पाकिस्तानातील सध्य स्थिती

Shrirang Kulkarni's picture
Shrirang Kulkarni in काथ्याकूट
15 Oct 2018 - 11:02 am
गाभा: 

२०१४ च्या आधी आणि २०१४ नंतर जसे भारतात बदल झाले तसे पाकिस्तानात हि झाले. मागील दोन तीन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीवर पाकिस्तानात चाललेल्या घडामोडी पहिल्या. त्यात असे होते कि हा देश दिवाळखोरीत निघत आहे आणि त्यांनी जागतिक बँकेकडे काही अब्ज डॉलर ची मागणी (कर्ज म्हणा किंवा भीक) केली आहे. तरी ह्या सगळ्या घडामोडीमागे भारताची कूटनीती कशी कामास येत आहे ह्याची विस्तृत पणे चर्चा अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया

तुम्ही पन थोड "विस्तृत" लिहा की वो..

एव्हढ्या त्रोटक माहीतीवर विस्तृत चर्चा कशी होनार?

टवाळ कार्टा's picture

15 Oct 2018 - 3:03 pm | टवाळ कार्टा

खिक्क....लोकांच्या कैच्याकै अपेक्षा असतात बुआ

ट्रम्प's picture

15 Oct 2018 - 3:50 pm | ट्रम्प

तुम्ही पुण्याचे का हो ?

खूपच मोजून मापून लिहले आहे म्हणून विचारले !!!

Shrirang Kulkarni's picture

15 Oct 2018 - 5:06 pm | Shrirang Kulkarni

प्रथमतः सर्वांची माफी मागून एक दुवा ह्या पोस्ट सोबत देता आहे कृपया तो दुवा वाचून आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.

https://www.livemint.com/Politics/6EFjxcj6pmChl98DaOWoWK/Why-Pakistan-IM...

आणि म्हणाल तर मी पुण्याचा नाही मी सोलापूर मधून आहे आणि कामा निमित्त बंगलोरला असतो.

मला ह्या पोस्ट संदर्भात म्हणायचे आहे कि भारताच्या राजकीय कूटनीती मुळे म्हणजे पाकिस्तानचे अमेरिकेशी आणि चीनशी असलेले संबंध आणि त्यांच्या कडून मिळणारी रसद भारताने बंद केली हे त्यामागचे कारण आहे असे मला वाटते. ह्याउपरोक्त पाकिस्तानात असणारा वैचारिक दिवाळखोरपणा, नसलेले राजकीय नेतृत्व, सैन्याची राजकारणात असलेली ढवळाढवळ हे हि सगळे कारणीभूत असावे. सध्या पंतप्रधान कार्यालयातील गाड्या, जनावरे लिलावात काढल्या आहेत अश्याही बातम्या चॅनेलवाले बातम्यांमध्ये दाखवत आहेत.

मला फक्त एवढेच नमूद करायचे आहे कि ह्या व्यतिरिक्त मिपाकर आजून काय विचार करतात किंवा ह्या व्यतिरिक्त आजून काय करणे आसू शकतात.

धन्यवाद!!!

ही माहिती फार त्रोटक आणि एकांगी आहे.
जर १३ वेळा पाकिस्तानने पॅकेज घेतलेले असेल, तर त्यासाठी कोणत्या अटी मान्य केलेल्या? त्या पूर्ण झाल्यात काय? जर नसतील तर त्यांना परत पॅकेज कोणत्या नियमांनुसार मिळू शकेल?
नुकतेच अमेरिकेने या पद्धतीचे पॅकेज पाकिस्तानला देण्यास आय.एम.एफ.ला विरोध केलेला होता. आणि आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत असे सांगीतले होते. त्याच्या नंतर पाकिस्तानने ही मागणी आय.एम.एफ.ला केली आहे किंवा नाही याची कल्पना नाही.

पाकिस्तान मिडिया सुद्धा एकांगीच माहिती देताना दिसतो बर्‍याचदा. पाकिस्तानच्या चार भागांपैकी किती भागातील बातम्या आपल्याला कळतात? जास्तीत जास्त बातम्या पंजाबच्या लगतच्या भागातूनच येत असतात.

पाकिस्तानातील सद्यपरिस्थितीचे आकलन करण्यासाठी उपलब्ध माहिती बरीच त्रोटक आणि अपुरी आहे. काही ब्लॉग्स आहेत जे माहिती टाकत असतात, पण त्यात ऑथेंटीसिटी नाही. तुमच्या जवळ काही स्त्रोत असतील तर सांगा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2018 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

नुकतेच अमेरिकेने या पद्धतीचे पॅकेज पाकिस्तानला देण्यास आय.एम.एफ.ला विरोध केलेला होता.

या विरोधाचे मुख्य कारण, पाकिस्तान या पैशांचा उपयोग चीनची कर्जे चुकवायला करेल, हे अमेरिकेला पसंत असणे शक्य नाही. कारण, अशा तर्‍हेने मागच्या दरवाजाने पैसे मिळाल्याने, अमेरिकेच्या चीनवरील बंदीची (सँक्शन्स) तीव्रता कमी होईल.

खरंय. त्यामुळे खरं तर हे पॅकेज त्यांना मिळायला नको.. आय.एम.एफ ची अमेरिकेच्या इच्छेबाहेर जायची ताकद आहेच असे नाही.
पण जो दुवा वर दिलाय, त्यावरून वाटतंय की ही मदत आता पाकिस्तान मागणार आहे. अर्थात् काहीच ठोस दिसत नाही हे खरे.

एकुलता एक डॉन's picture

5 Nov 2018 - 11:59 pm | एकुलता एक डॉन

manya
pan paise dile nahi tar china pakistan war kabja karu shakto he americela nakki mahit asel

दिगोचि's picture

16 Oct 2018 - 5:33 am | दिगोचि

तुम्ही सध्य स्थिति असे लिहिले आहे. हे चुकीचे आहे. तेथे सद्य हा शब्द वापरयला हवा होता.

धन्यवाद!!!

पुढील वेळेस खबरदारी घेईन

माहितगार's picture

16 Oct 2018 - 9:27 am | माहितगार

.....तरी ह्या सगळ्या घडामोडीमागे भारताची कूटनीती कशी कामास येत आहे ह्याची विस्तृत पणे चर्चा अपेक्षित आहे.....

या शब्दांच्या अवडंबरा (र्हेटॉरीकल वाक्यरचनानेच्या) मागे, एका पाठोपाठ दोन गृहीतके आहेत १) भारताची कूटनीती कामास येत आहे (ती कशी तेवढे तुम्ही सांगण्याचे काम करा) २) भारतास एवढा कुटनितीक प्रभाव प्राप्त झाला आहे.

कोणत्याही देशाचा कुटनितीक प्रभाव मर्यादांस हीत लक्षात घ्यावा लागतो .

असे म्हणून आपली आपण पाठ थोपटीयची की आपापले ठरवावे...
अर्थिक खड्ड्यात पडायचे की नाही ही चर्चा करण्यापेक्षा त्या खड्ड्यातून बाहेर कसे पडता येईल यावर सोच विचार करायला हवा...
इम्रानखान आधी मारलेल्या आत्महत्या करीन अशा फुशारक्यांमधे कसा अडकत चालला आहे ते...
रौफ क्लासरा आणि आमीर मतीन पाक जंभूरियत - लोकशाही- तील सध्याचे वझीरे आझम इम्रान खान आणि अर्थ मंत्री आसद उमर आय एम एफ च्या कर्जाविषयी कसे बेईमान आहेत ते ऐका...

माहितगार's picture

17 Oct 2018 - 9:14 am | माहितगार

पाकिस्तान समोरचे परकीय चलन गंगाजळीतील तुटवड्याचे नेमके संकट खालील युट्यूब मधून समजून यावे. हा युट्यूब जरासा स्लो मोशन मध्ये पाहिल्यास आलेख नीट अभ्यासता येऊ शकतील.

आणि भारतीय कुटनितीक डिप्लोमॅटीक दिशा काय असावी आणि भारतीय प्रभाव आणि मर्यादा खालील राज्यसभा टिव्ही वरील पॅनेल चर्चेतून लक्षात यावे.

भारतीय डिप्लोमॅटस पाकीस्तानला कोंडीत पकडून सरळ करण्याचा मार्ग म्हणून जी कुटनिती करायची ती पडद्यासमोर आणि मागे करत असतीलच. पण मुदलात पडद्या समोर आणि धार्मीक विषयावरुन पाकिस्तानी लोकांची चुकणारी भूमिकांवर उघद टिका करण्याचे डिप्लोमॅटस / राजदूतांचे ऑप्शन्स मर्यादीत असतात.

वस्तुतः ज्या अर्थी पाकिस्तानची निर्मिती इस्लामीक तत्वांवर झाली आणि इस्लामिक देश म्हणून मिरवतो त्या अर्थी त्यांना त्यांच्या ग्रंथ प्रमाण्य आधारीत अंधश्रद्धांवर अवाजवी विश्वास आहे. त्यांचे आधार ग्रंथ वस्तुतः ऋण देण्या घेण्यास अगदी कोणत्याही स्थितीत मान्यता देत नाहीत. आणि उदाहरण ओटोमन साम्राज्याचे असो वा पाकिस्तानचे ऋण घेण्या शिवाय त्यांचे पानही हललेले नाही. या मुद्यावरुन भाजपा वरीष्ठ राजकारणींनी गाजावाजा करुन त्यांच्या धर्मसंस्थेतील अर्थशास्त्रातील अवाजवी हस्तक्षेपाच्या अंधश्रद्धेवर कडाडून टिका करावयास हवी ती होताना दिसत नाही. (संदर्भ :धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा )
२) सौदी ते ईराण इस्लामिक देशाम्ची पाकिस्तानला आर्थीक संकटातील मदत पुरेशी कधीच आलेली नाही जी आली ती विना अटही आलेली नाही मग कोणत्या पॅन इस्लामिक स्वप्नांच्या मागे पाकीस्तानी मुस्लिम धावत असतात या मुद्यावरही भाजपा तून कडाडून टिका होताना दिसत नाही.

३) चीन सारख्या नास्तीक देशा समोर नाक घासण्यावरही कडाडून टिका केली जाण्यास संधी असावी

या टिकेच्या संधी यशस्वीपणे वापरुन घेण्यात भाजपा राजकारणी कमी पडतात असे वाटते.

पाकिस्तान जेवढा अस्थिर तेवढी भारताला सतत डोकेदुखी राहणार .पाकिस्तान च्या भीतीपोटी संरक्षण , कायदा आणि सुव्यवस्था वर हजारो कोटी खर्च होणार हे नक्की .
जर पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे पॅकेज नाही भेटले तर इम्रान खान ला कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा करणे अवघड आहे .
जावई आर्थिक संकटग्रस्त असेल तर सासऱ्याने त्याला मदत करावी किंवा इतर कोणी मदत करत असेल तर शुक्राचार्य बनू नये अशी अवस्था भारताची झाली आहे .

मदनबाण's picture

19 Oct 2018 - 6:49 pm | मदनबाण

अस्थिर पाकिस्तान म्हणजे म्हणजे आपल्याला अधिक ताप !
यावेळी पाकिस्तानने आगळिक केल्यास त्याला चांगले भाजुन काढण्याची आपण व्यवस्था करुन ठेवावी.

जाता जाता :- आपल्या जवानांना सातत्याने अत्यंत क्रूरपणे आणि अमानविय पद्धतीने ठार केले जात आहे, आपल्या देशातील लोकांची सहनशीलता कधी संपणार का ? असा मी अधे मधे विचार करत असतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Deadly Weapons of Indian Army

शशिकांत ओक's picture

30 Oct 2018 - 9:39 am | शशिकांत ओक

"Attorney general sahab, if you were aware that the secretary Establishment was behind the transfer, you could have called him too," the CJP said. "Should we now sit and play Ludo while we wait for him to come here?"

डॉन मधील बातमी...
सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या वरील वक्तव्यावरून 'आय जी इस्लामाबाद'ची तडकाफडकी बदलीचे हुकूम इम्रान खान यांनी तोंडी दिले होते का? यावर आपणहून (सु मोटो) चौकशीचे आदेश दिले होते. या आधी इम्रान खान यांची पत्नीच्या पहिल्या नवर्‍याच्या मुलीला छेडले म्हणून आयजी पंजाब ला रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी बदलीचा हुकूम दिला होता. (ती केस ही आम्ही हाताळतो आहे!) अहो हे काय चाललय? कायद्याचे राज्य आहे की पुढाऱ्यांची, त्यांच्या नातेवाईकांची अरेरावी? यावर काल २९ ऑक्टोबर ला वैतागून तो (साक्षीदार) येई पर्यंत आपण सुप्रीम कोर्टात ल्युडो खेळत बसू या का? असे ते म्हणाले...
पाकिस्तान मधील परिस्थिती... अशी आहे...

माहितगार's picture

30 Oct 2018 - 4:56 pm | माहितगार

पाकीस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आय वर टिका केली म्हणून पाकीस्तानी सुप्रीम कोर्टाच्या एका जजला गेल्या महिन्याभरात सॅक केले गेले . तिथे ना ईम्रान, ना नवाझ ना सुप्रीम कोर्ट कुणि पण आर्मी आणि आय एस आयच्या मर्जी पलिकडे जाऊ शकत नाही.

शशिकांत ओक's picture

2 Nov 2018 - 11:38 pm | शशिकांत ओक

खतरनाक है... पर चीनीयों ने जो जुल्म बरपा है उसका क्या करें... 1 नोव्हेंबर 2018 ची डोकेदुखी...
चिनी लडकियां बरोबर से शादी करून पाकिस्तानी पुरुष घरजमाई म्हणून चीन में राहात असताना... दाढ्या ठेवायच्या नाहीत, कुराण वाचायचे नाही, मशिदी बंद वगैरे अत्याचारांनी परेशान झैद हमीद उर्फ लाल टोपी पुराना दोस्त दुश्मनी पर उतर आया है....