Skip to main content

द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

लेखक II श्रीमंत पेशवे II यांनी गुरुवार, 03/01/2019 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय नीति विश्लेषक संजय बारू याचं एक संस्मरण आहे. ते २००४ ते २००८ या काळात तत्कालीन पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांचे प्रसार माध्यमाचे सल्लागार आणि सहाय्यक होते. पेंगुइन इंडिया द्वारा प्रकाशित 'एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'या पुस्तकात त्यांच्यावर आरोप केला होता कि तत्कालीन काबीनेट च काय तर PMO प्रधान मंत्री कार्यालय सुद्धा मनमोहन सिंगांच्या अधिकारात किंवा नियंत्रणात नव्हते. त्यांच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे जास्त अधिकार होते. आणि मनमोहनसिंग तिचे सहाय्यक होते. सत्तेची दोन केंद्रे असू शकत नाहीत , त्यामुळे लोकांमध्ये भ्रम तयार होतो. आणि हि गोष्ट श्री बारू यांनी मन्मोहानांच्या लक्षात आणून दिली होती. द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हे पुस्तकं प्रसारित व्हायच्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य करून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले होते. पुस्तकातील आरोपा अनुसार पंतप्रधान मुद्दाम त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते हे खरे आहे. हे 2 जी, सीडब्ल्यूजी आणि कोलगेटमुळे झाले का? निवडणुकांनुसार, भाजपने असेही वचन दिले की "आम्ही या देशात परस्पर पंतप्रधान देऊ इच्छित नाही." द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर , या पुस्तकाचे श्री हंसल मेहता द्वारा बॉलिवूड च्या सिनेमात रुपांतर केले गेले आहे. या मध्ये श्री अनुपम खेर हे प्रमुख भूमिकेत ,पूर्व प्रधान मंत्री मनमोहनसिंग यांची भूमिका साकारणार आहेत. येत्या काही दिवसात हा सिनेमा प्रदर्शित होत असून याचा सर्वस्वी परिणाम खूप रोचक असणार आहे.

वाचने 42044
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

दी अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर भारतातील करविषयक कायदे मोडल्याचा आरोप असतानाच आता त्यांच्यावर ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटला फसवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमध्ये न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल करण्यात आला आहे. कलाकृती ब्रिटिश आहे की नाही यावर शिक्कामोर्तब करणारी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युट ही संस्था आहे. फिल्म ब्रिटिश असेल तर 25 टक्क्यांपर्यंत करसवलत मिळते. त्यासाठी चित्रपटाच्या खर्चापैकी किमान 10 टक्के खर्च इंग्लंडमध्ये झालेला असावा लागतो आणि निर्माती कंपनी इंग्लंडच्या कॉर्पोरेशन टॅक्सप्रणालीमध्ये असावी लागते. व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन, बाँबे कास्टिंग टॅलेंट मॅनेजमेंट प्रा.लि., बोहरा ब्रॉस ग्रुप फर्म व होरायजन आउटसोर्स सोल्युशन्स यांनी गोलगोल फिरवणारे व्यवहार दाखवून बाँबे कास्टिंग टॅलेंट मॅनेजमेंट प्रा.लि.नं अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरसाठी जास्त पैसे गुंतवल्याचे दाखवल्याचा दावा इंग्लंडमधल्या स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. बोहरा ब्रदर्स एक निर्माते असून करसवलत मिळवण्यासाठी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखर सम्राट रत्नाकर गुट्टे यांचे पूत्र विजय गुट्टे हे व्हीआरजी डिजिटलच्या संचालक मंडळावर नोव्हेंबर 2018 पर्यंत होते. डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटीआयनं 2 ऑगस्ट रोजी गुट्टे यांना अटकही केली होती व ते आता जामिनावर बाहेर आहेत. https://www.loksatta.com/manoranjan-news/the-accidental-prime-minister-…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ब्लॅक कॅट्या, अरे हे चालयचेच. बाकी बॉलिवूडमध्ये पांढर्याचा काळा/काळ्याचा पांढरा करून चित्रपट बनवले जातात. बोहरा बंधू ह्या व्यवसायात अनेक वर्षे आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Sunil_Bohra

एकदम बरोबर विचार मांडले आहेत !!!! म्हणून आज पासून मी फक्त गोरगरीबांच्या कैवारी काँग्रेसला च मत देणार !!! कारण काँग्रेस तर कायमच कायद्याचा मान ठेवण्याची वर्तणुक करत असते . विशेष म्हणजे जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत संशयित लोकांना मानानेच वागवले पाहिजे , भले ते दिवसा ढवळ्या दरोडे टाकणारे असूदेत . हजारो मोठे गुन्हे सिद्ध नाही झाले तरी चालतील पण यत्किंचित गुन्ह्या साठी सिनेमा काढून बदनामी करणे हे कायद्याचा अपमान आहे !!!! बिचारी ती माता मायदेश सोडून भारताला आपला देश मानते काय , स्वतःचा मुलगा अद्वितीय दैदीप्यमान , अलौकिक बुद्धिने तेजपुंज असताना एम एम ला पंतप्रधान करवून देशासाठि केलेल्या त्यागाचा आदर्श घडवते काय , पण याचे तमाम भाजप समर्थकाना काहीच कौतुक नाही ? नतद्रष्ट मेले !!! ' भारतीय कायद्यात च तरतूद आहे नवऱ्या नंतर स्थावर जंगम ,विहीर, झाड़े , शेती इत्यादि चा मालकी हक्क त्या स्रीला आणि मुलांना मिळेल ' या अर्थाने ती अबला माता ओळखीच्या चार जुन्याजाणत्या समजसेवकांच्या मदतीने देश चालवीन्याचा कसोशीने प्रयत्न करत होती आणि भाजप ने त्या मातेला व तिच्या निरागस मुलाला त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवले , न केलेल्या आर्थिक घोटाळ्या वरुन पूर्ण देशात त्यांची बदनामी करून सत्तेपासून दूर केले , आरे कुठ फेडाल हे पाप ? लक्षात ठेवा देव बघतोय सगळ !!!! एम एम ने लालू सारख्या थोर समाजसेवी माणसांना निवडणूक बंदी चा अध्यादेश काढला होता तो आदेश आमच्या राजकुमार ने एकदा लहान असताना फाडल्या चे देशवासियानी याची देहि / डोळा बघितले होते , ती उर्मी आणि तड़फ राजकुमारा नां पंतप्रधान पदापर्यंत घेवून घेली असती पण देशातील मूर्ख जनता नरेंद्र मोदी नावाच्या राजघरान्याचे पाठबळ नसलेल्या माणसाच्या मागे ऊभी राहिली , तेव्हां पासून जनता कर्माची फळे भोगत आहे . त्या कपटी भाजपच्या नेत्यांनी 5 वर्षात देशाची / प्रत्येक नागरिकाची प्रगती न करता नोटबंदी , 15 लाख , स्वाभिमानी हिंदुत्व , काळा पैसा , राममंदिर , अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा या असल्या फालतू मुद्द्यावर गुंतवून ठेवले आणि आता अजुन 5 वर्ष सत्ता मागत आहेत , अरे आम्ही काय मूर्ख आहोत का राजघराणे सोडून पुन्हा भाजप ला मत द्यायला ? आता आम्ही आमच्या अबला म्याडम आणि त्यांच्या निरागस मुलाला च सत्ते वर बसवणार कारण त्यांच्याकडे वंशपरम्परने जनतेची सेवा करण्याचे गुण आहेत .

In reply to by ट्रम्प

मायमाता अन पुत्र दोघेही त्यांच्या मतदार संघातून निवडून येतात , इतर उमेदवार ( भाजपाची आले त्यात ) पडतात , त्याला मातेने काय करायचे ? तसेही भाजपा राज्यात निवडणुकीतून पडलेले लोक राज्यसभेतून पुनर्जन्म घेऊन डायरेकत कॅबिनेटमध्ये घुसतात , इलेक्षणाची गरजच नाही. मग मायमाता अन पुत्र जिंकतात , ह्यावर का पॉट दुखवून घ्यायचे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मायमाता अन पुत्र दोघेही त्यांच्या मतदार संघातून निवडून येतात , इतर उमेदवार ( भाजपाची आले त्यात ) पडतात , त्याला मातेने काय करायचे ? -- अपने गली मे तो कुत्ता भी शेर होता है, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींप्रमाणे स्वत:चा सुरक्षित व पारंपारीक मतदार संघ सोडून देशातील इतर कोणत्या ही ठिकाणाहून निवडणुक लढवून दाखवावी मायलेकांनी मग बघू कोण कीती जिंकून येते ते. २०१४ च्या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान एक वेळ अशी होती की, राहुल गांधीची हवा टाईट केली होती इराणी बाईंनी अमेठित.

In reply to by प्रसाद_१९८२

निवडून आल्याशी मतलब, उगाच दुसर्याच्या एरियात जाऊन त्याची सीट का बाद करायची ? मोदींनी दुसर्या राज्यात सीट घेऊन स्वतःच्या गुजरातला एक सीट जास्त मिळवून दिली , तसेही ते खासदारांचे काम कमी आणि पतप्रधानाचे काम जास्त करणार , उगाच गुजरातच्या त्या भागात दुर्लक्ष झाले असते , इराणीबाई दोनदा हरल्या होत्या ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

काय राव ! म्या आपुल्किन लिव्हलय सगळ , पॉट कशापाई दुखल ? त्ये तुमचा मडरासी अर्थमंत्री बी कदिच लोकांनी निवडून न्हाय दिलेल , कांग्रेस मदि बी चिक्कार हायत चोरवाट न घुसनार .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तसेही भाजपा राज्यात निवडणुकीतून पडलेले लोक राज्यसभेतून पुनर्जन्म घेऊन डायरेकत कॅबिनेटमध्ये घुसतात , इलेक्षणाची गरजच नाही. आपले लाडके व (फिक्स केलेल्या) पत्रकार परिषदांना न घाबरता सामोरे जाणारे उच्चविद्याविभुषित माननीय मनमोहन सिंह यांनी तर कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायचे पण धैर्य दाखवले नाही. जर त्यांना आत्मविश्वास होता की आपल्या कुशल नेतृत्वाखाली युपीए 1 ने उत्तम कारभार करून दाखवलाय तर युपीए 2 साठी त्यांनी निडणुकीच्या रिंगणात उतरून आपली लोकप्रियता सिद्धकरून दाखवायला हवी होती. परंतू ते तर राज्यसभेतून पुनर्जन्म घेऊन डायरेक्ट दोन वेळा पंतप्रधान झाले.

A Firstpost article felt that the trailer of the film seemed to suggest that Sanjaya Baru was the media advisor and chief spokesperson of Manmohan Singh during 2011 period of scams. However, Baru was only in this position during May 2004 to August 2008

अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट प्रदर्शित झाला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या सर्व प्रतिक्रियांमध्ये अनुपम खेर यांना आपल्या आईनं दिलेली प्रतिक्रिया सर्वाधिक भावली. त्यांनी याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या चित्रपटाला अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांनी १०० पैकी १०० गुण दिले आहेत. तसेच ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेबद्दल आपला अभिप्रायही व्यक्त केला. ‘ मेकअपनंतर अनुपमला मी ओळखलं नाही. हा चित्रपट मला खूपच आवडला. इतकंच नाही मला मनमोहन सिंग देखील खूप आवडले असं त्या म्हणाल्या. ‘मुझे मनमोहन सिंह बहुत पसंद है. ऐसा शरीफ था बेचारा. लगता था दूर से शरीफ है, तभी लोग शरीफ को बेवकूफ मानते हैं. ये नहीं पता वो बहुत तेज होते हैं’ असं म्हणत या दुलारी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीदेखील आपलं मत व्यक्त केलं

अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट प्रदर्शित झाला. आणी डाव्या विचारसरणीच्या मिडीयाला , ईचारवंतांना , अवॉर्डीना ह्या सिनेमावर कॉंग्रेसला सुटेबल अस समिक्षण लिहुन आपली लॉयल्टी सिद्ध करुन दाखवायला लागली. पण ह्या प्रयत्नात ते लोक अक्षरशः उघडे पडले !! ह्या सिनेमावर प्रसिद्ध समिक्षक मसंद, अदर्श सारख्यांनी ह्या सिनेमाची वाखाणणी करत चांगल रेटींग दिलय . TOI: 3 1/2 * Out of 5 DNA: 3 * Out of 5 Pink Villa Website: 3 1/2 * Out of 5 ह्याच्या विरुद्ध The Scroll: Bad Review 1* The Wire: Bad Review No star NDTV: Bad Review 1 * Indian Express: Bad Review No Star एकुणात काय स्वतःला खुप विचारवंत समजणारे ल्युटनस , अर्बन नक्षल मिडीया ह्या प्रकरणाने उघडी पडलेली आहे !! भारतीय जनतेने आपले डोळे उघडे ठेवले पाहीजेत !!

In reply to by डँबिस००७

चित्रपटाची वाखाणणी केली म्हणजे विषयवास्तू खरी आहे , असा अर्थ होतो का ? तसे तर एनाकोंडा , स्पायडरमॅन ह्यांच्या मुवीलाही 3/4 मार्क मिळतातच की. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये हे फिक्शन आहे , वगैरे आधीच दाखवले आहे , नीट बघून घ्या .

बुक माय शो वर 2-4 शो दाखवताहेत. पहिल्या दिवशी कलेक्शन 1 कोटी, खर्च किती झाला आहे ? पुढच्या आठवड्यात अजून मोठे सिनेमे आले की हा बहुदा यु ट्यूब वरच बघावा लागेल.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ह्या सिनेमामुळे त्यांची सर्वांची व तुमची हातभर फाटली, यातच सार आल !! बाकी तुमच पाल्हाळ चालु द्या !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

The Accidental Prime Minister First Day box office collections are of to a average start at the box office as it has opened at 15% in morning shows across India on a wide release The Accidental Prime Minister Box Office Collection Day 1 3.5 Crore Trade Figure 4.5 Crore Producer Figure Trade expectation: 3-4 Crore opening day The Accidental Prime Minister opening was comfortably below that of lower budget Uri The Accidental Prime Minister box office collections are set to be quite decent considering lack of star cast but it has got the benfit of controveries surrounding the movie.

राष्ट्रीय माता , पुत्र, जावई रॉबर्ट , लालू ,ए राजा , कनिमोळी , कलमाड़ी , अन्टोनी , अहमद , मायावती अखिलेश , आणि रा कॉ च्या नेत्यावर बायोपिक बनवले तर या महान देशसेवकांचे चरित्र समजायला सामान्य नागरिकांना मदत होईल. विशेष :- भुजबळ साहेबनां गेले 7 महीने छातीत एकदा ही कळ आलेली नाही .

गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तसेच उद्योजक रत्नाकर गुट्टे आणि वाद यांचं नातं जवळचं आहे. कारण आता त्यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांनीच तक्रार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. रत्नाकर गुट्टे छळतात, मारहाण करतात घटस्फोट मागतात अशी तक्रार सुदामती गुट्टे यांनी केली आहे. या तक्रारीनंतर रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात कलम ४९८ अन्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीराज शेळके यांनी ही माहिती दिली. रत्नाकर गुट्टे हे गेल्या काही दिवसांपासून सुदामती गुट्टे यांच्याकडे घटस्फोट मागत असल्याचे सांगण्यात आले. सुदामती गुट्टे यांनी यासंदर्भातली रितसर तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत ही बाब उघड आहे. या प्रकरणातील फिर्यादी म्हणजेच रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांच्या आई आहेत. सुदामती गुट्टे यांनी केलेल्या तक्रारीत रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रत्नाकर गुट्टे हे बाहेरख्याली असल्याचे सांगत, रात्री अपरात्री ते परस्त्रियांना घरी घेऊन येतात. मला घराबाहेर काढण्याची धमकी देतात. तू मला पसंत नाही असे सांगतात असेही सुदामती गुट्टे यांनी तक्रारीत म्हटले आहे. एवढंच नाही तर रत्नाकर गुट्टे आणि त्यांचा भाऊ तसेच इतर सहकारी मला पिस्तुलाचा धाक दाखवतात असाही आरोप सुदामती यांनी केला आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/ratnakar-gutte-suffers-me-see…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आता तर रत्नाकर गुट्टे ह्यांच्यवरच एक बायोपिक बनवायला हवे असे ह्यांचे मत. "One of the accused in the case is Ratnakar Gutte, a local leader of Rashtriya Samaj Party (RSP), an alliance partner of the Bharatiya Janata Party (BJP). https://www.thehindu.com/news/cities/mumbai/not-in-our-name-farmers-tel…

भारतात यश मिळवून आता हा सिनेमा ह्या महिन्यात पाकिस्तानात रिलीज होत आहे.

कलेक्शन घटत चालले आहे म्हणे According to the latest report by BoxofficeIndia.com, on Monday, the film has managed to collect Rs 40 lakh in eleven days at the box office. The film has managed to collect a total of Rs 21.76 crore in eleven days at the box office. 30 कोटी खर्च वसूल होईल का ? बुध अन गुरू दोनच वार राहिलेत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.