आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .
" तुज्याजवळ जो काय पैसा आडका फोनबीन हाय ते बाहेर काढ , चल आटप लवकर . "
तो खूपच घाबरला . त्याचे हात थरथरत होते . खिशातून पैसे काढायलाही येईनात नीटनीटके . खाडकन एक कानाखाली बसली .
" ए आवर लवकर . "
त्याने खिशातले होते नव्हते ते पैसे त्याला दिले .
" हे काय हाय ही चिल्लर . "
" जेव्हढे होते तेव्हढे दिले सगळे . "
" ही दहाची नोट आन वर ही चिल्लर काय भिकारी समजलास का मला . "
" अहो ते पैसे कमी पडत होते म्हणून मी मागच उतरलो आणि चालत निघालेलो . "
" फोन ? "
" आजच दुरुस्तीला टाकला . "
" सगळ आजच झाल ? " "भडव्या "अस म्हणत त्यान त्याला झोडायला सुरूवात केली . चांगल झोडपल्यावर त्याच समाधान झाल असाव .
" साला आज टाळक सटाकलय आणि हेच भेटायच होत . " म्हणत तो निघाला . इकड याला बरच लागल होत . तो जमीनीवर पडला होता . कपडे सगळे धूळीने माखले होते . कुठकुठ फाटलेही होते . हाताला खरचटल होत . गुढघे फुटले होते . ओठातून रक्त येत होत . तो हात टेकवून कसातरी उठायचा प्रयत्न करत होता तेव्हढ्यात त्याच्या हाताला काहीतरी लागल नेमक जिथे लागल होत तिथेच तो दगड लागला तो कळवळला पण क्षणभरच अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी आल आणि तो ताडकन उठला त्याच्या हातात दगड होता . समोर तो पाठमोरा . दोन तीन ढेंगामधेच त्याच्यापाशी पोहोचला आणि हातातला दगड सरळ त्याच्या डोक्यात घातला . तो थेट जमीनीवर तडफडत पडला होता . तोच दगड उचलून परत परत .... किती वेळा मारत होता माहीत नाही .
सकाळी उठल्यापासून सगळ अंग ठणकत होत . डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता .
" काय झाल मारहाण की काय ? " डॉक्टरांनी विचारल .
" नाही पडलो . "
" झेपेल एव्हढीच घ्यावी . दिवस चांगले नाहीत काल एकाचा खून झालाय दगडाने ठेचून . "
=====================================================
" अहो एव्हढे होत नाहीत मी रोज येतो . "
" ए एव्हढेच होतात एकदा सांगितल ना तूला . " रिक्षावाल्याचा आवाज चांगलाच चढला होता .
रस्ता तसा बराच सामसूम होता . त्याला मागून ढकलल तरीही त्याला फरक पडत नव्हता . त्याची नजर भिरभिरत होती काहीतरी शोधत होती . आता त्याचा शोध बहूदा पुरा झाला होता आणि नजर आता खिळली होती समोरच्या दगडावर . त्याला परत मागून ढकलल तसे त्याचे डोळे चमकले आणि ओठावर एक हसू उमटल ......
प्रतिक्रिया
28 Mar 2018 - 12:06 am | एस
बाप रे! भयानक. :-)
28 Mar 2018 - 12:15 am | मार्मिक गोडसे
वास्तव?
2 Apr 2018 - 5:12 pm | चांदणे संदीप
जवळपास जव्हेर ष्टाईल वाटली मला. चांगली आहे.
Sandy
3 Apr 2018 - 11:17 am | jamesrao bondpatil
..
4 Apr 2018 - 12:15 am | प्रियाभि..
जव्हेर ची नै.. बेफी ची नवी आयडी
3 Apr 2018 - 9:38 pm | अनाहूत
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभार
4 Apr 2018 - 3:02 pm | मराठी कथालेखक
कथा आवडली..
4 Apr 2018 - 5:19 pm | पुंबा
जंक्शन..
आवडली
4 Apr 2018 - 7:30 pm | पद्मावति
बापरे...
मस्तच जमलीय कथा.
4 May 2018 - 3:20 pm | राहूल.
आवडली कथा
8 May 2018 - 4:19 pm | जेम्स वांड
डोंबिवली फास्टचे हिंसक चित्रण वाटले!
5 Jun 2018 - 10:12 pm | अनाहूत
धन्यवाद
8 Jun 2018 - 3:17 pm | शित्रेउमेश
भयानक आहे हे....