आनंदवन

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
20 Jun 2017 - 5:53 pm

मी नाही जाणत उगम तुझ्या दु:खाचा
तू पापी अथवा क्षण जगसी शरमेचा
प्रारब्ध तुझे वा आणी येथे तुजला
करुणेचा पाझर नाही चौकस इथला

नि:शंक निकट ये, हाती दे तव हात
या दु:खार्ता॑च्या देशी हाच प्रघात
परवलिची इथली एकच अनवट खूण
जरि जखम तुला, तरी माझे हृदय विदीर्ण

जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग
जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग
या निबिड अरण्यी, चल रचण्यास तराणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

संदीप-लेले's picture

20 Jun 2017 - 8:42 pm | संदीप-लेले

खरोखर ब्रीद उतरले आहे कवितेत !

सत्यजित...'s picture

21 Jun 2017 - 12:28 am | सत्यजित...

आनंदवनात सतत सुरु असलेल्या मानवधर्मसेवेच्या व्रताची ऱ्हदयंगम अनुभूती! अभिनंदन!!

पुंबा's picture

21 Jun 2017 - 11:47 am | पुंबा

वाह!! फार आवडली..

पद्मावति's picture

21 Jun 2017 - 1:48 pm | पद्मावति

____/\_____

धन्यवाद!