अगम्य...!
लेखनप्रकार
आज हे असं काय झालंय?? काल पर्यंत तर सगळं ठिक होतं. आज अचानक हे असं?? काहीतरी नक्की झालयं. मी ही अशी .. अशी कधी होते?? आणि माझं पिल्लू... माझा नवरा?? हे असे.. असे कसे झाले?? कुणी केलं हे असं?? हे स्वप्न तर नाही ना?? काल पर्यंत हे असं नव्हतं. आज अचानक सगळंच वेगळं दिसतं दिसतं आहे. का? नक्की कोण बदललं आहे?? मी, लेक की नवरा?? की सगळेच.
अरे हे काय?? माझा चेहरा?? हा असा?? आता मला सगळे काय म्हणतील?? मी अशी नव्हते. अशी कशी झाले? सुंदर नसले तरी दिसायला वाईट नव्हते. आणि आज मी अशी काय दिसते आहे?? एखाद्या जोकरसारखी?? माझे केस? माझे इतके सुंदर सळसळीत केस.. असे काय झाले आहेत? माझ्या केसांचा मला कोण अभिमान होता!! कॉलेजमध्ये मला मिस ब्युटीफूल हेअर म्हणायचे सगळे आणि आज माझे केस असे हे चिकटवल्यासारखे का दिसताहेत??
आणि माझा नवरा?? त्याचा चेहरा असा का?? नक्की काय झालंय?? चेहर्याचा आकार बदलला आहे?? का? कुणी?? असा कसा?? दूधीभोपळ्यासारखा दिसतो आहे. आणि त्याचं नाक?? ते ही काहीतरी बिनसलं आहे?? त्याचे केस?? अरे देवा..... हे काय होतंय सगळं?
माझं लेकरू. इतकं अवखळ... इतकं चंचल.. हे असं का दिसतं आहे?? त्याचा चेहरा.... अरे!!! तो ही बदलला आहे. आणि त्याचं नाक?? तेही बदललं आहे.
हे काय स्वप्न आहे का?? आम्ही सगळे असे बदलले का आहोत?? जादूटोणा केला आहे का कुणी?? का असं सगळं वाटतं आहे?? छे !!! नक्कीच काहीतरी भानगड आहे. हाय देवा!!!!!!!!!!!!!!!!!!!! आमचे पाय!! ही एक नवई भानगड आहे. आमचे सगळ्यांचे पाय??? ते असे इतके विचित्र!!!! एखाद्या कोंबडीच्या पायासारखे??? आई ग़!!!!!!!!!!!!!! आज काय झालं आहे अचानक
आणि......... आणि............. आणि.. आमचे सगळ्यांचे हात कुठे आहेत??आम्हाला कोणालाही हातच नाहीत??? काल पर्यंत ज्या हातानी आम्ही जेवलो.. एकमेकांशी खेळलो.. दिवसभराच्या कामाचा भाग होऊन राहिलेले आमचे हात??? कुठे गेले?? कोणी तोडले?? हे आम्हीच आहोत का?? कि आणखी कुणी??
हे स्वप्न आहे का? की आणखी काही?? आम्ही पृथ्वीवरच आहोत ना?? हे आमचंच घर आहे ना? हो हे आमचंच घर आहे. आम्ही पृथ्वीवरच आहोत. मग हे नक्की काय आहे?? आम्हाला हात नाहीत.. आमचे पाय असे वेगळे... आमच्या चेहर्याचे आकार बदललेले.... हे नक्की काय आहे??
.
.
.
.
.
.
.
हे आहे माझ्या लेकाने (वय वर्षे साडे चार) काढलेलं आमचं चित्र... =))
(आई, बाबा आणि मी)
- प्राजु
(आई, बाबा आणि मी)
- प्राजु
वाचने
7001
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
अगम्य ;-)
In reply to अगम्य ;-) by प्रियाली
अगं.. तेच ना!
केस
चित्र अजिबात अगम्य नाहीये!
In reply to चित्र अजिबात अगम्य नाहीये! by चतुरंग
सहमत!
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
वा! मस्त
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
बेस्ट....
In reply to चित्र अजिबात अगम्य नाहीये! by चतुरंग
मस्तच चित्र!
वा! आमची
सह्ही..
अग
In reply to अग by शितल
हो ना..
चित्रं छान काढलय अथर्वनं.
हाहा
काय सुरेख
वा..वा...
हा हा हा
क्यूट,
हा हा हा..
In reply to हा हा हा.. by राघव
धन्यवाद मुमुक्षु..
मस्तच
शाबासकी
अरे वा..
मस्त आहे चित्र!
मस्त :)
प्रतिक्रिया
मस्त
झकास!