लेखकरामदासयांनी मंगळवार, 14/10/2008 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
टच् टच वाजती जोडवी
किण् -किणती काकण
माडीवर कशी येऊ
आई दारात राखण.
******
कशी उठू कशी बसू
दाराआड उभी सासू
चाळ -पाखड करून
कसं सैलावलं नेसू.
*******
वही नको बुकं नको
नको आता उजळणी
तीळ मोजून संपले
पुरे झाली शिकवणी.
******
कविता (नेहमीप्रेमाणेच) आवडली. आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..." त्या सुंदर कवितेत (आणि बाळासाहेब नि लताबाईनी अजरामर केलेल्या गाण्यात !) असा घरगुती, घरंदाज गोष्टी येतात. "नाही कशी म्हणू तुला , विडा रे दुपारी . परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी..." रामदासांच्या कवितेत नवपरिणित पत्नीच्या भावना "टच टच" वाजणार्या जोडव्यांच्या प्रतिमेत फारच सुंदर व्यक्त झाल्यात.
ग्रेसच्या एका लेखात "तांदूळ मोजणार्या मुली" येतात - "निवडणार्या" नव्हे , "मोजणार्या" . इथे तीळ आहेत. या "मोजण्यातून" अशा , संसाराच्या गाड्यात अडकलेल्या आणि प्रसंगी हळुवार भावनांची परवड होणार्या स्त्रियांची व्यथा अधोरेखित होते.
रामदास यांच्या कवितेतून पूर्वसुरींच्या दिग्गजांची आठवण येते. (मागच्या एका कवितेच्या बाबतीत जी ए / डाहाके यांचा मी उल्लेख केला होता.) आज सत्यकथा असती तर त्यांच्या कविता तिथे आल्या असत्या असे वाटते. मिसळपाववरील थिल्लरपणाचे आरोप करणार्याना या कविता दाखवाव्यात. तेव्हढे बस्स आहे. :)
सुंदर कविता.
>>आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..."
मलाही असेच वाटले..
त्याच बरोबर आरती प्रभूंची थोडिशी आक्रमक असलेली 'लव लव करी पातं' ही कविताही आठवली
त्यातले हे एक कडवे -
तट तट करी चोळी
तुट तुट गाठीची
उंबर्याशी जागी आहे
पारुबाई साठीची
- अभिजीत
टच् टच वाजती जोडवी
किण् -किण करती काकण
माडीवर कशी येऊ
दारात आईची राखण.
असे काही मला ठीक वाटते. पण स्वर ओढून ताणून जसे लिहिले आहे तसेही म्हणता येते :
टच् टच वाजती जोडवी
किण्ऽ -किणती काकण (किंवा किण् -किणतीऽ काकण)
माडीवर कशी येऊ
आई दारात राखण. (ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते. राखण=राखणदार असा अर्थ असल्यास ठीक आहे. पण हा अप्रसिद्ध अर्थ डोक्यात येईपर्यंत ओळ संपली नाही असे चुकल्याचुकल्यासारखे वाटते.)
>>ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते
सहमत. मी फक्त ठेक्याचाच विचार केला (नेहेमीप्रमाणे) :(
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
प्रतिक्रिया
समस्या
कविता
तीळ
In reply to कविता by मुक्तसुनीत
सालस भाव
छान
वा!
सूचना
In reply to वा! by धनंजय
असे काही
In reply to सूचना by घाटावरचे भट
>>ठेका ठीक
In reply to असे काही by धनंजय
कदाचित असे..
In reply to असे काही by धनंजय
मस्त
सुंदर
रामदासराव,
आगायायायायायायाअययययय
In reply to रामदासराव, by विसोबा खेचर
मस्त कविता.
च्या मारी...
अती अवांतर
तिळा तिळा दार उघड
In reply to अती अवांतर by विजुभाऊ
लाजरी उघडी कविता
मस्त
सुंदर कविता
अप्रतिम कविता !!
कविता