एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती.
सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत.
जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे.
तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली.
काही नवीन मेंबर आले.
त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली.
कंत्राटदार गयावया करु लागला.
शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली.
त्यानंतर आणखी मेंबर आले.
ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले.
जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला.
पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली.
वातावरण फार गढुळ झाले.
नवीन मेंबरांची आपापसात भांडणे सुरु झाली.
कंत्राटदार तर जेरीस आला.
नासधूस सुरु झाली.
शेवटी, जुन्या मेंबरांनी, मुकाट्याने दुसर्या खाजगी खानावळीचा रस्ता धरला.
वाचने
3657
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
Hmmmm....
Hmmmm....
खरंय. त्यापेक्षा जुन्या
खरंय. त्यापेक्षा जुन्या मेंब्रांनी चांगला चोप देऊन पळवून लावायला हवे अशा फुकट खाऊ ऐदयांना!!
असं कसं
In reply to खरंय. त्यापेक्षा जुन्या by यशोधरा
जुन्या जाणत्या मेंबराना त्यातलेच काही नको असतील तर नव्यांच्या आडून हे केलं नसेल कशावरून???
तसंही मालक २४ तास नसतेत तेंव्हा मी लै मामा असा आविर्भाव तोरा आपण पाहीला नाही का मैय्या!!
मामा= मालकाचा माणूस
उगा चिल्लर मेंबर नाखु बिनसुपारीवाला
खरंय
ही खंत अनेक दिवसांपासून जाणवतेय आणि आज एकाच अर्थाचे दोन धागे!!
मला वाटतं जुन्या मेंबरांनी पाठ फिरवल्याने आज खानावळीला हे दिवस आलेत.
खानावळ शीर्षक वाचून शाहरूख,
खानावळ शीर्षक वाचून शाहरूख, सलमान, आमीर आठवले :)
येनीवेज,
Change Is The Only Constant Thing In This World
हेच खरे !
हे मराठा आरक्षणा संदर्भात
हे मराठा आरक्षणा संदर्भात असल्याचा वास मला येतोय, आणिक कुणाला असं जाणवलं का?
मलाही असं वाटलं.
In reply to हे मराठा आरक्षणा संदर्भात by Ram ram
मलाही असं वाटलं.
मी पुन्हा मिपाव खानावळीत
मी पुन्हा मिपाव खानावळीत जोमाने लिहायला सुरवात करणार आहेत. पळून जाणार नाही.
लिहायला सुरुवात करावी
In reply to मी पुन्हा मिपाव खानावळीत by विवेकपटाईत
फक्त छान छानच लिहा
ओंडक्यातला नाखु ओंडके
हम्म..
म्हणूनच खानावळीकडे फारसे फिरकत नाही अनेक मेंबर.. असोच.
ते Change is the only constant का काय म्हणतात, तसंच..