 pm | प्रसाद_१९८२

मायमाता अन पुत्र दोघेही त्यांच्या मतदार संघातून निवडून येतात , इतर उमेदवार ( भाजपाची आले त्यात ) पडतात , त्याला मातेने काय करायचे ?
--
अपने गली मे तो कुत्ता भी शेर होता है,
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींप्रमाणे स्वत:चा सुरक्षित व पारंपारीक मतदार संघ सोडून देशातील इतर कोणत्या ही ठिकाणाहून निवडणुक लढवून दाखवावी मायलेकांनी मग बघू कोण कीती जिंकून येते ते. २०१४ च्या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान एक वेळ अशी होती की, राहुल गांधीची हवा टाईट केली होती इराणी बाईंनी अमेठित.

Blackcat's picture

9 Jan 2019 - 5:21 pm | Blackcat (not verified)

निवडून आल्याशी मतलब, उगाच दुसर्याच्या एरियात जाऊन त्याची सीट का बाद करायची ?

मोदींनी दुसर्या राज्यात सीट घेऊन स्वतःच्या गुजरातला एक सीट जास्त मिळवून दिली , तसेही ते खासदारांचे काम कमी आणि पतप्रधानाचे काम जास्त करणार , उगाच गुजरातच्या त्या भागात दुर्लक्ष झाले असते ,

इराणीबाई दोनदा हरल्या होत्या ना ?

काय राव ! म्या आपुल्किन लिव्हलय सगळ , पॉट कशापाई दुखल ?
त्ये तुमचा मडरासी अर्थमंत्री बी कदिच लोकांनी निवडून न्हाय दिलेल , कांग्रेस मदि बी चिक्कार हायत चोरवाट न घुसनार .

Blackcat's picture

9 Jan 2019 - 5:43 pm | Blackcat (not verified)

https://en.m.wikipedia.org/wiki/P._Chidambaram

इथे ते लोकसभेतून आल्याचे दिले आहे,

मामाजी's picture

9 Jan 2019 - 7:21 pm | मामाजी

तसेही भाजपा राज्यात निवडणुकीतून पडलेले लोक राज्यसभेतून पुनर्जन्म घेऊन डायरेकत कॅबिनेटमध्ये घुसतात , इलेक्षणाची गरजच नाही.
आपले लाडके व (फिक्स केलेल्या) पत्रकार परिषदांना न घाबरता सामोरे जाणारे उच्चविद्याविभुषित माननीय मनमोहन सिंह यांनी तर कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायचे पण धैर्य दाखवले नाही. जर त्यांना आत्मविश्वास होता की आपल्या कुशल नेतृत्वाखाली युपीए 1 ने उत्तम कारभार करून दाखवलाय तर युपीए 2 साठी त्यांनी निडणुकीच्या रिंगणात उतरून आपली लोकप्रियता सिद्धकरून दाखवायला हवी होती. परंतू ते तर राज्यसभेतून पुनर्जन्म घेऊन डायरेक्ट दोन वेळा पंतप्रधान झाले.

अनन्त अवधुत's picture

10 Jan 2019 - 1:36 pm | अनन्त अवधुत

आणि हरले, तेव्हा पासून कानाला खडा. नो लोकसभा.

Blackcat's picture

11 Jan 2019 - 4:37 pm | Blackcat (not verified)

A Firstpost article felt that the trailer of the film seemed to suggest that Sanjaya Baru was the media advisor and chief spokesperson of Manmohan Singh during 2011 period of scams. However, Baru was only in this position during May 2004 to August 2008

Blackcat's picture

11 Jan 2019 - 7:15 pm | Blackcat (not verified)

अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट प्रदर्शित झाला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या सर्व प्रतिक्रियांमध्ये अनुपम खेर यांना आपल्या आईनं दिलेली प्रतिक्रिया सर्वाधिक भावली. त्यांनी याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या चित्रपटाला अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांनी १०० पैकी १०० गुण दिले आहेत. तसेच ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेबद्दल आपला अभिप्रायही व्यक्त केला. ‘ मेकअपनंतर अनुपमला मी ओळखलं नाही. हा चित्रपट मला खूपच आवडला. इतकंच नाही मला मनमोहन सिंग देखील खूप आवडले असं त्या म्हणाल्या. ‘मुझे मनमोहन सिंह बहुत पसंद है. ऐसा शरीफ था बेचारा. लगता था दूर से शरीफ है, तभी लोग शरीफ को बेवकूफ मानते हैं. ये नहीं पता वो बहुत तेज होते हैं’ असं म्हणत या दुलारी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीदेखील आपलं मत व्यक्त केलं

अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट प्रदर्शित झाला.

आणी डाव्या विचारसरणीच्या मिडीयाला , ईचारवंतांना , अवॉर्डीना ह्या सिनेमावर
कॉंग्रेसला सुटेबल अस समिक्षण लिहुन आपली लॉयल्टी सिद्ध करुन दाखवायला लागली. पण ह्या प्रयत्नात ते लोक अक्षरशः उघडे पडले !!

ह्या सिनेमावर प्रसिद्ध समिक्षक मसंद, अदर्श सारख्यांनी ह्या सिनेमाची वाखाणणी करत चांगल रेटींग दिलय .
TOI: 3 1/2 * Out of 5
DNA: 3 * Out of 5
Pink Villa
Website: 3 1/2 * Out of 5

ह्याच्या विरुद्ध
The Scroll: Bad Review 1*
The Wire: Bad Review No star
NDTV: Bad Review 1 *
Indian Express: Bad Review No Star

एकुणात काय स्वतःला खुप विचारवंत
समजणारे ल्युटनस , अर्बन नक्षल मिडीया ह्या प्रकरणाने उघडी पडलेली आहे !! भारतीय जनतेने आपले डोळे उघडे ठेवले पाहीजेत !!

Blackcat's picture

12 Jan 2019 - 11:49 am | Blackcat (not verified)

चित्रपटाची वाखाणणी केली म्हणजे विषयवास्तू खरी आहे , असा अर्थ होतो का ?

तसे तर एनाकोंडा , स्पायडरमॅन ह्यांच्या मुवीलाही 3/4 मार्क मिळतातच की.

चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये हे फिक्शन आहे , वगैरे आधीच दाखवले आहे , नीट बघून घ्या .

Blackcat's picture

12 Jan 2019 - 2:21 pm | Blackcat (not verified)

बुक माय शो वर 2-4 शो दाखवताहेत.

पहिल्या दिवशी कलेक्शन 1 कोटी, खर्च किती झाला आहे ?

पुढच्या आठवड्यात अजून मोठे सिनेमे आले की हा बहुदा यु ट्यूब वरच बघावा लागेल.

डँबिस००७'s picture

12 Jan 2019 - 2:50 pm | डँबिस००७

ह्या सिनेमामुळे त्यांची सर्वांची व तुमची
हातभर फाटली, यातच सार आल !!

बाकी तुमच पाल्हाळ चालु द्या !!

Blackcat's picture

12 Jan 2019 - 2:58 pm | Blackcat (not verified)

The Accidental Prime Minister First Day box office collections are of to a average start at the box office as it has opened at 15% in morning shows across India on a wide release

The Accidental Prime Minister Box Office Collection Day 1

3.5 Crore Trade Figure

4.5 Crore Producer Figure

Trade expectation:

3-4 Crore opening day

The Accidental Prime Minister opening was comfortably below that of lower budget Uri

The Accidental Prime Minister box office collections are set to be quite decent considering lack of star cast but it has got the benfit of controveries surrounding the movie.

राष्ट्रीय माता , पुत्र, जावई रॉबर्ट , लालू ,ए राजा , कनिमोळी , कलमाड़ी , अन्टोनी , अहमद , मायावती अखिलेश , आणि रा कॉ च्या नेत्यावर बायोपिक बनवले तर या महान देशसेवकांचे चरित्र समजायला सामान्य नागरिकांना मदत होईल.
विशेष :- भुजबळ साहेबनां गेले 7 महीने छातीत एकदा ही कळ आलेली नाही .

Blackcat's picture

12 Jan 2019 - 10:22 pm | Blackcat (not verified)

गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तसेच उद्योजक रत्नाकर गुट्टे आणि वाद यांचं नातं जवळचं आहे. कारण आता त्यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांनीच तक्रार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. रत्नाकर गुट्टे छळतात, मारहाण करतात घटस्फोट मागतात अशी तक्रार सुदामती गुट्टे यांनी केली आहे. या तक्रारीनंतर रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात कलम ४९८ अन्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीराज शेळके यांनी ही माहिती दिली. रत्नाकर गुट्टे हे गेल्या काही दिवसांपासून सुदामती गुट्टे यांच्याकडे घटस्फोट मागत असल्याचे सांगण्यात आले. सुदामती गुट्टे यांनी यासंदर्भातली रितसर तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत ही बाब उघड आहे. या प्रकरणातील फिर्यादी म्हणजेच रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांच्या आई आहेत. सुदामती गुट्टे यांनी केलेल्या तक्रारीत रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रत्नाकर गुट्टे हे बाहेरख्याली असल्याचे सांगत, रात्री अपरात्री ते परस्त्रियांना घरी घेऊन येतात. मला घराबाहेर काढण्याची धमकी देतात. तू मला पसंत नाही असे सांगतात असेही सुदामती गुट्टे यांनी तक्रारीत म्हटले आहे. एवढंच नाही तर रत्नाकर गुट्टे आणि त्यांचा भाऊ तसेच इतर सहकारी मला पिस्तुलाचा धाक दाखवतात असाही आरोप सुदामती यांनी केला आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/ratnakar-gutte-suffers-me-seek...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Jan 2019 - 1:07 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आता तर रत्नाकर गुट्टे ह्यांच्यवरच एक बायोपिक बनवायला हवे असे ह्यांचे मत.
"One of the accused in the case is Ratnakar Gutte, a local leader of Rashtriya Samaj Party (RSP), an alliance partner of the Bharatiya Janata Party (BJP).
https://www.thehindu.com/news/cities/mumbai/not-in-our-name-farmers-tell...

Blackcat's picture

15 Jan 2019 - 5:01 pm | Blackcat (not verified)

भारतात यश मिळवून आता हा सिनेमा ह्या महिन्यात पाकिस्तानात रिलीज होत आहे.

Blackcat's picture

22 Jan 2019 - 3:45 pm | Blackcat (not verified)

कलेक्शन घटत चालले आहे म्हणे

According to the latest report by BoxofficeIndia.com, on Monday, the film has managed to collect Rs 40 lakh in eleven days at the box office. The film has managed to collect a total of Rs 21.76 crore in eleven days at the box office.

30 कोटी खर्च वसूल होईल का ? बुध अन गुरू दोनच वार राहिलेत

व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते.
मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ?

@ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.