सावरी...
हळुवार सोडवावं
एकेका आठवणीचं पान..
कुठ्ठं फाटू न देता, न चुरगळता...
निगुतीनं घड्या घालून
होड्या कराव्या त्यांच्या..
आणि सोडून द्याव्या अलगद,
वाहत्या आयुष्यावर...
खरंच असं करून बघ.
खरंच..
मग पुन्हा एकदा अनुभवशील
सावरीचं हल्लक मोकळेपण...
अगदी मन भरून...
अगदी तरल
निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर...अगदी तरल.....आयड्याची कल्पना भारीये !!
कविता आवडली!
मस्त
कविता आवडली.