ट्रिंग ट्रिंग !!!!!

Primary tabs

बटाटा चिवडा's picture
बटाटा चिवडा in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 10:23 am

ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone..
तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone"

१९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल
आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल...
हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला
येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला..

चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील
सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे..
अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला
लहान मुलांनी घरोघरी पळायचे...

काही वर्षांनी,

आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा
इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा...
त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां
८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

STD कॉल लावण्यासाठी होती "Trunk Call System"
१८७ नंबर वर असलेली बाई सांगायची "You are in waiting"...

क्रॉस कनेक्शन्स ची तर असायची भलतीच धमाल-मस्ती
मित्राकडे फोन लावला तर ऐकू यायची २ मारवाडींची शाब्दीक कुस्ती...

काही वर्षांनी,

घरोघरी Wireless आणि Caller-ID वाले फोन आले
मैत्रिणींच्या घरी फोन करायचे वांधे सुरु झाले...
मध्यंतरी PAGER नी Replace केला Wireless ना
पण Pagers बंद नाही पाडू शकले Landline चा जमाना...

२१ व्या शतकातले पर्व म्हणजे Mobile, I-phone आणि Broadband Internet
सर्वांच्याच हातात दिसतात किमान २ Handset …
पण आजही जेव्हा घरोघरी दिसतो ट्रिंग ट्रिंग वाला "डब्बा"
वाटते कोणताच I-Phone घेऊ शकणार नाही Landline ची जागा..!!!

-आपला बटाटा चिवडा __/\__

कविता माझीफ्री स्टाइलमुक्त कवितारोमांचकारी.अद्भुतरससंस्कृतीइतिहासकवितामुक्तकजीवनमानराहणीविज्ञानमौजमजारेखाटन