Skip to main content

वडील

वडील

Published on 27/12/2016 - 23:13 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं?
लेखनविषय:

याद्या 1587
प्रतिक्रिया 5

डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट

अप्रतिम लिहिता तुम्ही. एक सजेस्ट करू का? या तुमच्या लघु कविता एकेका थीम प्रमाणे ( उदाहरणार्थ वडील ) कंपाइल केल्या तर वाचायला सोपं जाईल. लिहीत राहा.

उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला तो पोहोचला हे लगेच कळतं त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं? डोळयांसमोर झळाळतं तुमचं राजस रूप भेटत जा ना स्वप्नांत बोलत जाऊ खूप प्रत्यक्षाहूनही उत्कट तुमचे सततचे भास मन थकून जातं पण संपत नाही आस... आता कसली कोजागिरी आणि कसलं काय भरलेल्या डोळ्यांवर आठवांची साय.... डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट या असल्या शिक्षेपेक्षा परवडला तुमचा राग कशानेच शांत होत नाही हो ही अंतरातली आग.....