Skip to main content

खानावळ - एक शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी रविवार, 29/07/2018 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती. सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत. जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे. तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली. काही नवीन मेंबर आले. त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली. कंत्राटदार गयावया करु लागला. शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली. त्यानंतर आणखी मेंबर आले. ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले. जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला. पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली. वातावरण फार गढुळ झाले. नवीन मेंबरांची आपापसात भांडणे सुरु झाली. कंत्राटदार तर जेरीस आला. नासधूस सुरु झाली. शेवटी, जुन्या मेंबरांनी, मुकाट्याने दुसर्‍या खाजगी खानावळीचा रस्ता धरला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3626
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

Hmmmm....

खरंय. त्यापेक्षा जुन्या मेंब्रांनी चांगला चोप देऊन पळवून लावायला हवे अशा फुकट खाऊ ऐदयांना!!

In reply to by यशोधरा

जुन्या जाणत्या मेंबराना त्यातलेच काही नको असतील तर नव्यांच्या आडून हे केलं नसेल कशावरून??? तसंही मालक २४ तास नसतेत तेंव्हा मी लै मामा असा आविर्भाव तोरा आपण पाहीला नाही का मैय्या!! मामा= मालकाचा माणूस उगा चिल्लर मेंबर नाखु बिनसुपारीवाला

ही खंत अनेक दिवसांपासून जाणवतेय आणि आज एकाच अर्थाचे दोन धागे!! मला वाटतं जुन्या मेंबरांनी पाठ फिरवल्याने आज खानावळीला हे दिवस आलेत.

म्हणूनच खानावळीकडे फारसे फिरकत नाही अनेक मेंबर.. असोच. ते Change is the only constant का काय म्हणतात, तसंच..