Skip to main content

...... कशाला ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/03/2018 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हापुन्हा मी क्षणोक्षणी सावरू कशाला उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला तिला जरासा हवा अबोला रुसावयाला जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला असे कसे बोलणे सखीचे मला कळेना जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला जगावयाला हवे कशाला नवे बहाणे सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला वृत्त : सती जलौघवेगा लगालगागा लगालगागा लगालगागा © विशाल कुलकर्णी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6474
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कधिकधी असल्या लटक्या (खोट्या) समर्थनाची गरज लागते प्रत्येकाला, पैजारबुवा,

खुप सुंदर गज़ल विकुशेठ ! " आमचे एक ज्येष्ठ गज़लकार मित्र एका कट्ट्याला म्हणालेले कि काफिया रदीफ वृत्त वगैरे क्ठोर बंधने पाळायची म्हणजे कृत्रिमता असणारच पण त्या कृत्रिमतेतही सौंदर्य असणे ही गझलियत आहे ! आईंचं आईं होणं हि कविता आहे पण बापाचं आई होणं ही गझलियत आहे !! " ह्या वाक्याची आठवण झाली ! कृत्रिमता आहे पण ती असुनही वाह क्या बात है अशी दाद मनात येणे हेच गज़लेचे यश मानतो आम्ही ! पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला वाह क्या बाय है !! कसलं भारी लिहिलंय राव!! _________/\____________

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या क्षेत्रातील आमचे ज्ञान अत्यंत खुजे आहे , आपलेपणा आहे म्हणुन कृत्रिमता वगैरे बोललो, राग नसावा ! आनंदकंद किंव्वा भुजंगप्रयात जितके नैसर्गिक वाटते तितके हे वृत्त ( मला माझ्या अप्लस्वल्प वाचनामुळे) नैसर्गिक वाटत नाही इतकेच म्हणायचे होते. अधिकार नसता लिहिले | क्षमा केले पाहिजे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

येताना डबाभर चाकलेटं घेवून या, म्हणजे क्षमा करायची की नाही ते ठरवता येइल ;) मनःपूर्वक आभार देवानू !

मस्त ! कवितेपेक्षा कैफं आवडला.