तांब्याश्री

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
26 Aug 2018 - 7:38 pm

तांब्याश्री

ऋणनिर्देश : मिपावरील सूप्रसिद्ध ( कि शीप्रसिद्ध म्हणावे ब्रे) तांब्याश्रीं पासून प्रेर्र्रना घेऊन खटपट करून जमवलेले मोकल शौचाव्य.
थीमनिर्देश : अशा प्रकारच्या विषयासाठी मूळ कवीचा नामोल्लेख टाळला आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

मिशेरी लावता लावता, जोरात कळ आली
अरे पुन्हा उचल तांब्या, पोट कर ते खाली ॥धृ.॥

आम्ही दार उघडण्याची वाट किती बघावी
कडी वाजवुनी जोरात घाई सूचित करावी
साहवेना प्रेशर आता, कशी दाबूनी धरावी ॥१॥

संडासात त्यांनी केले पोट त्यांचे मोकळे
आतषबाजीसह तयाचा गंध सर्वत्र दरवळे
आम्ही मात्र बाहेर उभे, काय करू नकळे ॥२॥

उठली ती पोटामध्ये एक मोठी तीव्र कळ
कशी आवरू हि मज आतील पळापळ
धाव धाव तांब्या आता, सोसवेना फारकाळ ॥३॥

वाजली असे वाटे सखया कडी ती आतली
उघड उघड दार आता लई अरजाण्ट आली
मीच आता पयला, माझ्या मागे रांग थोरली ॥४॥

उघडले द्वार स्वर्गाचे आला आला तो क्षण
हल्लक मोकळा मोकळा मी, प्रफुल्लित मन
जगी सर्व सुखी असा, मजविन दुजा कोण? ॥५॥

मज प्रिय जागा अशी ती आत सर्व नागडे
काही लोकां नशिबी मात्र रूळ उघडे वाघडे
हागणदारीमुक्त परिसर करू चला या ना-गडे ॥६॥

मिशेरी लावता लावता, जोरात कळ आली
अरे पुन्हा उचल तांब्या, पोट कर ते खाली ॥धृ.॥

काहीच्या काही कविताजिलबीमुक्त कवितामुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

27 Aug 2018 - 12:34 pm | खटपट्या

चांगली पडलीय...

टवाळ कार्टा's picture

27 Aug 2018 - 1:21 pm | टवाळ कार्टा

लै दिवसांनी अस्सल ताजी ताजी क्विता झालेली आहे =))

टर्मीनेटर's picture

27 Aug 2018 - 1:29 pm | टर्मीनेटर

:) :) :-)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2018 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा

छान शिकार केलीत! =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2018 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा

पण बरच कुंथावं लागलेलं दिसतंय!!!! =)))))

संथा घ्यावी सांप्रत काळी!
टळे कुंथणे प्रात:काळी !!
लाभे शिष्य त्रिकाळी , सदोदित!!!

संकलक नाखु वाचकांची पत्रेवाला

हम्म, फायबरचं प्रमाण वाढवावं लागणार तर !

खिलजि's picture

29 Aug 2018 - 1:38 pm | खिलजि

हगावे परी वासरूपे उरावे

नाक चोंदूनि बाहेरच्याने पडावे

कर्कश्श पादोनि ऐसे दुमदुमावे

बाहेरच्यांचे हगने पळून जावे

चामुंडराय's picture

3 Sep 2018 - 3:06 am | चामुंडराय

.