Skip to main content

द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

लेखक II श्रीमंत पेशवे II यांनी गुरुवार, 03/01/2019 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय नीति विश्लेषक संजय बारू याचं एक संस्मरण आहे. ते २००४ ते २००८ या काळात तत्कालीन पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांचे प्रसार माध्यमाचे सल्लागार आणि सहाय्यक होते. पेंगुइन इंडिया द्वारा प्रकाशित 'एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'या पुस्तकात त्यांच्यावर आरोप केला होता कि तत्कालीन काबीनेट च काय तर PMO प्रधान मंत्री कार्यालय सुद्धा मनमोहन सिंगांच्या अधिकारात किंवा नियंत्रणात नव्हते. त्यांच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे जास्त अधिकार होते. आणि मनमोहनसिंग तिचे सहाय्यक होते. सत्तेची दोन केंद्रे असू शकत नाहीत , त्यामुळे लोकांमध्ये भ्रम तयार होतो. आणि हि गोष्ट श्री बारू यांनी मन्मोहानांच्या लक्षात आणून दिली होती. द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हे पुस्तकं प्रसारित व्हायच्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य करून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले होते. पुस्तकातील आरोपा अनुसार पंतप्रधान मुद्दाम त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते हे खरे आहे. हे 2 जी, सीडब्ल्यूजी आणि कोलगेटमुळे झाले का? निवडणुकांनुसार, भाजपने असेही वचन दिले की "आम्ही या देशात परस्पर पंतप्रधान देऊ इच्छित नाही." द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर , या पुस्तकाचे श्री हंसल मेहता द्वारा बॉलिवूड च्या सिनेमात रुपांतर केले गेले आहे. या मध्ये श्री अनुपम खेर हे प्रमुख भूमिकेत ,पूर्व प्रधान मंत्री मनमोहनसिंग यांची भूमिका साकारणार आहेत. येत्या काही दिवसात हा सिनेमा प्रदर्शित होत असून याचा सर्वस्वी परिणाम खूप रोचक असणार आहे.

वाचने 42044
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

पुस्तक 2014 च्या निवडणुकीआधी आणि सिनेमा 2019 च्या निवडणुकीआधी या योगायोगाने कौतुक वाटते

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सत्य हे सत्य असते, मग ते निवडणूकी अगोदर, निवडणूक चालू असताना आणि निवडणूकीनंतरही सत्यच असते. किंबहुना, निवडणूकीपूर्वीच सत्य जनतेसमोर येणे आबश्यक असते, याबाबत काही संशय नसावा. निवडणूकीनंतर सत्य माहित झाल्यावर डोक्यावर हात मारून काहीच फायदा नाही. २०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ते आजतागायत, बारू यांच्या पुस्तकात खोटेपणा आहे असा गंभीर दावा, आरोप, कोर्ट खटला, इत्यादी कृती काँग्रेससकट कोणाहीकडून केली गेलेली नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लिहिणार्याचे विचार आहेत , सत्य असेलच वगैरे नाही , असे कोपर्यात कुठेतरी छापले असेलच ना ? नाटक सिनेमाने मत बदलले असते तर एव्हाना नोटेवर नथुराम आला असता. विष्णुपंत पाग्नीस तुकाराम बनले , ते तुकारामच राहिले, पोंक्षे नथुराम बनला , तोही नथुराम असल्यागतच फिरत असतो म्हणे, आता हे तिसरे उदाहरण ठरेल असे वाटते .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

२०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ते आजतागायत, बारू यांच्या पुस्तकात खोटेपणा आहे असा गंभीर दावा, आरोप, कोर्ट खटला, इत्यादी कृती काँग्रेससकट कोणाहीकडून केली गेलेली नाही. हे ठळक शब्दांत लिहिलेले असतानाही... आता, बारूंवर खटला चालविण्याची हिंमत न केलेल्या काँग्रेसच्या अनेक खंद्या जाणकार संविधान व कायदा तज्ज्ञांपेक्षा, तुम्ही जास्त हुश्शार आहात, असा तुमचा दावा असल्यास, आम्ही हसण्यापेक्षा जास्त काय करू शकतो? =)) नेहमीच्या सवयीप्रमाणे संबंध नसलेल्या इतिहास-भविष्यकाळात भरकटत गेला आहात यावरूनच, "शस्त्रे टाकून चुकीच्या वाटेने पळून गेला आहात", हे सिद्ध झाले आहे... मिपाकर सुजाण आहेत, ते सगळे समजतात. स्वतःची अजून किती नाचक्की करून घेणार आहात ???!!! =)) =)) =)) अवांतर : विचार फारच अवास्तव भरकटत जाणे, प्रकृतीला ठीक नसते असे म्हणतात. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसे तर करकरेंच्या पुस्तकावरही कुणी केस केलेली नाही ना? कुणी केस केली नाही , म्हणजे लिहिणार्याचे सगळे खरे का ? ( आता मी भित्रा , शस्त्र फेकलेला वगैरे नाही , हे कोणत्या कोर्टात जाऊन सिद्ध करायचे ? )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

परत व्हॉटअबाऊटरी ???!!! हेच, सद्य मुद्यावर तोंड बंद झाल्याचे लक्षण असते . =))

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

करकरेंच्या पुस्तकात कोणाचे नाव घेऊन असे आरोप केले आहेत का? आपला सहज मनात प्रश्न आला म्हणून विचारतो.. हिंदू दहशतवाद म्हणून सरसकट आरोप करणे वेगळे आणि पुराव्यानिशी नाव घेऊन आरोप करणे वेगळे

In reply to by आनन्दा

आणि असतील तर करकरेंच्या पुस्तकावर इथे एक रसग्रहण होऊनच जाऊ द्या.. तुम्हाला पण निवडणुकीच्या निमित्ताने राळ उठवायची आहेच, आम्हाला पण थोडं ज्ञान मिळालं तर मिळेल. हा का ना का.

In reply to by सागर

एक प्रश्न मला आता पडलाय की यांच्याकडे इतके सज्जड पुरावे आहेत तर मग हे इतकी वर्षे काय करत होते? आणायचे की सगळे साथीदार जगासमोर. सुब्रमण्यम स्वामींचे उदाहरण घ्या.. त्यांच्याकडे पुरावे आले, त्यांनी सरळ न्यायालयीन लढाई सुरू केली. पुस्तक लिहत बसले नाहीत. न्यायालयात टिकण्याची खात्री नसलेले लोक व्याख्याने आणि पुस्तके लिहत बसतात. जाताजाता, मी साधारण 15 मिनिटे विडिओ ऐकला, पण करकरे सोडून कोणाचे नाव कानावर पडले नाही. आर एस एस वगळता. ते पण इतक्या सावधपणे घेतले आहे की त्याबद्दल न्यायालयात जाणे मला तरी शक्य वाटत नाही. पुस्तकाबद्दल मात्र काही माहीत नाही. पण कोर्टाने करकरेंची फाईल पुन्हा ओपन करायला नकार दिला असे वाचले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

लिहिणार्याचे विचार आहेत , सत्य असेलच वगैरे नाही , असे कोपर्यात कुठेतरी छापले असेलच ना ?

मोगा खान हे तुमच्या प्रतिसादातपण कोपऱ्यात लिहीत चला कारण तसेही सत्य आणि तुमच्या प्रतिसादांचा फारसा संबंध नसतोच. केवळ काड्या टाकणे सोडले तर.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हॅहॅहॅ, पंजाब निवडणुकांआधी उडता पंजाब, राजस्तान निवडणूकांआधी पद्मावत आणि २००९ निवडणूकांआधी फिराक :)

बुद्धीमान परंतु अत्यंत अनाकर्षक व्यक्तीमत्वाच्या पंतप्रधानावर आधारीत असलेला हा सिनेमा बघावा असे अजीबात वाटत नाहीये. कोणी कीतीही शिव्या देवोत की उदो उदो करोत पण भारताच्या सर्व.पंतप्रधानांपैकी एक इंदिरा गांधी आणि दुसरे नरेंद्र मोदी ह्या दोनच व्यक्ती मला आवडतात. अर्थात हे संपुर्माणपणे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर, तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा आदर आहे. एक गोष्ट नजरेस आणून द्यावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही या चित्रपटाकडे रंजनमूल्याच्या दृष्टीने पहात आहात. मनमोहनसिंग अनाकर्षक पंतप्रधान असल्याने प्रस्तुत चित्रपट रटाळ असू शकतो. पण तरीही सिंगांनी केलेली भारताची हानी उघड्यावर यायला हवीये. ती दिलखेचक पद्धतीनेच यावी अशी अपेक्षा ठेवणं कितपत सयुक्तिक आहे? मला म्हणायचंय की चित्रपट आकर्षक जरूर बनवावा, पण मग तो वास्तवापासून दूर जाण्याची शक्यता असते. अगदी हाच नियम अनाकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या मोरारजी देसाई व इंदरकुमार गुजराल या दोन माजी पंतप्रधानांनाही लागू होतो. जरी यांची प्रतिमा सोज्वळ असली तरी या दोघांनी भारतीय हेरखात्याचं अपरिमित नुकसान केलं आहे. हे दोघे व मनमोहन सिंग यांच्या राजवटी भारताला अत्यंत घातक होत्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल एकमेव पन्तप्रधान आहेत ज्यानि २००८ मधिल जागतिक आर्थिक मंदी च्या भयानक अडचणीतुन देशाला वाचवले होते आणि परिणाम स्थिर ठेवले होते. इतर देशांत काय काय झाले हे अवश्य बघा. नोटबंदी चे भिषण परिणाम जी डी पी २ टक्क्यान्नी खाली येईल हे फक्त मनमोहन सिन्ग यांनिच सान्गितलेले होते. तिथे भाजप सरकार सपशेल फेल झाले हेही लोकान्नि पाहिले आहे. माहितिचा अधिकार मनमोहन सिन्ग यान्च्याच सरकारने दिला आहे. अशी कित्येक कामे आहेत जी मनमोहन सिन्ग यान्च्यामुळे देशात चान्गली आर्थिक परिस्थिति आहे. भारताला घातक राजवटीचे लेबल मनमोहन सिन्ग यान्ना लावण्यापुर्वि जरा खरेच अभ्यासून बघा की एवढा प्रामाणीक आणि मुख्य म्हणजे खोटे न बोलणारा पंतप्रधान भारताला मिळाला होता. सध्याचे पंतप्रधान तर रोजच खोटे बोलतात :)

In reply to by सागर

मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल एकमेव पन्तप्रधान आहेत ज्यानि २००८ मधिल जागतिक आर्थिक मंदी च्या भयानक अडचणीतुन देशाला वाचवले होते आणि परिणाम स्थिर ठेवले होते. इतर देशांत काय काय झाले हे अवश्य बघा. त्या परिणाम स्थिर ठेवण्या साठी राबवलेल्या अविचारी योजनांमूळेच उद्भवलेल्या परिस्थिती मधून बाहेर येण्यासाठी मोदिंना नोटाबंदी सारखे कठोर पाऊल उचलायला लागले. विस्तृत माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://youtu.be/JIqd_T_uf0E

In reply to by मामाजी

मोदी तर बोलत होते इंदिराजींनी नोटांबनदी करायला हवी होती तेंव्हा तर मनमोहन नव्हते ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आर्थिक अनाचार तर इंदिरा गांधी किंवा त्यांच्या अगोदरपासून चालू होता... आता हाताबाहेर जाऊ राहिला होता, इतकेच. १. बँकाचे राष्ट्रियिकरण करण्यामागे सर्वसामान्य लोक व लहान शेतकर्‍याला सुलभ कर्ज मिळावे हा उद्येश सांगितला गेला होता... सरकारी आशिर्वादाने, ते कर्ज कोणाला सुलभपणे मिळत होते व त्यामुळे किती एनपीए गोळा होते गेले, हे सांगायलाच हवे का? २. गरिबी हटाव, रेशन कार्ड, अन्नसुरक्षा, इत्यादी अनेक नार्‍याखाली योजना व सबसिड्या जाहीर झाल्या आणि शतहजार करोडोंनी पैसे वाटले गेले, तरीही, अनेक दशकांनंतरही, शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत... ते पैसे कोणत्या 'गरिबांच्या' खिशात गेले, हे सांगायलाच हवे का? ३. मनमोहमानांच्या 'मौनामागे' आणि 'पोलिटिकल कंपलशंन्सच्या' मागे किती भ्रष्टाचार लपवायचे प्रयत्न झाले... ते जगजाहीरच आहे, हे सांगायलाच हवे का? स्वार्थी हितसंबंध आणि दुराग्रह यांचा चष्मा उतरवल्यास अजून खूप काही दिसेल. पण मुद्दा सिद्ध करायला इतके पुरेसे आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

उगी, उगी, वरून डोळे उघडायचा आदेश आला ही सत्य दिसू लागेल... तोपर्यंत करा सहन, त्याला इलाज नाही. =))

In reply to by गामा पैलवान

एक गोष्ट नजरेस आणून द्यावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही या चित्रपटाकडे रंजनमूल्याच्या दृष्टीने पहात आहात.
गा.पै. साहेब मी केवळ याच चित्रपटाकडे नाही तर, चित्रपट माध्यमाकडेच रंजनमूल्याच्या दृष्टीने पहातो. वेळ आणि पैसा खर्च करून सिनेमागृहात जाऊन जर काही Larger than life बघायला मिळणार नसेल किंवा मनोरंजन होणार नसेल तर त्या पेक्षा असल्या विषयांवरच्या डॉक्युमेंटरी युट्युबवर बघणे पसंत करतो.
अगदी हाच नियम अनाकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या मोरारजी देसाई व इंदरकुमार गुजराल या दोन माजी पंतप्रधानांनाही लागू होतो. जरी यांची प्रतिमा सोज्वळ असली तरी या दोघांनी भारतीय हेरखात्याचं अपरिमित नुकसान केलं आहे. हे दोघे व मनमोहन सिंग यांच्या राजवटी भारताला अत्यंत घातक होत्या.
या वाक्यांशी पूर्णपणे सहमत!

चित्रपट आवर्जून बघायलाच हवा. अनुपम खेर ह्यांनी सिंगांची भूमिका उत्तम वठवली आहे असे ट्रेलरवरून दिसते.चित्रपटात मनमोहनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोनिया-राहूलवर गोळी मारायचाही प्रयत्न आहे असे वाचले आहे. भाजपावाले त्याचे निश्चित स्वागत करतील ह्यात शंका नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चित्रपटात मनमोहनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोनिया-राहूलवर गोळी मारायचाही प्रयत्न आहे असे वाचले आहे. अग्गो माई, तसे असले तरच ते सत्याच्या जास्त जवळ असेल नाही का? मनमोहन यांना पुढे करून सोनिया-राहूल देशावर गोळ्या चालवत... आपले ते... देशाचे सरकार चालवत होते, हे तुझ्यासारख्या मुरलेल्या राजकारण्याला सांगायचे म्हणजे कृष्णाला अर्जुनाने गीता सांगितल्यासारखे होईल, नाही का?! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा हा हा. नक्कीच. सोनिया/राहुल पंतप्रधानांना सल्ले देत असत हे वाचले आहे. पण सरकर चालवत असत हे जरा अती वाटते. राहूलची आता पर्यंतची राजकीय प्रगती यथातथाच आहे. २०१४ पासून तो कोणत्या प्रश्नावर मुद्देसूद बोलला असे दिसले नाही. सोनियाही तर्हेवाईक म्हणाव्या लागतील. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अग्गोबाई माई, सगळ्या फाईल्स सोनियाच्या घरून पास होऊन आल्यावरच पंतप्रधानांना सही करायला मिळत होत्या, ही जगजाहीर गोष्टही तुम्हाला माहित नाही??? आतापर्यंत तुमच्या राजकीय हुशारीबद्दलचा सगळा आदर धुळीला मिळाला की हो! ऑं? :( =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनमोहनसिंगांचा मसुदा ते परदेशदौऱ्यावर असताना राहूलने भर पत्रकारपरिषदेत टराटर फाडला होता, हे आठवणीवर जरा जोर दिल्यास आठवू शकेल. पंतप्रधानांचा इतका अनादर सल्ला देणारा नाही तर आज्ञा देणाऱ्यापेक्षा जास्त वरचढ ताकद असलेलाच करु शकतो. वेक अप माई, वेक अप ! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इथल्या काहींचे वय बहुतेक खूपच लहान आहे, त्यामुळे त्यांना नजिकचा इतिहास माहित (किंवा लक्षात राहिला) नाही असे दिसते. त्यांच्यासाठी, युपिए काळात पंतप्रधानपदाची खरी सुत्रे कोणाच्या हातात होती ते स्पष्टपणे दाखवणारा व्हिडिओ इथे दिसेल... https://twitter.com/AmitAgarwal9/status/1080901179360522240

In reply to by ट्रम्प

ट्रम्प, हा पप्पूवरील अन्याय नसून प्रेक्षकांवरील अन्याय आहे. पप्पूस न्याय व अन्याय यांतला फरक कळंत नाही. प्रेक्षकांना कळतो. आ.न., -गा.पै.

ट्रेलर बघितला अनुपम खेर यांची देहबोली तेव्हढी पटली नाही. बाकी छान आहे.

खरे तर भारताचे एकूण प्रधान मंत्री यावर नजर टाकता यातील अनेक जण अपघातानेच पी एम झाल्याचे दिसून येईल !

65 लाख लाइक्स आणि 61 हजार डिसलाइक्स भेटले आणि 5 करोड़ लोकांनी हा ट्रेलर पहिला . अगदी टाइमिंग साधून रिलीज केला आहे , 2019 च्या निवडणुकी मध्ये भाजपला कदाचित फायदा होईल .

In reply to by ट्रम्प

म्हणजे जवळपास 4कोटी लोकानी काहीच प्रतिक्रीया दिली नाही. 120 कोटी लोकानी तर यू ट्यूब वर ट्रेलर पण नाही पाहिला. === आपल्याकडे जनता कधी किर्तनाने सुधारली नाही अन तामाशाने बिघडली नाही.

In reply to by विशुमित

सर्व सामान्य लोकांना ' एक्सिडेंटल पी एम ' हा विषय पटलेला आहे , म्हणूनच ज्यास्त लाइक्स भेटल्या आहेत . ज्या प्रमाणे एक्सिट पोल चाचणी थोड्यशा मतदारा वर केली जाते त्याच प्रमाणे इंटरनेट , यु ट्यूब वापरणाऱ्या सुशिक्षित जामतीने सध्यातरी लाइक्स ठोकल्या आहेत . आता नेहमीप्रमाणे लाइक्स आणि डिसलाइक्स मधील एवढा मोठा फरक आणि त्याचा अर्थ समजून न घेता ब्लैणकेट्स घ्या आणि झोपा = )

In reply to by ट्रम्प

का कोणास ठाऊक सुशिक्षीत शब्द वाचला की मला स्मित हास्य करु वाटते. ... बाकी भारतात फक्त 61लाखच सुशिक्षित लोक आहेत हे वाचुन डोले पाणवले!! ... असो तात्या लगे रहो..!

२०१४ ला दिलेली विकासाची आश्वासनं पुरी केली असती तर आज असे चित्रपटाकडे वेड्या आशेने पहावे लागण्याची वेळ आली नसती.

In reply to by मार्मिक गोडसे

एक चित्रपट काँग्रेस ला सत्तेत येण्यापासुन रोखू शकतो , म्हणूनच तमाम काँग्रेसजन त्या सिनेमाच्या बंदी साठी सरसावले आहेत .आणि अश्वाशने पूरी करण्यासाठी जनता किमानअजुन 5 वर्ष भाजप ला सत्ता देणार हे नक्की .

In reply to by मार्मिक गोडसे

बाजपेयींची 5 अन मोदींची 5 , या 10 वर्षात काय केले, हे सांगण्या ऐवजी नेहरू ते मनमोहन सगळे कसे वाईट होते , हे दाखवण्यापलीकडे मोदींकडे काही उरलेले नाही, ही त्यांची मोठी शोकांतिका आहे, आणि मग त्याचा आधार घेऊन , हमको नई दुनिया बनानी है , ही टेप. ग्रीनडेलवाल / वोलदेमोर्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कोणाला सांगायचं आणि कशाला.. हा प्रश्न आहे. सांगून किंवा न सांगूनही समोरचा "ऐकायचं नाहीच" या हेक्यानं अडलेला असेल, तर उगाच कशाला सांगायचं?

आपल्या या महान देशात (आपल्या नजरेने जग काय समजत ते नेपाल पण भारताला दम देतो ह्यावरून ठरवावे ) पक्ष आध्यक्ष हाच खरा pm किंवा cm aasto ,,he nagad सत्य आहे


In reply to by प्रसाद_१९८२

वरिल व्हिडीओत मौनीबाबा सोनिया गांधींच्या आधी खुर्चीवर बसू नयेत म्हणून दोन लोकांनी त्यांना धरुन ठेवले होते व सोगा खुर्चीत बसल्यानंतरच, मौनीबाबांना बसवले खुर्चीत त्या दोन लोकांनी. च्यायला काय अवस्था केली होती भारताच्या पंतप्रधानाची, एका इटालीयन बाईने.

कळसुत्री बाहुली बद्दल विडिओ बरच काही सांगतोय , पण काही कॉन्ग्रेसधारजिनन्या गुलामाच्यां गळ्यातील साखळदंड तोडून त्यांना स्वतंत्र करण्याचा कितीही प्रयत्न केला तरिही ते स्वतःला गुलामच समजतात कारण तो 70 वर्षांच्या गुलामगिरी चा परिणाम आहे .

1. एक बार गलती की थी तो 10 साल के लिए बिना आवाज का प्रधानमंत्री मिला था, इस बार गलती करेंगे तो बिना दिमाग का प्रधानमंत्री मिलेगा ! 2. विकास पागल हो सकता है, परन्तु पागल का विकास कभी नहीं हो सकता! नमो को वोट दिया जा सकता है, परन्तु नमूने को नहीं, कोई शक??

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आ गया ना औकाद पे!! संम पाहताय ना?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तुमचं बर आहे ज्यास्त परीक्षण करत बसायच नाही . मतिमंद , बारबाला , नाही तर रिमोट कंट्रोल्ड कोणीही चालते . वैचारिक दिवाळखोरी झाली की असे होते .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आता, "तसले" देशाची काळजी आनी जन्तेचचे भलं तरी कर्तात. तुमच्ये मालक, जन्ता येक खोटंनाटं ब्वोलून येडबंबू बनवायची चीज आसती आसं समज्तात. त्ये फकस्त देश इकून सोत्ताची तुम्बडी भरत्यात आणी त्यातल्ये थोड्ये तुकडे त्येंच्या चेल्यांसाटी (कोन कोन त्येंना गुलाम्बी म्हंत्यात) उर्ले सुरले तुकड्ये फ्येकतात. च्येल्यांची तीच लायकी हाये आसं म्हनतात. एकाद्या चेल्यानं जर्रा गडबड क्येली कि त्येला सिद्दा पार्टीतून हाकलून द्येतात (जास्त गडबड क्येली तर जगातून्बी हाकलतात आसंबी म्हंतात). अंडरग्राऊंडमे जाना आसान हय, मगर भाईर पडना नामुमकिन हाये, भाय. मंग काय? त्येंच्या गुलामान्ला... आपलं च्येल्यान्ला... मतीमंद नेत्यासाटी सोत्ताचा आत्मा इकून कायबाय येडबंबूगत बोलाय्ला आनी लिवाय्ला लागतंय बगा. लई ब्येकार, ब्येच्चारे. =)) =)) =))

In reply to by मार्मिक गोडसे

वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करण्याचे कारण समजू शकेल का? कागलकरांचे एक सोडून द्या, त्यांना संमचा आशीर्वाद असावा कदाचित, आपले काय.

या दुव्यातील लेखातील मजकूर आणि संसदेतल्या भाषणाचा व्हिडिओ यांच्यामध्ये फारच रोचक माहिती आहे... https://www.inreportcard.in/news-list-detail.aspx?opedid=1573&fbclid=Iw… काँग्रेसने राफालं प्रकरणाचा निष्कारण गाजावाजा केल्यामुळे, शेवटी काँग्रेसच्याच जुन्या कपाटातली हाडे बाहेर पडू लागली आहेत, असे दिसते आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे कनेक्शन्स जबरदस्त आहेत. शिवाय तिकडे ऑगस्टा वेस्टलँडवाला मिशेलपण पिसं उखडणार दिसतय!!

In reply to by गामा पैलवान

गापै साहेब, मुद्दे सापडत नसल्याने खाजगीवर घरणार्‍यांची पातळी किती घसरली आहे, हे सगळे पाहत आहेत आणि त्यांची (घसरलेली) किंमत ठरवत आहेतच. तेव्हा त्यांना अनुल्लेखाने मारणे जास्त योग्य होईल. यासंबंधात, रागाच्या खाजगी जीवनाबद्दल माध्यामांत उपलब्ध असलेल्या असंख्य गोष्टींपैकी एक जरी बाहेर काढलीत, तर मधमाशांचे सगळे मोहोळ चावल्यासारखे पिसाळून हीच मंडळी, "हा व्यक्तिगत हल्ला आहे. हा इन्टॉलरन्स आहे" असे किंचाळत थयथयाट करू लागतील. पण आपण त्यांच्याइतक्या खालच्या स्तरावर जायचे टाळूया.

या धाग्यावर न बोलायचं ठरवलं होतं पण काही लोक एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलतात की निषेध नोंदवावासा वाटला. राजकिय मतभिन्नता असण्याला ना नाही, ते लोकशाहीचं लक्षण आहे. पण आपण सार्वजनीक मंचावर कोणावर काय चिखलफेक करतोय याचे थोडेतरी भान ठेवावे. तसेच मला इतर समंजस मिपाकरांना सांगावसं वाटतंय की Please, don't feed the trolls. तुम्ही कितीही मुद्देसूद उत्तरं दिलीत तरी ट्रोलिंग या एकमेव उद्देशाने भारलेल्या आयडीचे लिखाण सतत खालच्या थरालाच जात आहे.

अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील न्यायालयाने दिले आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

म. फि. हुसेनने हिंदू देवीदेवतांची नग्न चित्र काढली, पिके सारखे हिंदूंच्या देवांची चेष्टा करणारे एवढंच काय सेक्सी दुर्गा असे नाव मुद्दाम असलेले कितीतरी चित्रपट आले. तसेच हिंदू राजांची बदनामी करणारे चित्रपट आले. तेव्हा मात्र ते त्या कलाकारांचे अविष्कार स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य असतं. संपूर्ण देश असहिष्णू झाला म्हणून पुरोगाम्यांनी किती आदळआपट केली. मग हा तर जीवित व्यक्तींवरचा चित्रपट आहे. त्यापुढे जाऊन चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित त्या पुस्तकावर कधी आक्षेप, आरडाओरडा झालेला किंवा बंदी आलेली ऐकिवात नाही. असे असूनही चित्रपट एवढा का खुपावा? हे त्या कलाकारांचे अविष्कारस्वातंत्र्य का नाही? पुरस्कार परत करणाऱ्यांपैकी एकानेही ब्र उच्चारला नाही. प्लॅकार्ड घेऊन कोणी तुनळी वर व्हिडीओ टाकले नाहीत. यालाच म्हणतात गोची होणे.