दुपारच्या कविता.

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
14 Oct 2008 - 7:07 pm

टच् टच वाजती जोडवी
किण् -किणती काकण
माडीवर कशी येऊ
आई दारात राखण.

******
कशी उठू कशी बसू
दाराआड उभी सासू
चाळ -पाखड करून
कसं सैलावलं नेसू.

*******
वही नको बुकं नको
नको आता उजळणी
तीळ मोजून संपले
पुरे झाली शिकवणी.

******

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

14 Oct 2008 - 7:24 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आता ह्या समस्येवर उपाय पण लिहा.

मुक्तसुनीत's picture

14 Oct 2008 - 7:51 pm | मुक्तसुनीत

कविता (नेहमीप्रेमाणेच) आवडली. आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..." त्या सुंदर कवितेत (आणि बाळासाहेब नि लताबाईनी अजरामर केलेल्या गाण्यात !) असा घरगुती, घरंदाज गोष्टी येतात. "नाही कशी म्हणू तुला , विडा रे दुपारी . परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी..." रामदासांच्या कवितेत नवपरिणित पत्नीच्या भावना "टच टच" वाजणार्‍या जोडव्यांच्या प्रतिमेत फारच सुंदर व्यक्त झाल्यात.

ग्रेसच्या एका लेखात "तांदूळ मोजणार्‍या मुली" येतात - "निवडणार्‍या" नव्हे , "मोजणार्‍या" . इथे तीळ आहेत. या "मोजण्यातून" अशा , संसाराच्या गाड्यात अडकलेल्या आणि प्रसंगी हळुवार भावनांची परवड होणार्‍या स्त्रियांची व्यथा अधोरेखित होते.

रामदास यांच्या कवितेतून पूर्वसुरींच्या दिग्गजांची आठवण येते. (मागच्या एका कवितेच्या बाबतीत जी ए / डाहाके यांचा मी उल्लेख केला होता.) आज सत्यकथा असती तर त्यांच्या कविता तिथे आल्या असत्या असे वाटते. मिसळपाववरील थिल्लरपणाचे आरोप करणार्‍याना या कविता दाखवाव्यात. तेव्हढे बस्स आहे. :)

मिसळ's picture

14 Oct 2008 - 9:16 pm | मिसळ

मला वाटते हे तीळ आहेत ते अंगावरचे असावेत आणि कविता श्रुंगारिक अर्थाने असावी.

अभिजीत's picture

14 Oct 2008 - 8:37 pm | अभिजीत

सुंदर कविता.

>>आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..."
मलाही असेच वाटले..

त्याच बरोबर आरती प्रभूंची थोडिशी आक्रमक असलेली 'लव लव करी पातं' ही कविताही आठवली
त्यातले हे एक कडवे -

तट तट करी चोळी
तुट तुट गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे
पारुबाई साठीची

- अभिजीत

लिखाळ's picture

14 Oct 2008 - 9:20 pm | लिखाळ

तीळ मोजून संपले
पुरे झाली शिकवणी.

छान आहे कविता.
--लिखाळ.

धनंजय's picture

14 Oct 2008 - 9:22 pm | धनंजय

छानच!

पण पहिली लयीत म्हणायला मला कठिण जाते आहे...

घाटावरचे भट's picture

14 Oct 2008 - 10:26 pm | घाटावरचे भट

'माडीवरती येऊ कशी' केल्यास कसें? ठुमकणारी लय मिळते...लहान मुलांच्या गाण्यातली (वृत्त वगैरे आपल्याला समजत नाय बॉ...)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

धनंजय's picture

14 Oct 2008 - 10:52 pm | धनंजय

टच् टच वाजती जोडवी
किण् -किण करती काकण
माडीवर कशी येऊ
दारात आईची राखण.

असे काही मला ठीक वाटते. पण स्वर ओढून ताणून जसे लिहिले आहे तसेही म्हणता येते :
टच् टच वाजती जोडवी
किण्ऽ -किणती काकण (किंवा किण् -किणतीऽ काकण)
माडीवर कशी येऊ
आई दारात राखण. (ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते. राखण=राखणदार असा अर्थ असल्यास ठीक आहे. पण हा अप्रसिद्ध अर्थ डोक्यात येईपर्यंत ओळ संपली नाही असे चुकल्याचुकल्यासारखे वाटते.)

घाटावरचे भट's picture

14 Oct 2008 - 10:55 pm | घाटावरचे भट

>>ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते
सहमत. मी फक्त ठेक्याचाच विचार केला (नेहेमीप्रमाणे) :(

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

राघव's picture

16 Oct 2008 - 7:10 pm | राघव

चालेल -
दारात आईची राखण.
दारी आईची राखण.

बाकी कविता छानच.
मुमुक्षु

बेसनलाडू's picture

14 Oct 2008 - 10:21 pm | बेसनलाडू

नेहमीप्रमाणेच छान!
(आस्वादक)बेसनलाडू

सर्वसाक्षी's picture

14 Oct 2008 - 10:48 pm | सर्वसाक्षी

कविता, आवडली.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2008 - 12:26 am | विसोबा खेचर

रामदासराव,

वा वा! सुंदर कविता...

आपला,
(दुपारच्या वेळेला हळूच कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तात्या. ;)

टारझन's picture

15 Oct 2008 - 3:13 am | टारझन

(दुपारच्या वेळेला हळूच कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तात्या.

आगायायायाया =)) =)) =))
च्यायला .. ह्यो तात्या अंमळ चालु माणुस दिसतोय .... डेंजर टाकलाय एकदम ....

अवांतर : कविता अंमळ भावली आहे.. आम्ही दृष्य इमॅजिन (मराठी शब्द) करु शकतो .. जबर्‍या

(कोणत्याही वेळेला हळूच कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तार्‍या

आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अरुण मनोहर's picture

15 Oct 2008 - 7:59 am | अरुण मनोहर

वही नको बुकं नको
नको आता उजळणी
तीळ मोजून संपले
पुरे झाली शिकवणी.

मस्त कविता. थीअरी घोटून पाठ झाली आता प्रॅक्टीकलचा तास सुरू कराना!

टुकुल's picture

15 Oct 2008 - 8:09 am | टुकुल

कशा सुचतात हो तुम्हाला अशा सुंदर कविता :-)
नेहमी सारखी खुप सुंदर कविता, अजुन येवुद्यात.

टुकुल.

विजुभाऊ's picture

15 Oct 2008 - 10:01 am | विजुभाऊ

अती अवांतर :एक तीळ सात जणात वाटला
हे उगाच आठवले ;)

अवलिया's picture

15 Oct 2008 - 10:41 am | अवलिया

तिळा तिळा दार उघड

का नाही आठवले?

विसुनाना's picture

15 Oct 2008 - 10:20 am | विसुनाना

कविता आवडली.

आनंदयात्री's picture

16 Oct 2008 - 7:15 pm | आनंदयात्री

मस्त आहे प्रणयकविता !!
आमच्या धोंडोपंतांची ही दुपारची कविता आठवली !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2008 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तारुण्यविभोर भावअवस्थेचे सुंदर वर्णन.

आम्हालाही-

कसा ग गडे झाला ? कुणी ग बाई केला ?
राधे, तुझा सैल अंबाडा ची आठवण झाली :)

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2013 - 12:39 pm | प्रसाद गोडबोले

खुपच सुंदर !!

तिमा's picture

22 Mar 2013 - 12:08 pm | तिमा

कविता वाचून मन अगदी 'तिळ तिळ' तुटलं हो !