ये रे ये रे पावसा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
1 Jun 2018 - 6:27 pm

मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला

अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला

बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत
तुझ्या ढगफुटीत तुंबायला.

यंदा तरी भरभरून येशील?

बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2018 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व मिपाकरांना, सर्व पाऊस कविंना, पावसाची वाट पाहणा-या सर्व शेतक-यांना, सामान्य जनतेला पहिल्या पावसाच्या तहेदिलसे शुभेच्छा....!

'भाव अत्तराचे आज पार कोसळले'
'थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले'

'ल' आलं लं.......!

-दिलीप बिरुटे

एस's picture

2 Jun 2018 - 12:26 am | एस

वा वा!

लहान पणी पाउस मजेदार असतो
शाळेला सुट्टी मिळते म्हणून तो आवडतो

जरा मोठं झाल्यावर तो रोमँटीक होतो
ती बरोबर असताना तो येतच रहावासा वाटतो

त्या नंतर मात्र काही दिवस त्याचा वैताग येतो
कारण तो ऐने वेळी येउन तो ऑफिसची वेळ चुकवतो

आणि म्हातातपणी तो परत तारुण्याच्या आठवणीत रमून जातो
ती जवळच असल्याचा क्षणभर का होईना पण अनूभव देउन जातो

हा पाउस ना मोठा बहूरुपी असतो
असतो तोच
पण प्रत्येक वेळी नव्या रुपात समोर येतो

त आला त

पैजारबुवा,

अभिजीत अवलिया's picture

2 Jun 2018 - 5:12 pm | अभिजीत अवलिया

'भाव अत्तराचे आज पार कोसळले'
'थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले'

वा !!!

टवाळ कार्टा's picture

1 Jun 2018 - 9:05 pm | टवाळ कार्टा

"ये रे ये रे *सा" असे एक लैच विस्फोटक इडंबन डोक्यात आलेय....लिहिले तर आयडीला पंख लागायचे =))

सर इथे न मागता मुभा घेतोय , असं म्हणा चान्स घेतोय . रांगोळी आलीय का ते सांगा ?

तो वाट पाहता होता

आज येईल, उद्या येईल

नेहेमी शेतात नांगर नांगर खेळायचा

सोबत कुणी नसलं तरी बैल असायचं

राबत कुणी नसलं तरी त्ये खेळायचं

उपसून उपसून माती लालबुंद झाली

आणि नांगरही लालबुंद झाला

ऐकल्या होत्या बातम्या चहूकडून त्याच्या आगमनाच्या

पण त्यो यायच्या आधीच , धनी मात्र झाडाला लटकला

सरकार आलं , छत्र्या घेऊन , सांत्वनासाठी

पाऊस रिपरिप पडत होता

त्यो अस्साच झाडाला लटकलेला

पंचनामा त्याचा चालू होता

पाऊस असेल कुणासाठी काही और

पण एकमात्र नक्की जरा उशिरा पडला

तर बळीराजासाठी बनतो काळजाचा घोर

सिद्धेश्वर विलास पाटणकर

र आला " र "

नाखु's picture

2 Jun 2018 - 4:50 pm | नाखु

गुंतडा सोडून पावसात भिजायला लोणावळ्याला गेलो नाही
येता जाता भिजलो तर त्याची खंत नाही
मी चर्चा केली नाही,पण उपेक्षा पण केली नाही
पाऊस इमानेइतबारे येत राहीला कधी वेळ गाठून कधी वेळ काढून
मी भिजत राहीलो ऐन उन्हाळ्यात, तुझ्या आठवणींच्या चिंब वर्षावात, पाऊस नसतानाही

हा आलाय अभ्या

अनन्त्_यात्री's picture

3 Jun 2018 - 11:30 am | अनन्त्_यात्री

देणार्‍या सर्वांना धन्यवाद.

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2018 - 3:57 pm | अविनाशकुलकर्णी

येरे येरे पावसा
तुला देतो पेट्रोल

अनन्त्_यात्री's picture

5 Jun 2018 - 4:56 pm | अनन्त्_यात्री

का नाही?

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2018 - 3:57 pm | अविनाशकुलकर्णी

येरे येरे पावसा
तुला देतो पेट्रोल

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2018 - 4:05 pm | अविनाशकुलकर्णी

नवविवाहित पत्नीने स्नान झाल्यावर ओले रेशमी कुंतल झटकत "अहो"च्या चेहे-यावर ४ नाजूक थेम्ब उडवावेत
तेव्हढाच पाऊस पुण्यात पडला