मी घेतली यॉट

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Nov 2018 - 8:36 am

मी घेतली यॉट

ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.

मी तर घेतली बाबा यॉट
फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट
मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||

नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे
अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे
मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||

इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड
मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट
मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||

आय.आय.टी., आय.आय.एम. शिकलोय
मोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय
मल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३||

नकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे
किंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे
कुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४||

मी तर घेतली ब्वॉ यॉट
मी तर घेतली ब्वॉ यॉट

- यॉटकरी यॉ - पाषा भेदकर

प्रश्न:
१) यॉट कशाचे प्रतीक आहे?
२) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते? (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत)
३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्‍या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते? (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.)
४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात?
५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा.

(मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअ‍ॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी "उपयोजक" या सदस्यांशी संपर्क साधावा.)
वरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

27 Nov 2018 - 11:45 am | वरुण मोहिते

प्रश्नांची उत्तरे द्यायला ज्ञानी माणसे यावी लागतील.

चित्रगुप्त's picture

28 Nov 2018 - 4:50 am | चित्रगुप्त

.

हीच का ती यॉट ? लई भारी आहे.

आहाहा ... काय ते अफाट काव्य !
वाचता वाचता डोळ्यात पाणि आलं .. वाटलं आता हि यॉट ह्या डोळ्यातल्या पाण्यावरच चालणार कि काय =))

टर्मीनेटर's picture

28 Nov 2018 - 11:06 am | टर्मीनेटर

मस्त :)

सोताच्या याट वर बसून तुम्ही असल्याच व्हॅटसपगृपावर बिनामोबदल्याच्या कविता पाडणार.
काय उपेग?
पौड रोडवर भाड्याने लावा याट.

पाषाणभेद's picture

29 Nov 2018 - 10:35 pm | पाषाणभेद

यॉट अन भाड्याने? कभ्भी नही!

सिरुसेरि's picture

28 Nov 2018 - 4:13 pm | सिरुसेरि

मस्त .. मी घेतली यॉट
सगळ्यांना बसला शॉट .

नाखु's picture

28 Nov 2018 - 6:54 pm | नाखु

आवडली.
काही मूलभूत शंका.
याट पुण्यात चालवायची असल्यास नदीला पुरसे पाणी सोडावं लागेल त्याचा प्रश्न मार्गी लावावा.
पिंपरी-चिंचवड परिसरात जलपर्णी बरीच आहे, तेव्हा यानिमित्ताने तीही काढावी.

बाकी पुढील अमोश्येला.

वाचकांची पत्रेवाला नाखु

चित्रगुप्त's picture

29 Nov 2018 - 5:35 am | चित्रगुप्त

पुण्यात - (पुण्यावर) चालवण्यासाठी हवाई यॉट :
.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2018 - 8:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

हिंजवडीला यॉटने यायचे असल्यास काय करावे लागेल? सकाळी सकाळी फार ट्रॅफिक असतो बुवा. आणि मेट्रो काही आमच्या रिटायरमेंट पर्यंत येत नाही नक्की.

यानिमित्ताने-- ओला वाले एयर टॅक्सी चालु करणार असे कुठेतरी वाचले होते. त्याचे काय झाले का पुढे?

हाहाहाहा.. यॉटचा तुंबलेला बोळा इथे निघालाच तर..

पाली हिल = पाषाण कर्वेनगर ? , पाषाण कर्वेनगरकरांनी पाषाणभेदांचे आभार मानावेत. :)

पाषाणभेद's picture

29 Nov 2018 - 10:38 pm | पाषाणभेद

पुंबईच्या वाचकांची काळजी हो, बाकी दुसरं काय?
अन्यथा आम्ही यॉटवाले इतका विचार करतो का दुसर्यांचा!

चामुंडराय's picture

29 Nov 2018 - 8:19 am | चामुंडराय

मी तर घेतली बाबा खाट
लक्झरी बेड पेक्षा तिचा मोठ्ठा थाट
मी तर घेतली ब्वॉ खाट || धृ ||

पाषाणभेद's picture

29 Nov 2018 - 10:32 pm | पाषाणभेद

खाटवर खडखडाट
खाटवर खडखडाट

लई भारी's picture

29 Nov 2018 - 12:24 pm | लई भारी

मागचा काही संदर्भ असल्यास 'मिसला'!
पण जाम आवडलं :)

ते हिंजवडी च बघा काहीतरी!

पाषाणभेद's picture

29 Nov 2018 - 10:33 pm | पाषाणभेद

या तिकडे कायप्पावर.
अन हिंजवडीही घेणार होतो पण राहिलं.