आज ती मला भेटायला येणार होती. अजूनही का येत नाही ? दरवेळी ही उशिरच करते. या वेळेस चांगलाच जाब विचारणार आहे मी.
मी हा विचार करतोच आहे तेवढयात तिच्या बांगड्यांचा आवाज आला. एखादया महाराणीच्या आगमनाची वर्दी सेवे-याने द्यावी तशीच वर्दी ह्या बांगड्या देत असत.
"कसा आहेस ?"
"ठीक ..आजही तू उशीर केलास.."
ती फक्त हसली आणि आमचा सगळा राग निवळलासुदधा
ती काहीबाही बोलत राहिली. मी फक्त ऐकत राहिलो. निर्विकार होऊन मी फक्त पहात राहिलो.
"मॅडम आज का टाईम खतम हो गया. अगली तारीख को आना अभी"
त्याच्या कमावलेल्या पोलिसी आवाजात हे वाक्य ऐकले तेव्हा आपण प्रत्यक्षात कुठे आहोत याची दुखरी जाणिव झाली..
प्रतिक्रिया
21 Dec 2017 - 6:19 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम... आवडली!
21 Dec 2017 - 8:37 pm | चांदणे संदीप
चांगली आहे
Sandy