(पुर्वसूत्रः माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहूनच तिने तिच्या या अपराधाबद्दल स्पष्टिकरण दिलं...
"कोणीतरी अनोळखी पण इंडियन माणूस आहे. आवाजावरून वयस्कर वाटतोय, म्हणून कॉल घेतला...")
त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....
"हॅलो?"
"हॅलो, मी अमूकअमूक (माझं नांव) यांच्याशी बोलू शकतो का?" खरोखरच एक वयस्क भारतीय माणसाचा आवाज! बोलणं इंग्रजी पण द्रविडी उच्चारातलं!!
"तोच मी आहे"
"मी *** वैदिक केंद्राच्या वतीने बोलतोय. आम्ही आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम करीत असतो..."
मला आता अंदाज आला. असे बरेच फोनकॉल्स वेळोवेळी येत असतात. बहुतांश आर्थिक मदतीच्या अपेक्षेने. मलाच नाही तर आपल्यालाही येत असतील. आम्ही आपले त्यांची माहिती ऐकून घेतो आणि जर आमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल तर इतर सगळ्यांप्रमाणेच यथाशक्ति मदतही करतो. विशेष काही नाही, आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून!!
"बरं, पुढे बोला.."
"आम्ही आमच्या केंद्रातर्फे गोरक्षण आणि गोसंवर्धनाचे कार्य करत असतो."
आता गोरक्षण हा काही माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय नाही. मला रोगनिवारण, मुलांचे शिक्षण, दरिद्रतानिर्मुलन वगैरे एकंदरित "माणसांचे" रक्षण आणि संवर्धन यात जास्त इंटरेस्ट आहे. पण मनात म्हटलं, मी कोण ठरवणारा? एखाद्याला गोरक्षणातही इंटरेस्ट असू शकतो.
"माफ करा, आपल्याबद्दल मला आदर आहे पण मला काही गोरक्षणाच्या कार्यात फारसा रस नाही" मी सत्य सांगून टाकलं आणि माझ्या कादंबरीकडे वळलो.
"माफ करा सर, पण मी तुम्हाला हे कार्य अतिशय पुण्यवान आणि महत्त्वाचं आहे हे जर चर्चा करुन पटवून दिलं तर तुम्ही त्यात रस घ्याल का?"
म्हातारबुवांच्या या धिटाईचं मला कौतुक वाटलं.
"जरूर! तुम्ही तसं केलंत तर मी जरूर माझं मत बदलीन."
म्हणून मी पुढे विचारलं,
"तुम्ही गोरक्षण आणि गोसंवर्धन करता म्हणजे नक्की काय करता?" मी असा रस दाखवत असलेला बघून म्हातारबुवांनाही हुरूप आला.
"आम्ही गोमातेला खाटिकखान्यात जाऊन कत्तल होण्यापासून वाचवतो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गाय ही देवता आहे. तेंव्हा अशा ह्त्येसाठी चालवलेल्या गाईना आम्ही विकत घेतो आणि आमच्या गोशाळेत ठेवतो."
"तुम्ही मूळचे कुठले? तुमच्या उच्चारांवरून तुम्ही दाक्षिणात्य वाटता..." माझी चांभारचौकशी...
"यास सार, आयम फ्रॉम त्रिचनापल्ली. आय वर्क्ड इन त्रिचनापल्ली तहसील ऑफिस फॉर थर्टीसेवन इयर्स!! आयम नाऊ इन द युएस फॉर लास्ट वन इयर!!"
"इथे कसे काय?"
"माझी मुलगी लग्न होउन इथे असते. मी रिटायर झाल्यापासून आता तिच्याकडेच असतो".
"अमेरिकेत तुमचा वेळ घालवण्यासाठी हे केंद्राचे कार्य करता वाटतं," मी व्रात्यपणे एक गुगली टाकला. खरंतर मी नव्हे, माझ्या पोटात गेलेल्या शिवास रीगलने टाकला.....
"यास स्सार", माझ्या अपेक्षेप्रमाणेच आपण कधी त्रिफळाचीत झालो हे म्हातारबुवांना कळलंही नाही...
"बरं, भारतात कुठे आहे तुमची ही गोशाळा?"
"भारतात नव्हे, इथे अमेरिकेतच व्हर्जिनियामध्ये आहे आमची गोशाळा"
"आँ!!!!" आता त्रिफळाचीत व्हायची माझी पाळी होती....
"भारतातल्या गायींना इथे आणून ठेवता?" काय युएस इमिग्रेशनने गाईंसाठी सुद्धा ग्रीनकार्ड सिस्टीम चालू केलीय की काय!!!! काय सांगता येत नाही, या जॉर्ज बुशच्या अमदानीत काहीही अशक्य नाही!!!!
"भारतातल्या नव्हे सर, आम्ही इथल्या अमेरिकन गाईंनाच सोडवून आमच्या या व्हर्जिनियातल्या गोशाळेत ठेवतो. आत्तापर्यंत एक्काहत्तर गाई बाळ्गल्या आहेत आम्ही...."
आता भारतात काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाल्याने त्यांनी विकलेल्या गाई खाटिकखान्याकडे नेतात हे मला ठाऊक आहे. अशा गाईंना सोडवून त्या परत शेतकर्यांना देणं हे मी एकवेळ समजू शकतो. पण इथल्या अमेरिकेतल्या गलेलठ्ठ गाईंची सोडवणूक? आता मला हा सर्व प्रकार जाम विनोदी वाटायला लागला होता. मी हातातली कादंबरी मिटून बाजूला ठेवली. म्हातारबुवांशी गप्पा मारण्यासाठी ऐसपैस मांडी ठोकून बसलो. इतक्यात बायको परत डोकावली. मी अजून फोनवरच आहे हे पाहून तिने खूण करून "कोण आहे?" असं विचारलं. मी मान हलवली आणि हाताची मूठ करून ओठांना लावुन चिलमीचा खोल झुरका घेतल्याचा अभिनय केला.....
ही आमच्या दोघांमधली गुप्त खूण! जर आम्ही कुणाची फिरकी घेत असलो तर एकमेकांना ते कळवतांना आम्ही "फिरकी" हा शब्द वा खूण वापरत नाही. कारण इथल्या अमराठी लोकांनाही ते कळतं. त्यापेक्षा "ही फुक्कटची चिलीम भेटलीये, जरा चार झुरके मारून घेतो" ही खुण जास्त सेफ!! (आयला! बोलण्याच्या भरात खूण सांगून बसलो की तुम्हाला!!!!)
कपाळावर हात मारत ती परत आत गेली.....
"असं का? एक्काहत्तर गाई पाळल्यात का तुम्ही?" आमचं संभाषण पुढे चालू झालं...
"यास स्सार!"
"अणि बैल? बैल किती पाळलेत तुम्ही?"
"बैल?" म्हातारबुवा गोंधळले, "बैल कशाला पाळायचे?"
"का? बैलांना खाटिकखान्यात कत्तलीसाठी नेत नाहीत?"
"तसं नाही, पण आपल्या धर्मशास्त्रात बैलांना काही महत्त्वाचं स्थान नाहीये", म्हातारबुवा आता स्वतःच्या नकळत हळूहळू सापळ्यात शिरत होते....
"असं कसं आपण म्हणता? आपल्या श्री शंकरदेवतेचं वहान बैलच आहे की! प्रत्येक शिवमंदिरात शंकराच्या पिंडीच्या समोर नंदीची मूर्ती असतेच की!! तुमच्या दक्षिण भारतातल्या मंदिरातही पाहिलीये मी. शिवाय बंगलोर-म्हैसूरला तर नंदीच्या प्रचंड मूर्तींची पुजा-अर्चा होते ना!!"
"पण बैल ठेवण्यात मतलब काय?" आता तेच मला उलट विचारू लागले....
"बाकीचं सोडून द्या! पण तुम्ही ह्या ज्या पूज्य गोमाता वाचवता आहांत आणि पाळता आहांत, त्या गोमाता जन्माला घालण्यामध्ये बैलांचा काहीतरी हातभार आहेच की नाही? उद्या सगळे बैल जर खाटिकखान्यात नेउन कत्तल केले गेले तर तुम्हाला वाचवायला आणि पाळायला नवीन गोमाता मिळणार कुठून?" आता शिवास रीगल भारी म्हणजे भारीच व्रात्य झाली होती....
माझा युक्तिवाद नाकारणं म्हातारबुवांना शक्य झालं नाही. त्यांनी मग मुद्दा बदलला....
"पण सामाजिकद्दृष्ट्या बैलांना गाईइतकं महत्त्व नाहीये.."
"मला नाही पटत! भारतात बैल हा शेतकर्याचा किती मोठा अधार असतो! बैलाशिवाय शेतीची कामं होतील काय?"
"पण इथे अमेरिकेत शेतीसाठी बैल कुठे वापरतात?" म्हातारबुवांनी विजयी स्वरात विचारलं...
"कबूल! इथे यंत्रांनी शेती होते, बैल वापरत नाहीत. पण इथल्या प्राणीसमाजसंस्थेत त्यांचं एक विशिष्ट स्थान आहेच की! 'बुलडोझर' वगैरे शब्द काय उगाच आले का?"
"हं!!" म्हातारबुवा आता विचारात पडले...
"आणि तुम्ही बैलांना तसेच सोडून फक्त गाईंना रक्षण देताय! कायद्याचा सल्ला घेतलाय का तुम्ही लोकांनी? उद्या कोणीतरी तुमच्याविरुद्ध "जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!" मी माझं हसू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत म्हणालो.
"खरंच असं होऊ शकेल?" म्हातारबुवांचा आवाज आता सचिंत झाला होता....
" मग! अमेरिका आहे ही, भारत नव्हे! तुम्ही इथे एक वर्षांपूर्वी आलांत, मी इथे गेली वीस वर्षे रहातोय...." मी खुंटा ठोकून घट्ट केला...
"तुमचे मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत स्सार! मी त्यांचा अजून अभ्यास करीन आणि मग तुम्हाला पुन्हा फोन करून तुमच्याशी चर्चा करीन", म्हातारबुवांनी चर्चेत अखेर हार पत्करली....
"जरूर!! आता मी जेवायला जातो!! काय, येणार का माझ्याबरोबर जेवायला?" मी विचारलं.
"नो, बट थॅन्यू!" म्हातारबुवा हसून म्हणाले.
पण मग त्यांनी अगदी नको तो प्रश्न केला.....
"काय आहे आज जेवणाचा मेन्यू?"
"गरमागरम बीफच्या खिम्याचे पॅटिस!!!!!"
मी फोन ठेवला आणि त्या पाताळविजयम् सिनेमातल्या राक्षसासारखा हॅ, हॅ, हॅ, हॅ करून हसलो......
.
.
.
(अवांतरः हे परमेश्वरा! वयाला न शोभणार्या ह्या असल्या व्रात्यपणाबद्दल तू तुझ्या या डांबिस लेकराला क्षमा कर!!! आमेन!!!)
(संपूर्ण)
प्रतिक्रिया
13 Oct 2008 - 6:55 am | शैलेन्द्र
हा हा हा...... काका, ते आजोबा दुसर्या दिवशी केरळकडे पळाले असतिल.
13 Oct 2008 - 7:22 am | झकासराव
भलताच इनोदी आहे की म्हातारा.
पातळविजयम मधील राक्षस हसतो तसच माझ हसुही घ्या.
हॅ हॅ हॅ.....
चिलिम आवडली.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
13 Oct 2008 - 11:11 am | टारझन
जियो पिडा काका !!!!
च्यायला चिलीम काय !!! काकांच माहित्ये ... पण काकु सुद्धा एक नंबर चिलीमपट्टू असाव्यात ..
फुडला भाग कधी ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
13 Oct 2008 - 7:34 am | भाग्यश्री
:)))))
शिवास रीगल भारीच दिसतीय!! :))
13 Oct 2008 - 7:54 am | सहज
गमतीदार प्रसंग छान खुलवून सांगीतला व तो देखील क्रमशः पंथाला जागून.
13 Oct 2008 - 8:09 am | यशोधरा
घुमवलात तर बिचार्या म्हातारबुवांना! :D
13 Oct 2008 - 8:23 am | प्राजु
प्रसंग छोटासाच आहे पण मस्त खुलवून सांगितला आहे.
आवडला.
एकूण काय तर त्या म्हातार्याची तुम्ही विकेटच काढली.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Oct 2008 - 5:28 pm | नंदन
आहे :). आधी बाऊंसर, आणि मग गुगली टाकून विकेटची काढलीत की काका :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Oct 2008 - 9:57 am | विजुभाऊ
नाव सोनुबाइ आणि हाती कथलाचा वाळा
हे म्हण काही लोकांच्या बाबतीत ठार खोटी ठरते ती ही अशी
पुरेपूर डाम्बीस पणा....जै पाताळ विजयम
अवांतर :( "पात्तळ विजयम" अशा नावाचा एखादा पिक्चर का नाही निघाला बॉ ?)
13 Oct 2008 - 10:25 am | सागररसिक
चिलिम आवडली.
13 Oct 2008 - 11:06 am | घाशीराम कोतवाल १.२
लय भारि राव काय म्हनलात शिवास रीगल साला दारुला पण देवाचे नाव काय पण राव दुसर काहि तरी नाव लिहायच ना दारुच
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
13 Oct 2008 - 11:12 am | फटू
पिडाकाका,
काय सॉलिड फिरकी घेतली आहे तुम्ही आजोबांची... अगदी जेंडर डिस्क्रिमिनेशन शब्द ऐकल्यानंतर हवालदिल झालेला आजोबांचा चेहरा नजरेसमोर तरळून गेला...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
13 Oct 2008 - 12:00 pm | संजय अभ्यंकर
=)) =)) :))
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
13 Oct 2008 - 12:00 pm | संजय अभ्यंकर
=)) =)) :))
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
13 Oct 2008 - 12:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पिडाकाका की जय हो, जय हो, जय हो!
हा दुसरा भाग एकदमच वेगळा निघाला की ... झकासच आहे एकदम!
(हसून हसून बेजार) अदिती
13 Oct 2008 - 12:17 pm | धमाल मुलगा
कप्पाळ !!!!
=))
एएएक नंबर क्रिप्टीक! आजपासुन आमच्याकडंही चालु होणार हे क्रिप्टीक ;)
=))
च्यायला, ब्रँड बदलुन शिवास रीगल करावा काय? :?
आणि उठसुठ वापरला जाणारा (आमच्या दोस्तकंपनीत तरी) बुलशी* ???
आम्हा बोंबीलवाडीच्या पल्याड न गेलेल्या येड्यागबाळ्यांना तर बुलशी* हा शब्द नसेल तर अमेरिकेतली विंग्रजी पुर्ण कशी होणार असा येक खुळचट प्रश्न पडतो ;)
=))
अग्गायायायायाया.....त्या म्हातार्याच्या लुंगीच्या निर्याच सुटल्या असतीले तिकडं!
ही:हॉ:हॉ:.....बोकाशी बॉ!!!
-खंबियार वळूनादम् सांडकुमारम् धमालमुथ्थुस्वामी
अध्यक्ष, अखिल विश्व बैलभक्षण समिती,
त्रिचरापल्ली, व्हर्जिनिया!
13 Oct 2008 - 12:45 pm | अवलिया
मस्त
=))
13 Oct 2008 - 12:52 pm | धमाल मुलगा
च्यायला... नाना _/|\_
"१२ नंबर " हेच खरं ;)
=))
13 Oct 2008 - 5:14 pm | सुमीत
कसली जबरी फिरकी घेतलीत तुम्ही काका!
बाकी चिलीम ची खूण फार आवडली.
13 Oct 2008 - 5:20 pm | लिखाळ
वा ! मस्त चुटका !
अमेरिकेत गोरक्षण, जेंडर डिस्क्रिमिनेशन :)
मजा आली !
--लिखाळ.
13 Oct 2008 - 6:05 pm | शितल
काका,
चुटका वाचुन धमाल आली :)
ते आजोबा आता बैलच्या मागे लागतील आणि त्या बैलांना गायींच्या शेजारी बांधतील. :)
13 Oct 2008 - 9:54 pm | इनोबा म्हणे
"काय आहे आज जेवणाचा मेन्यू?"
"गरमागरम बीफच्या खिम्याचे पॅटिस!!!!!"
=)) काय जबरा टाकला हो काका!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 Oct 2008 - 10:00 pm | धनंजय
तिकडे त्या बिचार्या आजोबांना म्याड काऊ झाला असणार.
13 Oct 2008 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिडा, चमत्कारीकच आहात राव तुम्ही !!! :)
प्रसंग मस्तच खुलवला.
13 Oct 2008 - 11:43 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंग्या, पिडाकाकूही काही कमी नसणार हां, असला येलोनॉटी सांभाळायचा म्हणजे तितकाच खमकेपणा हवा, कसें! ;) )
चतुरंग
14 Oct 2008 - 7:49 am | मुक्तसुनीत
हा हा ...येडा बनून पेडा खाताव तुमी ! ;-)
14 Oct 2008 - 8:20 am | विसोबा खेचर
डांबिसा,
तुझी पण बाकी कमालच आहे हो! :)
तात्या.
10 Feb 2012 - 2:17 pm | चिगो
मस्त चुटका.. "जेंडर डिस्क्रिमीनेशन" तर जबराच..
10 Feb 2012 - 3:58 pm | चाणक्य
जेंडर डेस्क्रिमिनेशन
हा हा हा
10 Feb 2012 - 4:33 pm | मनराव
:D :D :D