कथा विविधा

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
10 Dec 2018 - 7:12 pm

नमस्कार मिपाकरांनो,

विविध विषयांवरील लेखन आणि कवितांमुळे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या मिपा सदस्या ज्योती अळवणी यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेल्या ‘कथा विविधा’ ह्या त्यांच्या पहिल्या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग काल जुळून आला.

मुळात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी हि पहिलीच वेळ होती, त्यामुळे चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा. लतिका भानुशाली, अशा नाट्य, कला, चित्रपट, शिक्षण, राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या ह्या बहारदार कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेला एक अतिशय सुंदर असा अनुभव, (मान्यवरांनी मनोगतात आपल्या आवडत्या मिसळपाव ह्या संस्थळाचा आवर्जून केलेल्या उल्लेखाचा सार्थ अभिमान मनात बाळगून) सदर सोहळ्याच्या सचित्र वृत्तांताच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे.
*****

दिनांक : ९ डिसेंबर २०१८
वेळ : संध्याकाळी ६ वाजता.
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), पार्ले (पूर्व) मुंबई.
कार्यक्रम : लेखिका ज्योती अळवणी लिखित “कथा विविधा” ह्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा.
विशेष उपस्थिती : चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा. लतिका भानुशाली.

रविवारच्या प्रसन्न संध्याकाळी, निमंत्रितांच्या चैतन्यपूर्ण उपस्थितीत सहा वाजून वीस मिनिटांनी, आपल्या निवेदनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री समीरा गुजर यांनी सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत मंचावर येऊन पोडियमचा ताबा घेतला आणि टाळ्यांच्या गजरात एका दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सर्वप्रथम लेखिकेच्या आई सौ. कल्पना जिन्सीवाले यांचे आशीर्वचन झाले, आपल्या लेकीच्या लहानपणीच्या काही आठवणी त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.

ग्रंथाली प्रकाशनच्या ट्रस्टी प्रा. लतिका भानुशाली ह्यांनी प्रकाशकाच्या भूमिकेतून लेखिकेला शुभेच्छा देऊन, चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथाली प्रकाशन संस्थेच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीचा अत्यंत मोजक्या शब्दात आढावा घेतल्यावर वाचनसंस्कृती वाढीसाठी संस्थेद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री, नाट्य दिग्दर्शिका व अभिनेते सुमित राघवन ह्यांच्या पत्नी सौ. चिन्मयी सुमीत ह्यांनी आपल्या खास शैलीत कथासंग्रहातील सात कथांपैकी एक असलेल्या ‘एक रेडवाईन नातं’ ह्या कथेचे अल्प अभिवाचन केले आणि श्रोत्यांच्या उस्फुर्त टाळ्या मिळवल्या.

तद्नंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. सतीश राजवाडे ह्यांनी आपले नाट्य-चित्रपट सृष्टीतले आपले काही अनुभव कथन करून लेखिकेने (ज्योती अळवणी) मिसळपाव ह्या संस्थळा साठी घेतलेल्या आणि २२ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या “विंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो!!!” ह्या त्यांच्या मुलाखतीच्या वेळच्या काही आठवणींना उजाळा दिला.

सतीश राजवाडेंचे छोटेखानी भाषण संपण्याच्या सुमारास स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ह्या मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार द्वयीचे मंचावर आगमन झाले.

त्यानंतर खा. पूनम महाजन यांनी आपल्या छोटेखानी भाषणात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना ह्या कार्यक्रमासाठी येथे निमंत्रित करून वाढदिवसा निमित्त एक आगळीवेगळी भेट दिल्याबद्दल लेखिका आणि त्यांचे पती आ. श्री. पराग अळवणी ह्यांचे विशेष आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या एका कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी पूनम महाजन उपस्थितांची रजा घेऊन निघाल्यावर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘तो आणि ती’ या कथेतील एका प्रसंगावर उत्कृष्ठ असा एकपात्री प्रयोग सादर केला, त्यांच्या अभिनयाने आणि वक्तृत्व शैलीने उपस्थितांच्या टाळ्या तर वसूल केल्याच पण त्याचं बरोबर सर्वांना भावूकही केले.

चिन्मय मांडलेकरांच्या एकपात्री सादरीकरणानंतर उत्सवमूर्ती ज्योती अळवणी ह्यांनी आपला एक वाचक ते लेखिका ह्या प्रवासाविषयी माहिती देत, आपले भाऊ अभय, पती पराग, शिवानी आणि सानिया या दोन्ही कन्या, आई तसेच मैत्रीण वर्षा ह्यांना श्रेय देऊन आजच्या कार्यक्रमाचे संयोजन करणारे सोहम प्रतिष्ठानचे श्री. विनीत गोरे यांचे आभार मानले.

तद्नंतर कथासंग्रहातील एक असलेल्या ‘लालीची गोष्ट’ ह्या कथेवर आधारित एक शॉर्ट फिल्म भव्य स्क्रीनवर दाखवण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि त्यांच्या पत्नी रजनी वेलणकर, रिया सिद्धये अभिनित आणि अर्चना गोरे ह्यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेली हि शॉर्ट फिल्म सर्वांनाच प्रभावित करून गेली.

टाळ्यांच्या गजरात शॉर्ट फिल्मच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.

‘लालीची गोष्ट’ ह्या शॉर्ट फिल्म नंतर वेळ झाली होती आजच्या मुख्य कार्यक्रमाची, म्हणजेच पुस्तकाच्या प्रकाशनाची. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. स्नेहलताताई देशमुख (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) ह्यांनी आपल्या विध्वत्तापूर्ण अध्यक्षीय भाषणानंतर अतिशय देखण्या कमळाच्या फुलासारख्या वेष्टनातून ‘कथा विविधा’ नावाचे पुस्तक बाहेर काढून ते प्रकाशित केले.

कथा विविधा

पुस्तक प्रकाशित झाल्यावर लेखिकेच्या दोन्ही कन्यांनी उपस्थितांचे आभार मानून आणि आईला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर विविध विषयांवरील कथांचा समावेश असलेल्या ह्या कथासंग्रहास ‘कथा विविधा’ असे अत्यंत समर्पक शीर्षक सुचवणारे लेखिकेचे पती आ. श्री. पराग अळवणी यांनी मोजक्या शब्दात सर्व मान्यवर, संयोजक, कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी पडद्यामागे राबणाऱ्या सर्वांचे, मिसळपाव ह्या संस्थळाचे व उपस्थितांचे आभार मानले.

श्री. पराग अळवणी यांच्या छोटेखानी भाषणानंतर अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांनी पुस्तका विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक सोहम प्रतिष्ठानचे श्री. विनीत गोरे यांचे निरोपाचे भाषण झाल्यावर एका नितांत सुंदर सोहळ्याची सांगता झाली.

एका शानदार कार्यक्रमासाठी निमंत्रित करून त्या कार्यक्रमाचा वृत्तांत लिहिण्याची संधी मला दिल्याबद्दल मी, लेखिका ज्योती अळवणी यांचा मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या पुढील लेखनास अनेकानेक शुभेच्छा. अशीच त्यांची आणि आपल्या इतर मिपाकर लेखक/लेखिकांची अनेक पुस्तके प्रकाशित होवोत आणि त्यांच्या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सर्वांना सहभागी होण्याचे भाग्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

कथासाहित्यिकलेखअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

10 Dec 2018 - 7:40 pm | कुमार१

हार्दिक अभिनंदन !

पद्मावति's picture

10 Dec 2018 - 7:47 pm | पद्मावति

वाह. ज्योति अळवणी यांचे मन:पूर्वक अभिनंदन. टर्मिनेटर यांचे सुद्धा अनेक आभार सचित्र वृत्तांत आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल.

ज्योति अळवणी's picture

11 Dec 2018 - 9:57 am | ज्योति अळवणी

टर्मिनेटर जी यांनी हा वृत्तांत लिहिण्याबद्दल मला विचारले त्यावेळी मला खरच खूप आवडले. माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनसंदर्भात मिपाकरांना सांगण्याची इच्छा होती. त्यामुळे मी टर्मिनेटरजींना लगेच हो म्हंटले.

तुम्ही इतके सुंदर वर्णन लिहिले आहात; त्याबद्दल मनापासून आभार

ज्योति अळवणी's picture

11 Dec 2018 - 9:57 am | ज्योति अळवणी

टर्मिनेटर जी यांनी हा वृत्तांत लिहिण्याबद्दल मला विचारले त्यावेळी मला खरच खूप आवडले. माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनसंदर्भात मिपाकरांना सांगण्याची इच्छा होती. त्यामुळे मी टर्मिनेटरजींना लगेच हो म्हंटले.

तुम्ही इतके सुंदर वर्णन लिहिले आहात; त्याबद्दल मनापासून आभार

ज्योति अळवणी's picture

11 Dec 2018 - 9:57 am | ज्योति अळवणी

टर्मिनेटर जी यांनी हा वृत्तांत लिहिण्याबद्दल मला विचारले त्यावेळी मला खरच खूप आवडले. माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनसंदर्भात मिपाकरांना सांगण्याची इच्छा होती. त्यामुळे मी टर्मिनेटरजींना लगेच हो म्हंटले.

तुम्ही इतके सुंदर वर्णन लिहिले आहात; त्याबद्दल मनापासून आभार

ज्योति अळवणी's picture

11 Dec 2018 - 9:57 am | ज्योति अळवणी

टर्मिनेटर जी यांनी हा वृत्तांत लिहिण्याबद्दल मला विचारले त्यावेळी मला खरच खूप आवडले. माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनसंदर्भात मिपाकरांना सांगण्याची इच्छा होती. त्यामुळे मी टर्मिनेटरजींना लगेच हो म्हंटले.

तुम्ही इतके सुंदर वर्णन लिहिले आहात; त्याबद्दल मनापासून आभार

कुमार१, पद्मावति आणि ज्योतिजी आपले मनःपूर्वक आभार.

श्वेता२४'s picture

11 Dec 2018 - 12:02 pm | श्वेता२४

तुमच्या लेखनाची चाहती आहेच. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या पुस्तकास भरभरून प्रतिसाद मिळेल यात शन्का नाही। अश्या सुंदर प्रकाशनसोहळ्याची क्षणचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल टर्मिनेटरजी आपले खूप आभार

सुरेख समारंभाचे तेवढेच सुरेख निवेदन . सर्वांचे अभिनंदन आणी पुलेशु .

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2018 - 2:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

भरगच्च फोटो युक्त वृतांत आवडला.
ज्योतिताईंचे ही मनःपूर्वक अभिनंदन
पैजारबुवा,

यशोधरा's picture

11 Dec 2018 - 2:27 pm | यशोधरा

ज्योती, अभिनंदन!
टर्मिनेटर, वृत्तांत आवडला.

वा खुप छान वाटले. ज्योती यांचे अभिनंदन.
टर्मिनेटर तुम्ही छान कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवलात.

विनिता००२'s picture

11 Dec 2018 - 3:20 pm | विनिता००२

खूप अभिनंदन ज्योती ताई :)

सोहळा रंगलेला दिसतोय.

स्मिता.'s picture

11 Dec 2018 - 4:23 pm | स्मिता.

अरे व्वा! छानच झालेला वाटतोय सोहळा.
पुस्तकासाठी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

ज्योति अळवणी यांचे अगत्याचे आमंत्रण असूनही कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती साधता आली नाही. टर्मिनेटर यांनी रेखीव - नेटक्या प्रकाशन सोहळ्याचा सचित्र वृत्तांत सादर करून बहार आणली आहे.

ज्योति अळवणी यांचे पुनःश्च अभिनंदन आणि टर्मिनेटर यांचे आभार !

अनिंद्य

नूतन's picture

11 Dec 2018 - 7:56 pm | नूतन

ज्योती अळवणींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

ज्योति अळवणी's picture

11 Dec 2018 - 8:26 pm | ज्योति अळवणी

सर्वांचेच मनापासून धन्यवाद.

बहुतेक हा पहिला असा लेख असेल की जिथे लेखका व्यतिरिक्त दुसरेच कोणी धन्यवाद म्हणत असेल. ;)

प्रचेतस's picture

12 Dec 2018 - 8:25 am | प्रचेतस

अभिनंदन ज्योतीजी. पुढील पुस्तकांसाठीही खूप सार्‍या शुभेच्छा.

टर्मिनेटर ह्यांचेही आभार, त्यांनी हा सचित्र वृत्तांत अगदी तपशीलवार पोहोचवला.

चांदणे संदीप's picture

12 Dec 2018 - 12:23 pm | चांदणे संदीप

पुढील पुस्तकांसाठीही खूप सार्‍या शुभेच्छा.

मायमराठीच्या चरणी तुमच्या हातून अशीच सेवा घडत राहू दे एवढीच इच्छा.

टर्मिनेटर ह्यांचेही आभार, त्यांनी हा सचित्र वृत्तांत अगदी तपशीलवार पोहोचवला.

अगदी.

Sandy

श्वेता२४, सिरुसेरि, पैजारबुवा, यशोधरा, जागु, विनिता००२, स्मिता., अनिंद्य, नूतन, प्रचेतस आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार...

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2018 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! ज्योति अळवणी यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! त्या मिपावर नियमित लेखन करणार्‍या मिपाकर असल्याने तर अधिकच आनंद झाला !!

त्यांची वांङमयिन कामगिरी भविष्यात उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी यासाठी अनेक शुभेच्छा !!!

तेजस आठवले's picture

12 Dec 2018 - 4:33 pm | तेजस आठवले

अरे वा ! अभिनंदन.
हा वृत्तांत वाचल्यानंतर असाच सचित्र वृत्तांत मिपाकर प्राजु ह्यांच्या कवितासंग्रह प्रकाशनाच्या वेळचा वाचलेला आठवतो.

निओ's picture

20 Dec 2018 - 2:57 pm | निओ

सोहळा मोठा दिमाखदार झालाय. छान वृत्तांत.
पुस्तक प्रदर्शनाबद्दल अभिनंदन. स्वत:च्या कथांचे पुस्तक असणे म्हणजे समाधानाची गोष्ट.
आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!!

जव्हेरगंज's picture

21 Dec 2018 - 12:15 am | जव्हेरगंज

_/\_

वाहवा!!!

अभिनंदन ज्योतीताई!!!

नाखु's picture

21 Dec 2018 - 10:54 am | नाखु

अभिनंदन,अगदी जबरदस्त वृत्तांत.
आणि ही मांदियाळी मिपाकर ज्योतीताईंसाठी , मिपाकर मंडळी साठी आनंदाची गोष्ट आहे.
मिपाकरांचा झेंडा सर्व क्षेत्रात उंचावत राहो हीच सदिच्छा.

कधीकाळी आपल्या कवितांचं विडंबन केलेला वाचकांची पत्रेवाला नाखु

ज्योति अळवणी's picture

21 Dec 2018 - 10:29 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद तेजस आठवले, जव्हेरगंज, नाखु जी

ज्योति अळवणी's picture

21 Dec 2018 - 10:29 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद तेजस आठवले, जव्हेरगंज, नाखु जी

जेडी's picture

22 Dec 2018 - 10:07 am | जेडी

हार्दिक अभिनंदन !

सविता००१'s picture

22 Dec 2018 - 7:24 pm | सविता००१

ज्योती ताइंचे आणि टर्मिनेटर यांचेही

डॉ सुहास म्हात्रे, तेजस आठवले, निओ, जव्हेरगंज, नाखु, जेडी आणि सविता००१ आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार _/\_

शब्दबम्बाळ's picture

27 Dec 2018 - 11:49 am | शब्दबम्बाळ

ज्योती ताईंचे अभिनंदन आणि टर्मिनेटर याचे आभार! :)

ऐ....चल न.... ची आठवण झाली! :D
मोठी मजल मारलीए तुम्ही, पुढील प्रवासाला शुभेच्छा!

टर्मीनेटर's picture

27 Dec 2018 - 11:54 am | टर्मीनेटर

धन्यवाद शब्दबम्बाळ _/\_

मुक्त विहारि's picture

1 Jan 2019 - 9:36 pm | मुक्त विहारि

ज्योती यांचे अभिनंदन.