परदेशी नोकरीची संधी चालून आलेला मुलगा आई वडिल इथ एकटे पडतिल म्हणुन संधी नाकारायला निघतो,तेव्हा वडिल त्याला सागत आहेत..........
माझ्या बेड्या तुझ्या पायी
उगाच अडकवु देणारनाही
घे भरारी उंच अंबरी
तुझेच आकाश अन दिशा दाही
म्हातारपणि आम्हाला
विचारले पाहिजेच असे नाही
जन्म देताना तुला
आम्ही सुद्धा विचारले नाही
माणुसकीला धरुन नाही
असेही तु मानु नकोस
नव्या युगाची गरज आहे
वाइट वाटुन घेउ नकोस
अरे काळा बरोबर आम्ही सुद्धा
जरा बदलल पाहिजेच कि
पाळणा घरी ठेवुन तुला
आम्हीहि नोकरी केलिच कि
तु तीथे, आम्ही इथे
चिंता मुळीच करायची नाही
अरे आम्ही सदा तुझ्या ह्र्दयी
तसे फारसे लांब नाही
ए बाबा! ए...पोरा..
उठ असा रडु नकोस
यश तुल खुणावते आहे
अशी संधी सोडु नकोस..
अरे.. लाकडे गेली आमची स्मशानी
आता राहिले हे सरपण..!
जा लेका.. जा.. पटकन
का करू आत्म समरपण...! ! !
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2740
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता छान
कविता छान
In reply to कविता छान by राघव
अरे व्वा!!
कविता आणि
अदितीच्या प्रतिक्रियेला उत्तर
In reply to कविता आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोकणी
In reply to अदितीच्या प्रतिक्रियेला उत्तर by चन्द्रशेखर गोखले
शेवटच्या दोन ओळी..
सुंदर
एकदम भावली...
वा! कविता