खानावळ - एक शतशब्दकथा

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
29 Jul 2018 - 10:42 am

एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती.
सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत.
जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे.
तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली.
काही नवीन मेंबर आले.
त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली.
कंत्राटदार गयावया करु लागला.
शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली.
त्यानंतर आणखी मेंबर आले.
ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले.
जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला.
पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली.
वातावरण फार गढुळ झाले.
नवीन मेंबरांची आपापसात भांडणे सुरु झाली.
कंत्राटदार तर जेरीस आला.
नासधूस सुरु झाली.
शेवटी, जुन्या मेंबरांनी, मुकाट्याने दुसर्‍या खाजगी खानावळीचा रस्ता धरला.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

29 Jul 2018 - 3:47 pm | ज्योति अळवणी

Hmmmm....

यशोधरा's picture

30 Jul 2018 - 5:22 pm | यशोधरा

खरंय. त्यापेक्षा जुन्या मेंब्रांनी चांगला चोप देऊन पळवून लावायला हवे अशा फुकट खाऊ ऐदयांना!!

नाखु's picture

30 Jul 2018 - 10:14 pm | नाखु

जुन्या जाणत्या मेंबराना त्यातलेच काही नको असतील तर नव्यांच्या आडून हे केलं नसेल कशावरून???

तसंही मालक २४ तास नसतेत तेंव्हा मी लै मामा असा आविर्भाव तोरा आपण पाहीला नाही का मैय्या!!

मामा= मालकाचा माणूस

उगा चिल्लर मेंबर नाखु बिनसुपारीवाला

स्मिता.'s picture

30 Jul 2018 - 7:11 pm | स्मिता.

ही खंत अनेक दिवसांपासून जाणवतेय आणि आज एकाच अर्थाचे दोन धागे!!
मला वाटतं जुन्या मेंबरांनी पाठ फिरवल्याने आज खानावळीला हे दिवस आलेत.

भन्नाट भास्कर's picture

30 Jul 2018 - 10:22 pm | भन्नाट भास्कर

खानावळ शीर्षक वाचून शाहरूख, सलमान, आमीर आठवले :)

येनीवेज,
Change Is The Only Constant Thing In This World
हेच खरे !

हे मराठा आरक्षणा संदर्भात असल्याचा वास मला येतोय, आणिक कुणाला असं जाणवलं का?

प्राची अश्विनी's picture

2 Aug 2018 - 6:14 pm | प्राची अश्विनी

मलाही असं वाटलं.

विवेकपटाईत's picture

8 Aug 2018 - 9:24 am | विवेकपटाईत

मी पुन्हा मिपाव खानावळीत जोमाने लिहायला सुरवात करणार आहेत. पळून जाणार नाही.

फक्त छान छानच लिहा

ओंडक्यातला नाखु ओंडके

चिगो's picture

13 Aug 2018 - 4:52 pm | चिगो

म्हणूनच खानावळीकडे फारसे फिरकत नाही अनेक मेंबर.. असोच.
ते Change is the only constant का काय म्हणतात, तसंच..