आत्मसमर्पण

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
4 Oct 2008 - 10:42 pm

परदेशी नोकरीची संधी चालून आलेला मुलगा आई वडिल इथ एकटे पडतिल म्हणुन संधी नाकारायला निघतो,तेव्हा वडिल त्याला सागत आहेत..........

माझ्या बेड्या तुझ्या पायी
उगाच अडकवु देणारनाही
घे भरारी उंच अंबरी
तुझेच आकाश अन दिशा दाही

म्हातारपणि आम्हाला
विचारले पाहिजेच असे नाही
जन्म देताना तुला
आम्ही सुद्धा विचारले नाही

माणुसकीला धरुन नाही
असेही तु मानु नकोस
नव्या युगाची गरज आहे
वाइट वाटुन घेउ नकोस

अरे काळा बरोबर आम्ही सुद्धा
जरा बदलल पाहिजेच कि
पाळणा घरी ठेवुन तुला
आम्हीहि नोकरी केलिच कि

तु तीथे, आम्ही इथे
चिंता मुळीच करायची नाही
अरे आम्ही सदा तुझ्या ह्र्दयी
तसे फारसे लांब नाही

ए बाबा! ए...पोरा..
उठ असा रडु नकोस
यश तुल खुणावते आहे
अशी संधी सोडु नकोस..

अरे.. लाकडे गेली आमची स्मशानी
आता राहिले हे सरपण..!
जा लेका.. जा.. पटकन
का करू आत्म समरपण...! ! !

कविताविचार

प्रतिक्रिया

राघव's picture

4 Oct 2008 - 10:54 pm | राघव

कविता छान आहे. आणि कल्पना माडण्याची तुमची हातोटी सुद्धा. हात कसलेला आहे यात शंकाच नाही.
पण,
अरे.. लाकडे गेली आमची स्मशानी
आता राहिले हे सरपण..!
जा रांडेच्या.. जा.. पटकन
का करू आत्म समरपण...! ! !

या ओळी का कुणास ठाऊक आवडल्या नाहीत. असो, स्पष्टोक्तीबद्दल राग नसावा.
शुभेच्छा. :)

(स्पष्ट)मुमुक्षु

चन्द्रशेखर गोखले's picture

4 Oct 2008 - 11:14 pm | चन्द्रशेखर गोखले

खर आहे जरा अतिच वाटत ना! पण भावना समजुन घ्या!

प्राजु's picture

4 Oct 2008 - 11:07 pm | प्राजु

कल्पना अतिशय सुरेख आहे. आपण मांडलीही अगदी सुंदर.
पण

अरे काळा आम्ही सुद्धा
जरा बदलल पाहिजेच कि
पाळणा घरी ठेवुन तुला
आम्हीहि नोकरी केलिच कि

या ओळी ...सत्य आहे.
मुमुक्षु म्हणतात त्याप्रमाणे शेवट खटकला..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता आणि आशय आवडला, पण
जा रांडेच्या.. जा.. पटकन
का करू आत्म समरपण...! ! !

वडिलांनी स्वतःच्याच मुलाला रांडेच्या म्हणणं माझ्या डोक्याला नाही झेपलं!

अदिती

चन्द्रशेखर गोखले's picture

4 Oct 2008 - 11:44 pm | चन्द्रशेखर गोखले

कोकणी माणुस हा बोलि भाषेत शिव्यांचा वापर करतो, त्यात प्रेम असते

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:32 am | विसोबा खेचर

कोकणी माणुस हा बोलि भाषेत शिव्यांचा वापर करतो, त्यात प्रेम असते

सहमत आहे! :)

आपला,
तात्या देवगडकर.

प्रमोद देव's picture

4 Oct 2008 - 11:59 pm | प्रमोद देव

सोडल्या तर कविता मस्तच आहे.
त्या ओळी बदलल्या तर जास्त बरे होईल.

मदनबाण's picture

5 Oct 2008 - 4:31 am | मदनबाण

सुंदर कविता,,,फार आवडली..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विकास's picture

5 Oct 2008 - 10:07 am | विकास

... एकदम आवडली.

परदेशी जाण्यासंदर्भात दोन टोके असतात. (एक तर "क्रेझ" अथवा दुसरा "हळवेपणा") ह्या कवितेने त्यातील सुवर्णमध्य दाखवला आहे.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:31 am | विसोबा खेचर

वा! कविता चांगली वाटली...!

तात्या.