आपल्याला वृद्धाश्रम का आवडत नाहीत?

मृदुला's picture
मृदुला in काथ्याकूट
28 Sep 2008 - 1:34 am
गाभा: 

ज्या आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी मुलांनी घ्यायची की नातेवाईक-मित्रमंडळींनी?

या तात्यांच्या एका प्रतिक्रियेतून ही चर्चा सुरू कराविशी वाटली.

जीवशास्त्रीय दृष्टीने बघता, आईवडिलांनी, इतकेच नव्हे तर आजी आजोबा, काका, आत्या, मामा, मावश्या अश्या सगळ्या नातेवाईकांनी बाळाचे संगोपन करणे माणसाच्या जातीला नैसर्गिक आहे. आईवडील आणि आजीआजोबा हे यात महत्वाचे. वेळप्रसंगी बाळासाठी प्राण पणाला लावू शकतील असे. त्यांचे हे वागणे बाळावर ऋण, कर्ज असे नसते तर वंशसातत्य टिकून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या झालेली योजना फक्त.
सहसा सर्व जीवजातीत पुनरुत्पादनाची क्षमता संपली की मृत्यू येतो. माणसाच्या बाबतीत, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तसे घडत नसल्याचे दिसते कारण मनुष्यबाळाचे संगोपन करायला आईवडिलांचे चार हात पुरेसे नसतात. आजीच्या मदतीची विशेष गरज असते.
शिवाय प्राचीन काळात माणसाची स्मृती हेच एकमेव ज्ञान साठवण्याचे साधन होते तेव्हा ज्ञानवृद्ध लोक ज्या त्या टोळीच्या टिकून राहण्यासाठी (सर्वाय्वलसाठी) आवश्यक असत. त्या दृष्टीने वृद्धांचे संगोपन ही कायम सामाजिक (=टोळीची) जबाबदारी ठरते. आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे.

भावनिक दृष्टीने बघता, निवृत्तीनंतर नातवंडे सांभाळण्याची आवड+गरज नसेल तर समवयस्क मंडळींबरोबर राहण्यात मजा नाही का? महाविद्यालयीन वयात घराबाहेर मित्रांत राहण्यात येते तशी मजा पुन्हा घ्यायची संधी वृद्धाश्रमात येणार नाही का? (हा माझा या चर्चेत मुख्य प्रश्न / मुद्दा आहे.)

दुसरे म्हणजे, मध्यंतरी मुंबई विद्यापीठात कोणी असा प्रबंध सादर केला होता (असे लोकसत्तेत वाचले) की झोपड्यांत राहणार्‍या लोक सरासरी सहा मुले होऊ देतात. कारण म्हातारपणी कोणी सांभाळ करायला हवे म्हणून. सहा असे, की सांभाळ करायला मुलगाच हवा. एखादा व्यसनी होईल, एखादा हाताशी यायच्या आधीच मृत्यूमुखी पडेल, म्हणून बॅकप असावा म्हणून तीन मुले; ती होता होता ५०/५० शक्यतेने तीन मुली!

मुलांनी आपला सांभाळ करावा ही भावना जनमानसात इतकी खोल कशी काय रुजली असावी. पाश्चिमात्यांचे सोडा, पण आफ्रिकी आदिम संस्कृत्यांमध्ये देखील असे दिसत नाही. पूर्वेत हा 'संस्कार' कसा काय आला असावा?

प्रतिक्रिया

शितल's picture

28 Sep 2008 - 6:24 am | शितल

>>>आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे.

ह्या गोष्टीला व्यवहार हा शब्द चुकीचा आहे.
म्हातारपणी त्यांना एकटे वाटते,प्रेमाची ,आपुलकीची फक्त अपेक्षा असते.आणि ती पोटच्या मुलांने केली की कशानेही भरून न येणारे समाधान त्यांना मिळतो आणि त्यांचे जीवन सार्थक झाल्या सारखे वाटते.

टारझन's picture

28 Sep 2008 - 7:25 am | टारझन

त्यांचे हे वागणे बाळावर ऋण, कर्ज असे नसते तर वंशसातत्य टिकून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या झालेली योजना फक्त.
असहमत आहे .... कुठल्या प्रकारे विचार करतात काही लोक कळत नाही राव .... काय गरज काय ? बाकी शितल शी सहमत ... मृदूला ताइ .. तुम्ही वृद्धाश्रमाचं टिकीट फाडलंय अशी आशा करतो.
बरच बोलावसं वाट्टय .. पण संपादक लोक ते उडवून लावतील म्हणून त्यांचे कष्ट वाचवतो ...

कसलीही कधीच अपेक्षा न करणार्‍या आई-वडिलांची छत्रछाया लाभलेला )
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

कलंत्री's picture

28 Sep 2008 - 8:01 am | कलंत्री

आपल्या प्रतिसादात अमूक अमूक येथे अशी कल्पना नाही असा उल्लेख आहे. प्रतिवाद म्हणून आपल्या येथे लहानपणी आईवडिल संगोपन करतात तर वृध्दत्त्वाच्या वेळेस मुलांनी का बरे सांभाळ का बरे करु नये? आणि आपल्याकडे जी कल्पना शतकोनुशतके रुजु आहे ती इतर देशात का बरे रुजु नये?

माझ्या मताप्रमाणे भारतीय आपल्या संतती मध्ये नको तितके आसक्त असतात त्याचमुळे मोठ्यापणी आपला सांभाळ व्ह्यावा ही इच्छा त्यातूनच येत असावी.

दुसरे असे की सहचराच्या कल्पनेमुळे त्यात सदाचाराचीही कल्पना आली असावी.

एक मुद्दा असा आला की आपण म्हणजे मुलानी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा असे समजतो. मग, मुलीनीही आपल्या पालक्कांचा सांभाळ का बरे करु नये?

आपल्या रक्ताच्या मुलांमध्ये, नातवंडामध्ये आपण जितके रममाण होऊ शकतो तितके आपण आपल्या समवयस्कामध्ये रममाण होऊ शकतो का?

शितल's picture

28 Sep 2008 - 8:06 am | शितल

>>>एक मुद्दा असा आला की आपण म्हणजे मुलानी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा असे समजतो. मग, मुलीनीही आपल्या पालक्कांचा सांभाळ का बरे करु नये?
मुली ही यात मागे नक्कीच नाहीत. उलट मुलीचे एक मन तीच्या संसारात आणि एक मन आई वडीलाजवळ नक्कीच असते.
आणि गरज पडल्यास नक्की त्या आई वडीलांना साभांळायला मागे पुढे पहात नाहीत.

शितल's picture

28 Sep 2008 - 8:06 am | शितल

>>>एक मुद्दा असा आला की आपण म्हणजे मुलानी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा असे समजतो. मग, मुलीनीही आपल्या पालक्कांचा सांभाळ का बरे करु नये?
मुली ही यात मागे नक्कीच नाहीत. उलट मुलीचे एक मन तीच्या संसारात आणि एक मन आई वडीलाजवळ नक्कीच असते.
आणि गरज पडल्यास नक्की त्या आई वडीलांना साभांळायला मागे पुढे पहात नाहीत.

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 8:10 am | विसोबा खेचर

त्यांचे हे वागणे बाळावर ऋण, कर्ज असे नसते तर वंशसातत्य टिकून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या झालेली योजना फक्त.

पूर्णत: असहमत...

माझ्या मते जेव्हा एखाद्या आईच्या बाबतीत,

तिचं आपल्या पोराला हृदयाशी कवटाळणं, त्याचं जेवणखाण, त्याचं उठणंबसणं, त्याचं हागणंमुतणं, त्याचे आजारपाजार, त्याची बालवाडी, त्याच्या कुणीही पटकन प्रेमात पडावं अश्या काही लोभसवाण्या बाललीला, तो चालायला शिकणं, आई-बाबा-काका-मामा इत्यादी म्हणायला शिकणं,

केवळ ह्याच सर्व गोष्टी ज्या माउलीच्या जीवनाचा भाग होऊन बसतात, त्याची केवळ वंशसातत्य टिकवणे ही कारणमिमांसा मला हास्यास्पद वाटते! आणि माझ्या मते जिथे अशी अनेक तार्किक, सैद्धांतिक, वैज्ञानिक कारणं संपतात तिथे ममत्व सुरू होतं! आणि ममत्व हे कुठल्याही व्याख्येच्या, कुठल्याही विश्लेषणाच्या, कुठल्याही वैज्ञानिक सिद्धांताच्या परे आहे!!

आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे.

माझ्या मते यात कुठलाही व्यवहाराचा भाग नसतो/नसावा! मुलांनी वृद्ध आईवडिलांना सांभाळणं, त्यांना जपणं, त्यांचं औषधपाणी पाहाणं, सेवाशुषृषा करणं यात व्यवहार असू नये..!

भावनिक दृष्टीने बघता, निवृत्तीनंतर नातवंडे सांभाळण्याची आवड+गरज नसेल तर समवयस्क मंडळींबरोबर राहण्यात मजा नाही का?

काही वृद्धांच्या बाबतीत हा चॉईस असूही शकेल..!

मुलांनी आपला सांभाळ करावा ही भावना जनमानसात इतकी खोल कशी काय रुजली असावी.

अशी भावना/अपेक्षा असणं ह्यात चूक ते काय?

पूर्वेत हा 'संस्कार' कसा काय आला असावा?

ह्या प्रश्नात "संस्कार" हा शब्द वापरला आहे ह्यातच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत... :)

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 9:11 am | प्रभाकर पेठकर

त्यांचे हे वागणे बाळावर ऋण, कर्ज असे नसते तर वंशसातत्य टिकून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या झालेली योजना फक्त.
ह्या वाक्यातील पुर्वार्ध मान्य होण्यासारखा आहे पण उत्तरार्ध कोरडा व्यवहार म्हणता येईल.
इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गाने माणसासाला शारिरीक दृष्ट्या सबळ बनविलेले नाही. प्राण्यांची पिल्ले लवकरात लवकर शारिरीक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी राहतात, मनुष्य बालक नाही. प्राण्यांची पिल्ले जन्मल्यापासून अल्पावधित स्वतःचे पोट भरण्यास लायक होतात. मनुष्याची बालके नाही. प्राण्यांची पिल्ले जन्मल्यापासून अल्पावधित 'स्वतंत्र' होतात मानवाच्या बालकांना 'स्वतंत्र' होण्यास कित्येक वर्षांचा काळ लागतो. प्राण्यांचा आयुष्यकाळ आणि त्याचा त्यांच्या बालसंगोपनाशी असलेला रेशो आणि माणसाचा आयुष्यकाळ आणि त्याचा बालसंगोपनाशी असलेला रेशो कदाचित थोड्याफार फरकाने सारखा असू शकेल पण माणसाला बालपणी सांभाळणं, त्यावर संस्कार करणं, त्यातून एक 'व्यक्तीमत्त्व' घडवणं, आणि त्याला स्वतंत्र करून सोडणं ही जितक्या वर्षांची जबाबदारी (साधारतः २५ ते २८ वषे?) आई वडीलांच्या डोक्यावर येते त्यामानाने आई वडील परावलंबी झाल्या पासून त्यांच्या अंतःकाळ पर्यंतच्या मुलांवर येणार्‍या जबाबदारीचा काळ फारच थोडा असतो. आईवडिलांनी मुलांचे केलेले संगोपन म्हणजे त्यांच्यावर केलेले ऋण नसते कारण तसे असते तर नोकरीला लागल्यावर आईला तिने पाजलेल्या दुधाची लिटरच्या भावात परतफेड करता आली असती, बापाने उचललेल्या आर्थिक जबाबदारीचेही मुल्यमापन करून परतफेड करता आली असती. शाळा-कॉलेजात आपण फी भरतो तरी पण आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यात, आपल्याला जगण्यासाठी सक्षम बनविण्यात शाळा-कॉलेजाचा असणारा सहभाग आपण फीच्या संदर्भात मोजत नाही. कृतज्ञतेचे मोल होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला व्यावहारीक रूप देता येत नाही. तसेच आईवडीलांचे म्हातारपणी करावयाचे संगोपन हे अशाच कृतज्ञ भावनेतून येते/यावे. त्यात कुठलाही व्यवहार किंवा आईवडीलांनी केलेल्या व्यवहाराची परतफेड म्हणता येणार नाही. तशी भावना असू नये ते कृतघ्नपणाचे होईल.

माणसाच्या बाबतीत, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तसे घडत नसल्याचे दिसते कारण मनुष्यबाळाचे संगोपन करायला आईवडिलांचे चार हात पुरेसे नसतात. आजीच्या मदतीची विशेष गरज असते.
पूर्वीच्या काळी नवरा-बायकोच्या वयात अंतर जास्त असायचे. नवरा हा बायकोपेक्षा ११-१२ वर्षांनी मोठा असायचा अर्थात तो बायकोच्या आधी हे जग सोडून जायचा. म्हणून पुरुषापेक्षा स्त्रीया अधिक काळ जगतात म्हणणे चूकीचे ठरेल. आजीच्या मदती इतकीच, जीवंत असतील तर, आजोबांच्या मदतीचीही गरज भासते. आजोबाही नातवांचे, शारिरीक वाढीला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक असे, भरपूर काही करीत असतात.

आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे.
१०० टक्के सहमत. त्या सांभाळण्यात भावनिक गुंतवणूक, आत्मियता, प्रेमाचा ओलावा, नवनिर्मितीचा आनंद आणि निर्मात्याच्या चरणी कृतज्ञतेची भावना असावी. व्यवहार कधीच नसावा.

पाश्चिमात्यांचे सोडा, पण आफ्रिकी आदिम संस्कृत्यांमध्ये देखील असे दिसत नाही. पूर्वेत हा 'संस्कार' कसा काय आला असावा?
इतर संस्कृतींचे माहीत नाही पण अरबस्थानात (मध्य पूर्वेत) वृद्धाश्रम पाहिले नाहीत. सर्वजणं आपल्या वृद्ध आईवडीलांची जबाबदारी आनंदाने पेलतात.

नीधप's picture

28 Sep 2008 - 10:22 am | नीधप

>>आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे.
१०० टक्के सहमत. त्या सांभाळण्यात भावनिक गुंतवणूक, आत्मियता, प्रेमाचा ओलावा, नवनिर्मितीचा आनंद आणि निर्मात्याच्या चरणी कृतज्ञतेची भावना असावी. व्यवहार कधीच नसावा.<<

हे नक्कीच पटलं. तात्विकदृष्ट्या ते योग्यच आहे. खरोखर आचरणात आणले गेले तर चांगलंच पण... खूप मुद्दे अडथळे होऊन बसतात मनात भावना असली तरी...
सर्वसाधारणतः इथे असे गृहित दिसतेय की हे मुलाचे आईबाप आहेत. त्यांचा सांभाळ करतानाचे अडथळे/ शक्यता बघूया.
१. याच रक्ताचं पाणी इत्यादी केलेल्या आईबापांनी स्वतः धडधाकट असताना सुनेला परक्यासारखेच वागवलेले असते. तेव्हा सुनेच्या मनात त्यांच्याविषयी कर्तव्य म्हणून त्यांचं बघायचं बाकी भावनिक बंध काही नाही असं असू शकतं. तेव्हा आपल्यासाठी काहीही न केलेल्या, किंबहुना त्रासच दिलेल्या या दोन म्हातार्‍यांना सांभाळणे हे तिला त्रासदायक वाटले तर तिचं काय चुकलं? इथे एक लक्षात घ्यायला हवं की कितीही झालं तरी या दोघांची जबाबदारी शेवटी सुनेवरच असते. मुलगा नामानिराळा असू शकतो. आणि जरा काही उन्नीसबीस झालं की सगळ्या पापाची धनीण सूनच असते. मुलगा नेहमीच बिचारा आणि चांगला असतो.
२. आम्ही तुम्हाला वाढवलं म्हणून आम्ही म्हणतो तसंच तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या आयुष्याचे निर्णय आम्हाला विचारून आमच्या संमतीनेच तुम्ही घेतले पाहिजेत हा आग्रह अनेक वृद्धांचा असतो. अगदी नातवंडं लग्नाला आली तरी मुलांच्या बाबतीत हा आग्रह असतो. कितीही कृतज्ञतेची भावना असली तरी शेवटी ह्या आग्रहाचा जाचच वाटतो. (आता म्हणाल आईवडिलांचं ऐकलं तर कुठे बिघडलं? पण आईवडील आणि मुलं यांच्यात कायमचं सुखासुखी मतैक्य कुठेही शक्य नाही हे सार्वत्रिक सत्य आहे.)
३. घरं छोटी आणि घरात आजीआजोबा, मुलगा-सून व नातू-नातसून अशी तीन तीन जोडपी असतील तर प्रत्येकाचाच कोंडमारा होणार. होतोच. यावर स्वतःचं घर झाल्याशिवाय लग्न करू नये पासून, त्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्यात आता त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या मनासारखंच सगळं झालं पाहिजे अश्या वरकरणी गोड गोड पण अव्यवहार्य सल्ल्यापर्यंत काहीही उत्तर येऊ शकतं.

प्रत्येक मुद्दा उदाहरणं घेउन पण बोलता येईल. पण ते सध्या राहूदे. पुढच्या पोस्टमधे मुलीचे आईवडील हा भाग लिहिते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 10:39 am | प्रभाकर पेठकर

आपण म्हणता ते ही घडते. पण माझे लिखाण हे 'जनरल' स्वरूपाचे आहे.
विशेष (स्पेसिफिक) केसेस मध्ये जमिन-आसमान इतके फरक असू शकतात हे मलाही मान्य आहे. मूळ विषयात 'आईवडीलांनी वाढविले' असा उल्लेख आहे म्हणून माझे लिखाण हे आईवडीलांसंबंधी आहे, सासू सासर्‍यांच्या बद्दल नाही.
आपल्या प्रतिसादावरही बरेच काही लिहीता येईल पण विषय भरकटत जाईल म्हणून मुख्य लेख आणि माझा प्रतिसाद ह्यावरच हा प्रतिसाद बेतलेला आहे.
धन्यवाद.

नीधप's picture

28 Sep 2008 - 10:57 am | नीधप

आईवडिल हेच सासूसासरे असतात ना. त्यामुळे तो भाग महत्वाचा ठरतोच. ती बाजू विचारात न घेता हा विषय चर्चिला तर आपण केवळ भावनिकच बोलत राहू.
आणि दुसरं म्हणजे मनात भावना असली तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी काय काय अडथळे असू शकतात एवढंच सांगतेय मी.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2008 - 2:05 pm | प्रभाकर पेठकर

याच रक्ताचं पाणी इत्यादी केलेल्या आईबापांनी हा 'इत्यादी' हा शब्द फार खोचक भावनेतूल लिहील्या सारखा वाटतो. चर्चेतील असे अनावश्यक शब्द चर्चा भरकटविण्यास कारणीभूत ठरतात. असो. त्या शब्दाकडे दुर्लक्ष्य करून सांगावेसे वाटते की, एक असते रक्ताचे नाते. दुसरे असते मानलेले नाते, सासूसासरे हे कायद्याचे नाते आहे. ( in-laws). हे नाते थोडेफार 'लादलेले' नाते असेही म्हणता येईल. इथे मने जुळली नाहीत (कोणाच्याही चुकीने) तर ती आत्मियता, ते भावनिक संबंध निर्माण होत नाहीत. मने जुळली नाहीत तर अगदी रक्ताच्या नात्यातही हिच समस्या उद्भवते. कित्येक सासवा सुनेसमोर आपलेच चालवतात तसेच त्या आया मुलालाही भावनिक ब्लॅकमेल करतात, त्याचाही छळ होतो. तिथेही आई-वडीलांना वृद्धाश्रमात पाठविले जाते.
कित्येक सासू-सासरे अति वृद्ध असतात. त्यांची मुलेही सेवानिवृती घेऊन पेन्शन वर जगत असतात. वृद्ध आईवडीलांच्या गरजा खूप वेगळ्या आणि सेवा करणार्‍याच्या शारीरिक क्षमतेची परिक्षा पाहणार्‍या असतात. अशा वेळी त्यांची देखभाल करण्यासाठी एक तर नर्स ठेवली जाते (कधी कधी २ नर्सेस ठेवाव्या लागतात.) किंवा त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं.

इथे एक लक्षात घ्यायला हवं की कितीही झालं तरी या दोघांची जबाबदारी शेवटी सुनेवरच असते. मुलगा नामानिराळा असू शकतो. आणि जरा काही उन्नीसबीस झालं की सगळ्या पापाची धनीण सूनच असते. मुलगा नेहमीच बिचारा आणि चांगला असतो.
असं कसं म्हणता येईल? एखाद दूसर्‍या केस मध्ये असे घडले असले तरी हे जनरलाईज करता येणार नाही असे मला वाटते. मुलावर संस्कार कसे झाले आहेत, त्याची मानसिक क्षमता काय आहे, त्याचे आपल्या पत्नी कडे पाहण्याचे दृष्टीकोन काय आहेत, ह्यावर त्याचे वर्तन ठरते. कित्येकांना दोघांचीही मने सांभाळावी लागतात. आई आणि बायको ह्या कात्रीत सापडल्यावर दोघींनाही रुचेल असा तोडगा काढणे ही तारेवरची कसरत असते. कारण दोघींनाही त्याने फक्त आपल्याबाजूनेच निर्णय द्यावा असे वाटत असते. त्याला जो मनस्ताप होत असतो तो कोण समजून घेतो? मनाविरूद्ध निर्णय झाला तर आई म्हणते, 'मेल्याला बायको काय आली , मी जड झाले' निर्णय बायकोच्या मनाविरूद्ध झाला तर बायको धुसफुस करून दाखवून देते, 'कितीही केलं तरी माझं मेलीच तुम्हाला पटायचंच नाही. लग्न कशाला केलं, करायची होती आईची सेवा श्रावण बाळासारखी, कोणी नाही म्हंटल होतं?' इ.इ.इ.

तेव्हा आपल्यासाठी काहीही न केलेल्या, किंबहुना त्रासच दिलेल्या या दोन म्हातार्‍यांना सांभाळणे हे तिला त्रासदायक वाटले तर तिचं काय चुकलं?
सुनेच्या मनात असा विचार येणे स्वाभाविक आहे. तिचे त्यात काय चुकले? काहीच नाही. पण त्याच बरोबर तिची भावजय आपल्या सासू-सासर्‍यांशी त्याच न्यायाने वागू पाहिल तर ह्या सुनेने तिलाही साथ दिली पाहिजे. स्वतःच्या आई-वडीलांना ठणकावून सांगितले पाहिजे की, 'तुमचे वागणे तुमच्या सुनेला पटत नाहीए. तुम्ही आयुष्यात तिच्या साठी काहीही खस्ता काढलेल्या नाहित तेंव्हा एक तर तिच्या तालावर नाचा नाहीतर वृद्धाश्रमात जाऊन राहा.' पण सहसा असे होताना दिसत नाही. ह्यापुढे जाऊन जेंव्हा ह्या सुनेला स्वतःची सुन येईल तेंव्हा तिचेही हिने आयुष्यात काहीच केलेले नसल्या मुळे तिला जर हिचा जाच वाटू लागला तर न बोलता गुपचुप वृद्धाश्रमात जायला हवे. असे होते का? नाही होत.
विषय खूप गहन आहे. माणसाच्या (स्त्री-पुरूष) स्वभावाचे जितके रंग आहेत तितक्या नाते संबंधात समस्या आहेत. नुसते सासू-सासरे आणि सुन नाही, तर अगदी आईवडील आणि मुलातही. सामंजस्य (दोन्ही बाजूंनी) हितावह ठरतं.

आता मुळ मुद्दा वृद्धाश्रम आवडत का नाही?
तरूणपणी शारीरिक ताकद खूप असते. सहसा व्याधी नसतात. स्नायू, हाडं थकून उठसूट तक्रार करीत नसतात. 'तू आयुष्याचय उतरणीवर लागला आहेस' असे आडूनही सुचवत नसतात. म्हातारपणी सगळं ह्याच्या उलट होतं. स्नायू शिथिल झालेले असतात, हाडं ठीसूळ झालेली असतात, सांध्यांमधील कुर्च्या फाटलेल्या असतात, वंगण संपलेलं असतं, इतकी वर्ष शारीरीक, आर्थिक, भावनिक जबाबदार्‍या उचलून, पार पाडून शरीर पिचलेलं असतं. पैलतीर दिसत असतं. समवयस्क मित्र-मंडळी, नातेवाईक एक एक करून साथ सोडून चाललेले असतात. 'संध्याछाया भिवविती मजला' अशी मनाची अवस्था असते. 'आता आपला नंबर जवळ आला आहे' ही भावना मनांत घर करून असते. ह्या वेळी काय हवे असते? मुलांची, सुनेची, नातवंडांची साथ, काही प्रेमाचे शब्द, 'तुमची अजूनही ह्या घराला गरज आहे' असा आपलेपणा. हे सर्व वृद्धाश्रमात मिळत नाही. आपल्याला परवडणारे वृद्धाश्रम म्हणावे तितके 'प्रेमळ' नसतात. तुम्ही पैसे भरता तेवढी विकतची सेवा मिळते, तिथले नोकरचाकर तुसड्यासारखे वागतात. हिडीसफिडीस करतात. 'आता आपण कोणालाही नको आहोत' हाच विचार सतत मनात घोळत राहतो. 'मृत्यूची वाट पाहात जगणारे जीव' ह्या स्लॉट मध्ये आपण आता पोहोचलो आहोत. आता नुसती 'वाट' पाहायची. ही भावना सुखकारी नसते.
सगळेच वृद्धाश्रम तसे नसतील पण 'आपल्याला परवडणारे' हे असेच आहेत. वृद्धाश्रमात सगळेच वृद्ध आणि म्हणून व्याधीग्रस्त असतात. प्रत्येकाच्या शारिरीक तक्रारी, मुलांविरूद्धच्या तक्रारी, सुनांविरुद्ध तक्रारी आणि हळू हळू मालवत जाणार्‍या ज्योती. सगळ्याच वृद्धांच्या मनात भीती निर्माण करतात. ह्या भीतीच्या वातावरणातच, दडपणाखाली आयुष्य अक्षरशः रेटावं लागतं.
म्हणून मला वृद्धाश्रम आवडत नाहीत.

ऍडीजोशी's picture

30 Sep 2008 - 6:55 pm | ऍडीजोशी (not verified)

सुनेने का सांभाळायचं, खरा भार सुनेवरच पडतो, सासू सुनेला मुलीचं प्रेम देते का असल्या फालतू नी भोंगळ स्त्रीमुक्तीवादी चर्चेतून बाहेर येऊया असं मला वाटतं. ह्यामुळे विषय भरकटत आहे. प्रत्येक गोष्टीला हे ठिगळ लावायची गरज नाहीये.

मुद्दा आई वडीलांनी व्रुद्धाश्रमात स्वखुशीने जावं की नाही हा आहे. मुलांनी आई वडीलांना सांभाळावं का हा नाही. मुळात तुमचं तुमच्या आई वडीलांवर प्रेम असेल तर असे बाष्कळ प्रश्न पडणारच नाहीत.

आमच्या सोसायटीत काही सार्वजनीक कुत्री आहेत. त्यांचे कुणी फार लाड करत नाही पण १६४ घरांपैकी रोज कुणी ना कुणी काही ना काही खायला घालतंच. आणि ह्याला जागून ती कुत्री सोसायटीचं रक्षण करतात. २ वेळा त्यांच्या भुंकण्यामुळे सोसायटी मधे घुसलेले चोर पळाले होते. सोसायटी मधे येणार्‍या संशयास्पद व्यक्ती, फेरीवाले, भिकारी, इतर भटके कुत्रे इत्यादींवर भुंकणे तर नेहेमीचेच. १-२ वेळा तर त्यांनी पावसाळ्या निघणार्‍या सापालाही मारलं होतं. आणि हे सगळं कुणीही न सांगता, न मागता.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Sep 2008 - 9:26 pm | प्रकाश घाटपांडे

ऍडीशी सहमत आहे. मुद्देसुद व कळीचे.
प्रकाश घाटपांडे

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Sep 2008 - 10:59 am | श्रीकृष्ण सामंत

प्रभाकर पेठकरजी,
आपल्या म्हणण्याशी मी संपूर्ण सहमत आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धम्मकलाडू's picture

29 Sep 2008 - 11:48 am | धम्मकलाडू


पूर्वीच्या काळी नवरा-बायकोच्या वयात अंतर जास्त असायचे. नवरा हा बायकोपेक्षा ११-१२ वर्षांनी मोठा असायचा अर्थात तो बायकोच्या आधी हे जग सोडून जायचा. म्हणून पुरुषापेक्षा स्त्रीया अधिक काळ जगतात म्हणणे चूकीचे ठरेल.

अतिशय चूक. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. Woman is built for endurance and man is built for performance. थोडक्यात स्त्रीची तुलना फोरस्ट्रोक गाडीशी करता येईल. तर पुरुषाची टूस्ट्रोक.
तूर्तास हा दुवा वाचा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर

माझी निरिक्षणे चुकीची असण्याची शक्यता आहे.

सखाराम_गटणे™'s picture

29 Sep 2008 - 10:37 pm | सखाराम_गटणे™

पेठकरांचे चुक नसुन, दोघांचेही बरोबर आहे.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.

यशोधरा's picture

28 Sep 2008 - 10:44 am | यशोधरा

सहमत पेठकर काका. स्वतःच्या आईवडिलांना सांभाळणे हे व्यवहार वाटण्याइतके जड का व्हावे?

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2008 - 9:48 pm | प्रकाश घाटपांडे

http://mr.upakram.org/node/828 हे आजच्या सुधारकचे मुखपृष्ठ आठवले.
प्रकाश घाटपांडे

रामपुरी's picture

28 Sep 2008 - 9:51 am | रामपुरी

"जीवशास्त्रीय दृष्टीने बघता..."
"सहसा सर्व जीवजातीत पुनरुत्पादनाची क्षमता संपली की मृत्यू येतो..."

इत्यादी वाक्यांवरुन असे ध्वनीत होते आहे कि माणूस आणि प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही. :) :)

(अजूनही माणूस असलेला आणि विचारशक्ती न गमावलेला) रामपुरी

एकलव्य's picture

28 Sep 2008 - 11:06 am | एकलव्य

चांगला विषयः थोडक्यात टिपण्णी ही अशी ...

माणूस हा मुळातच "अनैसर्गिक" प्राणी आहे.

निसर्गावस्थेत न वावरणारा हा एकमेव प्राणी असावा. अन्नधान्य नैसर्गिक अवस्थेपासून पार बदलून टाकून चमचमीत खाणारे असे आणखी कोणते प्राणी आहेत बरे? एकपत्नित्व/पतित्व हे निसर्गनियमानुसार आहेच याची मला खात्री नाही. प्राणिमात्र या जगातले आपले अस्तित्व मरणानंतर संपणार हे स्वीकारतात (सीरिअसलि! नो जोक्स अबाउट धिस!!) माणसे मात्र मरणानंतरच्या जगासाठी एकमेकाच्या जीवावर उठतात. वंशसंवर्धनासाठी "नैसर्गिक" समागमाची गरज तर केव्हाच ऑप्शनल झालेली आहे. आता क्लोनिंगच्या दुनियेत तर बालपणीच्या खस्ता काढण्याचीही गरज राहिलेली नाही. एकदम तरणीबांड पोरंपोरी समोर उभी राहतील... अगदी पाहिजे त्या रंगारूपातील आणि आकारातील.

सुखाच्या गादीवर न झोप येणारी अनैसर्गिकता माणसाकडेच आहे. म्हातारपणात आपल्या वयाच्या माणसांपेक्षाही नातवंडामध्ये रमण्यात पारंपारिक अर्थाने अनैसर्गिकता असेलही पण माणूस हा तसा जगावेगळा आहे हेच तर सत्य आहे.

बाकी गप्पा जाऊ द्या. पण बसमध्ये थोडे अडचणीत बसून दुसर्‍याला जागा द्यायची माणुसकी दाखविली तरी ह्याला जगात (निसर्गात) राहायची अक्कल नाही असा उध्द्दार घरीदारी होतो. आईवडिलांकडे पाहणे ही तर खूपच जगावेगळी गोष्ट झाली. वृद्ध आईबापाला कावडीत घालून नेणार्‍या श्रावणाला -- तेव्हाच्या आणि आत्ताच्याही -- नैसर्गिक व्यवहार कधी कळलाच नाही असेच जग म्हणत राहणार.

असो... ही तथाकथित "माणुसकी" कधी आणि केव्हा सुरू झाली हे मात्र सांगता येणार नाही हे खरेच.

लिखाळ's picture

29 Sep 2008 - 4:25 pm | लिखाळ

>>आता क्लोनिंगच्या दुनियेत तर बालपणीच्या खस्ता काढण्याचीही गरज राहिलेली नाही. एकदम तरणीबांड पोरंपोरी समोर उभी राहतील... अगदी पाहिजे त्या रंगारूपातील आणि आकारातील. <<
हे समजले नाही. माझ्या मते क्लोन हा समरुप असला तरी तो लहान बाळ म्हणूनच जन्मतो. माझा लोन मी ४० वर्षांचा असताना केला तर त्याच्या माझ्या वयात ४० वर्षे अंतर असेल. असा माझा समज आहे. चूभुद्याघ्या.

--लिखाळ.

जैनाचं कार्ट's picture

29 Sep 2008 - 4:39 pm | जैनाचं कार्ट (not verified)

बरोबर !

पण काही ठीकाणी वाचले होते की दवादारुचा वापर करुन त्यांची वाढ फास्ट करु शकने शक्य आहे !

**
विविध क्लोन चित्रपट पाहील्यावर मला पण हाच प्रश्न पडला होता ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रियाली's picture

28 Sep 2008 - 5:11 pm | प्रियाली

चर्चेचा विषय चांगला असला तरी अनेकांच्या पचनी पडण्याजोगा नाही असे वाटते. :)

पूर्वेत हा 'संस्कार' कसा काय आला असावा?

पूर्वेत हा संस्कार किंवा तडजोड नेमकी कधी आली ते लगेच सांगता येत नाही. विचार करावा लागेल. परंतु भारतीय संस्कृतीत गृहस्थाश्रम भोगल्यावर वनप्रस्थाश्रमात जाण्याची पद्धत होती. यावेळी घरातील वृद्ध आपल्या समवयस्कांसोबत वनात जाऊन उर्वरित आयुष्य व्यतीत करत. नातवंडांचे तोंड वगैरे बघून वनप्रस्थाश्रमात जाण्याची पद्धत होती असे वाटते. नंतर बहुधा, (असा प्राथमिक अंदाज, चू. भू. दे. घे) भारतात अशांतता, टोळीयुद्धे, परकीय आक्रमणे आणि यांच्या सोबत सती, बालविवाह इ. इ. सामाजिक बदल होऊ लागले तेव्हा कर्ता-सवरता मुलगा गेल्यावर, तितकासा वृद्ध न झालेला त्याचा पिता घर चालवू शकत असेल आणि आक्रमणांच्या भीतीनेही वनात जाऊन शांतीमय आयुष्य घालवणे कठिण झाले असेल. असे अनेक पैलू पुढे येतात.

सामाजिक परिस्थिती बदलत गेल्याने वृद्ध, कर्त्या मुलांवर अवलंबून राहू लागले. ज्या काळात त्यांना विश्रांतीची, निवृत्त होण्याची गरज आहे त्या काळात त्यांना नातवंडे, एकत्र कुटुंब इ. इ. बंधनात अडकून रहावे लागले. नातवंडांचे प्रेम खचितच असते आणि ते भारतीय संस्कृतीत अधिक असते आणि इतर संस्कृतीत कमी असते अशातला भाग नाही परंतु तरूण आईला लहान पोरामागे धावणे, त्याच्या वेळा सांभाळणे जेवढे शक्य आहे तेवढे त्याच्या आजीला ते सहज नाही ही जाणीव बहुधा भारतीय संस्कृतीत लोप पावत चालली आहे. याची कारणेही अनेक आहेत. जसे, बाई नोकरी करते, वडिल नोकरीसाठी परदेशी असतात म्हणून एकट्या बाईला आधाराची गरज लागते, भारतातील पाळणाघरांची सोय पाश्चिमात्य देशांएवढी अद्यावत नाही यापासून भारतातील वृद्धांची काळजी सरकार करत नाही किंवा आपल्याकडे मुलांवर, त्यांच्या शिक्षणावर आहे नाही ती पुंजी खर्च करण्याची पालकांची मानसिकता असते, अशी अनेक उदाहरणे समोर उभी राहतात.

सध्या वृद्धांवरील एक श्राव्य कादंबरी ऐकत होते. कादंबरी यथातथा असली तरी अमेरिकन वृद्धाश्रमांवर, तेथील कार्यपद्धतीवर बेतलेली आहे. वृद्धाश्रमाचे जितके फायदे-तोटे आहेत त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणावल्या त्या अशा -

वृद्धांच्या दृष्टीकोनातून

१. माणूस हा दिवसेंदिवस स्वार्थी होत चालला आहे. भौतिक आनंदाच्या गोष्टी (घर, प्रॉपर्टी, गाड्या, उपकरणे), त्यांवरील आपुलकी, अभिमान इ. इ. सोडून जाणे त्याला कठिण होत चालले आहे. जोपर्यंत "हे माझे आहे" ही भावना मनातून जाणार नाही तो पर्यंत वृद्धाश्रम आवडणार नाहीत.

२. वृद्धापकाळात आपल्या गाठीला पैसा असणे आणि आपण आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगू शकणे ही जाणीव त्यांना होत नाही तोपर्यंत.

३. हा एक महत्त्वाचा मुद्दा, वृद्धाश्रमात मृत्यूची जाणीव सतत होत असावी कारण समवयस्क लोकांतील अनेकांचे मृत्यू होत असतात. आपल्या घरात आपल्यासमोर मुलं-नातवंडं असताना ती जाणीव थोडी बोथट होत असावी परंतु वृद्धाश्रमात ती प्रकर्षाने जाणवत असावी. निवृत्तीनंतर नातवंडे सांभाळण्याची आवड+गरज नसेल तर समवयस्क मंडळींबरोबर राहण्यात मजा नाही का?
हो मजा आहे पण आपल्या समवयस्कांचे मृत्यू पाहत त्याच जागी राहणे आणि लवकरच आपलाही नंबर लागेल अशा चिंतेत राहणे कदाचित धोक्याचेही ठरू शकेल.

तरुणांच्या दृष्टीकोनातून

१. लोक काय म्हणतील? समाजात आपली छी: थू होईल का या भीतीतून वृद्धाश्रमाचा विचार लक्षात न घेणे.

२. मुलांकडे हक्काने आणि प्रेमाने पहायला, आपल्याला सल्ला द्यायला आई-वडिल हवेत. आई वडिलांनी आपल्याला खस्ता काढून वाढवलं ही जाणीव सतत "टोचत" राहणे.

वगैरे.

मला वाटतं की वृद्धाश्रम हाच पर्याय आहे असे नाही परंतु म्हातार्‍या आईवडिलांना सांभाळतो सांगून तरुणांच्या वरताण त्यांना कामाला लावायचे हाही पर्याय नाही. वृद्धांनी आपल्या गाठीशी पैसा बांधून ठेवणे, होईल तोवर स्वतःची कामे स्वतः करणे, जबाबदार्‍यांतून हळूहळू मुक्त होत राहणे, आपले राहून गेलेले छंद-आवडी जोपासणे, प्रवास करणे इ. केले पाहिजे. तरुणांनी आपल्या आई-वडिलांचा कल बदलण्याचा, त्यांच्या मानसिक आणि आर्थिक गरजा पुरवण्याचा, त्यांना अधिकाधिक स्वावलंबी राहू देण्याचा प्रयत्न करायला हवा.

वृद्धाश्रम हाच उपाय/ पर्याय असेल असे सांगता येत नाही परंतु प्रत्येक कुटुंबाने आपापल्यापरिने आपल्याला साजेसा उपाय शोधायला हवा. वृद्धाश्रम ही पसंती आणि सोय असणे उत्तम आहे, केवळ सोय होऊ नये असे वाटते.

कलंत्री's picture

28 Sep 2008 - 9:07 pm | कलंत्री

२०/२५ वर्षापूर्वी त्यावेळच्या वर्तमानपत्रात इच्छामरणावर काही लेख आले होते. त्यात लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यात आमच्या ज्येष्ठ बंधूनी उत्साहात एक लेख पाठविला होता आणि इच्छामरणाचे समर्थन केले होते. त्या लेखाचे शीर्षक होते "live and let die".

त्या लेखाची घरात आणि बाहेरही बरीच चर्चा झाली होती. त्या लेखाने आमचे वडिल २/४ दिवस बरेच अस्वस्थ झाले होते.

त्यामुळे कृपया प्रत्येकाने आपापले मतप्रदर्शन करताना काळजी घ्यावी. येथे काही ज्येष्ठ लोक आहेत आणि त्यांना या चर्चेचा त्रास होऊ शकतो म्हणून ही सूचना.

मराठी_माणूस's picture

28 Sep 2008 - 9:22 pm | मराठी_माणूस

आपल्या आई,वडिलाबरोबर रहाणे ह्यात मी फक्त निखळ आनंद अनुभवतोय ईतर गोष्टी नंतर

पत्नीच्याही भावना आपल्यासारख्याच आहेत का हे जाणून घ्या, तशा असतील तर उत्तम आहे, नसतील तर का नाहीत हे समजून घ्या आणि बदलण्याचा प्रयत्न करा!
लग्न होणार असेल तर लग्नानंतरही सर्व काही असेच राहू देत अशा शुभेच्छा!!

चतुरंग

विकेड बनी's picture

28 Sep 2008 - 9:54 pm | विकेड बनी

आपले आई-वडिलही असेच म्हणतात का?

आणि आपले लग्न झाले नसेल तर झाल्यावर, बायका पोरं झाल्यावरही आई वडिल हेच म्हणतील का? हे देखील माहित करून घ्या.

मीही माझ्या आई-वडिलांबरोबर सुखी आहे. आई सकाळी उठवते. चहा-नाश्ता देते. डबा करते. बाबा घड्याळ, पाकिट, रुमाल घेतलं का नाही ते विचारतात. बँकेची कामं असतील तर मी करून येतो सांगतात. संध्याकाळी घरी येतो तेव्हा आई खायला काहीतरी ठेवते. मग मी कट्ट्यावर जातो. परततो तेव्हा गरमा गरम जेवणाचं ताट आई समोर ठेवते. मग मी ताणून देतो, अरे हो, चादरी, उशांची कव्हरं धुतली का ते बघायला आई आहेच.

मी खरंच खूप सुखी आहे. आई-बाबा काय म्हणतात त्याची काळजी कशाला!

नीधप's picture

28 Sep 2008 - 11:13 pm | नीधप

हे असंच तुमच्या बायकोला(सद्य किंवा भावी) तिच्या आईवडिलांबद्दल वाटले तर? मग काय करायचे?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मृदुला's picture

28 Sep 2008 - 11:12 pm | मृदुला

त्याला स्वतंत्र करून सोडणं ही जितक्या वर्षांची जबाबदारी (साधारतः २५ ते २८ वषे?) आई वडीलांच्या डोक्यावर येते त्यामानाने आई वडील परावलंबी झाल्या पासून त्यांच्या अंतःकाळ पर्यंतच्या मुलांवर येणार्‍या जबाबदारीचा काळ फारच थोडा असतो

२८! सहसा २०/ २१ वर्षांच्या मुलांनी स्वतंत्र व्हायला सुरुवात करणे अपेक्षित आहे. दुसरे म्हणजे, ज्येष्ठांची जबाबदारी केवळ ते परावलंबी झाल्यानंतर येते हे वरच्या वाक्यात गृहीतक आहे. ती त्या आधीच येऊ शकते असे मला वाटते.

तसेच आईवडीलांचे म्हातारपणी करावयाचे संगोपन हे अशाच कृतज्ञ भावनेतून येते
... व्यवहाराची परतफेड म्हणता येणार नाही

कृतज्ञ = (दुसर्‍याने) केले त्याची जाण ठेवणारा/री. आईवडिलांनी आपले 'केले' आहे या भावनेतून त्यांचे संगोपन? की ते आपले आईवडिल आहेत; आपले आहेत या भावनेतून? इथे शब्दांची थोडी गल्लत झाल्यासारखी वाटते.
आईवडिलांनी संगोपन केले नाही; वार्‍यावर सोडले; व नंतर ते परावलंबी झाल्यावर आपल्या आश्रयाला आले तर काय करावे? (अशी तीन उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. दोनात मुलांनी आईवडिलांना स्वतःच्या घरात सांभाळले तर एकात त्यांची आश्रमात व्यवस्था केली.)

पूर्वीच्या काळी नवरा-बायकोच्या वयात अंतर जास्त असायचे. नवरा हा बायकोपेक्षा ११-१२ वर्षांनी मोठा असायचा अर्थात तो बायकोच्या आधी हे जग सोडून जायचा. म्हणून पुरुषापेक्षा स्त्रीया अधिक काळ जगतात म्हणणे चूकीचे ठरेल. आजीच्या मदती इतकीच, जीवंत असतील तर, आजोबांच्या मदतीचीही गरज भासते. आजोबाही नातवांचे, शारिरीक वाढीला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक असे, भरपूर काही करीत असतात.

प्राचीन काळी म्हणजे जेव्हा लग्न वगैरे गोष्टींचा शोध लागायचा होता तेव्हा विषयी मला म्हणायचे होते. :-) तेव्हा आजोबा, नवीन काका, आत्या तयार करण्यात किंवा युद्धात व्यस्त आहेत असे गृहित आहे.
सध्याच्या काळात आजीआजोबांना वेगवेगळे मोजायचे कारण नाही. दोघे सारखेच महत्त्वाचे.

मुलांनी आपला सांभाळ करावा ही भावना जनमानसात इतकी खोल कशी काय रुजली असावी.

अशी भावना/अपेक्षा असणं ह्यात चूक ते काय?

चूक किंवा बरोबर असा प्रश्न नाही. त्याचे बरेच तोटे आहेत असे मला वाटते इतकेच.
एक म्हणजे अशी भावना असल्याने, म्हातारपणी आपला संभाळ करायला एक तरी मुलगा हवा हा समज टिकून राहतो. त्यातून आणखी काय काय होते हे सविस्तर लिहिण्याची गरज नसावी.
दुसरे म्हणजे सध्याच्या काळात ते सहजशक्य होत नसल्याने आईवडिल आणि मुले दोहोंना कायमचे असमाधान, टोचणी राहते.

स्वतःच्या आईवडिलांना सांभाळणे हे व्यवहार वाटण्याइतके जड का व्हावे?

कोणतीही गोष्ट नियम म्हणून करायची म्हटली की अवघड वाटते. मुले व आईवडिल एका गावात रहात नसतील तर आईवडिलांना सांभाळणे म्हणजे त्यांना आपल्या गावी घेऊन जाणे (याला त्यांचा नकार असण्याची शक्यता, कारण त्यांचे मित्रमैत्रिणी, पाळेमुळे आपल्या गावी) किंवा मग त्यांच्या गावी आपली व्यवस्था करून घेणे (यात आपल्याजोगे काम न मिळाल्यास कमी क्षमतेचे, पगाराचे, मानाचे काम करणे इथपासून ते मुले आईवडिलांच्या घरात असल्याने मुलांच्या जोडीदाराबरोबर आईवडिलांचे खटके उडणे इथपर्यंत कुठल्याही गोष्टीने मनःशांती नष्ट होण्याची शक्यता.) यातला एक पर्याय निवडावा लागतो, म्हणूनही अवघड.

इत्यादी वाक्यांवरुन असे ध्वनीत होते आहे कि माणूस आणि प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही.

तसा प्रत्येक जीवजातीत थोडाथोडा फरक आहे. पण शेवटी माणूस, इतर प्राणी, वनस्पती एकाच मटेरियलचे बनलेले आहेत. :-) माणसाला त्याच्या मोठ्या आकाराच्या मेंदूमुळे जास्त तर्कसुसंगत विचार करता येतो, दुसर्‍याला काय वाटेल याचा जास्त चांगला अंदाज येतो, जास्त चांगले खोटे बोलता येते. पण या सगळ्या गोष्टी थोड्याबहुत प्रमाणात इतर प्राण्यांनाही येतातच.

एकपत्नित्व/पतित्व हे निसर्गनियमानुसार आहेच याची मला खात्री नाही.

बर्‍यापैकी आहे. यावर लिहायचे बरेच दिवस ठरवते आहे. माणसाचे प्रेमात पडणे इतर प्रेमात पडणार्‍या प्राण्यांसारखे टिकाऊ नसले तरी दीर्घ सहवासाने ते पुष्कळसे तुल्यबळ होते.

बाकी प्रियाली वा नीरजा यांचे प्रतिसाद आवडले.
आपल्या आपण घरी काय करावे हा प्रश्न आपापलाच सोडवावा लागणार हे तर आहेच. माझा प्रश्न / चर्चेचा मुद्दा हा वृद्धाश्रम हा विषय टॅबू का आहे असा आहे. आणि उपविषय पूर्वेकडे म्हातारपणी आपला संभाळ करायला मुलगे हवे असे समाजमन कसे तयार झाले असावे असा.

शेवटी

मृदूला ताइ .. तुम्ही वृद्धाश्रमाचं टिकीट फाडलंय अशी आशा करतो.

ते तर आहेच. :-)

अभिजीत's picture

28 Sep 2008 - 11:38 pm | अभिजीत

वृद्धाश्रम नावडते असण्याचे कारण मुख्यत्वे मुलांवर कृतघ्नपणाचा शिक्का येणे आणि वृद्धांवर 'अशी दुर्दैवी वेळ येणं' यात आहे.
पण मला वाटते हा केवळ भावनिक, संस्कार-संस्कृती, सुदैव-दुर्दैव वगैरेचा विषय नाही..

त्यामुळे 'याचे सोल्युशन श्रावण बाळाचे अवतारच सर्वत्र जन्माला आले की निघु शकेल' टाइप हट्ट धरणे किंवा 'आपल्या-त्यांच्या संस्कार-संस्कृती' कडेच बोट दाखवत राहणे ह्यातून फार काही निष्पन्न होइल असे वाटत नाही. हे प्रश्न याच्या पलिकडे जाउन मुळातून तपासून पाहिले पाहिजेत.

सध्या मध्यमवर्गातील नोकरी-पेशातुन रिटायर झालेल्यांचे साधारणपणे दोन भाग पाडता येतील. एक - जे चार पैसे गाठीशी सांभाळुन आहेत आणि दुसरे -जे आर्थिक दृष्ट्या त्यांच्या मुलाबाळांवर अवलंबुन आहेत.

पहिल्या प्रकारात त्यांचे आणि त्यांच्या घरच्यांचे कसे संबंध आहेत हा त्या त्या कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. यातले ढोबळमानाने चॉईस असे -
१) मुला-सुनेचे विचार यांना बर्‍यापैकी पटतात-त्यांना यांचे विचार बर्‍यापैकी पटतात/यांना घरात अजुनही ऍक्टिव रोल आहे/ नातवंडांची जमेल तितकी जबाबदारी घ्यायची आहे-घेता येते वगैरे लोक
किंवा
२) 'आम्ही आता आमच्या राहिलेल्या इच्छा-छंद जोपासणार', 'मुला-सुनेने आपापले बघावे'/ 'घरी आहोत म्हणून मुला-सुनेने कामाला लावु नये'/ 'मुला-सुनेचे पटत नाही-जमत नाही म्हणुन एकत्र नाही' वगैरे लोक.

यात दोन्ही पिढ्यांनी एकमेकाची गरज/स्वातंत्र्य ओळखले आहे आणि सुसंवादाचा मार्ग चोखाळला आहे.

दुसर्‍या प्रकारात मात्र आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने हे लोक स्वत:च्या मुला-बाळांकडे अपेक्षेने पाहत असतील तर त्यात अनैसर्गिक असे काहीच नाही. या लोकांपुढे याशिवायतरी काय ऑप्शन्स असतात? एक तर मुला-बाळांकडे अपेक्षा करा किंवा शेजार्‍या-पाजार्‍यांच्या भूतदयेवर दिवस काढा. पण मुला-बाळांनी ही जबाबदारी नाकारली तर मात्र हा विषय कौटुंबिक न राहता सामाजिक बनतो.

येथे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत; पहिली ही की, असे जवाबदारी नाकारणारे लोक 'हलक्या विचाराचे आहे'/'कृतघ्न आहेत' वगैरे बोलुन 'संस्कार-संस्कृतीच्या' मार्गे हा प्रश्न समजणार नाही/सुटणार नाहीत आणि दुसरी - जबाबदारी म्हणजे 'मानसिक, शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे/त्यासाठी लागणारा पैसा-वेळ खर्च करु शकणे'.

वाढते आयुष्यमान (भारताची लाइफ एक्स्पेक्टंसी सध्या ६६-६७ वर्षे आहे, ३०-४० वर्षापुर्वी ४०-४५ वर्षे होती असो), सुधारलेले राहणीमान (लाइफस्टाइल) आणि त्या अनुषंगाने वाढलेले खर्च-आकांक्षा वगैरेमुळे साठीच्या पुढे या वर्गाचे प्रश्न किचकट बनले आहेत. या वर्गाची हतबलता आणि त्यातून निर्माण होणार्‍या कहाण्या कारुण्याच्या-दुर्दैवाच्या-कृतघ्नतेच्या वगैरे (वृद्धांच्या, शेजार-पाजार्‍यांच्या मते) किंवा अपराधाच्या-निर्लज्जपणाच्या वगैरे (मुला-सुनांच्या मते) कितीही प्रकारच्या असल्यातरी आर्थिक स्वातंत्र्य नसणे हा मुद्दाच यात सर्वात प्रभावी घटक आहे.

सध्याच्या विकसीत देशांमधे दोन-तीन पिढ्यांपुर्वी हेच प्रश्न आले आणि काही प्रमाणात तरी यावर उपाय शोधण्यात यश मिळाले आहे. आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर कोणाला ना कोणावर तरी यांची जवाबदारी नक्कीच घ्यावी लागणार हे ओळखून, जबाबदार्‍यांचे वर्गीकरण करणे (वृद्धांच्या वैयक्तिक, मुला-सुनेच्या, सरकारच्या) आणि त्यानुसार उपाययोजना करणे हा मार्ग आपल्याला स्विकारावा लागेल.

आपला देश सध्या 'सर्वाधिक तरुण लोकांचा देश' म्हणुन मिरवतो आहे म्हणजेच २५-३० वर्षात आपण ' सर्वाधिक वृद्ध लोकांचा देश' म्हणून ओळखले जाउ. हे वृद्ध लोकांचं मार्केट जसे-जसे वाढत जाइल तसे-तसे आज 'रिवर्स मॉर्टगेज', 'रिटायरल इंशुरंस' सारखे खर्‍या अर्थाने 'म्हातारपणाची काठी असलेले' आर्थिक मार्ग भारतात अवतरतील, त्यांचे भारतियीकरण होईल आणि आर्थिक दृष्ट्या होणारी परवड व त्या अनुषंगाने येणारे कौटुंबिक प्रश्न तरी धसास लागण्यास सुरुवात होईल.

- अभिजीत

यशोधरा's picture

29 Sep 2008 - 12:23 am | यशोधरा

कोणतीही गोष्ट नियम म्हणून करायची म्हटली की अवघड वाटते. मुले व आईवडिल एका गावात रहात नसतील तर आईवडिलांना सांभाळणे म्हणजे त्यांना आपल्या गावी घेऊन जाणे (याला त्यांचा नकार असण्याची शक्यता, कारण त्यांचे मित्रमैत्रिणी, पाळेमुळे आपल्या गावी) किंवा मग त्यांच्या गावी आपली व्यवस्था करून घेणे (यात आपल्याजोगे काम न मिळाल्यास कमी क्षमतेचे, पगाराचे, मानाचे काम करणे इथपासून ते मुले आईवडिलांच्या घरात असल्याने मुलांच्या जोडीदाराबरोबर आईवडिलांचे खटके उडणे इथपर्यंत कुठल्याही गोष्टीने मनःशांती नष्ट होण्याची शक्यता.) यातला एक पर्याय निवडावा लागतो, म्हणूनही अवघड.

मुळात आई वडिलांची काळजी घ्यायची ते नियम किंवा व्यवहार म्हणून करायचे असे नसावेच, हे माझे मत. नियम झाला की अवघड वाटेल हे मान्यच, पण आपल्याच आई वडिलांची काळजी घ्यायचा नियम बनवावा लागत असेल, तर ते दुर्दैव म्हणायला हवे, आपले की आई वडिलांचे हे मी अजून ठरवू शकत नाही... केवळ आपल्या घरी/ गावी घेऊन जाणे म्हणजे सांभाळणे किंवा काळजी घेणे नव्हे. एका घरात राहून बेबनाव असू शकतात तसेच साता समुद्रापलिकडे असलेले आपले अपत्य गरज पडली तर आपल्यासाठी केव्हाही धावत येईल हा विश्वास ज्या आई वडिलांच्या मनात त्यांच्या वृद्धापकाळात असेल, त्यांच्या मुलांनी / मुलींनी जिंकलय एवढेच म्हणावेसे वाटते.

प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या तसेच प्रत्येकाला कशाचे महत्व वाटेल हेही व्यक्तीसापेक्ष बदलेलच ना?? वृद्धापकाळात आपली पाळेमुळे सोडायला वृद्ध लोक तयार नसतात याचे कारण अडवणूक यापेक्षा अनोळखी वातावरणात, नव्या ठिकाणी आपण तग धरु शकू का ही भीती असायचीच शक्यता जास्त. त्यात काही वावगे असेल का? एखाद्याला आई वडिलांच्या सोबत राहून त्यांची साथ संगत करणे हे अधिक क्षमतेच्या कामापेक्षा अथवा पगारापेक्षा जास्त महत्वाचे वाटू शकते, वाटावेच असे म्हणत नाही. ही उदाहरणेही पाहिली आहेत. शेवटी प्रत्येकाची विचार करायची पद्धत.

तसेच, मुलाच्या जोडीदाराबरोबर खटके कधी उडतील? सुनेचे उदाहरण बघू. सूनेचे सासू सासर्‍यांशी खटके का उडतात, तर मधे असलेला नवरा आणि सासू सासर्‍यांचा मुलगा बोटचेपं धोरण स्वीकारुन दोन्ही डगरींवर हात ठेवतो, यासाठी. अर्थात हे माझं मत. आपल्या आई वडिलांच चुकत असेल तरीही कदाचित तो त्यांना सांगत नाही, कारण त्याला बायल्या म्हटले जाईल याची भीती त्याला असते. बायको त्यामानाने सोपी, नवरा म्हणून हक्क आहेच, जाते कुठे? हा अपमान सुनेच्या मनात राहत नसेल का? तो मग खटक्यांच्या रुपात बाहेर पडत असावा का?

आणि असेही धरुन चालू की सर्वच नाती आलबेल आहेत, तरीही कधीतरी चार माणसे एकत्र असली की खटके उडतीलच ना?? पण तेच लावून धरुन मनःशांती ढळवायची की भले बुरे जे घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर म्हणत परत एकत्र यायचे, आणि एकमेकांची ओळख जपायची हे आई वडिल आणि मुलं ह्या दोघांच्या हातात असू शकतं.

दोन्ही पिढ्यांना एकमेकांविषयी आस्था असेल तर एकमेकांची काळजी घेणं कदाचित काही मर्यादांमुळे ( दूर असणे वगैरे) जरा कठीण असू शकतं , पण अशक्य नसावं आणि व्यवहार सदृश अथवा नियमात बांधून जाणारं नसावं, असं वाटत. असो.

वैशाली हसमनीस's picture

29 Sep 2008 - 12:50 pm | वैशाली हसमनीस

मूळ लेख व त्यावरील एवढ्या प्रतिक्रिया वाचून आमच्यासारख्या वयस्क लोकांना मला एवढेच सांगावेसे वाटते की त्यानी आपली मुले,सूना,मुली, जावई कितीही चांगले वागत असतील तरीही वृध्दाश्रमात जाण्याची मानसिक तयारी ठेवणे आवश्यक आहे.प्रत्यक्ष वेळ येवो न येवो,आनंदाने जाण्याची तयारी दाखवावी.पण त्यासाठी स्वतः कडे थोडेसे डिटॅज्ड होऊन पहावे लागेल.सूनेच्या व मुलाच्या ठिकाणी आपल्याला ठेवून पहावे लागेल.तसे केल्यास फारसे प्रॉब्लेम्स येणार नाहीत असे वाट्ते.

>>आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे. <<
सर्वप्रथम असे म्हणावेसे वाटते की जीवशास्त्रीय दृष्ट्या काय आहे हे पाहताना फक्त सर्वसामन्य निष्कर्ष काढुन चालत नाही. ऍनिमल बिहेवियर सायन्स या नावाची जीवशास्त्रात एक शाखा आहे. म्हणजेच प्राण्यांचे वागणुक शास्त्र ! यामध्ये प्राणी जसे वागतात ते तसे का हे अभ्यासले जाते. हे आपणाला माहित असेलच. ते जे काही वागतात ते नैसर्गिकच असते फक्त त्याचे निरिक्षण केले जाते. या तर्‍हेने माणसाबद्दलची आपली मते ही अनैसर्गिक सदरात आपणाला टाकता यायची नाहित. माणुस हा प्राणी आहे असे मानून त्याचे सर्व व्यवहार हे नैसर्गिकच मानावे लागतात.

आपण वरील वाक्यात वापलेला व्यवहार हा शब्द मी घडामोड या अर्थी स्विकारला. म्हणजे मानसिक व्यवहार, शारीरिक व्यवहार, सामाजिक व्यवहार या अर्थाने. त्यामुळे मला तो अक्षेपार्ह वाटला नाही.

मानवी समाजात कोणी कुणाला किती वर्षे संभाळावे हे समाजातील रीतिंनुसार ठरते आहे. मुलांना आई-बापाला संभाळायचे नसेल तर आई-बापाने असल्या मुलांच्या लाथा खाण्यापेक्षा वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा हा धोपट मार्ग आहे. पण नव्या रचनेमध्ये आपण म्हणता तसे समवयस्कांत राहण्याचा आनंद, वृद्धांसाठी खास सोयी असलेली जागा, या सारख्या फायद्यासाठी कुणाला तेथे राहायचे असेल तर त्यांचा निर्णय इतरांनी स्विकारावा हे बरोबर. शेवटी कुणी कुठे राहायचे या सारखे प्रश्न पैसा, श्रम करण्याची तयारी, जिव्हाळा यावर अवलंबून असतात.

--लिखाळ.

भास्कर केन्डे's picture

30 Sep 2008 - 1:46 am | भास्कर केन्डे

चर्चा चांगली चालली आहे. पण एक मुद्दा जरा बाजूला रहात आहे.

चर्चेच्या मूळ मसुद्यात वृद्धाश्रमांची तुलना तरुणपणी मित्रांसोबत राहण्यासोबत केली आहे. ते काही पटत नाही.

तरुणपणी जग पाहिलेले नसते. बहेरच्या जगाबद्दल औत्सुक्य असते. त्यामुळे बाहेर रहायला तरुण मने तयार असतात. या वयात नवीन काही शिकण्याची, करण्याची उर्मी असते तशी शरिराची साथही असते. वृद्धांचे याच्या उलट आहे. जन्मभर संसाराच्या गाड्यात राहिल्यामुळे त्यांना वर्षानुवार्षांची ही सवय मोडून अज्ञात वृद्धांच्या संगतीत जाऊन राहणे (अन मृत्यूची वाट पाहणे) हे अवघड वाटते.

आपला,
(सजीव) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विजुभाऊ's picture

30 Sep 2008 - 5:04 pm | विजुभाऊ

महाविद्यालयीन वयात घराबाहेर मित्रांत राहण्यात येते तशी मजा पुन्हा घ्यायची संधी वृद्धाश्रमात येणार नाही का?
नाहेच येणार. महाविद्यालयीन वयात मित्राम्बरोबर करतो तशी गम्मत केली तर लोक जवांदिल च्या ऐवजी हिरवट म्हणतात.
म्हातारपणी बरोबरच्या म्हातारीला डोळा मारता येत असेल तर त्याना आनन्द येतो.
व पुं चे सखी पुस्तकातील झकासराव वाचा.
वृद्धाश्रम म्हणजे काय ते समजेल.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत