ज्या आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी मुलांनी घ्यायची की नातेवाईक-मित्रमंडळींनी?या तात्यांच्या एका प्रतिक्रियेतून ही चर्चा सुरू कराविशी वाटली. जीवशास्त्रीय दृष्टीने बघता, आईवडिलांनी, इतकेच नव्हे तर आजी आजोबा, काका, आत्या, मामा, मावश्या अश्या सगळ्या नातेवाईकांनी बाळाचे संगोपन करणे माणसाच्या जातीला नैसर्गिक आहे. आईवडील आणि आजीआजोबा हे यात महत्वाचे. वेळप्रसंगी बाळासाठी प्राण पणाला लावू शकतील असे. त्यांचे हे वागणे बाळावर ऋण, कर्ज असे नसते तर वंशसातत्य टिकून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या झालेली योजना फक्त. सहसा सर्व जीवजातीत पुनरुत्पादनाची क्षमता संपली की मृत्यू येतो. माणसाच्या बाबतीत, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तसे घडत नसल्याचे दिसते कारण मनुष्यबाळाचे संगोपन करायला आईवडिलांचे चार हात पुरेसे नसतात. आजीच्या मदतीची विशेष गरज असते. शिवाय प्राचीन काळात माणसाची स्मृती हेच एकमेव ज्ञान साठवण्याचे साधन होते तेव्हा ज्ञानवृद्ध लोक ज्या त्या टोळीच्या टिकून राहण्यासाठी (सर्वाय्वलसाठी) आवश्यक असत. त्या दृष्टीने वृद्धांचे संगोपन ही कायम सामाजिक (=टोळीची) जबाबदारी ठरते. आईबापांनी मुलांना वाढवले, म्हणून आता मुलांनी त्यांना सांभाळायचे असा व्यवहार अनैसर्गिक आहे. भावनिक दृष्टीने बघता, निवृत्तीनंतर नातवंडे सांभाळण्याची आवड+गरज नसेल तर समवयस्क मंडळींबरोबर राहण्यात मजा नाही का? महाविद्यालयीन वयात घराबाहेर मित्रांत राहण्यात येते तशी मजा पुन्हा घ्यायची संधी वृद्धाश्रमात येणार नाही का? (हा माझा या चर्चेत मुख्य प्रश्न / मुद्दा आहे.) दुसरे म्हणजे, मध्यंतरी मुंबई विद्यापीठात कोणी असा प्रबंध सादर केला होता (असे लोकसत्तेत वाचले) की झोपड्यांत राहणार्या लोक सरासरी सहा मुले होऊ देतात. कारण म्हातारपणी कोणी सांभाळ करायला हवे म्हणून. सहा असे, की सांभाळ करायला मुलगाच हवा. एखादा व्यसनी होईल, एखादा हाताशी यायच्या आधीच मृत्यूमुखी पडेल, म्हणून बॅकप असावा म्हणून तीन मुले; ती होता होता ५०/५० शक्यतेने तीन मुली! मुलांनी आपला सांभाळ करावा ही भावना जनमानसात इतकी खोल कशी काय रुजली असावी. पाश्चिमात्यांचे सोडा, पण आफ्रिकी आदिम संस्कृत्यांमध्ये देखील असे दिसत नाही. पूर्वेत हा 'संस्कार' कसा काय आला असावा?
वाचने
12957
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते.
अरे बापरे
विषय चांगला पण....
मला वाटते.
मला वाटते.
त्यांचे हे
टोळी...
सहमत.. पण...
In reply to टोळी... by प्रभाकर पेठकर
शक्य आहे...
In reply to सहमत.. पण... by नीधप
आईवडिल हेच
In reply to शक्य आहे... by प्रभाकर पेठकर
सासू-सासरे...
In reply to आईवडिल हेच by नीधप
पेठकर काकांशी सहमत
In reply to सासू-सासरे... by प्रभाकर पेठकर
ऍडीशी सहमत
In reply to पेठकर काकांशी सहमत by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
शंभर टक्के सहमत
In reply to टोळी... by प्रभाकर पेठकर
अतिशय चूक
In reply to टोळी... by प्रभाकर पेठकर
शक्य आहे...
In reply to अतिशय चूक by धम्मकलाडू
पेठकरांचे
In reply to शक्य आहे... by प्रभाकर पेठकर
सहमत पेठकर
यावरुन आठवले
In reply to सहमत पेठकर by यशोधरा
माणूस आणि प्राणी
अनैसर्गिक
समजले नाही
In reply to अनैसर्गिक by एकलव्य
बरोबर ! पण
In reply to समजले नाही by लिखाळ
वनप्रस्थाश्रम
कृपया काळजी घ्या.
आनंद
आपले लग्न झालेले असेल तर आपल्या
In reply to आनंद by मराठी_माणूस
आपले आई-वडिल
In reply to आनंद by मराठी_माणूस
हे असंच
In reply to आनंद by मराठी_माणूस
काही उत्तरे
केवळ भावनिक विषय नाही ..
कोणतीही
मानसिक तयारी ठेवावी
अनिसर्गिक असे काहिच अस्तित्वात नाही !
रोपटे वि. झाड
महाविद्या