Skip to main content

गुरू

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/07/2018 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे चिंतन ज्यांना मोहविते त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा इंद्रधनूसही वाकविते जटिल समस्या त्यांच्या हाती पडता सरळ,सुलभ होते विभिन्न अस्फुट पैलूंमधले नाते अलगद उलगडते आदिम अनघड पत्थरातही सुबक शिल्प त्यांना दिसते केवळ प्रज्ञा-स्पर्शे त्यांच्या हीणाचे सोने बनते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2968
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

व्वा यात्री साहेब , बर्याच दिवसांनी आगमन झालेले आहे . सुंदर कविता आहे .

देणार्‍या सर्वांना धन्यवाद.