अगम्य...!

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
29 Sep 2008 - 12:40 am

आज हे असं काय झालंय?? काल पर्यंत तर सगळं ठिक होतं. आज अचानक हे असं?? काहीतरी नक्की झालयं. मी ही अशी .. अशी कधी होते?? आणि माझं पिल्लू... माझा नवरा?? हे असे.. असे कसे झाले?? कुणी केलं हे असं?? हे स्वप्न तर नाही ना?? काल पर्यंत हे असं नव्हतं. आज अचानक सगळंच वेगळं दिसतं दिसतं आहे. का? नक्की कोण बदललं आहे?? मी, लेक की नवरा?? की सगळेच.
अरे हे काय?? माझा चेहरा?? हा असा?? आता मला सगळे काय म्हणतील?? मी अशी नव्हते. अशी कशी झाले? सुंदर नसले तरी दिसायला वाईट नव्हते. आणि आज मी अशी काय दिसते आहे?? एखाद्या जोकरसारखी?? माझे केस? माझे इतके सुंदर सळसळीत केस.. असे काय झाले आहेत? माझ्या केसांचा मला कोण अभिमान होता!! कॉलेजमध्ये मला मिस ब्युटीफूल हेअर म्हणायचे सगळे आणि आज माझे केस असे हे चिकटवल्यासारखे का दिसताहेत??
आणि माझा नवरा?? त्याचा चेहरा असा का?? नक्की काय झालंय?? चेहर्‍याचा आकार बदलला आहे?? का? कुणी?? असा कसा?? दूधीभोपळ्यासारखा दिसतो आहे. आणि त्याचं नाक?? ते ही काहीतरी बिनसलं आहे?? त्याचे केस?? अरे देवा..... हे काय होतंय सगळं?
माझं लेकरू. इतकं अवखळ... इतकं चंचल.. हे असं का दिसतं आहे?? त्याचा चेहरा.... अरे!!! तो ही बदलला आहे. आणि त्याचं नाक?? तेही बदललं आहे.
हे काय स्वप्न आहे का?? आम्ही सगळे असे बदलले का आहोत?? जादूटोणा केला आहे का कुणी?? का असं सगळं वाटतं आहे?? छे !!! नक्कीच काहीतरी भानगड आहे. हाय देवा!!!!!!!!!!!!!!!!!!!! आमचे पाय!! ही एक नवई भानगड आहे. आमचे सगळ्यांचे पाय??? ते असे इतके विचित्र!!!! एखाद्या कोंबडीच्या पायासारखे??? आई ग़!!!!!!!!!!!!!! आज काय झालं आहे अचानक
आणि......... आणि............. आणि.. आमचे सगळ्यांचे हात कुठे आहेत??आम्हाला कोणालाही हातच नाहीत??? काल पर्यंत ज्या हातानी आम्ही जेवलो.. एकमेकांशी खेळलो.. दिवसभराच्या कामाचा भाग होऊन राहिलेले आमचे हात??? कुठे गेले?? कोणी तोडले?? हे आम्हीच आहोत का?? कि आणखी कुणी??
हे स्वप्न आहे का? की आणखी काही?? आम्ही पृथ्वीवरच आहोत ना?? हे आमचंच घर आहे ना? हो हे आमचंच घर आहे. आम्ही पृथ्वीवरच आहोत. मग हे नक्की काय आहे?? आम्हाला हात नाहीत.. आमचे पाय असे वेगळे... आमच्या चेहर्‍याचे आकार बदललेले.... हे नक्की काय आहे??
.
.
.
.
.
.
.

हे आहे माझ्या लेकाने (वय वर्षे साडे चार) काढलेलं आमचं चित्र... =))

(आई, बाबा आणि मी)

- प्राजु

साहित्यिकमौजमजाछायाचित्रणप्रकटनप्रतिक्रियाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

29 Sep 2008 - 12:47 am | प्रियाली

चित्र अगम्य आहे प्राजु कारण दिसतच नाहीये. ;-)

आता दिसतंय. आईला केस आहेत. मला मात्र सर्वांचे पाय आवडले.

अमेरिकन तगड्या माणसांसमोर आपले पाय "चिकन लेग्ज" दिसतात असं नेहमी वाटतं. तुझ्या लेकालाही तसंच वाटत असावं. ;;)

प्राजु's picture

29 Sep 2008 - 12:49 am | प्राजु

चतुरंग करताहेत मदत त्यासाठी.. बघूया काय होतं ते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
दिसतंय आता!

मृदुला's picture

29 Sep 2008 - 12:56 am | मृदुला

माझे केस?

आहेत की. बाबा आणि पिल्लाच्या मानाने आईला बरेच केस आहेत. ;-)

आणि आईने अर्धी जागा व्यापलीय चित्रातली. ते नाही सांगितलेलं!

पिकासावर जाऊन चित्र पाहिले. या दुव्यावर

मस्तच काढले आहे चित्र अथर्वने!

(खुद के साथ बातां : रंग्या, मुलांना बरोबर कळते नाही घरातले सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कोण ते! ;) :T (कृ. ह घे.))
चतुरंग

पिवळा डांबिस's picture

29 Sep 2008 - 3:05 am | पिवळा डांबिस

मला तर अगदी फोटोच लावल्यासारखं वाटलं!!!!!! :)

मुलांना बरोबर कळते नाही घरातले सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कोण ते!
बिच्चारे बाबा आणि पिल्लू!!!! :(

आणखी एक, चित्रात बाबा आणि पिल्लू ला कान दाखवलेत पण आईला कान दाखवलेले नाहीत (पण मोठ्ठी जिवणी मात्र दाखवलीय!!)!!!! काय बरं सुचवायचं असेल त्या बाल-पिकासो ला?:)

प्राजु, ह. घे :)

झकासराव's picture

29 Sep 2008 - 7:42 am | झकासराव

वा!
मस्त आहे चित्र. :)
बाकी वर रंगा शेठ आणि पिडा काकानी ह घ्या अशा सुचेनेसहीत दिलेल्या टिप्पणीला सहमत. ;)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनिष's picture

29 Sep 2008 - 1:31 pm | मनिष

खरच! तुझं स्वगथी आणि अथर्वच चित्रही!! :)
बाकी रंगा आणि पिडाकाकांशी सहमत!!! =))

एकलव्य's picture

29 Sep 2008 - 9:24 am | एकलव्य

:)

विसोबा खेचर's picture

29 Sep 2008 - 1:30 am | विसोबा खेचर

वा! आमची प्राजू सुरेखच दिसत्ये..

लेकरू सदाबहार दिसतंय....

आणि भावजी लग्न करून पस्तावल्यासारखे दिसताहेत.. :)

तात्या.

शितल's picture

29 Sep 2008 - 3:05 am | शितल

प्राजु
स्लेटची निम्मी जागा तुच व्यापली आहेस
आणि उरलेल्या जागेत बाबा आणी पिल्लु कसे बसे मावले आहे.
मला तर खुप आवडले हे चित्र.
त्या बद्दल अर्थवला माझ्या कडुन आईस्क्रीमची पार्टी. :)

शितल's picture

29 Sep 2008 - 3:07 am | शितल

प्राजु,
अमर काय म्हणतो बघ,
अर्थवला माहित आहे, घरात आईच व्यापली आहे.
आमच्या मित्राला त्यामानाने वाव कमी आहे. :)

प्राजु's picture

29 Sep 2008 - 8:55 pm | प्राजु

अर्थवला माहित आहे, घरात आईच व्यापली आहे.

माझ नावच आहे ना सर्वव्यापी... आता सर्वव्यापी म्हणजे सर्वांना व्याप देणारी की सर्वांना व्यापून राहिलेली हे व्यक्तीसापेक्ष आहे.. :) :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु,
वाचायला सुरूवात केल्यावर मला काही कळेच ना!
नंतर हसू आले.
अथर्वला सांग कि एका खोट्या आदित्यने चित्र पाहून दुसर्‍या खोट्या आदित्यला आवडल्याचं कळवलय.

रेवती

मुक्तसुनीत's picture

29 Sep 2008 - 6:43 am | मुक्तसुनीत

चित्र क्युट आहे. आम्ही कलाकाराला भेटलोय. त्याच्या कलेचे दर्शन आता घडले ;-)

धनंजय's picture

29 Sep 2008 - 8:27 am | धनंजय

कंपोझिशन आहे. (अगदी प्रामाणिक मत.)

मस्तच चित्र आहे. कलाकाराला माझ्यकडून शाबासकी!

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 8:59 am | प्रभाकर पेठकर

अतिशय 'बोलकं' चित्र. तुमच्या लेकाचे हार्दीक अभिनंदन.

सहज's picture

29 Sep 2008 - 9:21 am | सहज

मजा!!

मस्त..[लेख, चित्र, प्रतिक्रिया सगळेच] :-)

यशोधरा's picture

29 Sep 2008 - 9:32 am | यशोधरा

क्यूट, क्यूट, क्यूट!! :)

राघव's picture

29 Sep 2008 - 10:32 am | राघव

हा हा हा.. मस्त आहे की!!!
अगोदर कळलेच नाही काय लिहिलेय ते.. चित्र बघितल्यानंतर मात्र तुम्ही मांडलेले शब्दचित्र परत वाचले तेव्हा तुमचेही तेवढेच कौतुक वाटले!! तुम्हा दोघांसही शुभेच्छा :)
मुमुक्षु

प्राजु's picture

29 Sep 2008 - 8:56 pm | प्राजु

धन्यवाद..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जैनाचं कार्ट's picture

29 Sep 2008 - 10:33 am | जैनाचं कार्ट (not verified)

मस्तच चित्र आहे.
वास्तववादी चित्रकला करणा-या कलाकाराला माझ्याकडून ही शाबासकी!

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

ऋषिकेश's picture

29 Sep 2008 - 1:55 pm | ऋषिकेश

हा हा हा =)) पाय तर लै भारी!
सह्ही! अथर्वला शाबासकी
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

29 Sep 2008 - 3:53 pm | स्वाती दिनेश

मस्त आहे की तुझ्या लेकाचं चित्रं,तुझं स्वगत आणि वरच्या प्रतिक्रिया.. सगळंच..:)
स्वाती

प्रमोद देव's picture

29 Sep 2008 - 4:02 pm | प्रमोद देव

ह्यावरून मला साधारण तीस वर्षांपूर्वीची एक जाहिरात आठवली. 'हकोबा'नावाच्या एक वस्त्रप्रावर्णांच्या कंपनीची ती जाहिरात होती. त्यातही एका लहान मुलाने अगदी असेच चित्र काढलेले दाखवलेले होते आणि त्याच्या तोंडी घातलेले वाक्य असे होते.....
"हा मी,नी ही माझी आई,नी हे माझे बाबा!हे माझे फताके आनि हे माझे नवीन कपले!"..वगैरे वगैरे असेच काहिसे लिहीलेले आठवतेय. साधारणपणे ही जाहिरात दिवाळी अंकात यायची. एरवीच्या अंकातली जाहिरात साधी होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2008 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र सुरेख काढलंय, पण कवितेचा 'क' शोधूनही दिसत नाही. :)

प्राजु's picture

29 Sep 2008 - 8:57 pm | प्राजु

प्रतिक्रिया देणार्‍या आणि न देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

29 Sep 2008 - 9:08 pm | लिखाळ

लेख वाचत असताना काय प्रकार आहे ते कळत नव्हते..पण चित्र पाहिल्यावर हसू आले. चित्र मस्तंच आहे..पाय तर खासच :)
मुलांचे भावविश्व आया जास्त व्यापून असतात तेच या चित्रातून दिसते. चित्रकाराचे अभिनंदन.
--लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2008 - 9:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजु, तुझा पोरगा एकदम मस्त असणार, त्याचा फोटोतरी दाखव एकदा!

चित्र मस्तच काढलंय त्यानी. वरचं वर्णन वाचून मला काही कळलं नाही, म्हणून आधी खाली "फोटो" पाहिला. आणि त्या चित्रावरून, त्यांतल्या स्केलवरच्या बाकी सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून अलिकडेच ऐकण्यात आलेलं एक इंग्लीश वाक्य आठवलं:

Being husband, my dad is the head of the family but being his wife, my mum is the neck of the family; she decides which way to look at! ;-)

(मानी) अदिती