Skip to main content

मी घेतली यॉट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/11/2018 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी घेतली यॉट ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. मी तर घेतली बाबा यॉट फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ || नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१|| इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२|| आय.आय.टी., आय.आय.एम. शिकलोय मोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय मल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३|| नकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे किंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे कुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४|| मी तर घेतली ब्वॉ यॉट मी तर घेतली ब्वॉ यॉट - यॉटकरी यॉ - पाषा भेदकर प्रश्न: १) यॉट कशाचे प्रतीक आहे? २) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते? (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत) ३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्‍या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते? (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.) ४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात? ५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा. (मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअ‍ॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी "उपयोजक" या सदस्यांशी संपर्क साधावा.) वरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8883
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आहाहा ... काय ते अफाट काव्य ! वाचता वाचता डोळ्यात पाणि आलं .. वाटलं आता हि यॉट ह्या डोळ्यातल्या पाण्यावरच चालणार कि काय =))

सोताच्या याट वर बसून तुम्ही असल्याच व्हॅटसपगृपावर बिनामोबदल्याच्या कविता पाडणार. काय उपेग? पौड रोडवर भाड्याने लावा याट.

आवडली. काही मूलभूत शंका. याट पुण्यात चालवायची असल्यास नदीला पुरसे पाणी सोडावं लागेल त्याचा प्रश्न मार्गी लावावा. पिंपरी-चिंचवड परिसरात जलपर्णी बरीच आहे, तेव्हा यानिमित्ताने तीही काढावी. बाकी पुढील अमोश्येला. वाचकांची पत्रेवाला नाखु

हिंजवडीला यॉटने यायचे असल्यास काय करावे लागेल? सकाळी सकाळी फार ट्रॅफिक असतो बुवा. आणि मेट्रो काही आमच्या रिटायरमेंट पर्यंत येत नाही नक्की. यानिमित्ताने-- ओला वाले एयर टॅक्सी चालु करणार असे कुठेतरी वाचले होते. त्याचे काय झाले का पुढे?

पाली हिल = पाषाण कर्वेनगर ? , पाषाण कर्वेनगरकरांनी पाषाणभेदांचे आभार मानावेत. :)

In reply to by माहितगार

पुंबईच्या वाचकांची काळजी हो, बाकी दुसरं काय? अन्यथा आम्ही यॉटवाले इतका विचार करतो का दुसर्यांचा!

मागचा काही संदर्भ असल्यास 'मिसला'! पण जाम आवडलं :) ते हिंजवडी च बघा काहीतरी!